तुम्ही कोणतं गाणं रिपीट मोडवर ऐकता आहात?

Submitted by अज्ञातवासी on 8 January, 2019 - 11:42

दरवर्षी एक ना एक गाणं असं असतं, जे आपल्या रिपीट मोडवर असतं!
यावर्षी सुरुवातीला बिंते दिल माझ्या रिपीट मोडला होतं!
त्यांनतर शेप ऑफ यु!
त्यांनतर मेरे नाम तू!
तेलगू मध्ये bachikusto आणि आता तमिळ मध्ये adchithooku!
तर सांगा, तुमचं कोणतं गाणं रिपीट मोडवर आहे?
आता माझा हेतू सांगतो, सध्या माझ्या फोनमध्ये ही चारच गाणी आहेत.
तुमचं रिपीट मोडवरच गाणं मी स्वतः ऐकेन, आणि आवडलं तर तुम्हाला लाख लाख धन्यवाद!
येउद्या!

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

@मधुरा ती बासरीची धून गोड आहे.>>>>>>>> हो, खरचं. मी वेडी झाले होते त्यापायी. Star Utsav channel वर लागायची शौर्य और सुहानी मालिका. तिचे प्रक्षेपण मधूनच बंद केले तेव्हा रडले होते मी. Sad आत्ता आठवलं की हसू येत. पण अजूनही मालिकेचे सर्व भाग मिळत नाहीयेत. hotstar वर अर्धवट आहेत. पण ती धून मिळाली मला HD मध्ये तर फार मस्त वाटेल. मला खूप आवडते अजूनही. Happy Happy

रच्याकने, सौरभ पांडे (शौर्य) हा सूर्यपुत्र कर्ण मालिकेत कृष्ण बनला होता. आधी वाटायचं शौर्य पात्र छान लिहिले आहे म्हणून सौरभ पांडे मस्त वाटतो आहे. पण सु.क. पाहिलं तेव्हा कळालं, तो उत्तम भूमिका करतो, मालिका बालिश असली तरीही! Lol

ओहो अस आहे तर. सॉरी अज्ञा!

तो शॉर्टफिल्मवाला धागा वाचलाय. शॉर्टफिल्मपेक्षा सुप्रसिद्द झालाया धागा ट्रोल्ससाठी.

बघेन हे गाण.

आणि एक अर्जुन कपूरच >>>>>>> ( अरे देवा!!!!)

हाउसफुल ४ च असच एक गाण आलाय ' चुम्म्याशी' निगडित. त्यात रितेश देशमुख असल्याने वरचे लिरिक्स त्यातलेच वाटले. Rofl

अहो सॉरी काय त्यात.
आणि बादवे खरंच एकदा घरात मोठ्याने ते गाणं लावलं असताना आई 'हाकलून देईल' असं म्हणाली होती. Lol

मी ऐकतोय
मै तुझपे मरती हू पर दुनिया से मै डरती हू
इस्पायडरमॅन इस्पायडरमॅन तुने चुराया मेरे दिल का च्यान हो हो
130k view ५००लाईक्स

हाऊसफुल सिरिज मध्ये इंटरेस्ट नाहीये. मी तर हेरा फेरीच्या पुढच्या भागाची वाट पाहते आहे.

HF4 ची तर गाणी सुध्दा बेकार आहेत.

सप्रस, तुला मी इथून एकदा हाकलून लावलंय, तरीही तुला अक्कल येत नाही.
तुझी मुक्त हागणदारी बाकीच्या धाग्यांवर चालव, माझ्या धाग्यावर नाही.
Now please **** off!!!!

खुबसूरत है वो इतना सहा नहीं जाता
कैसे हम खुदको रोकले रहा नहीं जाता
चांद में दाग है ये जानते है हम लेकिन
रातभर देखे बिना उसको रहा नहीं जाता

आणि बादवे खरंच एकदा घरात मोठ्याने ते गाणं लावलं असताना आई 'हाकलून देईल' असं म्हणाली होती. >>>>>>>>> Lol

मी तर हेरा फेरीच्या पुढच्या भागाची वाट पाहते आहे. >>>>>>> मी सुद्दा. ह्या भागाचा मुहुर्त झालेला बघितला होता टिव्हीवर बर्याच वर्षापुर्वी. तेव्हा अभिषेक बच्चनही होता वाटत अक्षय- सुनील- परेश रावलबरोबर. नक्की आठवत नाही. पुढे त्या सिनेमाच काय झाल ते कळलच नाही.

Angel of the city >>>>>>> कोरियन का? मला आवडतात कोरियन ड्रामा सिरिज. Happy

हेरा फेरी ३ अनिश्चित काळासाठी बासनात बांधला गेलाय, दिगदर्शक नीरज व्होरा यांच्या निधनाने.
आणि त्यामध्ये अक्षय कुमार नव्हता. जॉन अब्राहम, परेश रावल, सुनील शेट्टी आणि अभिषेक बच्चन हे होते.
मी सिक्वेल मध्ये फक्त KGF २ ची वाट बघतोय.
बादवे आजच गाणं - कंगना तेरा नी, सानू करदे इशारे!

सध्या नाही पण जेव्हा नवीन मिळालं होतं हे गाणं ऐकलं होतं खूप वेळा रिपीट .. एक गाणं आवडलं की त्याचा कंटाळा येईपर्यंत ऐकत राहायचं रिपीट मग पुढे क्वचित अशी माझी थोडी विचित्र सवय आहे ... खूप गाणी आहेत अशी , बहुतेक मराठीच सगळी ..

https://youtu.be/JLDn0kqnDQ0

आणि त्यामध्ये अक्षय कुमार नव्हता. जॉन अब्राहम, परेश रावल, सुनील शेट्टी आणि अभिषेक बच्चन हे होते. >>>>>>>> धन्स अज्ञा, मी हे विसरलेच होते.

मातोश्रीनी आज लै भारी गाणं लावलं होतं!

ना बोले तुम ना मैने कुछ कहा!!

https://youtu.be/SlAPCfkcm3A

कितीदा गुणगुणत बसलोय गणना नाही!
बाकी टिना मुनीम काय सुंदर दिसतेय!

Pages