Submitted by नंदिनी on 20 April, 2009 - 05:42
जुन्या मायबोलीवरचे काही फारच मजेदार बीबी होते. त्यापैकी हा एक!!
http://www.maayboli.com/hitguj/messages/644/104457.html?1225138364
कुणाचे असेच काही गमतीशीर अनुभव असतील ते इथे टाका...
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
बस मध्ये माझ्या सीटपासून सगळे
बस मध्ये माझ्या सीटपासून सगळे ओघळ पाहून लोकांचा गैरसमज...
<<<<<<
गैरसमज कसला सहीच समज झाला असेल त्यांचा
टोणग्या
टोणग्या
दक्षे काल नविन धडा मिळाला.
दक्षे
काल नविन धडा मिळाला.
वर मी विचारतेय कोण बोलतेय?
घरी आईला फोन लावायचा होता. ११ नंतर ५० पैसे कॉलिंग आहे(दक्ष गृहिणी). आणि माहेरी 'रात के बारा बजे दिन निकलता है' परिस्थिती. म्हणजे आम्ही १२:३० ल वगैरे झोपत असू. लावला फोन. home डिस्प्ले झाले मोबाईलवर. पलीकडून झोपाळू आवाज "काय गा(बाई चिडल्या की ग आकारान्त होतो), इतक्या रात्री का फोन केलास" म्हटले राँग नंबर लागला की काय? विचारले "क कोण बोलतेय?" पलीकडून "झोप आता."
मग लक्षात आले. नवर्याच्या मोबाईलवरुन फोन लावतेय. साबांनी फोन उचललेला. त्या पहाटे ५ वाजता उठतात. गाढ झोपल्या असणार बिचार्या
पुन्हा म्हणून ११ नंतर फोन लावणार नाही. दुप्पट बिल आले तरी चालेल.
पनू मला तर आधी वाटलं तू
पनू
मला तर आधी वाटलं तू स्वतःच्याच घरी तर नाही ना फुनवा लावलास! 
पने... काय बाई आहेस गं!
पने...
काय बाई आहेस गं!
<<११ नंतर ५० पैसे कॉलिंग आहे(दक्ष गृहिणी). <<<नवर्याच्या मोबाईलवरुन फोन लावतेय<<
अति दक्ष गृहिणी!
home डिस्प्ले झाले मोबाईलवर.
home डिस्प्ले झाले मोबाईलवर. >>> पने लग्नाला ईतके दिवस झाल्यावर पण तु सासरला स्वतःचे घर न मानता माहेरला स्वतःचे घर माणतेस
कुठे फेडशील ही पापे

लले
पने
पने
कुठे फेडशील ही पापे
कुठे फेडशील ही पापे
खुप दिवसाने इथे आले, काय एक
खुप दिवसाने इथे आले, काय एक एक भन्नाट किस्से आहेत

हा बर्याच वर्षांपूर्वी
हा बर्याच वर्षांपूर्वी केलेला वेंधळेपणा आहे!
माझ्या एका मित्राचे लग्न होते. पुण्यातील कोथरुडमधील एक प्रसिध्द कार्यालय आहे तिथे हे लग्न होते. मी व माझे अजून काही दोस्त लोक लग्नाच्या मुहूर्ताच्या अगदी काही मिनिटे आधी धापा टाकत कार्यालयात थडकलो. तिथे वेगवेगळ्या मजल्यांवर वेगळे मॅरेज हॉल्स होते. आम्ही मित्राचे लग्न कोणत्या हॉलमध्ये आहे हे न पाहताच जिन्याने पहिल्या मजल्यावरच्या हॉलमध्ये गेलो. मंगलाष्टके चालली होती, सर्व निमंत्रित उभे राहून अक्षता फेकण्याचे काम प्रामाणिकपणे करत होते. आम्हीही जवळच ठेवलेल्या ताटातून मूठ मूठ अक्षता घेतल्या व जीवाच्या कराराने, जीव खाऊन मित्राच्या डोक्यावर नेम धरून अक्षतांचा मारा सुरु केला.
लग्न लागल्यावर जरा आजूबाजूला पाहिले तर कोणीच ओळखीचे दिसेना.... मित्राचे अभिनन्दन करायला रांगेत उभे राहिलो तेव्हा एकाचे लक्ष ''मित्राच्या'' चेहर्याकडे गेले आणि तो उडालाच..... कारण तो नवरदेव आमचा मित्र नव्हताच मुळी!! मग आम्ही उशीराने प्रवेशद्वारावरचा फलक वाचला......... आणि तिथून धूम ठोकली....
दुसर्या मजल्यावर आमचे मित्रवर्य लग्नबध्द होत होते!!! आम्ही तिथे पोचेपर्यंत लग्न लागले होते.... मग काय, ''अरे इथेच होतो रे गर्दीत....पार मागे उभे होतो.... म्हणून तुला दिसलो नाही....'' वगैरे बोलून वेळ निभावून नेली!!
दक्षी..पर्स तो छोड.. जातायेता
दक्षी..पर्स तो छोड.. जातायेता लोकांना तुझ्याजवळ ताकाचा वास येत असेल आणी तुझ्या पर्फ्यूम च्या चॉईस विषयी त्यांच्या मनात (कु)शंका निर्माण झाल्या असतील नै????
पनू... अकु..प्रसंग नुस्तं
पनू...:खोखो:
अकु..प्रसंग नुस्तं इमॅजिन करून हसत सुटलेय
बस मध्ये माझ्या सीटपासून सगळे
बस मध्ये माझ्या सीटपासून सगळे ओघळ पाहून लोकांचा गैरसमज... >>> दक्षिणा
,
लोकं म्हणत असतील नुसतीच वाढलीय , कुठल्या गोष्टी कुठे कराव्या काही समजत नाही
हा घ्या एक ताजा ताजा
हा घ्या एक ताजा ताजा किस्सा.
मंगळवारी जनशताब्दीने गोव्याला निघालो. निघण्यापूर्वी डिपार्ट्मेन्ट असिस्टंटला गुरुवारच बुकिंग करुन ठेवायला सांगितलं होत. फोनाफोनी करुन कामाचं स्वरुप समजल्याने बुधवारी काम संपेल हा अंदाज आला. परत डि.अ. ला फोन करुन बुधवार रात्रीचं बुकिंग करुन ठेवायला सांगितलं. गोंधळ करायचाच म्हणून त्याने कोकणकन्याचं बुकिंग करुन ठेवलन. ती मडगाव वरुन संध्याकाळी ६ ला सुटते. साइटवरुन मडगावला पोहोचायला दिड तास सहज लागतो.
बुधवारी सकाळी घाई घाईत साईटवर पोहोचलो, जीवाच रान करुन काम संपवले. साईट इंजिनियरला फिडबॅक द्यायला सांगून स्टेशनवर निघालो. साडे पाच वाजले होते म्हणून गाडी थिवीम ला पकडायच ठरल. सव्वा सहाला थिवीम स्टेशनला पोहोचलो. हुश्श. मेल्स वगैरे चेकून रिप्लायून टाकले. सात वाजता गाडीत शिरताना एक खुळा दरवाजा वर लावलेला चार्ट वाचत होता. त्याला चिडवायला म्हणून मी पण मुद्दामहून जाउन वाचला.
अरे, हे काय ? ३२ नंबर सीट वर कुणीतरी भलतच कसं काय ?
तिकीट रीचेक केलं. ओ ओ.... ते गुरुवार संध्याकाळचं होतं...
उलट पावली साईटवर परत. कलिग्जनी "किती लवकर मुंबईला जाउन आलास" वगैरे बोलून घेतलच.
त्यातल्या त्यात एक समाधान, गुरुवारी साईटवरच काम मनसोक्त झालं.
जातायेता लोकांना तुझ्याजवळ
जातायेता लोकांना तुझ्याजवळ ताकाचा वास येत असेल आणी तुझ्या पर्फ्यूम च्या चॉईस विषयी त्यांच्या मनात (कु)शंका निर्माण झाल्या असतील नै >>>
अमित
हा मल्टीयुजर वेंधळेपणा म्हणायला हवा. तू आणि डिपार्ट्मेन्ट असिस्टंट यांनी मिळून केलेला...
(चार्ट वाचणारा तो खुळा नंतर विचार करत बसला असेल - कोण होता तो खुळा? नुसता चार्ट वाचून निघून गेला, गाडीत चढलाच नाही... :हहगलो:)
टोणग्या, >>बूंदसे गयी वो
टोणग्या,
>>बूंदसे गयी वो हौजसे नही आती<<<
हे असे असायला हवे
बूंदसे गयी वो हौदसे नही आती
अम्या आता तरी सुधार जो
अम्या
आता तरी सुधार
जो दुसर्यावरी विसंबला त्याचा कार्यभाग बुडाला...
अम्या नाद खुळा
अम्या नाद खुळा
अम्या
अम्या
निम्बुडा माझ्या ज्ञानाप्रमाणे
निम्बुडा माझ्या ज्ञानाप्रमाणे हौदाला हिन्दीत हौजच म्हणतात....
ल्याब इ हौज म्हनजे पर्शियन भाषेत तलावाच्या बाजूला होते.
place in the heart of South Delhi today. This was the Hauz Khas lake and remnants of a tomb and madrasa. Hauz means tank
तुझे हिन्दी हे मराठी माणसांचे हिन्दी या बीबी वर पोस्ट कर
आइन्दा इस आलीशान दिमागसे मत टकराना...
आइन्दा इस आलीशान दिमागसे मत
आइन्दा इस आलीशान दिमागसे मत टकराना... >> आय्याई ग...
एंग्लीश टोणग्या हे आलिशान
एंग्लीश टोणग्या हे आलिशान काय्ये ? मी लहानपणीच ठरवल होतं कधी हत्ती पाळला तर त्याच नाव आलीशान ठेवायच. बाबांना सांगायला गेलो तर त्यांनी मलाच हत्तीएव्हढा सुजवून ठेवला. (कृपया सध्याच्या आकारावरुन विशेष टिप्पण्ण्या नकोत :डोमा:)
मलाच हत्तीएव्हढा सुजवून ठेवला
मलाच हत्तीएव्हढा सुजवून ठेवला

मैत्रिणीने साखरपुड्याचं
मैत्रिणीने साखरपुड्याचं निमंत्रण वर्डमध्ये टाईप करुन मेल करायला सांगितलं होतं. सर्व टाईप केलं पत्ता, स्टेशनवरुन कोणत्या बसने कसं यायचं इ. आणि नेमकं साखरपुड्याची तारीख आणि वेळ टाकली नाहीय त्यावर.
यो मैत्रीण याचा सूड तुझ्या
यो

मैत्रीण याचा सूड तुझ्या साखरपुड्याच्या वेळी उगवेल
मैत्रीण याचा सूड तुझ्या
मैत्रीण याचा सूड तुझ्या साखरपुड्याच्या वेळी उगवेल
योडेच्या लग्नाचे निमंत्रण घेउन लोक बारश्याला नाही गेले म्हंजे मिळवलं...
योडेच्या बारशाला?
योडेच्या बारशाला?
मैत्रिणीने साखरपुड्याचं
मैत्रिणीने साखरपुड्याचं निमंत्रण वर्डमध्ये टाईप करुन मेल करायला सांगितलं होतं. >>> मैत्रिणीने तुला सांगितले .. म्हणजे साखरपुडा तुझा आहे का
कौलेज ला होस्तेलला असताना
कौलेज ला होस्तेलला असताना एकदा पीएल् मध्ये एक मित्र घरुन आला आनि मला भेतायला आला. खुप दिवसन्नि भेतल्यामुले गप्पन्चा स्तोक भरपुर होता. तो म्हनाला चल जेव्आयल जऊ बाहेर अनि गप्पाहि होतिल. मी २ मिनि. तयार झाले अनि आम्हि रिक्शात बसुन निघलो सुद्धा, गप्पा अखन्द चालुच होत्या. बर्याच वेलेपासुन मला काहितरि वेगले वातत होते पन समजत नवत नक्कि काय ते अनि ते समजल तेव्हा मी इतक्या जोरात ओरदले कि औतोवाला मागे वलुन पाहु लागला"अरे मी हिरव्या द्रेस् वर निलि ओधनि घेतलिय......" तर तो शान्तपने म्हनाला " मी मघाशीच पाहिल होत पन मला वातल कि फैशन आहे"
काय सिमि त्यात ओलदायच काय
काय सिमि त्यात ओलदायच काय एवदं ? औतोवाल्याला फॅसन मदल काई कलत नसाव
Pages