ओळखा पाहू .... एक गंमतखेळ: क्रिकेट

Submitted by स्वरुप on 27 November, 2019 - 04:04

यावर्षीच्या गणेशोत्सवात खेळलेल्या "ओळखा पाहू .... एक गंमतखेळ" या उपक्रमाला चांगला प्रतिसाद मिळाला.
त्या प्रतिसादावरुन प्रोत्साहित होवून हा खेळ आपण असाच पुढे चालू ठेवावा अशी एक कल्पना सहज मनात आली.
यातली रंगत कायम ठेवण्यासाठी दर एखाद महिन्याने आपण सर्वानुमते पुढच्या महिन्यासाठीचा विषय ठरवू शकतो.

अर्थात या खेळातली गंमत पूर्णतः आपल्या सगळ्यांच्या सहभागावर अवलंबून आहे.... गणेशोत्सवात दिलेल्या प्रतिसादाइतकाच भरभरुन प्रतिसाद मिळेल ही रास्त अपेक्षा!

जे लोक हा खेळ आधी खेळले नाहीयेत त्यांच्यासाठी थोडक्यात कल्पना देतो

मायबोलीकरांमध्ये क्रिकेट फार लोकप्रिय आहे म्हणून तोच आपल्या या खेळासाठी पहिला विषय म्हणून घेवूया.

विषय: क्रिकेट

यामध्ये क्रिकेटशी संबंधित एखाद्या व्यक्तीबद्दल (खेळाडू/पंच/समालोचक/समिक्षक/मार्गदर्शक/सपोर्ट स्टाफ/पदाधिकारी) एखादा क्ल्यू देईल जसे की टोपणनाव/एखादा विक्रम/ठराविक लकब/ प्रसिद्ध किस्सा/ मास्क केलेला फोटो/इतर माहिती त्यावरुन आपल्याला त्या व्यक्तीचे नाव ओळखायचे आहे.
बरोबर उत्तर देणारा पुढचा क्ल्यू देईल आणि हा खेळ पुढे चालू राहील.
क्ल्यू देताना कुठलीही उघड माहिती न देता पण पुरेश्या हिंट देवू शकलात तर हा खेळ खुप रंगतदार होईल.

उदाहरणार्थ:
नेटवेस्टच्या त्या प्रसिद्ध फायनल विजयानंतर दादा पाठोपाठ शर्ट काढण्याचा प्रयन्त करणारा अजुन एक भारतीय खेळाडू कोण होता?
उत्तर: हरभजनसिंग

किंवा
९० च्या दशकात कुठल्या भारतीय खेळाडूला त्याच्या संघ सहकाऱ्यांनी " ज्यॉंटी ऱ्होड्स" हे नाव पाडलेले
उत्तर: नवज्योत सिद्धू

आवडला का हा खेळ?
करायची का सुरुवात?

तुमच्यासाठी या खेळातला पहीला क्ल्यू आहे: (एकदम सोप्पा)

पदार्पणाच्या T20 सामन्यात सलग तीन षटकार मारणारा भारतीय खेळाडू कोण होता?
तो केंट कडून काउंटी क्रिकेटही खेळला आहे.

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

The best Cricketer and Commenatator (Cricket Mahaguru) Manjarekar ?

सहा अंक आहेत म्हणजे कुठल्यातरी रन देण्याबाबत कंजूष बॉलर बद्दल असेल का ज्याने अनेकदा डेथ ओव्हर्स मध्ये रन्स रोखले किंवा रन्स ना काढणार्‍या उलट कंजूष बॅट्समन बद्दल.

ओ पुरोगामी,
हिंट द्या की अजुन काहीतरी!

>>> '०१०००० हा त्याचा पिनकोड' आहे अशी उपहासात्मक टीका झालेला खेळाडू कोण? >>>

१९८२ मध्ये भारत पाकिस्तानात ६ कसोटी सामन्यांची मालिका खेळला व नंतर वेस्ट इंडिज मध्ये ५ कसोटी सामने खेळला. या ११ सामन्यात मोहिंदर अमरनाथ प्रचंड भरात होता. या ११ कसोटीत त्याने ५ शतके करून ११८२ धावा केल्या होत्या.

नंतर १९८३ मध्ये झालेल्या विश्वचषक स्पर्धेत त्याचा भर कायम राहिला.

परंतु १९८३ मध्ये भारत दौऱ्यावर आलेल्या पाकिस्तानविरूद्ध त्याला २ कसोटीत फक्त ११ धावा करता आल्या. त्यापाठोपाठ भारतात आलेल्या विंडीज विरूद्ध पहिल्या ६ डावात त्याने ०, १,०,०,०,० अशा धावा केल्याने त्याला संघातून वगळण्यात आले.

त्यावेळी ०१०००० हा त्याचा पिनकोड आहे अशी उपहासात्मक टीका झाली होती.

ग्रेट!
मनस्विता, आता पुढचा क्लू तुम्ही द्यायचाय

>>> म्हणजे मी दिलेले उत्तर बरोबर आहे तर. अर्थात नवर्याच्या कृपेने देता आले हे उत्तर. >>>

अगदी बरोबर!

Pages