ओळखा पाहू ....... एक गंमतखेळ - २ - महाराष्ट्रातील गावे

Submitted by संयोजक on 1 September, 2019 - 10:49

मायबोलीच्या दर उत्सवात आपण एखादातरी नविन गंमतखेळ खेळतो.... यावर्षीचा गंमतखेळ आहे "ओळखा पाहू"
यामध्ये दर तीन दिवसांनी खेळाचा विषय बदलला जाईल.

पुढच्या तीन दिवसांसाठी विषय आहे: महाराष्ट्रातील गावे
या खेळामध्ये मंडळ सुरुवातीला एक कोडे देईल.... ज्यात एखाद्या गावाबद्दल काही क्ल्यू असतील.... त्या क्ल्यू वरुन तुम्हाला गावाचे नाव ओळखायचे आहे.
बरोबर उत्तर ओळखणारा पुढचे कोडे/क्ल्यू देईल.

उदाहरणार्थ:
डोंगरांमध्ये वसलेले टुमदार हे गाव
त्याच डोंगरांवरुन याचे पडलेय नाव
सुपारी, बडीशेप, बटर अन खारी
इथला कंदी पेढा जगात भारी

उत्तर: सातारा

कोडे/क्ल्यू देताना गद्य/पद्य कुठल्याही प्रकारात देवू शकता
कोडे देताना शक्यतो त्या गावाची ठळकवैशिष्ट्ये/प्रसिद्ध वस्तू/वास्तू/व्यक्ती यांचा उल्लेख असावा.... जेणेकरुन ते ओळखायाला सोपे जाईल आणि लोकांच्या माहितीतही भर पडेल.
इथे फक्त महाराष्ट्रातीलच गावे ग्राह्य धरण्यात येतील.

आवडला का हा खेळ?
चला तर मग करुया का सुरुवात?

पहीला क्ल्यू आहे:

सह्याद्रीच्या कुशीमधले हे एक गिरीस्थान
पर्यटनाच्या दुनियेत याचा मोठ्ठा मान
ब्रिटिश अधिकारी यायचे इथे सुट्टीला
इथे जवळच आहे राजांचा एक किल्ला

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

Correct

धन्यवाद श्रद्धा !

कोकणच्या निसर्ग भूमीत असे देवाचा वास
इथल्या फळांच्या राजाचा स्वाद असे खास

सोप्प आहे. सहज ओळखाल

तालुका अमचा लहान ,
नावात अमच्या गड खरा.

दोन मुख्यमंत्री दिले महान

((दोन गावं आणि तालुका.))

Submitted by Srd on 8 September, 2019 - 09:16
>>हेच का?

जीर्णोद्धार झाला माझा एकदा नाही तर दोनदा,
एकदा होते मालोजीराव तर दुसऱ्या वेळी अहिल्याबाई
माझी शैली दाक्षिणात्य खरी पण आहे मी महाराष्ट्रातील जगप्रसिद्ध लेण्याजवळ
ज्यांना बघण्यासाठी होते पर्यटकांची गडबडघाई

विदर्भातील एक गाव,
जिथे 150 वर्षांची परंपर असलेली यात्रा भरते
रामनवमी ते हनुमान जयंती
यात्रेला एका प्राण्याचे नाव

Pages