मी केलेला वेंधळेपणा!!!!

Submitted by नंदिनी on 20 April, 2009 - 05:42

जुन्या मायबोलीवरचे काही फारच मजेदार बीबी होते. त्यापैकी हा एक!!

http://www.maayboli.com/hitguj/messages/644/104457.html?1225138364

कुणाचे असेच काही गमतीशीर अनुभव असतील ते इथे टाका...

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

Lol

मलाही मघाशी एका नविन नंबर वरुन कॉल आला, वाटलं मलाही माबो वरुन (दक्षिणा सारख कुणीतरी ..) आला असेल,तर तो वोडाफोन कडुन रिंग टोन साठी आलेला होता ...
Lol
Lol
Angry

नवीन लग्न झालं होतं. कोणता तरी सण होता. नवर्‍याने मला नणंदेकडे सोडलं. जेव्हा माझी परत जायची वेळ झाली ....थोड्या वेळाने नणंदेचे मिस्टर म्हणाले मी तुला घरी सोडतो. आम्ही दोघे त्यांच्या स्कूटरवरून निघालो. बरंच अंतर जायचं होतं. काही तरी सण असल्यामुळे अस्मादिक नटलेल्या अवस्थेत होते. सिल्कची साडी दागिने वगैरे......... म्हणजेच पूर्ण अवतार! एके ठिकाणी खूप वाळू होती. तर नणंदेच्या मिस्टरांनी स्कूटर खूप हळू केली. अंगात असलेल्या अतिरिक्त चापल्यामुळे..आणि ते मला पाडतील की काय भीतीमुळे मी पटकन स्कूटरवरून उतरले. उतरताना पुटपुटले सुद्धा की मी जरा उतरते बरं का! अहो नवीन लग्न झालेलं ...त्यात नणंदेचे मिस्टर........!
वाळू संपल्यावर ते निघून गेले. मी त्यांना हाक काय मारू ...भर रस्त्यात कशी ओरडू ....या विवंचनेत नुसतीच पहात राहिले. ते गेले आमच्या घरी. इकडे मी पूर्ण अवतारात(नटलेल्या...) रस्त्याने चालतीये. बरं ..नवीन गाव.......पटकन रिक्षाही दिसेना. सेल्फोन वगैरे नव्हते बरं का तेव्हा! निम्मं अंतर चालत काटलं ....... समोरून ते....नणंदेचे मिस्टर येताना दिसले.........त्यांना घरी पोचल्यावर कळलं होतं की मी मागे नाहीये.....म्हणून ते लगोलग मला पहायलाच निघाले होते. पण सगळ्यात गंमत तरीही मी त्यांना रस्त्याकडेने चाललेली दिसलेच नाही. नाकासमोर बघून भुर्रर्रर्र करून निघून गेले. आता नणंदेचे मिस्टर ...माझं नवीन लग्न झालेलं ...परत तीच परिस्थिती ना? हाक तरी काय मारणार? आणि दात ओठ तरी कसे खाणार ना?
गेले चालssssssssssत चालsssssssssssssत घरी! काय करणार?

मानुषी Lol

>गेले चालssssssssssत चालsssssssssssssत घरी! <

अगं गं.......असे कसे हो वेंधळे तुमचे नणंदेचे मिस्टर Uhoh

Lol

अगं गं.......असे कसे हो वेंधळे तुमचे नणंदेचे मिस्टर
नि, ते एकटेच नाहीयेत त्या प्रकारात. माझ्या काकांनी सुध्दा केलेला ह प्रकार.. Proud याच बिबि वर आधी कधी तरी पोस्टलंय.

दाराचे लॅच लागल्याने बाहेर अडकावे लागणे आणि मग दार उघडण्याचे वेगवेगळे मार्ग हा तर सर्व्हे करण्याचा विषय आहे. तसेच लहान मुलांनी (टॉडलर्स)आईला टॉयलेट्/बाथरूम मधे कोंडून ठेवणे आणि मग कडी काढता येत नाही म्हणून भोकाड पसरणे, हा किस्सा मी प्रत्यक्षात अनेकदा ऐकलाय.(अर्थात तो त्या मुलांचा वेंधळेपणा नाही.)

मानुषी, रस्त्यात दिसणार्‍या प्रत्येक महिलेला तुमच्या नणंदेच्या मिस्टरांनी निरखत जायला कवे होते (का?). म्हणहे इकडे आड तिकडे विहीर.

शकुंतला परांजपेंच्या 'काही आंबट काही गोड' मधले हे दोन किस्से
पासपोर्टच्या बाबतीत विलायतेत असताना अप्पांनी(रँ.परांजपे) मोठाच पराक्रम केला होता. अनेक कॉन्फरन्सेसकरता त्यांना लंडनहून जिनेव्हाला जावे लागे. विमान प्रवासाची वहिवाट तेव्हा पडली नव्हती. एकदा असेच तेथे गेले असताना मध्यरात्री तार आली की ' माझा पासपोर्ट ताबडतोब रजिस्टर करून पाठव'. स्वारी आईचा पासपोर्ट घेऊन गेली होती.परंतु आईच्या पासपोर्टवर अप्पांना २ परराष्ट्रांत प्रवेश कसा मिळाला हे गूढ अद्याप उलगडलेले नाही.
२) हा सई परांजपेंबद्दलः
एक दिवस कामासाठी पुष्कळ ठिकाणी फिरून स्वारी घरी आली तर दारात पोलिस आणि दारात एक अस्वस्थ झालेला माणूस्.'बाई ती स्कूटर चोरीची आहे' पोलिस म्हणाला. 'वा माझी आहे' सईने उत्तर दिले. 'नंबर काय तुमच्या स्कुटरचा'. 'माहित नाही. ''ही स्कुटर माझ्ही आहे' त्या इसमाने सांगितले. 'मग माझ्या चावीने कशी सुरू झाली?' प्रतिप्रश्न्. 'तुमचा स्कुटरचा लाइसेन्स आहे का?' असे विचारताच अरुणने(जोगळेकर) तो जपून ठेवलेल्या खणातून काढून आणला. त्यावरचा नंबर वेगळा होता. 'मग माझी स्कुटर कुठे आहे?' सईला काळजी पडली. 'ती पोलिस ठाण्यावर आहे. या गृहस्थाने ती तेथे आणली. आपल्या स्कुटरच्या चोरीची तक्रार नोंदवली. आता तुम्हाला पोलिस ठाण्यला यायला लागेल'. शेजारीच राहणारे बंगल्याचे मालक सईला आपल्या स्कुटरवरून ठाण्याला घेऊन गेले.दोन्ही स्कुटर अगदी एकसारख्या होत्या आणि एकमेकांच्या किल्लीने उघडत होत्या. दुसर्‍या दिवशी सई स्कुटर घेऊन घरी परतली. रात्री फिरून दारात पोलिस. 'आता आणखी काय केले मी?'. 'बाई तुमचे लाइसेन्स, तुमचे ऑफिसचे कागदपत्र तुम्ही ठाण्यात विसरलात!'

मी काल मुलांना सोडायला बसस्टॉप वर निघाले. उशीर झाला होता म्हणून गाडी काढली. वेळेत बसस्टॉप वर पोचलो. तिथे गाडी पार्क केली. मुलांना टाटा केला नि चालत घरी गेले. मग लक्षात आलं की मी गाडी विसरून आलेय Happy

अगं प्रीत मी म्हटलं ना नवीन लग्न झालेलं होतं ...नंतर हळूहळू त्यांना(नणंदेच्या मिस्टरांना) नावही आलं!

भरपूर सामान घेऊन घरी परतले. लिफ्टमधे शिरून ९ व्या मजल्याचं बटण दाबलं. हातातल्या पिशव्या खाली ठेवताना त्यातलं काहीतरी सामान बाहेर पडतयसं वाटलं. ते सावरण्याकडेच माझं लक्ष होतं. दरम्यान सातव्या मजल्यावर कुणीतरी लिफ्ट बोलवली होती. ते मला समजलंच नाही. सातव्या मजल्यावर लिफ्ट थांबल्यावर मला वाटलं ९ वा मजला आला. मी घाईघाईने पिश्व्या उचलून बाहेर पडले. पर्समधली किल्ली काढली आणि ७०२ नंबरच्या लॅचमधे सरकवली. दार उघडेना म्हटल्यावर किल्ली बाहेर ओढून उलटी करून पुन्हा लॅचमधे सरकवली. Lol तरी उघडेना म्हटल्यावर चिडचिड झाली. दरम्यान कपाळावरचा घाम पुसताना वरच्या ७०२ नंबरकडे लक्ष गेलं आणि गोंधळ लक्षात आला. आधी पिशव्या उचलू, लिफ्ट बोलवू की जिन्यावरून धूम ठो़कू ते कळेना.
माझी खात्री झाली होती की परत लिफ्ट बोलावून मी जाईपर्यंत ७०२ वाला / वाली दार उघडणार आणि आपल्याला त्याच्या/तिच्यासमोर ओशाळं हसावं लागणार.
नशीब म्हणजे ते ७०२ नंबरचं घर बंद होतं. आत कुणी नव्हतं! (घर विकत घेऊन त्यात न राहणारी माणसं वेंधळ्या लोकांसाठी केवढं वरदान आहेत. :फिदी:)

लले घरी वास्तुशांत केलीयस का गं?? नसशील तर करुन घे आधी, त्याने तरी तुझा वेंधळेपण झाला कमी तर झाला..

यो, भाड्याच्या घराची वास्तुशांत करायचा वेंधळेपणा करू म्हणतेस?? Proud

लले, Proud
आता ७०२ च्या दारावर लावलेली भलीमोठी चिठ्ठी पाहिलीस की नाही?
या घराचा नंबर ७०२ आहे. आपली चावी स्वतःच्याच घराकरता वापरावी. Proud

लिफ्ट मध्ये मजला आला की कुठला मजला आला आहे हे दिसत की
तेवढं ही बघण्याची तसदी घेउ ने म्हंजे लै झालं

किरू Rofl

तेवढं ही बघण्याची तसदी घेउ ने म्हंजे लै झालं >>> माझ्या मते, दत्तात्रय, वेंधळेपणा त्यालाच म्हणतात आणि हा बीबी त्यासाठीच आहे.

लले Lol

>>>>लले, दत्तात्रयांचाच मोठ्ठा वेंधळेपणा झालाय
>>>>ललिता-प्रीति त्याला वेंधळेपणा नाहि बावळटपणा म्हणतात
लाजो, दत्तात्रयांचा हा बावळटपणा आहे.. वेंधळेपणा नाही असं म्हणतायत दत्तात्रय. Proud

Pages