कालपासून नारायण धारपांची पुस्तके वाचायला सुरुवात केली आहे. त्याविषयी माझे विचार/परीक्षण या धाग्यात टाकेन.
यात अजून एक सिस्टीम मी वापरेन. एक ते पाच च्या रेटिंगवर मी माझं मत मांडेन.
★ - बिलकुल वाचलं नाही तरी चालेल
★★ - वाचलं न वाचलं काही फरक पडत नाही
★★★ - वाचायला तर हवं
★★★★ - वाचायलाच हवं
★★★★★ - काहीही करा, हे पुस्तक चुकवू नका
(ही फक्त माझी रेटिंग. वाचकांच्याही रेटिंगचं स्वागत आहे.)
मी आतापर्यंत वाचलेली पुस्तके व रेटिंग!
१. लुचाई - ★★★★
२. माणकाचे डोळे - ★★★
३. चेटकीण -★★★★★
४. भुकेली रात्र - ★★★1/2
५. दस्त -★★★★
६. ४४० चंदनवाडी - ★★★★★★
७. आभास - पहिली कथा ★★★★★ बाकीच्या ★★
८. स्वाहा - ★★★★★★
९. शपथ - ★★★1/2
१०. काळगुंफा - ★★★★
११. अत्रारचा फास (कथासंग्रह) - सरासरी रेटिंग - ★★★1/2
१२. वेडा विश्वनाथ - ★★1/2
१३. न्यायमंदिर - ★★★★
१४. माटी कहे कुमहारको (कथासंग्रह) - सरासरी रेटिंग - ★★★★★
१५. चंद्राची सावली - ★★
१६. दरवाजे (कथासंग्रह) - सरासरी रेटिंग - ★★★★1/2
१७. अघटीत (कथासंग्रह) - सरासरी रेटिंग - ★★★
१८. सैतान - ★★★★★★
१९. समर्थांची ओळख (कथासंग्रह) - सरासरी रेटिंग - ★★★★1/2
२०. कुलवृतांत - ★
२१. बहुरूपी - ★★
२२. द्वैत - ★★★
इतर वाचकांची रेटिंग
१. बहुरूपी (अमा) - अर्धा स्टार
२. काळगुंफा -(मन्या S) ★★★
३. देवाज्ञा - (मन्या S) ★★★★
४. वेडा विश्वनाथ - (मन्या S) ★★
५. संक्रमण - (मन्या S) ★★★1/2
अनु,
अनु,
तुपण धारप आणि मी (अनु) असा एक वेगळा धागा काढ की. त्यात तुझ्या सगळ्या सुरवातीपासूनच्या आठवणी लिहून काढ.
अगं आठवणी अश्या खास नाहियेत
अगं आठवणी अश्या खास नाहियेत ☺️☺️ कॉमनप्लेस आहेत.
फक्त सर्व(3 सोडून) पुस्तकं वाचली आहेत इतकंच.
भरत , मुद्दे पटलेत . तुम्ही
भरत , मुद्दे पटलेत . तुम्ही जे लिहिलेत ते माझ्या मनात आलेलं । पण लेखक स्वातंत्र्य म्हणून सोडून दिलं ।.
अज्ञातवासी , मी ही सैतान वाचायला सुरुवात केलीये काल रात्री . कसलं डेंजर आहे . मी अर्ध्यात वाचून बंद केलं . रात्रीच वाचण्याची हिंमत नाही माझ्यात ते पुस्तक
विशेषतः फोटो ग्राफर ला
विशेषतः फोटो ग्राफर ला मारण्याचा सीन.
आळस, दुर्लक्ष , अभ्यासाचा
आळस, दुर्लक्ष , अभ्यासाचा अभाव इत्यादींना स्वातंत्र्याच्या लेबलखाली दडपणं बरं न्हवं.
सैतान -
सैतान -
सैतान सगळ्यात शेवटी वाचायची ठरवली होती, पण कालच्यासारखी निवांतता मिळाली नसती.
सैतानला एका शब्दांत म्हणायचं गेलं, तर आजपर्यंतची सर्वोच्च भय देणारी कथा. भयकथेला लागणारा एकूण एक इलेमेंट यात आहे. एक भयानक सुरुवात, उत्कंठावर्धक मध्य आणि अत्युच्च शेवट!
तिनवाडी गावाच्या जवळ एका विमानाला भीषण अपघात होतो. तेव्हापासून एक गावावर विचित्र, अभद्र सावट पसरायला सुरुवात होते, आणि यात सर्व गावच हळूहळू भरडले जाते.
सैतान ही कथा सुरुवातीपासून खिळवून ठेवते, क्षणोक्षणी घाबरवते, इथे अमानवीय घटना किंवा व्यक्ती नाही, तर त्या घटनांची, व्यक्तींची साखळीच आहे. सैतानमधील काही प्रसंग तर विचारांच्या पलीकडे आहेत, उदा. विमान कोसळण्याचा प्रसंग, चौधरी गुदमात जातात तो प्रसंग, कालीचा मृत्यू, बाबाच्या शरीराची होणारी घुसळण (असे अनेक प्रसंग आहेत.)
भगत यांचं कॅरेक्टरही मस्त रंगलय, आणि पुस्तकाचा शेवटही.
वाचावंच असं पुस्तक
रेटिंग - ★★★★★★
बादवे, बाबावरूनच वेडा विश्वनाथ हे कॅरेक्टर सुचलं असावं, किंवा वाईस ए वर्सा!
@मी अनु - एका फ्रेंडने पाठवली
@मी अनु - एका फ्रेंडने पाठवली. त्याला करोडो धन्यवाद!
@जाई - सैतान आहेच डेंजर, विमान कोसळण्याचा प्रसंग, शिंदेंची हत्या, कचकड्याची बाहुली, सगळंच भयानक आहे.
मला दोन प्रश्न आहेत.
मला दोन प्रश्न आहेत.
१. बिहारीलाल बासुरिवाला हे कॅरेक्टर कोणत्या पुस्तकात आहे?
२. कचकड्याची बाहुली नेमकी कशी असते, कुणी फोटो टाकू शकेल??
सैतान पुस्तकाच्या विमान
सैतान पुस्तकाच्या विमान नंतरच्या कथेत आहे बिहारीलाल बाहुलीवाला. अर्थात आता पुस्तक स्टाईल बदलून त्यात एकाच विमाणकथा टाकली असेल तर माहीत नाही.
पूर्वीच्या काळी जत्रेत अत्यंत स्वस्त आणि पातळ प्लास्टिक च्या लगेच चेपे(डेंट) पडणाऱ्या बाहुलया मिळायच्या, चेहरा वगैरे पण वेल डिफाईंड कला नसायची.रात्रीच्या वेळी कधीकधी भीतीदायक दिसतात. त्यांना कचकड्या ची बाहुली म्हणतात.बाकी आताच्या सुबक कुपोषित सोनेरी केशीय आखूड ड्रेसीय बारब्या थोड्या नंतर आल्या असाव्या भारतात(85-9० दरम्यान)
धन्यवाद मी अनु.
धन्यवाद मी अनु.
माझं पुस्तक विमानकथेवरच संपलं.
आणि बाहुलीच्या माहितीसाठी धन्यवाद!
त्या बासरीवाल्याची कथा सांगू शकाल???
नीट आठवत नाही.कॉलिंग rmd
नीट आठवत नाही.कॉलिंग rmd
आता धारप नाहीत , तेव्हा
आता धारप नाहीत , तेव्हा कोणाला विचारणा करणार . त्या पुस्तकात लूपहोल्स आहेत, क्रफ्टिंग नीट झालेलं नाही हे बरोबर . , ती सिरीयल आली नसती तर ते पुस्तक वाचलही गेलं नसतं. फॅन्टसी प्रकार आहे म्हणून सोडून दिलं .
हो अनु बरोबर , डेंजर सीन आहे
हो अनु बरोबर , डेंजर सीन आहे तो .
अज्ञातवासी , पूर्ण वाचलं नाही अजून पुस्तक , पण मला लताचा घाबरून जाण्याचा आणि चौधरींचा गोदाममधील प्रसंग भीतीदायक वाटले
अज्ञातवासी, अनु, rmd
अज्ञातवासी, अनु, rmd,
तुम्ही ५+ तारे दिलेली पुस्तकं कोणत्या (स्टिफन किंगच्या?) पुस्तकांवर बेतलेली आहेत सांगू शकाल का? मी ती वाचेन.
===
> अगं आठवणी अश्या खास नाहियेत ☺️☺️ कॉमनप्लेस आहेत. > आठवणी म्हणजे तशा नाही. ती पुस्तकं तू कधी, कितीदा वाचली, दर वाचनात नवीन काही गवसलं का, भीतीचे परिणाम काय झाले वगैरे.
@ॲमी - सॉरी, पण मी तरी ते
@ॲमी - सॉरी, पण मी तरी ते सांगू शकत नाही, कारण मी किंगच it सोडून कोणतंही पुस्तक वाचल्याचं मला आठवत नाही, आणि it कधी संपतय, असं झालं होतं. त्यामुळे ती पुस्तके किंगच्या नेमक्या कुठल्या पुस्तकावर बेतलेली आहेत, खरंच माहिती नाही.
अगं सगळी किंग वरून घेतलेली
अगं सगळी किंग वरून घेतलेली नाहीयेत.काही ओरिजिनल कल्पना,काही दुसऱ्या लेखकांवरूनही घेतलेली असतील.किंग काकांकडे पुणेरी पाटी नाहीय "आमची सर्व पुस्तके मराठीत हवी असल्यास धारप यांच्या दुकानात जावे, इतरत्र गेल्यास आम्ही वॉरंटी ची जबाबदारी घेणार नाही, आमची इतरत्र शाखा नाही" अशी ☺️☺️
किंग काकांची पेट सीमेटरी,
किंग काकांची पेट सीमेटरी, कॅरी, द शाइनिंग,सालेम्स लॉट ही आवर्जून वाचावी अशी पुस्तकं आहेत.शिवाय 1 पास्ट मिडनाईट(लँगोलियर्स),निडफुल थिंग्स हे पण.
ओके ओके
ओके ओके

धन्यवाद दोघांनापण.
मला ते चंदनवाडी, स्वाहा, सैतानबद्दल कुतूहल वाटत होतं.
पेट सिमेटरी चित्रपटातली
पेट सिमेटरी चित्रपटातली झेल्डा कसली भयंकर आहे ... ते पात्र एका पुरुष अभिनेत्याने भरपूर मेकअप करून साकारलं आहे हे समजल्यावर सुद्धा तो सीन बघायची हिम्मत होत नाही ... अनेक हॉरर चित्रपटांमध्ये या एकुलत्या एक सिनने मला घाबरवलं ...
समर्थांची ओळख हा कथासंग्रह
समर्थांची ओळख हा कथासंग्रह वाचला, समर्थ या पात्रावर बेतलेल्या या कथा आहेत, ज्या त्यांचा सहकारी अप्पा याच्या नजरेतून लिहिल्या आहेत.
ही लिखाणाची शैली मला होम्सच्या कथांशी मिळतीजुळती वाटली, व ही जोडीसुद्धा.
या संग्रहातील सगळ्याच कथा भीतीदायक व रोमांचक आहेत. यातली भीती अस्सल वाटते, सामना अस्सल वाटतो, आणि शेवटी आपणही सुटकेचा निश्वास सोडतो.
१. संग्राम - उद्योगपती राहुल यांच्या मुलाला अपाय करून एक शक्ती त्यांच्याकडून खंडणी उकळायचं बघते.
रेटिंग - ★★★★
२. मोहिनी चक्र - एका प्राचीन काळाच्या तंत्राची जोड घेऊन एक गुन्हेगार गुन्हे करू बघतो. अप्रतिम!!!
रेटिंग -★★★★★
३. आवाहन - एका लहान मुलीच्या आवाहनावरून समर्थ अघोरी शक्तीचे उपासक व त्या शक्तीशी सामना करायला तयार होतात.
रेटिंग -★★★
४. समर्थांचीया सेवका - बीभत्स रूपानी घेतलेला अप्पा व नारगौडाचा ताबा. Vampire स्टोरी, भीतीदायक
रेटिंग - ★★★★★
५. घातकी पूर्वचक्र - एक अमानवीय शक्तीशी वेगळ्याच कालप्रवाहात सामना-
रेटिंग - ★★★
६. आक्रमण - एक अमानवीय शक्तीच्या वासनेची कथा
रेटिंग - ★★★★
७. मंतर हाट - एका भयानक पंजाशी होणारा सामना. जबर भयकथा
रेटिंग - ★★★★★★
८. समर्थांचीया सेवका (२) - चंद्रमनीशी होणारी अप्पांची लढाई.
रेटिंग - ★★★★
देवाज्ञाभय-रहस्य कादंबरी
देवाज्ञा
भय-रहस्य कादंबरी
पृष्ठसंख्या : 252
ही कादंबरी मृत्युचा स्पर्श होऊन बचावलेल्या माणसाच्या मनात होणारे बदल/ जाणिवांवर आधारीत आहे. यात भीतीचे प्रसंग जरी कमी असले तरी ते रोमांचक आणि भीतीदायक आहेत..(उदा.हेमांगी पात्राच धारपांनी थोडक्यात केलेल वर्णन)
आचार्यांच पात्र जे सुरवातीला सरळ आणि पवित्र वैगेरे वाटत तेच पुढे जाऊन अनपेक्षितपणे धक्का देत..
असे लहान मोठे धक्के देणार देवाज्ञा सुरवातीला थोडस रटाळ वाटत पण नंतर कादंबरी अचानक वेग घेत त्याच गतीने पुढे शेवट गाठते.
रेटींग: 4 stars
पूर्वीच्या काळी जत्रेत अत्यंत
पूर्वीच्या काळी जत्रेत अत्यंत स्वस्त आणि पातळ प्लास्टिक च्या लगेच चेपे(डेंट) पडणाऱ्या बाहुलया मिळायच्या, >>>>>>> ' अॅना बॅले' सिनेमातल्या बाहुलीसारखी?
तिला निरखून पाहिले नाही.बघून
तिला निरखून पाहिले नाही.बघून सांगते
वेडा विश्वनाथ
वेडा विश्वनाथ
पृष्ठसंख्या - 152
भय कादंबरी
विश्वनाथ कादंबरीतील मुख्य पात्र! ज्याची पुर्ण वाढ होऊनदेखील आकलनक्षमता मात्र एका 3-4 वर्षाच्या बालकाएवढीच. आर्यवर्मन हा मांत्रिक विश्वनाथचा वापर शत्रुच्या अंतासाठी करुन त्याचा वेडसरपणा घालवुन जन्माचे कल्याण करतो.
2 stars
कुलवृतांत -
कुलवृतांत -
हे छोटं पुस्तक आज संपलं. या पुस्तकाला इतका वेळ लागण्याच कारण म्हणजे या पुस्तकाविषयी माझी जी उत्सुकता होती, त्या प्रमाणात हे पुस्तक फुसकच ठरलं.
एकतर हे पुस्तक खूप स्लो चालतं, आणि त्यातही अतिवर्णन, जे धारप कधी करत नाहीत ते येतं.
बऱ्याच गोष्टी फिलर म्हणून भरल्यासारख्या वाटतात, आणि काही तर अनावश्यक आहेत.
खूप ताणल्यासारखं वाटलं.
रेटिंग - ★
संक्रमण .
संक्रमण .
टिपिकल भयकथा धारपांच्या नसतात हे सांगणारे अजून एक पुस्तक. इंग्रजी पुस्तकात ती घाणेरडी भुतांची वर्णने वाचून भय नाही पण किळस नक्कीच येतो.
चांगले आहे पुस्तक, पण बऱ्यापैकी संथ आहे.
वाचायला सुरुवात केली तेव्हा आठवण झाली मायबोलीवरच्या विषवल्ली या कथेची. त्या कथेच्या प्रतिसादात कोणीतरी ह्या पुस्तकाचा उल्लेख केला होता की ती कथा पूर्ण नाही पण बरीचशी या कथेवर आधारित आहे, अन खरेच तसे आहे.
असो, बऱ्याच वर्षांनंतर मी कुठलेतरी पुस्तक रात्रभर जागून वाचले आहे, तेही घरात एकटी असताना, पूर्ण अंधार करून. म्हटले धारपांचे आहे सो मजा येईल, पण यात भीती वाटेल असे काही नाहीचे. काल रात्री ८ वाजता वाचन सुरू केले ते आता संपले. आता झोपेन, पण एवढे रात्रभर जागरण करून वाचून पण जे थ्रिल अनुभवायचे होते ते झालेच नाही. आज पण एकटी आहे, सो एखादी चांगले भयकथा पुस्तक सुचवा रात्री वाचायला.
आज शेवटचा दिवस ना धागा संपादन
आज शेवटचा दिवस ना धागा संपादन करता येण्याचा?
३० दिवसात एकाच लेखकाची २० पुस्तकं!
रोचक होतं हे सगळं. आणि अजूनही लेखकाचा, शैलीचा कंटाळा आला नाही हे विशेष.
बहुरूपी -
बहुरूपी -
ही भयकथा नसून एक थ्रिलर आहे. पुस्तकाचा वेग प्रचंड आहे, पुस्तक प्रचंड वेगाने पुढे सरकत जातं. वाचताना कुठेही कंटाळा येत नाही.
पुस्तकात अनेक गोष्टींची संगती लागत नाही, अनेक गोष्टी विनाकारण जुळवलेल्या वाटतात. काही गोष्टी तर तद्दन हिरोगीरीसाठी केलेल्या वाटतात आणि कॅरेक्टरच्या वागण्यामागचं लॉजिक समजत नाही.
रेटिंग - ★★
बहुरूपी या नावाने धारपांना एक
बहुरूपी या नावाने धारपांना एक जबरदस्त भयकथा लिहिता आली असती, एक बहुरूपी मरतो, आणि तो निरनिराळी रूपे घेऊन लोकांना मारतो असं काही. जबरदस्त झाली असती,पण धारपांनी तो चान्स घालवला हे माझं प्रांजळ मत.
बादवे कुलवृतांतचा दुसरा भाग आला होता का? कुणाला माहीत असेल तर सांगा.
@VB - धन्यवाद! संक्रमण अजून
@VB - धन्यवाद! संक्रमण अजून वाचलेली नाही, पण तुमचे मुद्दे नक्की लक्षात ठेवेन.
@ॲमी - धन्यवाद! हो आजपासून धागा एडिट करता येणार नाही, म्हणून पार्ट २ काढायचा विचार चालू आहे. बघूयात.
Pages