ओळखा पाहू ....... एक गंमतखेळ - २ - महाराष्ट्रातील गावे

Submitted by संयोजक on 1 September, 2019 - 10:49

मायबोलीच्या दर उत्सवात आपण एखादातरी नविन गंमतखेळ खेळतो.... यावर्षीचा गंमतखेळ आहे "ओळखा पाहू"
यामध्ये दर तीन दिवसांनी खेळाचा विषय बदलला जाईल.

पुढच्या तीन दिवसांसाठी विषय आहे: महाराष्ट्रातील गावे
या खेळामध्ये मंडळ सुरुवातीला एक कोडे देईल.... ज्यात एखाद्या गावाबद्दल काही क्ल्यू असतील.... त्या क्ल्यू वरुन तुम्हाला गावाचे नाव ओळखायचे आहे.
बरोबर उत्तर ओळखणारा पुढचे कोडे/क्ल्यू देईल.

उदाहरणार्थ:
डोंगरांमध्ये वसलेले टुमदार हे गाव
त्याच डोंगरांवरुन याचे पडलेय नाव
सुपारी, बडीशेप, बटर अन खारी
इथला कंदी पेढा जगात भारी

उत्तर: सातारा

कोडे/क्ल्यू देताना गद्य/पद्य कुठल्याही प्रकारात देवू शकता
कोडे देताना शक्यतो त्या गावाची ठळकवैशिष्ट्ये/प्रसिद्ध वस्तू/वास्तू/व्यक्ती यांचा उल्लेख असावा.... जेणेकरुन ते ओळखायाला सोपे जाईल आणि लोकांच्या माहितीतही भर पडेल.
इथे फक्त महाराष्ट्रातीलच गावे ग्राह्य धरण्यात येतील.

आवडला का हा खेळ?
चला तर मग करुया का सुरुवात?

पहीला क्ल्यू आहे:

सह्याद्रीच्या कुशीमधले हे एक गिरीस्थान
पर्यटनाच्या दुनियेत याचा मोठ्ठा मान
ब्रिटिश अधिकारी यायचे इथे सुट्टीला
इथे जवळच आहे राजांचा एक किल्ला

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

नही
त्या नावात वनस्पती !

खूप सोपे
.
.

करवीर नगरीत वसलेले, ज्याच्या नावातच गड आहे
Submitted by VB on 6 September, 2019 - 19:01 >>> हे चंदगड आहे का ?

मोठी शहरे माहिती आहेत विदर्भातील , गावं काही नावं माहिती आहेत पण तिथे काय आहे ह्या गेममुळे समजलं आहे, बुटीबोरी एरिया ऐकून माहिती होता.

मोठी शहरे माहिती आहेत विदर्भातील , गावं काही नावं माहिती आहेत पण तिथे काय आहे ह्या गेममुळे समजलं आहे, >> उपक्रम अगदी उपयुक्त ठरतोय बऱ्याच गावांची माहिती कळतेय Happy

सीमेवर असले तरी आपलेच की ते
समजतात लोक त्याला मागास ..
एका धान्याच्या गिरण्या खूप
रेल्वे स्टेशन पण भारी
अन विमान बी उडतंय इथून .

अजून एक सोपे

हिरण्या-चित्रा वाहतात जवळून
खूप जुने ग्रंथसंग्रहालय आहे इकडे
कोकणी-कानडी दोन्ही आहेत जवळ

या उत्तम उपक्रमाबद्दल संयोजकांचे मनापासून आभार !
ही कोडी तयार करताना तसेच सोडविताना इतिहास, भूगोल आणि सामान्यज्ञान यांची छान उजळणी झाली.
या धाग्यावर आलेल्या सर्वांच्या आठवणीसाठी एका जुन्या धाग्याचा दुवा:

https://www.maayboli.com/node/41636
तिथे बऱ्याच सभासदांनी जगभरातील गावांबद्दल उपयुक्त लिहीलेले आहे.

Pages