ओळखा पाहू ....... एक गंमतखेळ - २ - महाराष्ट्रातील गावे

Submitted by संयोजक on 1 September, 2019 - 10:49

मायबोलीच्या दर उत्सवात आपण एखादातरी नविन गंमतखेळ खेळतो.... यावर्षीचा गंमतखेळ आहे "ओळखा पाहू"
यामध्ये दर तीन दिवसांनी खेळाचा विषय बदलला जाईल.

पुढच्या तीन दिवसांसाठी विषय आहे: महाराष्ट्रातील गावे
या खेळामध्ये मंडळ सुरुवातीला एक कोडे देईल.... ज्यात एखाद्या गावाबद्दल काही क्ल्यू असतील.... त्या क्ल्यू वरुन तुम्हाला गावाचे नाव ओळखायचे आहे.
बरोबर उत्तर ओळखणारा पुढचे कोडे/क्ल्यू देईल.

उदाहरणार्थ:
डोंगरांमध्ये वसलेले टुमदार हे गाव
त्याच डोंगरांवरुन याचे पडलेय नाव
सुपारी, बडीशेप, बटर अन खारी
इथला कंदी पेढा जगात भारी

उत्तर: सातारा

कोडे/क्ल्यू देताना गद्य/पद्य कुठल्याही प्रकारात देवू शकता
कोडे देताना शक्यतो त्या गावाची ठळकवैशिष्ट्ये/प्रसिद्ध वस्तू/वास्तू/व्यक्ती यांचा उल्लेख असावा.... जेणेकरुन ते ओळखायाला सोपे जाईल आणि लोकांच्या माहितीतही भर पडेल.
इथे फक्त महाराष्ट्रातीलच गावे ग्राह्य धरण्यात येतील.

आवडला का हा खेळ?
चला तर मग करुया का सुरुवात?

पहीला क्ल्यू आहे:

सह्याद्रीच्या कुशीमधले हे एक गिरीस्थान
पर्यटनाच्या दुनियेत याचा मोठ्ठा मान
ब्रिटिश अधिकारी यायचे इथे सुट्टीला
इथे जवळच आहे राजांचा एक किल्ला

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

जाउ द्या देतो उत्तर

अकोले (अहमदनगर)
भंडारदरा येथिल काजवा महोत्सव पहायला लोक येतात
१९१८ साली एका जुलमी सरकारी अधिकार्‍याला स्थानिक लोकांनी जिंवत जाळून देहदंड दिला होता ह्याचा विश्वकोशात उल्लेख आहे.
येथिल प्रवरा नदीचा उल्लेख ज्ञानेश्वर माऊलीनी अमृतवाहिनी असा केलेला आहे. ह्या नदीतटी नेवासे येथे माऊली ने अमृतानुभव ग्रंथ निर्मिला!
सह्यगिरीतील उंच शिखर कळसूबाई ह्याच तालुक्यात. रतनवाडीला प्रवरा उगम खाली अमृतेश्वराचे सुंदर मंदिर अकोले गावात देखिल एक पेशवेकालीन महादेवाचे गंगाधरेश्वर तर हेमाडपंथी सिद्धेश्वर ही दोन सुंदर मंदिरे. प्रवरातटी अगस्ती आश्रम . असे सह्याद्रीच्या कुशीतील हे सुंदर गांव...

पोफळी

पोफळी.... बरोबर आहे स्मिता श्रीपाद!

कोयनानगरच्या पुढे जाउन कुंभार्ली घाट उतरल्यानंतर येते हे छोटेसे गाव!

अछ्छा! छान आहे… मला भोर नाही भिरा म्हणायचे होते. कोलाडच्या पुढे टाटा पॉवर प्लांट आहे तिकडे… एनिवे तुमचा क्लु दुसराच होता Happy

साहित्य, कला, शिक्षण, राजकारण
सगळ्या क्ष्रेत्रात अग्रेसर
प्रितीसंगमाच्या काठाशी
वसलय माझं माहेर

ओळखा पाहु माझं गाव ....

बरोबर Happy
प्रीतीसंगम हा खुप सोपा क्लु होत बहुतेक Happy

हत्तीवरुन येतात देव
लग्नसोहळा होतो शाही
वाळवंटी भरते यात्रा
भक्तिमय दिशा दाही

पाली
पाल पण म्हणतात
खंडोबा आणी म्हाळसा विवाहाच्या वेळी मोठी यात्रा असते

श्री दत्तात्रयांची मुर्ती
दिसते सुंदर साजिरी
स्वराज्याच्या छत्रपतींचे
जन्मस्थान आहे शेजारी

बरोबर

खंडोबाच आलाय तर

ह्या तालुक्यातही आहे एक ठिकाण खंडोबाचे
पवित्र नदी तिरी वसले गांव हे साचे
नांवे दोन गांवाचे जरी दुसरे मोठ्या हुतात्म्याचे
ह्याच्या सोबतच आहे हे कसदार लोककलेचे

Pages