तुम्ही कोणतं गाणं रिपीट मोडवर ऐकता आहात?

Submitted by अज्ञातवासी on 8 January, 2019 - 11:42

दरवर्षी एक ना एक गाणं असं असतं, जे आपल्या रिपीट मोडवर असतं!
यावर्षी सुरुवातीला बिंते दिल माझ्या रिपीट मोडला होतं!
त्यांनतर शेप ऑफ यु!
त्यांनतर मेरे नाम तू!
तेलगू मध्ये bachikusto आणि आता तमिळ मध्ये adchithooku!
तर सांगा, तुमचं कोणतं गाणं रिपीट मोडवर आहे?
आता माझा हेतू सांगतो, सध्या माझ्या फोनमध्ये ही चारच गाणी आहेत.
तुमचं रिपीट मोडवरच गाणं मी स्वतः ऐकेन, आणि आवडलं तर तुम्हाला लाख लाख धन्यवाद!
येउद्या!

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

माधव
हर्मोनिअम हा माझा वीक पॉईट. आणि त्यामुळे कव्वाली सुद्धा. नुसरत साहेबांच्या कुठल्याही कव्वालीच्या आधी पेटीवाल्यांना फ्री हँड.
२३:४३ ला जी स्वरावली आहे ती सेम राहत साहेबांनी रश्के कमर मध्ये वापरली आहे.>>> कारण तो समोरच बसला आहेना.
आता ह्या पहा रेश्माजी आणि त्यांचा पेटीवाला. एकच धून वाजवतो आहे.
https://www.youtube.com/watch?v=kowARsNeMqo
अप्पा जळगावकर, एकनाथ ठाकूर . कहां गये वो लोग.
हे पेटीवाले गायकाच्या नॅनोसेकंद मागे राहून त्यांना फालो करत असतात.

पेटी आणि कव्वाली एकत्र म्हटले की मला सगळ्यात आधी सचीन जांभेकर आठवतात. पडद्यावर नूतन आणि पडद्यामागे आशा . दोघींच्या अदाकारीने अविस्मरणीय झालेलं निगाहे मिलानेको इतरांच्या गळ्यावर सहसा चढत नाही. पण जांभेकरांची बोटे मात्र कमाल करतात ...

https://www.youtube.com/watch?v=eLTeGMFMCZk

माधव
आभार. ऐकतोय. धमाल चालू आहे. Enjoying!

पीएस-२ मधलं ‘रुआं रुआं’ ऐकतेय सध्या. गुलज़ार आणि रहमान बरेचदा काहीतरी ऍडिक्टिव घडवून आणतात, त्यापैकी हे एक ठरावं. शिल्पा रावचा आवाज परफेक्ट सुट होतो आहे. मुळ गाण्याचं पिक्चरायझेशन आवडलंच. पण हे ऍनिमेशन जास्त आवडलं.

तशी आवडलेली सगळीच अधूनमधून ऐकत असते म्हणजे रिपीट होतात पण एकच सलग रिपीटवर असं कमी वेळा . कधीकधी काम करताना प्लेलिस्ट ऐवजी एकच गाणं बॅकग्राउंडला रिपीटवर लावते . हे याचवर्षी ऐकलेलं आणि आवडलेलं एक - अपनी भी क्या ज़िंदगी है निराली

https://youtu.be/0xl-CPYqOZ0?si=Qsz6E7eHTGsUDR_y

हे आणखी एक , आया तुफान

https://youtu.be/XdogHKcScHI?si=Z58wfwWCNXdzSZtK

लो भोर हुई -

https://youtu.be/cxrJ0IPwpWE?si=uiLmjeVw-otQLAMc

गाण्या मध्ये माझा लिरिक्सवर जोर असतो. पण ही दोन गाणी ! कुठल्या भाषेत आहेत -तेलगु का तमिळ - माहित नाही. त्याची गरज पण नाही. हल्ली रोज ऐकतो आहे.
https://www.youtube.com/watch?v=_OC9neMwIpE

https://www.youtube.com/watch?v=JcUR_J0-Dko
Enjoy!

Pages