ओळखा पाहू ....... एक गंमतखेळ - २ - महाराष्ट्रातील गावे

Submitted by संयोजक on 1 September, 2019 - 10:49

मायबोलीच्या दर उत्सवात आपण एखादातरी नविन गंमतखेळ खेळतो.... यावर्षीचा गंमतखेळ आहे "ओळखा पाहू"
यामध्ये दर तीन दिवसांनी खेळाचा विषय बदलला जाईल.

पुढच्या तीन दिवसांसाठी विषय आहे: महाराष्ट्रातील गावे
या खेळामध्ये मंडळ सुरुवातीला एक कोडे देईल.... ज्यात एखाद्या गावाबद्दल काही क्ल्यू असतील.... त्या क्ल्यू वरुन तुम्हाला गावाचे नाव ओळखायचे आहे.
बरोबर उत्तर ओळखणारा पुढचे कोडे/क्ल्यू देईल.

उदाहरणार्थ:
डोंगरांमध्ये वसलेले टुमदार हे गाव
त्याच डोंगरांवरुन याचे पडलेय नाव
सुपारी, बडीशेप, बटर अन खारी
इथला कंदी पेढा जगात भारी

उत्तर: सातारा

कोडे/क्ल्यू देताना गद्य/पद्य कुठल्याही प्रकारात देवू शकता
कोडे देताना शक्यतो त्या गावाची ठळकवैशिष्ट्ये/प्रसिद्ध वस्तू/वास्तू/व्यक्ती यांचा उल्लेख असावा.... जेणेकरुन ते ओळखायाला सोपे जाईल आणि लोकांच्या माहितीतही भर पडेल.
इथे फक्त महाराष्ट्रातीलच गावे ग्राह्य धरण्यात येतील.

आवडला का हा खेळ?
चला तर मग करुया का सुरुवात?

पहीला क्ल्यू आहे:

सह्याद्रीच्या कुशीमधले हे एक गिरीस्थान
पर्यटनाच्या दुनियेत याचा मोठ्ठा मान
ब्रिटिश अधिकारी यायचे इथे सुट्टीला
इथे जवळच आहे राजांचा एक किल्ला

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

शेकडो वर्षांचे हिंदू साम्राज्य झाले अस्त इथे,
चिरंजीवी आडवा असतो इथे ,
सैतानही चिरनिद्रा घेतोय इथेच

खुलताबाद जि औरन्गाबाद
Submitted by हर्पेन on 6 September, 2019 - 18:49 >>>>.बरोबर

राज्याच्या उत्तरेला आहे
साधेसुधे आहे पण
उद्योगातले फाईव्ह स्टार होतंय..
उर्जा प्रकल्प पण भारी

खूप सोपे
.
.

करवीर नगरीत वसलेले, ज्याच्या नावातच गड आहे

हा प्राणी निर्बुद्ध म्हणता तरी
ह्याचा बाजार मोठ भरतो ह्या गावी
नवनाथातील एक नाथ आहे इथे
आहे इथे त्याची महती काय सांगावी

गडहिंग्लज नाही

हा प्राणी निर्बुद्ध म्हणता तरी
ह्याचा बाजार मोठ भरतो ह्या गावी
नवनाथातील एक नाथ आहे इथे
आहे इथे त्याची महती काय सांगावी
नवीन Submitted by कृष्णा on 6 September, 2019 - 18:54 >>>>मढी

डॉक्टर तुम्ही अजून क्ल्यू द्या ना. उत्तर बाजू म्हणजे नाशिक, नगर, खानदेश वगैरे येतं ना, मराठवाड्याचापण काही भाग येतो का. नकाशा काढून बघायला हवं.

Pages