इंग्रजी पुस्तकं, चित्रपट, मालिका शिफारस

Submitted by ॲमी on 18 October, 2018 - 14:09

मी सध्या वाचत असलेले पुस्तक, नुकतेच पाहिलेले-आवडलेले चित्रपट, मालिका याबद्दल इथे लिहित जाईन.

सगळे शक्यतो इंग्रजीच असेल.

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

>> The office बिंज वॉचत ५ सिझन संपवले. अफाट विनोद!!
इथे कुणी फॅन आहे का??>> ऑफकोर्स. अर्थात अमेरिकन ‘द ऑफिस‘ चे. ब्रिटीश किंवा हिंदीचे नाही.

मला पण अमेरिकन ऑफिस आवडले. कधीही कोणताही एपिसोड बघता येतो. ब्रिटिशमधला तो रिकि जार्विस समहाऊ अज्जिबात आवडत नाही मला त्यामुळे थोडी पाहिली पण बोर झाली. खरं तर मला अमेरिकन वर्जन ला पण २-३ सीझन लागले कॅरेक्टर्स शी अटॅचमेन्ट व्हायला. पण नंतर मग आवडलीच.

ब्रेकींग बॅड बिन्जलं सात दिवसात. मधे थोडी दमले होते पण शेवटी फार फार समाधान वाटलं. मस्त झालीय मालिका! _/\_

पहिले दोन सिझन काळा विनोद भारी होता. तिसर्यापासून मालिका अधिकाधिक अंधारी होत गेली. (दमल्यामुळे असेल कदाचीत पण मला) चौथ्या सिझनचे सुरवातीचे ४ एपिसोड थोडे बोअर झाले. पाचव्यापासून परत रुची वाढली. पायलट बनवतानाच पूर्ण मालिकेचा सांगडा लेखकाच्या डोक्यात असणार असं वाटतंय, त्यामुळेच एकेक भाग, सारे कथानक, शेवट अगदी जमून आलाय.

सुरवातीला मुख्य नायक सोडून इतर लोकंच आवडत होती मला (नेहमीप्रमाणे Wink ). वॉल्टर ज्युनियर, जेसी, बॅजर, सोल, माईक, गेल. पण पाचव्या सिझनमधेमात्र वॉल्टर आवडला. खलनायकांमधे टुको, गस, टुकोचे चुलतभाऊ, इव्हन टॉडदेखील आवडले. पण हँकचामात्र अतीराग येत होता सुरवातीपासून. Man that guy is annoying!

जेसी-वॉल्टर कॉम्रेडशीप, गस-वॉल्टर (नायक-खलनायका)चे एकमेकांना खरोखरच उमजून असणे - हे जे पुरुषांमधले नाते/बॉण्डिंग अगदी बारकाव्याने दाखवतात तसे बायकामधले कधी बघितल्याचे आठवत नाहीय. ते नसतंच म्हणून पडद्यावर दाखवता येत नाही? की मिडियात भरपूर पुरुष-भरपूर काळ असल्याने ते कसे दाखवायचे हे नीट डेव्हलप झाले आहे? की अजून इतर काही कारण असेल कळत नाही. बिग लिटल लाईजमधे आहे पण ते नीट दाखवायला पुरुष दिग्दर्शकच योग्य होता, बाई दिग्दर्शक झाली आणि दुसऱ्या सिझनची वाट लागली!
कदाचीत घरगुती कथानकामधे दाखवत असतील फिमेलबॉण्डिंग आणि मी ते बघत नसल्याने मला माहीत नसेल.... असो.

जवळपास प्रत्येक एपिसोडच्या सुरवातीचे सीन अस्थेटिकली इतके सुंदर आहेत, ऑम्लेट बनवणे, माशी, लहानपणीचे जुळे भाऊ... कसं काय सुचत असेल यांना हे असे शॉट घ्यावेत? आदर+कुतूहल वाटलं.

आणि काही एपिसोडचा/सिझनचा शेवट इतका क्लीफहँगर आहे, 'बरं झालं आपण बिन्ज करतोय नाहीतर आठवडा/वर्षभर वाट पाहायचं टेन्शन आलं असतं आणि मालिका संपेपर्यंत हृदयविकार जडला असता' वाटलं.
दुसऱ्या बाजूने विचार करता 'एवढी हेवी मालिका ७ दिवसात संपवण ठीक आहे का? ५-६ दिवसांनंतर स्वप्नातपण हीच लोकं येताएत. निम्मी संपल्यावर मधे १-२ दिवस ब्रेक घ्यायला हवा होता' असंदेखील वाटलं Lol

संगीत भारी आहे. ट्युनफाईन्डवरून युट्यूबकडे जाऊन एकेक गाणी डाउनलोड करतेय आता.

अभिनयाबद्दल काय बोलणार. सगळे मुख्य कलाकार ग्रेट आहेतच पण इतर छोट्या, बाजूच्या व्यक्तिरेखादेखील चांगल्या रंगवल्यात. यांना कुठून मिळतात इतके फिट बसणारी माणसं काय माहीत! स्पेशली ते सगळे मेथहेड, तो सगळा केवळ मेकअप असतो की खरंच ड्रगिंना उचलून आणतात काम करायला? Peekaboo हा एक डेंजर हॉन्टिंग एपिसोड आहे Sad

काही सीन, डायलॉग बघताना म.आं.जा. आठवत होतं. गस Man - provider बोलतो तेव्हा, वॉल्टर मरायच्या आत आपल्याला किती पैसे कमवावे लागणार आहेत याचा हिशोब करत असतो ७३७k, I am counting the days until your cancer comes back असं स्कायलर म्हणते तेव्हा....

एकंदर फार प्रभावित करणारी आणि समाधान देणारी मालिका आहे.
अजूनकाही आठवलं तर नंतर लिहीन सध्या एवढेच...

एक गोष्ट लिहायची राहून गेली.
काही सीनमधे (Fly एपीसोड बघताना हे खासकरून जाणवलं) बॅकग्राउंड ब्लर केलंय त्याबद्दल चांगलं की वाईट मत बनवता येत नाहीय मला. म्हणजे मागे एखादं पात्र असतं, कधीकधी तर ते पात्रच संवाद म्हणत असतं, पण तरी ते ब्लर. कोणाच्या भावना, एक्सप्रेशन महत्वाचे आहेत हे असं स्पेसिफीकली दाखवायला पाहिजेच का?

मी सध्या ब्रेकिंग बॅड सीझन ३ वर आहे.
प्रत्येक एपिसोडच्या सुरूवातीच्या सीनबद्दल +१. फारच अफाट आहेत ते सीन्स.

मला वॉल्टपेक्षा जेसीच आवडतो. ते स्क्रीनवर काही वेळ नसेल तर कंटाळा येतो.

मात्र कधीकधी पात्रं फारच पुटपुटत संवाद बोलतात त्यामुळे बोअर वाटतं. विशेषत: फॅमिली सीन्समध्ये.

पण बारीकसारीक बाबींचा केलेला विचार, कमालीची कंटिन्युइटी, एका सीझनच्या एखाद्या दृष्याचा रेफरन्स दुसर्‍या-तिसर्‍या सीझनमध्ये कधीतरी दाखवणे, तो आपल्यालाही लगेच आठवणे, हे त्यातलं सगळं भारी आहे.

हो. नेटफ्लिक्सवर आहे.
खरंतर नेटफ्लिक्समुळे अतिलोकप्रिय झाल्याने अजूनेक सिझन करायची परवानगी मिळालेला, पहिलं नेटफ्लिक्स सेन्सेशन म्हणता येईल असा शो म्हणजे ब्रेकिंग बॅड (विकिपांडित्य).

नार्कोस आणि नार्कोस मेक्सिको 10 - 12 दिवसात संपवल्या , एकूण 40 च एपिसोड आहेत . सिरिअल संपूच नये असं वाटत होतं पाहताना .. दोन्ही खूप आवडल्या .

I'm Thinking of Ending Things पुस्तकावर सिनेमा बनवणारा मनुष्य Charlie Kaufman (Eternal Sunshine of Spotless Mind)आहे हे जेव्हा माहीत झालं तेव्हाच Iain Reid चे दुसरे पुस्तकदेखील वाचायला हवे असे ठरवले होते.

Foe (याचे फिल्म अधिकार Spotlight, The Revenant बनवणाऱ्या कंपनीने विकत घेतलेत). बऱ्यापैकी आवडलं पुस्तक. फिलॉसॉफी+डिस्टोपिया+सस्पेन्स आहे. पण याला हॉरर+ सायकोलॉजिकल थ्रिलर म्हणून प्रमोट केलं गेलं, गुडरीड्स चॉईस अवॉर्ड २०१८ ला हॉरर गटात नामांकन होतं... काहीही चालू असतं... यावर्षी Verity ला रोमान्स गटात नामांकन आहे Angry
एनिवे तर Foe बद्दल - यातली फिलॉसॉफी सोप्या भाषेत आली आहे. उत्तरं मिळत नसली तरी प्रश्न काय आहेत हे तरी कळतंय/ कळल्यासारखं वाटतंय Wink . I'm thinking मधे हे काय बडबड करतायत हेच कळत नव्हतं कधीकधी Lol
एनिवे दोन्ही पुस्तकं आवडल्याने आता या लेखकाकडे लक्ष ठेवणार.
===

सनव आणि चैतन्य
तुमचं सध्या काय वाचन चालूय?
===

The 10 Best Fiction Books of the 2010s
गेल्या दशकातली सर्वोत्तम पुस्तकांची टाईम ने बनवलेली लिस्ट. यात Gone Girl आणि Little Fires Everywhere आहेत.
===

The Best Books of 2019 अमेझॉनची यादी.
===

वर्ष संपत आलंय. गुडरीड्स चॅलेंज पूर्ण करायला छोटी, पटकन संपणारी पुस्तकं हवी असतील तर
32 Short (and New) Books to Help You Crush Your 2019 Reading Challenge
Nickel Boys आणि The Only Woman in the Room वाचणार.

Crown चा पुढचा सीझन आलेला आहे . ब्लॅकलिस्टचा देखील पुढचा सीझन आलाय
ब्रेकिंग बॅड चा एक एपिसोड पाहुन झाला .

मायबोलीवरचा लिहिलेला बाफ वाचून ब्रॉडचर्च पाहायला सुरुवात केली . मस्त आहे , आवडली . एक सिझन बघून पूर्ण केला .

Crown सीजन 3 आला. पहिले 2 तर भारीच होते. तिसरा सुद्धा भारीच असेल. आज पहिला भाग बघितला ज्यात चर्चिल मेला. त्या कलाकाराने काय उत्तम काम केलंय. राणीचं आणि त्याचं नात फार सुरेख उभं केलय.

अ‍ॅमी, सध्या या जॉनरमधलं काहीच नवीन वाचलं किंवा पाहिलं नाहीये. दुसरंच काय काय वाचन सुरु आहे.
Foe ची नोंद घेतलीय!

पहिली डीलब्रेकर अट - मालिकेनं, चित्रपटानं किंवा पुस्तकानं मला बोअर करू नये. (म्हणजे मनोरंजनच करावं असा अर्थ काढू नये)
भारतीय नेटफ्लिक्सवर सध्या आवर्जून जावं अश्या मालिका फारशा नाहीत. मी बऱ्याच दिवसांनी खातं पुन्हा सुरु केलं.

१. Dancing with the Birds : ही डॉक्युमेंटरी अशक्य सुंदर आहे. नृत्य म्हणजे पक्ष्यांच्या प्रणयाराधनेतली अत्यंत महत्त्वाची गोष्ट. एकाहून एक चित्तवेधक रंगीत नर पक्षी आपल्या मादीला भुलविण्यासाठी जे भन्नाट प्रकार करतात ते पाहून जीव अगदी हलका झाला. एक क्षणही नजर हलत नाही. संगीत अगदी साजेसं. समालोचन तर खास साहेबी. माहितीपटांची कंटाळी तऱ्हा नाही की निसर्गनाशाचं दांभिक रडगाणं आळवलं नाही. टिपीकल निसर्गपॉर्न नसलेली. अद्भुत वाटावं असं खगनर्तनातलं नैसर्गिक वैविध्य. अवश्य पाहावी.

२. Abstract : कलाकार, स्थापत्यविशारद, टंकनिर्माते, वेशभूषाकार अशा विविध कल्पकांची त्यांच्या कल्पनांना मूर्त रूप देतानाची प्रक्रिया एकेका एपिसोडमध्ये मांडली आहे. अलिकडच्या सीझनमध्ये नेरी ऑक्समन ही बया विशेष आवडली. तिचे क्षेत्र BioStructures हे आहे. सर्जनशील लोकांनी आपापल्या क्षेत्रातली कामगिरी उलगडून दाखवताना पाहणे आनंददायक असते. विशेषत: जेव्हा अशा लोकांच्या कल्पना उसन्या आयात केलेल्या नसतात तेव्हा. या सिरीजचे दोन्ही सीझन नेत्रसुखद आहेत.

अ‍ॅमी, ब्रेकींग बॅड बिंजल्यानंतर एक मोठा व्हॉईड येतो. का? तर एकाच वेळेस दर्जा, मास अपील, मनोरंजन, वैविध्य अशा कसोट्यांना उतरणारी दुसरी मालिका आपण शोधू लागतो. खूप सारा चिखल उपसल्यावरदेखील अशा मालिकेचं कमळ सापडत नाही. असा चिखल उपसून कमळ आयतं खुडून देणाऱ्य, मध्यरात्री अचानक मेसेज करून मालिकांची नावं सांगणाऱ्या (एरव्ही सुप्त) शांत मैत्रिणी का नाहीत अशी खंत भेडसावू लागते.
तर मला देखील बऱ्याच दिवसांनी ब्रेकिंग बॅडचे चित्तावर आलेले गांभीर्य घालवणारी, उत्तम मनोरंजन करणारी, बहुजन-अभिजनांना आवडलेली मालिका सापडली ती म्हणजे "बॅरी". (हीदेखील क्राईम जॉनरा मधलीच आहे, पण सूक्ष्म काळी विनोदी) पाहिली नसेल तर अवश्य पाहा.
एका मोठ्या प्रेमप्रकरणानंतर बॅऱीसारखं आनंददायी रिबाऊंड आवश्यक असते.

रिक अँड मॉर्टीचा नवीन सीजन

खरेतर पहिले दोन सीझन खूप आवडले होते. नव्या सीझन मध्ये मालिकेचं नावीन्य आणि तिचा ताजेपणा हरवल्यासारखा वाटत आहे. तिसऱ्या सीझनचा दुसरा एपिसोड पाहताना मी अक्षरश: अर्ध्यातून सोडला. काही गोष्टी रिपीट केल्या की मजाच जाते. असो.

नेटफ्लिक्स वर सध्या ब्लॅक लिस्ट नावाची सिरीज बघतोय. FBI टॉप १० मोस्ट वॉन्टेड यादीतील एक जण सरेंडर करून त्यांच्याशी कॉन्ट्रॅक्ट करतो कि तो त्यांना खूप खतरनाक गुन्हेगार कि जे FBI ला पण माहिती नाहियेत त्यांना पकडायला मदत करेल . आणि तो फक्त एका लेडी ऑफिसर शीच बोलेल ( हे का ते माहिती नाही) . खूप उत्कंठावर्धक आणि IMDB रेटिंग ८ आहे.

बबन , ब्लॅकलिस्ट बद्दल लिहिलेय याच बाफवर मी. तो तिच्याशीच का बोलतो ह्याबद्दल स्पॉयलर अलर्ट आहे . तुम्ही कोणता सीझन बघताय ?

जाई , माझा पहिलाच season चालू आहे. आणि हो..मी तुमचा प्रतिसाद वाचूनच चालू केली बघायला. धन्यवाद. मलापण अंदाज आलाय कि तो तिचाशी बोलायची अट का घालतो पण मी मुद्दाम काही बोललो नाही पण अंदाज चुकला तर मजा येईल. तिच्या नवऱ्याचं पण काहीतरी असणारे

ओके . मग मी लिहीत नाही जास्त .नाहीतर मजा जाईल .
त्यातले रेमंड रेडिंगटन चे संवाद मात्र भारी आहेत . कधी खुसखुशीत तर कधी फिलॉसॉफीकल .

The Nickel Boys वाचून झालं. आतडी पिळवटणारं पुस्तक आहे. शेवटचा धडा वाचताना काळीज धडधडत होतं. नक्की वाचा!!

Beloved जसे Margaret Garner च्या सत्य घटनेवर आधारीत होते; तसेच हे Nickel Boys पुस्तकदेखील १९०० पासून २०११ पर्यंत चालू असणाऱ्या
The Florida School for Boys किंवा The Arthur G. Dozier School for Boys (AGDS)
या खऱ्या बालसुधारगृहातील मुलांनी सांगितलेल्या अनुभवांवर आधारीत आहे.

१९६२ मार्टिन ल्युथर किंगची सिविल राईट्स चळवळ जोरात चालू असतानाचा काळ. किंगच्या भाषणामुळे भारावून गेलेला एलवूड हा १५ वर्षांचा गुणी मुलगा. चुकीच्या वेळी चुकीच्या ठिकाणी असल्याने निकेल सुधारगृहात पाठवला जातो. हक्क म्हणजे काय याची नुकतीच जाणीव होऊ लागली होती, स्वातंत्र्य म्हणजे काय हे आताच तर कळू लागले होते आणि नेमके तेव्हाच होते नव्हते ते सगळे स्वातंत्र्य हिरावले गेले. आणि 'सुधार'गृहात आलेल्याना कसले हक्क द्यायचे!

You have to be in the system to change the system हे प्रॅक्टिकली शक्य आहे का? मुळात व्यवस्था (किंवा माणसं) बदलणं शक्यतरी असतं का? की ते फक्त काल्पनिक विश्वातच होतं.
Like justice it exists in theory!
गुडरीड्सवर एकाने लिहलंय
When you’re surrounded by your own choices which make you feel safe and careless and stick to your daily routine, reach out to your own comfort zone, you always tend to forget what happens at the outside! This book makes you remember it with a harsh, vulgar, ugly slap on your face! It makes you remember, outrageous, darkest shameful era of American history.


Caption: From Library of Congress: Orphaned children and juvenile offenders could be bought to serve as laborers for white planters in many Southern states from 1865 until the 1940s. (Library of Congress, Prints & Photographs Division, Detroit Publishing Company Collection, LC-D428-850)

The 10 Most Influential Films of the Decade (and 20 Other Favorites)

The most popular movies and the movies we love most aren’t always the ones that shape the industry, reflect the times or change the terms of cultural discourse — for better or worse. The films on the first list, whether we like them or not (and in some cases we very much did), made a difference in the world of entertainment and beyond. In a politicized time, their impact was often measured in ideological terms, by the arguments they started and the passions they inflamed. And at a time of blockbuster hegemony and streaming ascendancy, they also represented a business and an audience in constant and sometimes confusing flux.
===

चैतन्य कुठे गायब झालाय? बरेच दिवस झाले दिसला नाही. कोणी १:१ ओळखतं का त्याला? सब ठिकठाक आहे ना?
===

ओके सनव Happy
===

जाई, हो क्राऊन, ब्लॅकलिस्ट बघायच्या यादीत आहेतच.
===

रॉय,
हो ब्रेकींग बॅड पाहिल्यानंतर व्हॉईड येतो खरा. मी अजून पाहिली नाहीय पण मला वाटतं The Wire देखील तितकीच चांगली असेल. Barry बघते. सुचवणीसाठी आभार Happy

The Whisper Man वाचलं. मस्त आहे. रेकमेंडेड.

सीरिअल किलर, रहस्य, थरार, किंचीत सुपरनॅचरल वगैरे सगळं यात आहेच. पण बाप-मुलगा हे नाते ज्या पद्धतीने लिहले आहे, ते फारफार मस्त आहे. नुकताच विधुर झालेला तिशीतला बाप, आपल्या सात वर्षांच्या मुलाला कसे सांभाळत असतो, त्या बापाच्या स्वतःच्या बालपणीच्या आठवणी, चांगली-वाईट-कुरूप नाती, त्यातले ताणतणाव, हे सगळं आपल्याला किती-कसं बि/घडवतं... याच्यासाठीतरी नक्की वाचा हे पुस्तक.
रॉसबंधू (Avengers, Arrested Development वाले) यावर सिनेमा बनवणार आहेत म्हणे. पण मला वाटतं २-२.३० तास कमी पडतील. ५-८ तासांची मालिका बनायला हवी.
पुस्तक वाचताना Silence of the Lambs, Red Dragon एवढंच काय वास्तुशास्त्रमधला लहान मुलगादेखील आठवत होता. But its all that and much more.
Alex North हे pseudonym आहे म्हणे. आणि या लेखकाची इतर(खऱ्या?) नावाने काही पुस्तकं प्रकाशित झाली आहेत. कोण असेल हा उत्सुकता वाटतेय Happy
===

आता His Dark Materials वाचायला चालू केलंय. तिन्ही पुस्तकं महिनाअखेरपर्यंत संपवायचा विचार आहे. बघुयात कसं जमतंय.

Nickel Boys चा लेखक Colson Whitehead ची ही मुलाखत वाचली. त्यात त्याने आपल्या लेखनप्रक्रियेबद्दल सांगितलं आहे. नवलेखकांना कदाचित उपयोगी पडू शकेल.

GR : It struck me that a theme in The Nickel Boys and also in The Underground Railroad is the idea that pain of abuse and racism transmits across generations. It's what President Barack Obama said of The Underground Railroad , and I saw those themes in The Nickel Boys as well. I wondered if you agree with that?
CW: I don't know about transmit. There's institutional racism, there's control of black people under slavery, and then that becomes converted after Reconstruction to Jim Crow laws. It's converted now to a racist police apparatus, gerrymandering, the incarceration state. There have been articles about the pain of slavery, the Holocaust being transmitted as if it's a physical thing. I don't know much about that science. But the structures to control black people 20 years ago are still operating now in different guises.

GR : When someone is as talented as you are, how do you get better?
CW: That's nice of you to say. For me, it’s to not do the same thing. Each time I start a new project, I think: Is this a new kind of character, is this a new kind of challenge, a new kind of genre I want to explore? What do I want to keep from postapocalyptic science fiction in Zone One ? I haven't done a historical novel before—what are the things I like about that genre, the things I hate about it? I haven't done a first-person narrator before—what are the strengths and disadvantages of that?

GR : Is there one piece of advice you find yourself giving aspiring writers?
CW: Read a lot to find out what kind of writer you want to be, and then write a lot to find out what kind of writer you actually are. And then, obviously, you have to stick with it. There's a lot of disappointment. And going back to what I said about the challenge, if there's a story that's personal or a story that's first person that you've been avoiding…maybe you should try it.

काल गुडरीड्स चॉईस अवॉर्ड्सचा निकाल लागला.

• Mystery & Thriller - The Silent Patient
• YA - Five Feet Apart
• Historical Fiction - Daisy Jones & the Six
• Romance - Red, White & Royal Blue
• Fiction - The Testaments
• Debut - Red, White & Royal Blue

दुसऱ्या, तिसर्या क्रमांकावर कोण होतं, इतर जॉन्रमधले विजेते जाणून घ्यायचे असेल तर वरील लिंकवर क्लिक करून पाहू शकता.
===

दुसऱ्याएका धाग्यावर The Sense of an Ending चा उल्लेख बघून परत त्याबद्दलचे लेख, समीक्षा वाचून काढली.

“The Sense of an Ending” by Julian Barnes, Explained. [SPOILER ALERT]

What do people think of the ending? (SPOILER ALERT)

New York Times

Guardian
“We thought we were being mature when we were only being safe. We imagined we were being responsible but were only being cowardly. What we called realism turned out to be a way of avoiding things rather than facing them.”

Tony resembles the people he fears, “whose main concern is to avoid further damage to themselves, at whatever cost,” and who wound others with a hypersensitivity that is insensitive to anything but their own needs. “I have an instinct for survival, for self-­preservation,” he reflects. “Perhaps this is what Veronica called cowardice and I called being peaceable.”
===

हिवाळ्यात वाचावीत अशी पुस्तकं
===

मी सध्या The Princess Bride वाचतेय. His Dark Materials पहिल्या पुस्तकाची काही पानं वाचली पण मजा येत नव्हती म्हणून बाजूला ठेऊन दिलं.

The Princess Bride: S. Morgenstern's Classic Tale of True Love and High Adventure मस्त पुस्तक आहे. मजा आली वाचायला.
नावावरून लक्षात आलंच असेल की ही एक परीकथा आहे. जुन्या परीकथेला आजकालच्या नजरेतून पाहिल्यास जाणवणाऱ्या कमतरता यातदेखील आहेतच. पण त्याखेरीज असलेला फॅन्टसी, ऍडवेन्चर भाग बऱ्यापैकी चांगला आहे.

मला सगळ्यात जास्त काय आवडलं असेल तर ही परीकथा ज्यात फ्रेम केली आहे ती गोष्ट! आणि परीकथा सांगताना लेखकाने अधूनमधून केलेल्या खवचट कमेंट/तळटीपा Lol Lol
अजून सिनेमा बघितला नाही पण गुडरीड्सवरून कळालं की ही फ्रेमकथा + काही व्यक्तीरेखांची डिटेल पार्श्वभूमी चित्रपटात नाहीय. त्यामुळे (बरेचजण पुस्तकापेक्षा सिनेमा जास्त चांगला आहे म्हणताहेत तरीही) पुस्तक नक्की वाचा असे सांगेन. शेवटदेखील पुस्तकचाच जास्त चांगला आहे!!

“Life is pain,” his mother said. “Anybody that says different is selling something."

Life is not fair, and it never has been, and it’s never going to be.

Love is many things none of them logical.

I got a cold wife; she’s brilliant, she’s stimulating, she’s terrific; there’s no love; that’s okay too, just so long as we don’t keep expecting everything to somehow even out for us before we die.

True love is the best thing in the world, except for cough drops. Everyone knows that!
===

गुडरीड्सवर एकाने हे छान लिहलंय:

It's a story about a story, and the effect that a story can have on a young mind. Or any mind, for that matter. It's about how stories can teach us lessons that only later we understand - such as how life is not fair - and how stories can change us in ways that we never expected. It's about our relationship with fiction, and with the world around us.

And as you read, just remember the books that molded you into who you are today. Think about the stories that taught you life's lessons before life got around to doing it. Think about them and appreciate them, and remember that every book is a lesson, one way or another....

"यावर्षीची सर्वोत्कृष्ट पुस्तकं" अशा वेगवेगळ्या याद्या आता जालावर येऊ लागल्या आहेत.
त्यापैकी काही
चाळून ही यादी काढली.

• The Dutch House
• Girl, Woman, Other
• Black Leopard, Red Wolf
• Red at the Bone
• On Earth We're Briefly Gorgeous
• American Spy
• Miracle Creek
• Olive, Again
• The Giver of Stars
• The Huntress
• When All Is Said
• Ask Again, Yes
• The Starless Sea
===

Goodreads Staffers' Top Three Books of the Year
तुमचीही यावर्षी वाचलेली टॉप ३ किंवा ५ पुस्तकं सांगा, कदाचीत माझ्या वरील यादीत भर पडेल...

Pages