तुम्ही कोणतं गाणं रिपीट मोडवर ऐकता आहात?

Submitted by अज्ञातवासी on 8 January, 2019 - 11:42

दरवर्षी एक ना एक गाणं असं असतं, जे आपल्या रिपीट मोडवर असतं!
यावर्षी सुरुवातीला बिंते दिल माझ्या रिपीट मोडला होतं!
त्यांनतर शेप ऑफ यु!
त्यांनतर मेरे नाम तू!
तेलगू मध्ये bachikusto आणि आता तमिळ मध्ये adchithooku!
तर सांगा, तुमचं कोणतं गाणं रिपीट मोडवर आहे?
आता माझा हेतू सांगतो, सध्या माझ्या फोनमध्ये ही चारच गाणी आहेत.
तुमचं रिपीट मोडवरच गाणं मी स्वतः ऐकेन, आणि आवडलं तर तुम्हाला लाख लाख धन्यवाद!
येउद्या!

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

ये दुरीया
हम जो चलने लगे
हसी बन गये
पल एक पल मे ही थम सा गया

Light 1
तिला जगू द्या - अमृताजी फडणवीस
https://youtu.be/DhEjS0I5mBg
सध्या तुनळीवर हे गाणे ट्रेंडिंग आहे. जवळपास १४लाख लोकांनी पाहिले आहे तरी फक्त ४२०० लाईक्स आणि ३२००० डिसलाईक्स आलेत. आजकाल लोकांना खऱ्या टॅलेंटची कदर उरली नाही. एवढ्या सुंदर गाण्याला डिसलाईक देणारे नतद्रष्ट कोण असतील ?
Light 1

माझ्या लिस्टमध्ये काही नवीन गाणी ऍड झालीत.

१. पधारो म्हारे देस - बंदिश bandit
२. ओ री सखी - बंदिश bandit
३. मासोळी - बाजी
४. जिमी जिमी - डिस्को डान्सर
५. Another day of sun - la la land
6. Nazar na lag jaye - stree
7. Suit suit - hindi medium
8. Valam - made in China.
९. Without me - एमिनेम
१०. Attention - charlie puth

इस मोडसे जाते है,
कुछ सुस्त कदम रस्ते,
कुछ तेज कदम राहे.

ओल्या सांजवेळी उन्हे सावलीस बिलगावी,
तशी तू जवळी ये जरा.

येप्प Lol
एक वेगळाच फिलिंग देतात ही गाणी. शांत, एन्जॉयइंग द लाईफ kind of! (जे माझ्या लाईफमध्ये बिलकुल नाही Rofl
यावर मी एक ललीतलेख पाडू शकतो!

आधी कथा पूर्ण करू दे, मग लिहितो.-- ok

तुला,आवडेल कि नाही काय माहीत..
पण, मला नवीन पैकी ,
तु तो साडी केअर नि करदा
आणि 'तेरी चोरीया(गुरुच आहे) खूप आवडतात..

तू साडी केयर नि करदा chalang मधलं आहे ना? आवडलं होतं मला.
पण 'तेरी चोरीया तितकं नाही.
अरे हो, वरच्या लिस्टमध्ये 'फिलहाल' आणि 'pachataoge' राहील.
हेही असतात रिपीट मोडवर!
आणि अजून एक म्हणजे charlie puth च अटेन्शन! शेप ऑफ यु नंतर सर्वात जास्त आवडलेलं गाणं!

तू साडी केयर नि करदा chalang मधलं आहे ना? -- हो तेच..
आवडलं होतं मला.
पण 'तेरी चोरीया तितकं नाही.-- ok

Meghna Aherrao यांची युट्युबवरील कमेंट

जरी "सुन्या सुन्या" हे गाणे "उंबरठा" चित्रपटातले असले तरी सुरेश भटांनी ते गाणे तो चित्रपट बनण्याआधीच ते लिहिले होते.

जयश्री गडकर आणि बाळ धुरी हे एक चित्रपट बनवत होते आणि त्यांनी बाळासाहेबांना संगीतकार म्हणून निवडले होते. त्यांनीच बाळासाहेबांना सांगीतले कि गीतकार तुम्ही निवडा.

बाळासाहेबांनी सुरेश भटांना मुंबईत बोलावून घेतले (ते मुळचे नागपूरचे). त्यांना कथा वगैरे सांगून ४-५ गाणी लिहा असे सांगितले. त्यांना हॉटेल मध्ये राहायला सांगून सगळे आपापल्या घरी गेले.

१-२ दिवस गेले पण भट साहेबांनी एक हि गाणे लिहिले नाही. पंडितजींनी त्यांना विचारले तर ते म्हणाले "कुछ सुंझ नाही राहा है तो क्या लिखू!!!" ( ते बाळासाहेबांशी नेहमी हिंदीत बोलत असत). ४ दिवस झाले पण नो चेंज !!

जयश्री बाई थोड्या अस्वथ होवू लागल्या कारण हॉटेलचे बिल वाढतंय आणि चित्रपटाचे बजेट कमी. पण भट साहेब जैसे थे !!

७ दिवस झाल्यावर जयश्री बाई म्हणाल्या "मला नको तुमचे हे भट साहेब. जावू द्या त्यांना परत नागपूरला " बाळासाहेबांनी हे सांगितल्यावर भट साहेब थोडे नाराज झाले पण म्हणाले "ठीक है , मेरा रेल्वे का टिकट दो, मै निकलता हू "

बाळासाहेबांनी त्यांचे तिकीट काढून आणून दिले रूम खाली केली, जयश्री बाई हॉटेल चे बिल भरू लागल्या तेव्हा ते म्हणाले " आप मत भरो ये मेरा दोस्त है न बाळ, ये भरेगा मेरा बिल ".

बाळासाहेबांनी हॉटेलचा बिल भरलं आणि टक्सी बोलाविली. टक्सीत बसल्यावर भट साहेबांनी अचानक पणे बाळासाहेबांकडे एक कागद मागितला. ते म्हणाले माझ्याकडे नाही. भट साहेब म्हणाले त्या हॉटेल वाल्याकडून एक कागद आण.

बाळासाहेबांनी हॉटेलात परत जावून एक जुने बिल आणले त्या बिलाच्या मागे भट साहेबांनी फक्त १५ सेकंदात एक गाणे लिहिले अगदी झरझर … शब्द होते

सुन्या सुन्या मैफिलीत माझ्या
तुझेच मी गीत गात आहे
अजूनही वाटते मला की
अजूनही चांद रात् आहे!!

सगळी कडवी लिहून झाल्यावर त्यांना थोडे शांत वाटले. त्यांनी तो कागद बाळासाहेबांकडे दिला. बाळासाहेब ती कविता वाचून स्तब्ध झाले.

त्यांनी ती कविता लगेच जयश्री बाईना आणि धुरी साहेबाना दाखविली. जयश्री बाईंच्या डोळ्यातून पाणी वाहू लागले.

त्यांनी १५००० रुपयांचा चेच्क फाडून भट साहेबांच्या हातात ठेवला पण भट साहेबांनी त्याचा स्वीकार केला नाही. ते म्हणाले "यह मेरी अमानत है और मै मेरी अमानत कभी बेचता नही, रखो आप इसे". भट साहेब तसेच निघून गेले.

पुढे जयश्री बाईंचा तो चित्रपट काही बनला नाही आणि ते गाणे बाळासाहेबांकडे राहिले.

कालांतराने जब्बार पटेल यांनी "उंबरठा" हा चित्रपट बनवायला घेतला. त्याचे संगीत बाळासाहेबांकडे दिले आणि गीते दिली भटांना. बाळासाहेबांनी भटांना हे गाणे दाखवले आणि त्यांना विचारले "हे गाणे वापरू या का?" भट साहेब म्हणाले "तुम्हारी इच्छा".

ते गाणे मग जब्बार पटेलांना ऐकवले आणि त्यांना पण आवडले. फक्त त्यांनी एका शब्दावर आक्षेप घेतला. शब्द होते

कळे न मी पाहते कुणाला
कळे न हा चेहरा कुणाचा
पुन्हा पुन्हा भास होत आहे
कुणीतरी आरश्यात आहे

पटेलांनी भटांना सांगितले की तो "कुणीतरी" शब्द नको मला कारण ती एक विवाहित स्त्री आहे (चित्रपटाची नायिका). लोक काय म्हणतील?

परत गाडी अडकली. बाळासाहेबांनी २-३ शब्द सुचविले पण त्यावर भट साहेब रागावून म्हणाले "तुम अपना काम करो. मेरे काम मे दखल अंदाजी न करो".

रेकॉर्डिंग ची वेळ आली. भट साहेबाना शब्द सुचेना आणि जब्बार पटेल तयार होईनात. चाल, सेटअप आणि लता दीदी सगळे तयार होते .

इतक्यात शांता शेळके लता दीदींना भेटायला स्टुडिओ मध्ये आल्या त्यांनी थोडी चौकशी केल्यावर त्यांना कळले कि एका शब्दाची अडचण आहे. त्या लगेच म्हणाल्या "अरे काय कठीण आहे त्यात. "कुणीतरी " ऐंवजी "तुझे हसू" घल.

त्या क्षणाला सुरेश भटांनी "वाह , शांता वाह " असे उदगार काढले. शांता बाईंचे ते शब्द गझलच्या त्या ठेक्यात एकदम चपलख बसले.

कळे न मी पाहते कुणाला
कळे न हा चेहरा कुणाचा
पुन्हा पुन्हा भास होत आहे
तुझे हसू आरश्यात आहे

एका टेक मध्ये बाळासाहेबांनी आणि लता दिदींनी ते गाणे रेकॉर्ड केले आणि अजरामर गाण्याचा जन्म झाला .

हे गाणे पहिल्यांदा ऐकल्यावर स्मिता पाटील लता दीदींच्या पायावर धाय मोकलून रड्ल्याची आठवण सुद्धा बाळासाहेबांनी सांगितली.

अशी उत्स्फूर्त कविता करणारा कवी महान, सहज शब्द सुचविणारी ती कवयित्री महान. अजरामर चाल आणि अजरामर आवाज. एका शब्दासाठी गाणे अडवून ठेवणारा तो दिग्दशर्क महान आणि पडदया वरची ती नायिका आणि तो नायक केवळ महान महान आणि महानच ...

छान माहिती अज्ञातवासी..
सुन्या सुन्या मैफीलीत हे गाणं माझ्या खूप आवडीचं आहे. कितीही वेळा ऐकलं तरिही मन भरत नाही. ह्या गाण्यात काय जादू आहे माहीत नाही पण ऐकताना मन खूप हळवं होतं उगाचच!!

काही गाणी मी नेहमी ऐकते. सुन साहिबा.. सुन साहिबा सुन..( राम तेरी गंगा मैली), लंबी जुदाई ( हिरो) ही गाणी ऐकली की मी बालपणात जाते मग मला नविन घराला दिलेला रंग, आम्ही सगळी चुलत भावंडं हे सारं अंधुकसं डोळ्यांसमोर येत.ही गाणी आठवण्याचं कारण की तेव्हा नविन टेपरेकॉर्डर घरी आणला होता आणि ह्या गाण्याच्या कॅसेट सतत वाजवल्या जायच्या.

९० च्या दशकातील बरीचशी गाणी मी रिपीट मोडवर ऐकते. दिवाना, आशिकी, सडक, दिलवाले, फुल और काँटे, बाजीगर, दिलवाले दुल्हनियाँ ले जाएँगे, मोहब्बते कुछ कुछ होता है, हम आपके है कौन..हया चित्रपटातील गाणी मला नेहमी ऐकायला आवडतात.

मराठी गाणी हि मी नेहमी ऐकते.
१) जीवनात हि घडी अशीच राहू दे
२) एका तळ्यात होती
३) परिकथेतील राजकुमारा
४) फिटे अंधाराचे जाळे

हि गाणी मला ऐकायला आवडतात कारण आकाशवाणीवर हि गाणी लागायची जेव्हा सकाळी शाळेत जायच्या वेळेला आई माझ्या केसांच्या वेण्या घालत असायची. मग हि गाणी मला भूतकाळाची आठवणं करून देतात.

जीममध्ये जात होती त्यावेळी मोबाईलवर कबीर सिंगची गाणी ऐकायला आवडायची. सध्या सुन्या सुन्या मैफलीत माझ्या, सात समुंदर पार मै ( विश्वात्मा), ऐ काश के हम होश में अब ( कभी हाँ.. कभी ना) हि गाणी रिपीट मोडवर आहेत.

एन्जॉयइंग द लाईफ kind of! (जे माझ्या लाईफमध्ये बिलकुल नाही Rofl
यावर मी एक ललीतलेख पाडू शकतो! >>>>> सध्याच्या काळात ते कुणाच्या लाईफमध्ये नाही म्हणा.

९० च्या दशकातील बरीचशी गाणी मी रिपीट मोडवर ऐकते. दिवाना, आशिकी, सडक, दिलवाले, फुल और काँटे, बाजीगर, दिलवाले दुल्हनियाँ ले जाएँगे, मोहब्बते कुछ कुछ होता है, हम आपके है कौन..हया चित्रपटातील गाणी मला नेहमी ऐकायला आवडतात. >>>>>> सेम पिन्च

मी छिचोरेच्या फिकर नॉटच्या प्रेमात आहे. Happy
साल्सा स्टाईल गाणं ऐकायला आणि बघायलासुद्धा भारी वाटतं!!

Pages