तुम्ही कोणतं गाणं रिपीट मोडवर ऐकता आहात?

Submitted by अज्ञातवासी on 8 January, 2019 - 11:42

दरवर्षी एक ना एक गाणं असं असतं, जे आपल्या रिपीट मोडवर असतं!
यावर्षी सुरुवातीला बिंते दिल माझ्या रिपीट मोडला होतं!
त्यांनतर शेप ऑफ यु!
त्यांनतर मेरे नाम तू!
तेलगू मध्ये bachikusto आणि आता तमिळ मध्ये adchithooku!
तर सांगा, तुमचं कोणतं गाणं रिपीट मोडवर आहे?
आता माझा हेतू सांगतो, सध्या माझ्या फोनमध्ये ही चारच गाणी आहेत.
तुमचं रिपीट मोडवरच गाणं मी स्वतः ऐकेन, आणि आवडलं तर तुम्हाला लाख लाख धन्यवाद!
येउद्या!

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मी फिरत असताना प्राईम वर मूड प्रमाणे सजेस्टेड स्टेशन किंवा प्लेलिस्ट लावतो. आज बॉलीवूड स्टेशन लावलं होतं. (यामुळे बरीच चांगली गाणी कळतात.)
आणि कित्येक दिवसांनी बिंते दिल लागलं...
आपसूकच हात रिपीट मोडवर.
या गण्यातली जादू एक्स्प्लेन करता येणार नाही. मनात कितीही विचार असू दे, हे गाणं क्षणात मूड रिलॅक्स करत, आणि स्वतःला फील करवत.
यातील १.१५ ते १.३८ पर्यंत ऐका, आवाजातली जादूच. जीव ओवाळून टाकावा अशी.

https://youtu.be/9aoUpCXY7uk

@आदीश्री - believer खास माझ्या जिम सेशनचं गाणं! Happy

अंतहीन या नितांतसुंदर चित्रपटातील, हे आल्हाददायक गाणं. रिपीटमोड नाही तरी असुन मधून ऐकतो. अर्थ, संगीत, आवाज, चित्रण सारं काही बेस्ट! गाणं बघणं, बघताना ऐकणं, त्यातली राधिका आपटे.. ह्याच गाण्यातून मी हिच्यावर प्रेम करायला लागलोय! आणि फक्त ह्याच गाण्यासाठी.. नक्की बघा, अनुभवा. रसिक मंडळी पहिल्या पावसात घरातल्या खिडकीत बसून हे गाणं नक्की ऐकतील.
https://youtu.be/b09HPjMsFT8

<<छान आहे मेरे रश्के कमर!!>> .. Happy
होय आणि सादर करताना एक्स्प्रेशन्सही उत्तुंग आहेत ह्या माणसाची..
उदाहरणार्थ हे एक..
ये जो हल्का हल्का सुरूर है..

https://youtu.be/UIPXHsUXVH0

whatsapp वर एका तरुण साधूचा शिवतांडव म्हणतानाचा व्हिडीओ आला आहे कोणत्यातरी उंचावरच्या मंदिरात शूट केलाय.. अर्थात साधुबुवा त्यांचं त्यांचं म्हणत होते, कुणीतरी शूट केलाय.. सलग चौथ्यांदा ऐकतोय सकाळपासून! काय ते स्पष्ट उच्चार, मोकळा, शोभणारा आवाज आणि जगाला विसरून केलेली शिवस्तुती. लिहिणारा रावण सुद्धा याच्यापुढे नतमस्तक होईल बहुधा!

मी तर आठवडाभर कोणतं ना कोणतं गाणं रिपिट मोड मधे ऐकते. गेल्या आठवड्यात नेहा कक्करचा ट्रिब्युट टू अरिजित सिंग लागोपाठ ३ दिवस बघितला/ऐकला. हा आठवडा जोनिता गांधी कप्पा म्युझिक रिपिट माडमधे ऐकतेय. तुम्ही पण ऐका..मस्त आहे.

लिहिणारा रावण सुद्धा याच्यापुढे नतमस्तक होईल बहुधा! >> पाटील सर लिन्क द्याल का प्लिज ?

whatsapp वर एका तरुण साधूचा शिवतांडव म्हणतानाचा व्हिडीओ आला आहे कोणत्यातरी उंचावरच्या मंदिरात शूट केलाय.. >>>> मी FB वर व्हिडीओ पाहिला होता, त्याखाली कमेंट्स मध्ये बऱ्याच जणांनी लिहिलं होतं की भोपाळ जवळ भोजपुर गावी हे मंदिर आहे आणि स्तोत्र म्हणणारे त्या मंदिराचे पुजारी /उपासक कालीचरण महाराज आहेत.
जे काही glimpses मिळाले, त्यात हे देऊळ पण मस्त वाटतं आहे. त्या महाराजांचा, आवाज, उच्चार, व्यक्तिमत्त्व आणि बहुतेक शास्त्रीय गायकीचा अभ्यासामुळे उच्चारणात आलेले सूर, सगळं मिळून अतिशय सुंदर प्रकरण आहे. मला त्यातलं काही कळत नसून आणि स्तोत्र वगैरे बद्दल काही धार्मिक भावना नसून बघताना goosebumps आले.
तो व्हिडीओ सध्या अतिशय viral झाला आहे.

खरं तर फार पूर्वीपासून शिवतांडव स्तोत्र म्हणत, ऐकत आलोय.. मला वाटतं 12 - 15 वर्षं आधी शिवतांडव वाचलं होतं.. मग ऐकलं (आधी अजय अतुल, नंतर बहुतेक रवींद्र साठे) आणि पुन्हा शोधून लिहून ठेवलं. अजय अतुलने कमाल बसवलं होतं शिवतांडव, पण अपूर्णच केलेलं (https://youtu.be/OPpWdv0FUW4). नंतर मात्र मनावर गारुडच झालेलं या स्तोत्राचं. इतक्या वेळा ऐकलं की पाठ झालं.

खरच पाठ झालय ! वॉव कारण अवघड आहे फार ते स्तोत्र. तुम्ही आदि शंकराचार्यांचे कालभैरवाष्टक ऐका. असेच नादमय तालमय आहे. माझे फार आवडते आहे.

आकाशवाणी मुंबई ब वर मंगल प्रभात मध्ये रजनी जोशींनी म्हटलेलं शिवतांडव स्तोत्र ऐकवायचे. ते डोक्यात बसलंय.

नविन पैकी " हवा मे हो के मलंग " हे गाणं ऐकलं छान वाटलं आणि दोन तीन वेळा ऐकलं.
बघणार नाही, बघितलं तर विरस व्हायचा कदाचित.

"अलैपायुदे कन्ना" हे तमीळ शास्त्रीय संगीतातील गीत माझ्या टॉपलिस्टमध्ये आहेच पण त्याच एक सुंदर फ्युजन व्हर्जन आहे युट्युबवर ते सध्या रिपीटमोड्वर ऐकतोय.
मूळगीत रेहमानने संगीतबद्ध केलेलं -
https://youtu.be/gisUw5WOY3U
फ्युजन व्हर्जन -
https://youtu.be/I9qMm3Zp2g8
हे आणि इतर फ्युजन गाणी "महेश राघवन" म्हणून चॅनेल आहे त्यावर मिळतील. फारच टॅलेंटेड पोऱ्या आहे.

बगळ्यांची माळ फुले अजुनी अंबरात...

एक कवी एका कवीतेमुळे सुद्धा अमर होऊ शकतो!
वा.रा. कांत !!!
https://www.youtube.com/watch?v=bWqEOGiOlO8
https://www.youtube.com/watch?v=hZFaMMD5gOA
याचे रसग्रहण कुठे मिळेल का
प्लीज सांगाल कुणीतरी

@मानव सर खूप खूप धन्यवाद.
मी सुरु करतो वाचायला
"चरणस्पर्श" कबूल कर लो Happy
खूप वर्षांपासून ची इच्छा होती याबद्दल / वा.रा. कांत यांच्याबद्दल काहीतरी वाचायला मिळावं

Girls like you feat Cardi B- Maroon 5
youtube वर तो बाप-लेकीचा क्युट विडिओ बघून पहिल्यांदा ऐकलं. आता सारखं साऱखं तेच. Happy

Girls like you..माझं पण आवडतं गाणं आहे.

तू चाल पुढं ..हे गाणं रोज ऐकतोय.. तीन महिन्यापूर्वी काही कलांकारांनी ह्याच गाण्यांवर एक छान पोसिटिव्ह व्हिडीओ पण बनवला होता. जरूर बघा.

https://youtu.be/4oJGvCvBA6c

Pages