क्रिकेट - ५

Submitted by भास्कराचार्य on 12 September, 2018 - 08:48

Submitted by भास्कराचार्य on 3 November, 2016 - 16:33

क्रिकेटवरील पहिले चार धागे -

http://www.maayboli.com/node/1889

http://www.maayboli.com/node/30450

http://www.maayboli.com/node/51908

https://www.maayboli.com/node/60723

भारत-इंग्लंड मालिका नुकतीच संपली. त्यावर भरपूर खडाजंगी झाली. पुढच्या आठवड्यात आशिया कप आहे. त्यानिमित्ताने अजून घमासान होईलच. आधीच्या धाग्याची प्रतिसादसंख्या भरपूर झाल्याने ह्या पॉझ असलेल्या आठवड्यात हा नवीन धागा काढला आहे.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

१-१६
आफ्रिका

अजुन १३३ धावा हव्यात!
टप्पा कॅच त्यामुळे एल्गर नाबाद!

माझं 'मालवणी'वरचं प्रेम मधेंच अनावर होतं . इलाज नाही ! Wink

तुझ्या आवशीची नाय , ऑसीजची धडगत नाय म्हटलंय मी ! आणि , पावसाची लक्षणां मालवणात नाय मेलबोर्नात आसत !20181226_182320.jpg

१-४२
आफ्रिका

अजुन १०७ धावा हव्यात फक्त !!!

जेवायच्या सुट्टी पर्यन्त आफ्रिकेचा १-८१ धावफलक!
आता उर्वरीत ६८ धावा म्हणजे बहुदा औपचारिकता ठरावी दुसर्‍या सत्रात!

भारत - ऑस्ट्रेलिया: बुमराह ने अफलातून बॉलिंग केली. त्याची प्रगती कमाल आहे. मॅच जिंकू आपण. पण दुसर्या इनिंग ला आत्तापर्यंत फक्त मयंक च जवाबदारीनं खेळलाय. शर्मा परत एकदा ‘टेस्ट चं टेंपरामेंट नाही‘ ह्या रेप्युटेशन ला जागत दिवसाचा खेळ संपायला २० मिनीटं शिल्लक असताना, ४ विकेट्स गेलेल्या असताना अनावश्यक शॉट मारून आऊट झाला.

शर्मा परत एकदा ‘टेस्ट चं टेंपरामेंट नाही‘ ह्या रेप्युटेशन ला जागत दिवसाचा खेळ संपायला २० मिनीटं शिल्लक असताना, ४ विकेट्स गेलेल्या असताना अनावश्यक शॉट मारून आऊट झाला. >> टेस्ट क्रिकेटमध्ये एक अनावश्यक शॉट मारला की लगेच आऊटच... अधेमधे काही माफीच नाही. आणि वन-डे,२०-२० मध्ये कुठेही...कसेही... कधीही शॉट मारा.... जगातला बेस्ट बॅट्समन....
हे काय गौड बंगाल आहे?
एक अनावश्यक शॉट आणि शर्मा आऊट ....टेस्ट मध्ये शर्मासाठी २५ फील्डर्सची टीम असते किंवा रोहित शर्मा चा अतिशय भंगार क्रिकेटिंग स्कीलवाला डॉपलगँगर आहे जो फक्त टेस्ट खेळतो अस वाटायला लागलंय.

हाब, शर्मा ने हे चुकीच्या वेळी, चुकीचा फटका मारून आऊट होणं कित्येक वेळा केलय, ज्यामुळे त्याच्या टेस्ट च्या टेंपरामेंटवर प्रश्नचिन्ह आहे.

आज आपले फलंदाज पटकन मिळतील तेवढ्या धावांची भर टाकून उद्या ऑसीजना लवकरात लवकर खेळायला देण्याच्या इराद्यानेच आले होते, असं मला वाटतं. ऑसी गोलंदाजही लेग-टरॅप लावून या इराद्याला खिळ घालत होते. तरीही आपले फलंदाज जाणून बुजूनविकेट जाण्याची पर्वा न करतां फटकेबाजी करत होते. कारण , हया पीचवर चौथ्या-पांचवया दिवशीं 300+ धांवा करणं ऑसीजना महाकठीण असलं तरी पावसाच्या शकयतेने वेळेचं भान महत्वाचं. म्हणून , आजच्या आपल्या फलंदाजीमुळे ( अगदीं शर्माच्याही ) मला काळजी वाटत नाहीं .
( आशावादी अतिरंजन म्हणून माझ्या वरील म्हणण्यावर काट मारला जाणं अपेक्षित आहेच ! )

मलाही भाऊंसारखेच वाटले. पुजारा बहुतेक वेळा सुरूवातीला असा ग्लान्स करत नाही. नेहमीपेक्षा अधिक फास्ट खेळण्याचा प्लॅन असावा.

विहारीची काळ्जी वाटते. त्याला शॉर्ट बॉल ट्रॅप मधे अडकवले जाणार हे उघड आहे नि त्याचे तो खेळण्याचे तंत्र फारसे आशादायक वाटले नाही. अगदी इंग्लंडमधेही हुक मारण्याचा असफल प्रयत्न केलेला आठवतो. पुढची टेस्ट तीन दिअवसांमधे सुरू होत असल्यामूळे सुधारणा करायला संधी मिळणेही कठीण वाटतेय. त्यात दिलाशाची बाब एव्हढीच कि सिडने मधे असा वेरीअब्ले बाउन्स नसेल.

भाऊ शेवटचे चित्र मस्तच आहे Happy

सुरवातीला लायनला बॉलिंगला आणणे हे ऑस्ट्रेलियाच्या दृष्टीने आत्मघातकी ठरु शकते. त्याला अ‍ॅटॅक करणे सोपे जाईल.
अगरवालच्या लायनला दोन दणदणीत सिक्स!

अगरवाल बोल्ड - ४२.
कमिन्सला पाचवी विकेट.
बॉल लो राहतो आहे.

क्राईस्टचर्च टेस्टमध्ये लंचपर्यंत न्यूझीलंडला एकही विकेट नाही.
मेंडीस आणि चंडीमल विकेटवर चिकटले.
श्रीलंका ८९ / २/

भारत १०० / ७.
पहिल्या इनिंग्जप्रमाणे एक बाऊंड्री मारुन जाडेजा आऊट.

पंतची हेझलवूडला स्ट्रेट सिक्स आणि पुढल्या बॉलवर अपर कट मारण्याच्या प्रयत्नात आऊट.
भारताची इनिंग्ज १०६ / ८ वर डिक्लेअर.
ऑस्ट्रेलियाला ३९९ चे टार्गेट.

ऑसीज ६/१
फिंच गेला.
पुन्हा बुमराह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह

मार्श गेला !
मार्शला सलाम ! लहरी पीच , मोठं लक्ष्य, भेदक गोलंदाजी व तीन विकेट लवकर गेलेल्या या कशाचाही दबाव न घेता प्रत्येक चेंडू त्या चेंडूच्या गुणवत्तेवर स्वत:च्या नेहमीच्या शैलीत खेळणं हें कमालीचं कठीण व कौतुकास्पद !! वेल प्लेड !!!

*पंतोबा झेल नाका सोडू हो!* - पीच फलंदाजांना फसवं तसंच यषटीरक्षकालाही !
( पंतोबा तोंडही सैल सोडतात ! Wink )

जुनाट पद्धतीने मला 'पंत' म्हणतेस कीं आताचं तें क्रिकेट बघून ! 20181229_075635_0.jpg

हेडेक संपले.
ऑस्ट्रेलिया १५७ / ६.

Pages