ओळखा पाहू ....... एक गंमतखेळ - २ - महाराष्ट्रातील गावे

Submitted by संयोजक on 1 September, 2019 - 10:49

मायबोलीच्या दर उत्सवात आपण एखादातरी नविन गंमतखेळ खेळतो.... यावर्षीचा गंमतखेळ आहे "ओळखा पाहू"
यामध्ये दर तीन दिवसांनी खेळाचा विषय बदलला जाईल.

पुढच्या तीन दिवसांसाठी विषय आहे: महाराष्ट्रातील गावे
या खेळामध्ये मंडळ सुरुवातीला एक कोडे देईल.... ज्यात एखाद्या गावाबद्दल काही क्ल्यू असतील.... त्या क्ल्यू वरुन तुम्हाला गावाचे नाव ओळखायचे आहे.
बरोबर उत्तर ओळखणारा पुढचे कोडे/क्ल्यू देईल.

उदाहरणार्थ:
डोंगरांमध्ये वसलेले टुमदार हे गाव
त्याच डोंगरांवरुन याचे पडलेय नाव
सुपारी, बडीशेप, बटर अन खारी
इथला कंदी पेढा जगात भारी

उत्तर: सातारा

कोडे/क्ल्यू देताना गद्य/पद्य कुठल्याही प्रकारात देवू शकता
कोडे देताना शक्यतो त्या गावाची ठळकवैशिष्ट्ये/प्रसिद्ध वस्तू/वास्तू/व्यक्ती यांचा उल्लेख असावा.... जेणेकरुन ते ओळखायाला सोपे जाईल आणि लोकांच्या माहितीतही भर पडेल.
इथे फक्त महाराष्ट्रातीलच गावे ग्राह्य धरण्यात येतील.

आवडला का हा खेळ?
चला तर मग करुया का सुरुवात?

पहीला क्ल्यू आहे:

सह्याद्रीच्या कुशीमधले हे एक गिरीस्थान
पर्यटनाच्या दुनियेत याचा मोठ्ठा मान
ब्रिटिश अधिकारी यायचे इथे सुट्टीला
इथे जवळच आहे राजांचा एक किल्ला

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

टेकडीवर विराजमान गजानन, तलावाशेजारी हनुमान,
मध्यभागी अनेक चौक, खवय्यांना तिखटाचा षौक.

राम सितेने केले येथे विश्राम
महाकवी ला सुचले येथे काव्य महान
आयुर्वेदाचे महाविद्मालय येथे छान
ओळखा पाहू कोणते आहे हे ग्राम

नाशिक?

मध्यंतरी इकडे आयुर्वेदिक कॉलेज आहे असे ऐकले होते

रामटेक

कालीदासाने मेघदूत लिहले इथे!

कालीदासाने मेघदूत लिहले इथे!>>>> बहुतेक कालिदासाने मेघदूत मध्यप्रदेशातील एका शहरात कदाचित उज्जैन इथे लिहिले अशी मान्यता आहे. असो पुढचं कोड द्या.

सह्याद्रीच्या कुशीत गांव हे
अमृतधारा इथे वाहते
विविध निसर्गाच्या चमत्कृतींचा
वारसा भवताली मिरविते
स्वातंत्र्याच्या समरी इथले
उल्लेख तुम्हा विश्वकोशीही दिसते

रामटेक ला कालीदासाचे स्मारक आहे. कुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठ आहे. आणि मेघदूत तिथे लिहिले गेले आहे असे सांगितले जाते.

डोंगरांच्या सहवासात आहे गाव
पुणे-मुंबईहून कोकणात जाताना,
आम्हाला स्पर्श करून जावं....
गणपतीबाप्पासाठी आमचंच नाव.

पेण

राजाचा आहे येथे मुक्त विहार
त्याला बघायला असतात सगळे उत्सुक फार
वनराजीने नटलेले छान
जवळच आहे एका कर्ममहर्षीचे स्थान
Happy

सह्याद्रीच्या कुशीत गांव हे
अमृतधारा इथे वाहते
विविध निसर्गाच्या चमत्कृतींचा
वारसा भवताली मिरविते
स्वातंत्र्याच्या समरी इथले
उल्लेख तुम्हा विश्वकोशीही दिसते
Submitted by कृष्णा on 6 September, 2019 - 12:57 >>>>> आधी याचे उत्तर तरी द्या.

वाई

ताडोबा बरोबर आहे..
आनंदवन जवळच आहे वरोऱ्याला >>> धन्यवाद श्रद्धा

वाई नाही

विश्वकोशात ह्या गावातील १०० वर्षापुर्वीच्या स्वातंत्र्य समरातील एका घटनेचा उल्लेख आहे. एका जुलमी इंग्रज अधिकार्‍याला शिक्षा केल्याचा...

एक निसर्गाची यात्रा बघायला लोक गर्दी करतात ह्या तालुक्याच्या एका निसर्गरम्य गावात.

Pages