नारायण धारपांच्या कथा आणि कादंबऱ्या

Submitted by गणेशप्रसाद on 14 May, 2017 - 06:07

'मायबोली'वर कै. नारायण धारप यांच्या गूढ कथांचे अनेक दर्दी, चिकित्सक आणि विचक्षण वाचक आहेत. मी धारपांच्या शक्य तितक्या सर्व कथा-कादंबऱ्या गोळा करायचा प्रयत्न करतो आहे. कुणी काही मदत करू शकेल काय? विशेषतः मला त्यांच्या 'युगपुरुष' या कादंबरीची एखादी प्रत कुठे उपलब्ध असेल तर हवी आहे. माझ्या मते ती धारपांच्या मी वाचलेल्या साहित्यात बहुधा सर्वोत्कृष्ट ठरेल. कुणी मदत करू शकेल का?

Group content visibility: 
Use group defaults

मध्यंतरी त्यांच्या निधनानंतर मॅजेस्टिक नि बोरीवली मधील एका प्रकाशनाने त्यांची पुस्तके परत प्रसिद्ध केली होती. तिथे बघू शकता. रसिक.कॉम किंवा बुकगंगा वर विचारू शकता.

I started collecting his books from 2009. Right now I have 50+ books. Still I am missing some below.
Yugapurush
Luchai
Kalgumfa
Shaducha Shaap

All of above are out of print.

नारायण धारपांची बरीच पुस्तकं आउट ऑफ प्रिन्ट आहेत.
त्यातल्या त्यात जास्त पुस्तकं बुकगंगा वर उपलब्ध आहेत.जी आउट प्रिन्ट आहेत त्यांच्या इ कॉपीज आहेत.
माझ्याकडे बरीच पर्चेस्ड आहेत बुकगंगा अ‍ॅप वर.

कालगुंफाच्या उपलब्धतेबद्दल काहीही माहिती असेल तर मलाही हवी आहे. हे पुस्तक बर्‍याच वर्षांपासून आऊट ऑफ प्रिंट आहे. तसेच 'वेडा विश्वनाथ' हे पुस्तकही बर्‍याच वर्षांपासून गायब आहे.

सध्या धारपांची बरीच पुस्तकं रिप्रिंट होऊन येत आहेत. किंवा वेगवेगळ्या कथा एकत्र करून संग्रह स्वरूपात येत आहेत. त्यात कुठे या गोष्टी मिळतायत का ते चेक करू शकता.
जुन्या लायब्ररीज मधे ही पुस्तकं आहेत का ते ही पाहा एकदा.

'युगपुरुष' या कादंबरीची एखादी प्रत कुठे उपलब्ध असेल तर हवी आहे. माझ्या मते ती धारपांच्या मी वाचलेल्या साहित्यात बहुधा सर्वोत्कृष्ट ठरेल. >>> इंटरेस्टिंग! पुढच्या वेळी ही कादंबरी शोधायला हवी. धारप त्यांच्या भयकथांसाठी प्रसिद्ध आहेत खरंतर. माझ्या माहितीप्रमाणे युगपुरूष कादंबरी ही भयकथा नाही. ही विज्ञानकथा आहे का?

आर एम डी तू देखील धारपच ना? तुला कसे माहीत नाही? Happy

' अत्रारचा फास ' म्हणून एक कथासंग्रह वाचल्याचे आठवते आहे बुवा....
त्यात एक ' आकाशात तरंगणारा डोळा' म्हणून एक कथा होती.

आकाशात तरंगणारा डोळा' >> हो प्रुथ्वी उलटी करून हिंगाच्याडब्बीत जाते. आणि मग तो डोळा दिसू लागतो. पण प्रत्यक्षात हिंगाच्याडब्बीला जाळून टाकलेले असते. आता पृ थ्वीचे काय होणार. दहा बारा दिव्सात. लैभारी होती ती. व एका वाळूच्या कणात मोठे विश्व सामावलेले असते ती ही कथा होती ह्या पुस्तकात. नईन पैकी चेटकीन मस्त आहे चंदण वा डी अजून काय काय आहेत पाठलाग. आता मला हपीसच्या मागे एक बखळ आहे तिथे आत आत चालत जावं असं वाटतय.

ना धा कथा जबरदस्त असतात.
मला सगळी पुस्तकण हवीत माझ्या सन्ग्रहात.
सध्या फक्त्त पडछाया, मोहिनी,चेटकीण्,चंद्राची सावली आणि ४ इ बुक्स आहेत

चंद्राची सावली चुकून रात्री वाचली होती. रात्रभर डोक्यावरुन पांघरुन घेवून झोपले होते. खुट्ट वाजले तरी श्वास रोखून धरायचे.

चेटकीण पण मस्त आहे.
स्वाहा वाचून बरेच दिवस घाबरीफाइट उडाली होती.त्यात ज्या जिन्यावरुन 'व्हाईट लेडी' येते तश्याच सेम वर्णनाचा जिना आमच्या घरात आहे Happy

आर एम डी तू देखील धारपच ना? तुला कसे माहीत नाही? >>> अ३ Happy काय करणार! नाधा माझे नातलग असते तर मीच खुशीने माहिती पुरवली नसती का?

आकाशात तरंगणारा डोळा >>> मी जुनं अत्रारचा फास वाचलं आहे. त्यात ही गोष्ट नव्हती. ही पण विज्ञानकथा वाटते आहे. मी धारपांच्या सगळ्याच विज्ञानकथा नाही वाचलेल्या. मला भयकथा जास्त आवडतात Proud

आता मला हपीसच्या मागे एक बखळ आहे तिथे आत आत चालत जावं असं वाटतय >>> भुकेली रात्र संग्रहात आहे एक बखळीची गोष्ट. ती वाचली आहे का, अमा Happy

स्वाहा वाचून बरेच दिवस घाबरीफाइट >>> स्वाहा माझी फेव आहे एकदम.

मला पण एके काळी जाम आवडायचे..
अत्रारचा फास ,कृष्णचंद्रपंत, शपथ (ज्यावर नंतर एक पीळ सिरीयल आली होती) , साठे फायकस, दस्त,माटी कहे कुम्हारको ,ग्रास,वाईकरांची कथा
अशा कित्येक..
समर्थ नाव वाचलं की हुश्श व्हायचं..
'त्या'च्या तावडीतुन सुटल्यानंतर नंतरची काॅफी आणि केक्स पण आवडायचे..

शपथ, आनंदमहल, वेडा विश्वनाथ नि लुचाई ह्या माझ्या सर्वात फेव्हरिट्स. माझ्या मते धारप ह्यात जेव्हढे सुंदर लिइते, अनुवाद करते झाले तेवढे नंतर इतरत्र नाहि जाणवले. पुढच्या सगळ्या ह्यांच्याच वेगवेगळ्या बदलत्या extended आवृत्त्या वाटत राहिल्या.

असाम्या, अगदी बरोबर! माझ्या लिस्ट्मधे अ‍ॅडिशनली दस्त आणि स्वाहा पण आहेत Happy पण सगळ्याच काही यांच्या आवृत्त्या वाटत नाहीत. आता ती एक मोहिनीची कथा होती ती कसली मस्त आहे. किंवा चेटकीण, शोध, देवाज्ञा सारख्या कादंबर्‍या.

त्यांच्या कथा पण कितीतरी वेगवेगळ्या आहेतच की. माटी कहे कुम्हारको, सीमेपलिकडून हे कथासंग्रह भारी आहेत.

शपथ बेस्ट आहे. स्टिफन किंग च्या IT वर बेस्ड असली तरी इतका मस्त मराठी बाज फार मस्त पकडलाय. फक्त मित्र होटेल मधे रहातात तो एकच सीन आपल्या संसकृतीत बसत नाही (नीट लिहिता आलं नाहिये सस्क्ऱुती)
समर्थ कॅरॅक्टर फार मस्त. ते आले की हुश्श्य! कृष्णचंद्र तेवढे आवडते नाहित. (नावडते पण नाहित)

दस्त - समार्थाचिया सेवका - चंदनवाडी - नातुंची बखळ ही आवडतात.
एका पुस्तकात पिढ्यानपिढ्या ते रक्त देऊन एका प्राण्याकडून कामं करवून घेत असतात - त्याचं नाव काय?
दस्त म्हणजे कमल वालं का गोडे गुरुजी वालं (दोन्ही आवडतात)
वरचीही सगळी वाचली आहेत. पण संग्रही नाहित.
शाळेत - कोलेज मधे असताना घरात भांडणं व्हायची भयकथा - कादंबरी आधी वाचण्यासाठी. अगदी १० सालापर्यंत आधाशा सारखी वाचलेली आठवतायत.
पण समहाऊ हल्ली भयकथा वाचाव्याशा वाटत नाहित. का कोण जाणे!

दस्त म्हणजे कमल वालं का गोडे गुरुजी वालं >>> दोन्ही Happy

एका पुस्तकात पिढ्यानपिढ्या ते रक्त देऊन एका प्राण्याकडून कामं करवून घेत असतात - त्याचं नाव काय? >>> यो अस्मान् द्वेष्टी (बहुतेक)

दोन्ही कस शक्य आहे.. गोडे गुरुजे वाल्या पुस्तकात सविता असते ना.
कमल मधे तिचं लग्न होतं त्या घरात अन मग सुरुवात होते - राईट?

एका पुस्तकात पिढ्यानपिढ्या ते रक्त देऊन एका प्राण्याकडून कामं करवून घेत असतात - त्याचं नाव काय? >>> नीट नाव नाही आठवत पण चांदीच्या पिंजर्यातलं का तळघरातलं असं काहीतरी आहे. तो प्राणी चांदीच्या पिंजर्‍यात तळघरात ठेवलेला असतो. यो अस्मान् द्वेष्टी मध्ये शेरभ विरुद्ध समर्थ आहे - यो अस्मान् द्वेष्टी युष्मान् द्विष्मते स्मः| असा काहीतरी त्या पंथाचा श्लोक असतो.

उप्स! Happy डोक्यात काला झाला वाटतं माझ्या.

नानबा, बरोबर. दस्त मधे सविता आहे. कमलची स्टोरी गंगाधररावांची. बहुतेक 'समर्थांना आव्हान' कथा आहे ती.

नीट नाव नाही आठवत पण चांदीच्या पिंजर्यातलं का तळघरातलं असं काहीतरी आहे >>> हो यार. मलाही नीट नाव नाही आठवत आहे. पण "तळघरातलं, चांदीच्या पिंजर्‍यातलं ते" हे नाव आहे मग बहुतेक.
"यो अस्मान् द्वेष्टी" मधे पण पिंजर्‍याचा उल्लेख आहे त्यामुळे कन्फ्युजन झालं बहुतेक. त्यात त्या कथानायकाला स्वतःच पिंजर्‍यात असल्याची स्वप्नं पडत असतात आणि शेरभ म्हातारीच्या रूपात येऊन त्याला खायला घालत असतो वगैरे. बरोबर ना?

शेरभ म्हातारीच्या रूपात येऊन त्याला खायला घालत असतो वगैरे. बरोबर ना? >> परफेक्ट. बहुतेक अनंतराव नाव असतं कथानायकाचं.
तळघरातलं, चांदीच्या पिंजर्‍यातलं ते >> हो हेच नाव आहे.
बहुतेक 'समर्थांना आव्हान' कथा आहे ती. >> बरोबर. गंगाधररावांची स्टोरी म्हणजे समर्थांचा प्रहार.

गंगाधररावांची स्टोरी म्हणजे समर्थांचा प्रहार >>> करेक्ट! पुस्तकाचं नाव समर्थांना आव्हान. कथा 'समर्थांचा प्रहार'. शाब्बास पायस! Happy

सैतान पण बेस्ट.
सैतान मधल्यासारखे विमान अपघात खरोखर झालेले आहेत.
मला पण नंतरचे कॉफी केक्स आवडतात.
त्यांची एक कथा आहे ज्यात भूत डेमो प्रयोगात असलेल्या एकाचं आणि नंतर त्याच्या साथीदाराच्या हाडारक्ताचं जेलीत रूपांतर होतं.

पुस्तकाचं नाव समर्थांना आव्हान. कथा 'समर्थांचा प्रहार'. शाब्बास पायस!
>>
समर्थाचा प्रहार आक्खी कादंबरी पण आहे.
यो अस्मान द्वेष्टी वाचलं नाहिये बहुतेक...
थॅंक यु पायस आणि रमड.

I started collecting his books from 2009. Right now I have 50+ books. Still I am missing some below.

>>
तुम्ही कुठे असता?

साधारण १९९४ च्या सुमारास नारायण धारपांनी एक अनुवादित कादंबरी लिहिली होती "अवकाशाशी जडले नाते ". ही कादंबरी दि स्पेस ब्रिज (किंवा साधारण नाव असलेले ) या कादंबरीचा अनुवाद होती. मी ही कादंबरी ३ वेळा वाचली पण एकाला वाचायला म्हणून दिली आणि परत नाही मिळाली.
कुणाकडे हि कादंबरी आहे का? किंवा कुणी वाचली आहे का?
जॉन सौयर असा कोणीतरी कादंबरीचा नायक आहे.

साठे फायकस वाचली आहे फक्त..
बोअर झाली... कदाचित त्यातला काळ जुना आहे म्हणुन..
त्यातिल हिरो/ नायक अगदीच फिल्मी हिरो शोभेल येवढा गुडी गुडी होता.. आणि शेवटी सगळं फिल्मी रित्या छान पण झालं..
भिती नव्हती वाटली.. दुसर्या कथा वाचुन बघयला हव्या..

माझ्याकडॅ त्यांची एक साधी फिक्क्षन कथा पण आहे छाया आणि आशा. छाया पहिली बायको. छान छोकी वाली सुंदर असते ती मरते मग नवरा मुलांसाठी दुसरे लग्न करतो ती आशा. ही जनरली छान व घर कामात, मुलाना संभाळण्यात ग्रेट दिसायला अ‍ॅव्हरेज पण नीट नेट की असते. नवरा तिच्या जवळ जायल उत्सुक नसतो पण दे डू स्लीप टुगेदर आणि ते त्याच्यासाठी एक सुखद सरप्राइज असते कारण पहिल्या पत्नि ने त्याला कायम लीश वर व उपाशी ठेवलेले असते. ती कधी स्वतःला विसरूच शकत नाही. उलट आशा त्याला समरसून साथ देते. संसार सुखाचा होतो. अगदी साधी कथा आहे पण मला वाचाय ला खूप आवड ते. मुलांना छान आई मिळते. एकून त्या संसारावर एका सेल्फ सेंटर्ड मुलीची छाया असते ती जाउन आशा उमलते असे कायतरी आहे. मी भय पार्ट कुठे सुरू होते म्हणून एकदम घाई घाईत वाचली. छायाचे भूत येते कि काय म्हणून पण तसे काहीही झाले नाहे दे जस्ट लिव्ह हॅपीली

ही जुदाई ची धारपीकरण केलेली स्टोरी वाटतेय>> अगं आजिबात नाही. अगदी साधी आहे स्टोरी. नवरा विकला वगिअरे नाहीये. जुदाईत श्रीदेवीचे काम छान आहे रोल पण. धारपी करणही नाहीये. त्याच पुस्तकात दुसरी कथा पण साधी फिक्षन आहे. मला वाट्ते भयकथांच्या आधीची त्यांची फेज असावी. नो थरार नो फीअर. जस्ट ओ डीअर कम नीअर.

धारपांची एक कथा आहे.
दामू आणि शकी नावाची मुलं खेळात चुकून पेटीत अडकलेली.
खूप टचिंग कथा आहे.

शाळेत असताना परिसस्पर्श वाचलेली
खूप घाबरलो होतो तेव्हा ..
.. आवडते लेखक
पुण्याला बालगंधर्व चौकात जे एम रोडवर त्यांची जुनी बिल्डिंग होती
तिथे ते लेखन करीत असत असं वाचलंय

आणी ते दंडी नावाचे व्हँपायर, तळघरात चालणारे प्रकार, एकदम गढूळ हो णारे वातावरण. वीकांताला वाचतेच एखादे बुक शोधून. मला पन सर्व पुस्तकांचा संग्रह करायचा आहे कधीपासून. गणेश लिस्ट हेडर मध्ये अपडेट करा ना.

दामू आणि शकी नावाची मुलं खेळात चुकून पेटीत अडकलेली >>> ही कथा 'अनाहूत' बहुतेक?

भूत डेमो प्रयोगात असलेल्या एकाचं आणि नंतर त्याच्या साथीदाराच्या हाडारक्ताचं जेलीत रूपांतर होतं. >>> "संकासूर" कथा. "किमयागार" कथासंग्रह.

तरी धारपांच्या कथा आता बालीश वाटायला हरकत नाहीत . वयानुसार आणि विविध माध्यमातून त्यापेक्षा कितीतरी भयावह गोष्टी अनुभवल्यानन्तर..

साॅरी, वर आलय हे नाव...
अजून काही....
रत्नपंचक
440, चंदनवाडी
फरिस्ता
संक्रमण
ग्रहण
समर्थांची ओळख
माणकाचे डोळे
सावधान
चेतन
कृष्णचंद्र

अजून काही...

मृत्युजाल
किमयागार
अत्रारचा फास
माटी कहे कुम्हारको
अनाहूत
भुकेली रात्र
चंद्राची सावली
महंतांचे प्रस्थान
शोध

माझ्याकडे खालील सर्व पुस्तके आहेत.

समर्थांची शपथ, समर्थांना आव्हान, समर्थांचा विजय, शपथ, चेटकीण, सैतान, पळती झादे, नवे दैवत, अनोळखी दिशा भाग १ ते ३, ईक्माइ, झाकलेला चेहरा, संक्रमण, काळी जोगीण, ४४० चंदनवाडी, देवाज्ञा, काळोखी पौर्णीमा, संसर्ग, अघटित, एक पापणी लवली, स्वाहा, सीमेपलीकडून, अंधारयात्रा, अत्रारचा फास, कृष्णचंद्र, प्राध्यापक वाईकरांची कथा, पाठलाग, काळ्या कपारी, सावट्या, नवी माणसं, टोळधाड, फरिस्ता, माटी कहे कुम्हारको, चंद्राची सावली, विधाता ? आणि महावीर आर्य, सावधान, व्दैत, महंतांचे प्रस्थान, दस्त, आभास, काजळी, दुहेरी धार, मृत्युच्या सीमेवर, आनंदमहल, चंद्रविलास, वासांसि नुतनामि, केशवगढी, पेशंट नं. ३०२, बहुमनी, चंद्रदास आणि इतर विलक्षण माणसं, परीसस्पर्श, दिवा मालवू नका, ग्रहण, भुकेली रात्र, थैलीतला खामरा, कपटी कंदार आणि कंताचा मनोरा, तीळा उघड, सीमेपलिकडून, आपुले मरण, रत्नपंचक

त्यांचं अजून एक पुस्तक होतं.. ते भुताचं नव्हतं..
एक बाई आईस्र्कीम आणायला बाहेर पडते आणि परत येते तर तिचं घर नसतं..
आणि हळुहळु आपल्या लक्षात येतं की ती वेगळ्याच प्रतलामध्ये गेलीये.. म्हणजे तिचा नवरा ,मूल आहे तिथच असतं.. पण ते वेगळच प्रतल असतं..
असं बरंच काही..
त्यावेळी तरी जाम आवडलेलं पुस्तक..

Pages