ओळखा पाहू ....... एक गंमतखेळ - २ - महाराष्ट्रातील गावे

Submitted by संयोजक on 1 September, 2019 - 10:49

मायबोलीच्या दर उत्सवात आपण एखादातरी नविन गंमतखेळ खेळतो.... यावर्षीचा गंमतखेळ आहे "ओळखा पाहू"
यामध्ये दर तीन दिवसांनी खेळाचा विषय बदलला जाईल.

पुढच्या तीन दिवसांसाठी विषय आहे: महाराष्ट्रातील गावे
या खेळामध्ये मंडळ सुरुवातीला एक कोडे देईल.... ज्यात एखाद्या गावाबद्दल काही क्ल्यू असतील.... त्या क्ल्यू वरुन तुम्हाला गावाचे नाव ओळखायचे आहे.
बरोबर उत्तर ओळखणारा पुढचे कोडे/क्ल्यू देईल.

उदाहरणार्थ:
डोंगरांमध्ये वसलेले टुमदार हे गाव
त्याच डोंगरांवरुन याचे पडलेय नाव
सुपारी, बडीशेप, बटर अन खारी
इथला कंदी पेढा जगात भारी

उत्तर: सातारा

कोडे/क्ल्यू देताना गद्य/पद्य कुठल्याही प्रकारात देवू शकता
कोडे देताना शक्यतो त्या गावाची ठळकवैशिष्ट्ये/प्रसिद्ध वस्तू/वास्तू/व्यक्ती यांचा उल्लेख असावा.... जेणेकरुन ते ओळखायाला सोपे जाईल आणि लोकांच्या माहितीतही भर पडेल.
इथे फक्त महाराष्ट्रातीलच गावे ग्राह्य धरण्यात येतील.

आवडला का हा खेळ?
चला तर मग करुया का सुरुवात?

पहीला क्ल्यू आहे:

सह्याद्रीच्या कुशीमधले हे एक गिरीस्थान
पर्यटनाच्या दुनियेत याचा मोठ्ठा मान
ब्रिटिश अधिकारी यायचे इथे सुट्टीला
इथे जवळच आहे राजांचा एक किल्ला

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

दोन तपांपूर्वी लई भोगले आमी
सप्टेंबरातील तो काळा दिवस
आमच्या दुख्खावर शिणुमा निघतो
पण त्यापरीस आमची सोय नीट झाली तर
.....
आठवतंय का आमचे गाव ?

बरोबर.
३० /९ हा आजही किल्लारीत काळा दिवस म्हणून पाळला जातो.
माझ्या आठवणीत ३०/९/९३ ला बहुधा अनंत चतुर्दशी होती. पुण्यातल्या मिरवणुकीतील बैल भूकंपाच्या 'पूर्वजाणीवेने' बिथरले होते.

या उत्सवातील हा धागा व सिनेमा ओळखा हे दोन्ही धागे धमाल आहेत. पण मला गावे ओळखायचा अधिक आवडला. यात कल्पकता जास्त आहे.

मला वाटलं एनरॉन>>> एनराॅन प्रकल्प कोकणात आहे दाभोळला. वैनगंगा नदी विदर्भात आणि बावनथडी प्रकल्प बरीच वर्षे रखडलेला आहे. मला वाटते साधारण 1972 पासून 3ते 4 वेळा भूमिपूजन झाले. याच नदीवरील गोसीखुर्द प्रकल्प मार्गी लागला पण बावनथडीचं काम खुपच रखडलं.

माणगंगेच्या तीरी वसलेले
पावनक्षेत्र प्रसिद्ध हे
जवळ असे विठुरायाच्या
अन् राम नामी रंगलेले

पंचनद्यांच्या संगमावरी
यज्ञातून महादेव प्रगटले
आद्यकवी ही या भुमीवर
ग्रंथ रचण्यात रमले

पक्ष्यांचा निर्भय वास असे
शिवरायांचे शौर्यही वसे
कोकणवारी करता तुम्हा
दुर्ग मार्गी हा सहज दिसे

नवीन Submitted by @Shraddha on 7 September, 2019 - 14:33 >>

पवनी का हे?

महाबळेश्वर>>>> इथे उगम आहे ना? संगम नाही...

Submitted by कृष्णा on 7 September, 2019 - 14:35>>
कर्नाळा>>>
नवीन Submitted by वावे on 7 September, 2019 - 15:03
>>>>कर्नाळा बरोबर!

Pages