ओळखा पाहू ....... एक गंमतखेळ - २ - महाराष्ट्रातील गावे

Submitted by संयोजक on 1 September, 2019 - 10:49

मायबोलीच्या दर उत्सवात आपण एखादातरी नविन गंमतखेळ खेळतो.... यावर्षीचा गंमतखेळ आहे "ओळखा पाहू"
यामध्ये दर तीन दिवसांनी खेळाचा विषय बदलला जाईल.

पुढच्या तीन दिवसांसाठी विषय आहे: महाराष्ट्रातील गावे
या खेळामध्ये मंडळ सुरुवातीला एक कोडे देईल.... ज्यात एखाद्या गावाबद्दल काही क्ल्यू असतील.... त्या क्ल्यू वरुन तुम्हाला गावाचे नाव ओळखायचे आहे.
बरोबर उत्तर ओळखणारा पुढचे कोडे/क्ल्यू देईल.

उदाहरणार्थ:
डोंगरांमध्ये वसलेले टुमदार हे गाव
त्याच डोंगरांवरुन याचे पडलेय नाव
सुपारी, बडीशेप, बटर अन खारी
इथला कंदी पेढा जगात भारी

उत्तर: सातारा

कोडे/क्ल्यू देताना गद्य/पद्य कुठल्याही प्रकारात देवू शकता
कोडे देताना शक्यतो त्या गावाची ठळकवैशिष्ट्ये/प्रसिद्ध वस्तू/वास्तू/व्यक्ती यांचा उल्लेख असावा.... जेणेकरुन ते ओळखायाला सोपे जाईल आणि लोकांच्या माहितीतही भर पडेल.
इथे फक्त महाराष्ट्रातीलच गावे ग्राह्य धरण्यात येतील.

आवडला का हा खेळ?
चला तर मग करुया का सुरुवात?

पहीला क्ल्यू आहे:

सह्याद्रीच्या कुशीमधले हे एक गिरीस्थान
पर्यटनाच्या दुनियेत याचा मोठ्ठा मान
ब्रिटिश अधिकारी यायचे इथे सुट्टीला
इथे जवळच आहे राजांचा एक किल्ला

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आंभोरा बरोबर आहे. नागपूर जिल्ह्य़ातील कुही तालुक्यात. वैनगंगा ,कन्हान , आम , मुरझा , आणि कोलारी या पाच नद्यांच्या संगम. 'चैतन्येश्वर महादेव' यज्ञातून प्रगटलेली शिवलिंग.
आद्यकवी मुकुंदराज यांनी तीन ग्रंथ लिहिलेले येथे.

भुते(खरी/खोटी) उतरवण्याचा कार्यक्रम भरपूर ठिकाणी चालतो.
हत्ती घुसता होतो वांधा म्हणजे हत्तींचा त्रास असेल तर तो सिंधुदुर्ग/कोल्हापूरचा काही भाग येतो
क्लू अपूर्ण वाटतायेत

हत्ती घुसता होतो वांधा म्हणजे हत्तींचा त्रास असेल तर तो सिंधुदुर्ग/कोल्हापूरचा काही भाग येतो
>>>> मग बहुतेक बांदा.

या विषयाच्या अनुषंगाने 'महाराष्ट्र दर्शन' या पुस्तकाचा सुहास कुलकर्णी यांनी करून दिलेला परिचय :

https://www.aksharnama.com/client/granthnama_article_detail/3578

.... जरूर वाचण्यासारखा .

तालुका अमचा लहान ,
नावात अमच्या गड खरा.

दोन मुख्यमंत्री दिले महान

((दोन गावं आणि तालुका.))

साद,
अजून एखादा मुद्दा द्या ना

इथे आता सरमिसळ झालेली आहे. आधीच्या कोड्याचे उत्तर मिळत नाही तोपर्यंत अजून दोन कोडी येतात. आणि कोडी देणारे सुध्दा कोडी देऊन सोडवण्यासाठी पाठपुरावा करत नाहीत.
खेळाचे नियम पाळा तरच खेळाचा आनंद लुटता येईल.

नरेश ++११
srd येईपर्यंत व्यवस्थित चालू होते. त्यांनी आधीचे न बघता एकदम टाकायला सुरवात केली.

Pages