ओळखा पाहू ....... एक गंमतखेळ - २ - महाराष्ट्रातील गावे

Submitted by संयोजक on 1 September, 2019 - 10:49

मायबोलीच्या दर उत्सवात आपण एखादातरी नविन गंमतखेळ खेळतो.... यावर्षीचा गंमतखेळ आहे "ओळखा पाहू"
यामध्ये दर तीन दिवसांनी खेळाचा विषय बदलला जाईल.

पुढच्या तीन दिवसांसाठी विषय आहे: महाराष्ट्रातील गावे
या खेळामध्ये मंडळ सुरुवातीला एक कोडे देईल.... ज्यात एखाद्या गावाबद्दल काही क्ल्यू असतील.... त्या क्ल्यू वरुन तुम्हाला गावाचे नाव ओळखायचे आहे.
बरोबर उत्तर ओळखणारा पुढचे कोडे/क्ल्यू देईल.

उदाहरणार्थ:
डोंगरांमध्ये वसलेले टुमदार हे गाव
त्याच डोंगरांवरुन याचे पडलेय नाव
सुपारी, बडीशेप, बटर अन खारी
इथला कंदी पेढा जगात भारी

उत्तर: सातारा

कोडे/क्ल्यू देताना गद्य/पद्य कुठल्याही प्रकारात देवू शकता
कोडे देताना शक्यतो त्या गावाची ठळकवैशिष्ट्ये/प्रसिद्ध वस्तू/वास्तू/व्यक्ती यांचा उल्लेख असावा.... जेणेकरुन ते ओळखायाला सोपे जाईल आणि लोकांच्या माहितीतही भर पडेल.
इथे फक्त महाराष्ट्रातीलच गावे ग्राह्य धरण्यात येतील.

आवडला का हा खेळ?
चला तर मग करुया का सुरुवात?

पहीला क्ल्यू आहे:

सह्याद्रीच्या कुशीमधले हे एक गिरीस्थान
पर्यटनाच्या दुनियेत याचा मोठ्ठा मान
ब्रिटिश अधिकारी यायचे इथे सुट्टीला
इथे जवळच आहे राजांचा एक किल्ला

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

भाषा असे खास इथली,
मासळी ही दर्जेदार,
पर्यटकांचा ओढा नेहमी,
पाहण्या किल्ला दिमाखदार.

राजकुमारी चे हरण करण्या भगवंत आले
शापवाणीने अवघे नगर पालथे झाले>>>
त्याच उत्तर दिले आहे आधी कौंडीण्यपुर. नंतर नायगावच कोडं आलं.

अलीकडच्या काळात ज्ञानेश्वरीवर आपल्या ग्रंथात खऱ्या अधिकारवाणीने निरूपण केलेल्या नाथपंथियाचे कर्मस्थान ज्यांनी आपल्या दिव्यवाणीतून जणू अमृतच प्रसवलं.
गावाच्या नावात एक शरीर अवयव आहे.

कोडे...
नाटकपंढरी, गणेश मंदिरी,।
संभाजी इथे इतिहासाला भिडे।।
राजा असे जनहितकारी।
वसंत असे मुख्यमंत्री।।
?

नो

शरीराचा अवयव हा क्लू चुकला माझ्याकडून ... माफ करा Sad
मोतीचूर ऐकल्यासारखंच याचबी नाव आहे. आता यायलाच हवं
सोलापूर जिल्हा आहे

माचणूर
बाबा आर्वीकर - दिव्यामृतधारा
द्या भरत पुढचं काही

Pages