Submitted by नंदिनी on 20 April, 2009 - 05:42
जुन्या मायबोलीवरचे काही फारच मजेदार बीबी होते. त्यापैकी हा एक!!
http://www.maayboli.com/hitguj/messages/644/104457.html?1225138364
कुणाचे असेच काही गमतीशीर अनुभव असतील ते इथे टाका...
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
काय पण लिहिते ही LP >> का?
काय पण लिहिते ही LP
>>
का? वेंधळेपण हा जळी स्थळी काष्ठी पाषाणी कुठेही होउ शकतो
लले,लगे हाथो आंघोळही उरकून
लले,लगे हाथो आंघोळही उरकून घायचीस
(No subject)
वेंधळेपण हा जळी स्थळी काष्ठी
वेंधळेपण हा जळी स्थळी काष्ठी पाषाणी कुठेही होउ शकतो >>>
लले, तोषा
लले, तोषा
लले... मग आंघोळही उरकुन
लले... मग आंघोळही उरकुन टाकलेस्किकॉय ?
लले, मामी
लले, मामी
मग आंघोळही उरकुन टाकलेस्किकॉय
मग आंघोळही उरकुन टाकलेस्किकॉय ? >>> हो बहुतेक! तेव्हा काहीच वेंधळेपणा झाला नाही म्हणून आता आठवत नसेल बहुतेक
ललिता
ललिता
लले.... हहगलो:
लले....
हहगलो:
लल्र
लल्र

आंघोळीवरून आठवलं..... आज
आंघोळीवरून आठवलं..... आज सकाळी आंघोळीसाठी कोमट-गरम पाणी असलेल्या बादलीशेजारी गार पाण्याची बादली होती. मी तंद्रीत गार पाण्याने आंघोळ केली आणि मग लक्षात आले की अर्र.... कोमट पाणी तसेच राहून गेले की!
ललीता-ताई... अामच्या बाथरूम
ललीता-ताई...
अामच्या बाथरूम मधे जो नॅाब अाहे तो डावी कडे पीळला कि नळातुन पाणी अाणी उजवीकडे पीळला कि शॅावर. अाजी बाथरुम मधे गेली की नेमकी उलटी कडे फिरवते. दिसेल त्याला शिव्या...काय रां...चे हल्लीचे नळ...पोरा-टोरानी तिला बरोब्बर उलट सांगितलय हे नंतर कळाल...
सकाळीच तोंड धुतल्यावर टॉवेलला
सकाळीच तोंड धुतल्यावर टॉवेलला न बघता तोंड पुसलं.. कामवाल्या बाईने काल आवरताना टॉवेल धुवायला टाकून तिथे पायपुसणं वाळत घातलं होतं
काय (पाय) तरी पुसायचं होतं नं
काय (पाय) तरी पुसायचं होतं नं ... झालं तर मग

@girishvg >> रां...चे , हा
@girishvg >> रां...चे , हा खास ठेवणीतला कोल्हापुरी शब्द का?
मागच्या आठवड्यात गाडी ऑन केली
मागच्या आठवड्यात गाडी ऑन केली आणि नवर्याला एक सीडी हवी होती ती द्यायला घरात गेले. परत आल्यावर गाडीची चावी शोधतेय सगळीकडे. गाडीखाली पडली की काय म्हणून खाली वाकून बघितले. सीडी द्यायला घरात गेले तेव्हा सोफ्यावर ठेवली असावी म्हणून बघायला परत घरात जात होते. पायर्या चढताना गाडीचा हेड लाइट ऑन आहे दिसले आणि लक्षात आले चावी कुठे आहे
संगणकाशी संबंधित
संगणकाशी संबंधित मल्टि-टास्किंग करताना माझा खूप म्हणजे खूप गोंधळ उडतो! म्हणून मग मी एका वेळेस एकच काम शक्यतो करते. गाणी ऐकत ईमेल चेक करणे किंवा आंतरजालात भटकणे जमते, पण एकाच वेळी ते चॅटिंग, ईमेल्स, गाणी, ब्राऊजिंग वगैरे काही मला जमत नाही आणि कधी चुकून असे करावे लागले की एकच घोळ होतो!!!
परवा रात्री उशीरा खूप उकडत होते, झोप येत नव्हती, म्हणून मग टाईमपास म्हणून आंतरजालावर भटकत होते आणि त्याच वेळी हेडफोन्स लावून वडाली ब्रदर्स ची गाणी ऐकणे चालले होते. मला आलेले एक ईमेल मी माझ्या बर्याच नातेवाईकांना त्याच वेळी फॉरवर्ड केले. झाले!!! क्षणात अमेरिकेतला मावसभाऊ जी टॉक वर मला एवढ्या रात्री काय भुतासारखी जागत बसलीस म्हणून पिंग करु लागला. त्याच वेळी तिथल्या बहिणीनेही ईमेल पाहिले व मला मोबाईलवर फोन केला, काय गं, अजून झोपली नाहीस का ते विचारायला.... दुसरी मावसबहीणही जी टॉकवर अवतरली व मला पिंग करू लागली. मी इतकी गोंधळले की कानावर हेडफोन्स आहेत हे लक्षात न घेताच मोबाईल एका हाताने कानाला चिकटवला, तिथे मोबाईलवर बहीण मी उत्तर का देत नाहीए म्हणून ठो ठो करत होती, इकडे दोन मावसभावंडे पिंग करत होती, मी डाऊनलोडला लावून ठेवलेले एक गाणे अजून पुरते डाऊनलोड झाले नव्हते..... वडाली ब्रदर्स मस्तपैकी भन्नाट गात होते...... काय करावे नक्की हे सुचेचना..... आणि मग झाली धांदरटपणाची कमाल!! उजव्या हाताने सर्व विंडोज खटाखट बंद केल्या. डाऊनलोडचे गाणे बंद पडले. जीटॉक बंद, जीमेल बंद, गूगल बंद, गाणी बंद असे करत करत कॉम्प्युटरपण बंद केला अनवधानाने आणि डाव्या हाताने बहिणीचा कॉल घेण्याऐवजी मोबाईलचे कॉल डिस्कनेक्टचे बटण दाबले........ अरारारारारा..........
अजूनही त्यावरून भावंडांचे बोल ऐकत आहे.........!!!
पायपुसणं अरुंधती, सगळा गोंधळ
पायपुसणं
अरुंधती, सगळा गोंधळ अगदी डोळ्यांसमोर उभा राहिला
मी ही कंप्युटरवर एका वेळेला अनेक गोष्टी नाही करू शकत.
अरु....
अरु....

पायपुस्ण्याने तोंड

आणि मग टॉवेल ने काय ....
परदेसाई
परदेसाई
पायर्या चढताना गाडीचा हेड
पायर्या चढताना गाडीचा हेड लाइट ऑन आहे दिसले आणि लक्षात आले चावी कुठे आहे अ ओ, आता काय करायचं>>>:):):)
चाबी शोधणे ..अतिशय आवडता छंद.. हे एकदा मी हि केले आहे . एकदा तर बाहेर बर्फ पद्याला उत आला होता ..जबरी थंडी .. आणि मो शोधतेय चावी काही केल्या सापडेना शेवटी गाडीत जावून बसले थंडी ने हात गारठले म्हणून.. पोर आणि ग्रोसरी गाडीत ठेवून बराच वेळ शोधते .. तर माझ्या नेहमीच्या वेन्धालेपणाला कंटाळून जाणीव पूर्वक driving सीत वर चावी ठेवली होती जेणे करून शोधासोध नको.. आणि तेच विसरले.. गपचूप खाली हात घालून गाडी सुरु केली ..
काल संध्याकाळी घाईघाईत बाहेर
काल संध्याकाळी घाईघाईत बाहेर पडताना मनगटावर घड्याळ उलटं घातलं. उलटं म्हणजे ६ च्या जागी १२ असं. घालताना काहीतरी वेगळं जाणवलं, पण मी त्यावर फारसा विचारच केला नाही.
बाहेरची ३-४ कामं उरकून घरी परतले. गाडी पार्क करताना वाटलं - फार उशीर तर नाही ना झाला आपल्याला; म्हणून घड्याळ बघितलं. तर त्यात पावणे आठ ऐवजी सव्वा दोन वाजलेले! तेव्हा लक्षात आलं.
(रस्ताभर मी एकदाही घड्याळ बघितलं नव्हतं. मग मुळात घातलंच कशाला? हा प्रश्न मला आत्ता हे टायपताना पडला :फिदी:)
ललिता..आई ग!!
ललिता..आई ग!!

ललिता धमाल आहेस तू म्हणजे..
ललिता धमाल आहेस तू म्हणजे..
चष्मा सापडेना बराच
चष्मा सापडेना बराच वेळ....
बर्याचदा दुसर्या फोनवरून रिंग द्यायला हात शिवशिवत होते
<<<चष्मा सापडेना बराच
<<<चष्मा सापडेना बराच वेळ....
बर्याचदा दुसर्या फोनवरून रिंग द्यायला हात शिवशिवत होते <<<
अय्या तुझ्या चष्म्याची रिंगटोन वाजते का ?

नाही हो , पन फोन शोधतानाची
नाही हो , पन फोन शोधतानाची सवय एवढी अंगवळणी पडलीय की काहीही शोधताना हात शिवशिवतात....:)
आजचा माझा प्रताप
आजचा माझा प्रताप सांगते.
म्हणलं काय झालं पाहू मग मधला कप्पा उघडून जॅमच्या बॉटलचं झाकण चेक केलं, घट्ट होतं. (बरोब्बर नेम धरून दुसरं चेक केलं नाही.) 

ऑफिसला २ कंटेनर भरून ताक आणते. एक जुनी जॅमची बॉटल (घट्ट झाकण आहे म्हणून) आणि दुसरा अर्ध्या लिटर चा टपरवेअर.. बसमध्ये इकडे तिकडे डोलतात म्हणून हे दोन्ही कंटेनर मी पर्स मध्ये ठेवते. आज टपरवेअर चे झाकणच लावले नव्हते. पर्सच्या मधल्या कप्प्याने ताकात अंघोळ केली... बस मध्ये बसले आणि ड्रेस ओला..
पैसे, कॉस्मेटिक्स, कार्ड, सगळ्या गोष्टींना ताकाने अभिषेक झाला
बस मध्ये माझ्या सीटपासून सगळे ओघळ पाहून लोकांचा गैरसमज...
मग पर्स मांडीवरची उचलून सरळ मधल्या पॅसेज मध्ये ठेवून दिली....
मग पर्स मांडीवरची उचलून सरळ
मग पर्स मांडीवरची उचलून सरळ मधल्या पॅसेज मध्ये ठेवून दिली....
>>
जाऊ दे , बूंदसे गयी वो हौजसे नही आती
Pages