क्रिकेट - ५

Submitted by भास्कराचार्य on 12 September, 2018 - 08:48

Submitted by भास्कराचार्य on 3 November, 2016 - 16:33

क्रिकेटवरील पहिले चार धागे -

http://www.maayboli.com/node/1889

http://www.maayboli.com/node/30450

http://www.maayboli.com/node/51908

https://www.maayboli.com/node/60723

भारत-इंग्लंड मालिका नुकतीच संपली. त्यावर भरपूर खडाजंगी झाली. पुढच्या आठवड्यात आशिया कप आहे. त्यानिमित्ताने अजून घमासान होईलच. आधीच्या धाग्याची प्रतिसादसंख्या भरपूर झाल्याने ह्या पॉझ असलेल्या आठवड्यात हा नवीन धागा काढला आहे.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

पॅट कमिन्स जबर खेळतो. बॅटने उत्तर देतो, गोलंदाजीतही १००% नव्हे ११०% देतो. ग्रेट ऑसीजच्या रांगेतला आहे. अ‍ॅग्रेशन!

माझ्या मते तळाच्या शेपटाला बँटिंग प्रॅक्टीस मिळावी म्हणून कोहली पुजारा आणि रहाणेने खेळलेली चाल असावी कमिन्सला विकेट्स देणे! Wink
भाऊ, सकरात्मक बाजू घेतली हो! Proud

44 -5 !!
* झेल सोडायचे नसतात , हा धडा आपण ऑसीजना शिकवताना पहाणं , हया सारखा आनंद नाही * - तो धडा त्यानी इतक्या पटकन आत्मसात करावा, यासारखं दु:ख नाहीं ! 5ही झेलबाद !!!

सिरीजमध्ये एक टॉप ऑर्डर कोलॅप्स अपेक्षित होता. तो इथेच झाला हे चांगले आहे म्हणजे सिडनीला होणार नाही.
या विकेटवर २५० च्या वर काहीही चेस करणे जवळपास अशक्य आहे.

सगळे रथी - महारथी कोसळले असताना अगरवाल एका बाजूने ठामपणे खेळतो आहे.
हॅट्स ऑफ टू हिम.

अजुन एक अंदाज बहुतेक एमसीजी च्या संयोजकांनी कोहली आणि टीमला विनंती केली असावी कांगारूंच्या पाठिराख्यांचा उत्साह शाबूत ठेवण्यासाठी ... त्यामुळे उद्या गर्दी होईल चांगली लाखभर प्रेक्षकांची.. Wink

झेल सोडायचे नसतात , हा धडा आपण ऑसीजना शिकवताना पहाणं , हया सारखा आनंद नाही * - तो धडा त्यानी इतक्या पटकन आत्मसात करावा, यासारखं दु:ख नाहीं ! 5ही झेलबाद !!! +११११

दिवस अखेर ५-५४..

उद्याचे पहिले सत्र खेळावे जर सर्वबाद नाही झालो तर! आणि थांबावे... ३४६ ची आघाडी झाली आहे!

हे सत्र वेगात गेलं. पण तिसर्‍या दिवसाच्या अंती भारत ३४६ धावांच्या आघाडीवर आणि हाती ५ विकेट्स शिल्लक, आणि ऑस्ट्रेलियाची शेवटची फलंदाजी हे मला बॉक्सिंग डेच्या आधी कोणी सांगितले असते, तर मी त्याला ख्रिस्मसच्या रेड वेल्वेट केकचा एक तुकडा स्वतःच्या हाताने बहुधा भरवला असता, हेही तितकंच खरं. Happy बघू आता उद्या पहिल्या सत्रात काय होतंय (१०० धावांच्या आसपास गेल्यास ५ सत्रं ऑसीज टिकाव धरणार का) ते.

पावसाने अडथळा नाही आणला तर भारत जिंकण्याचीच शक्यता. ( Bumrah will be unplayable on this wicket .) हाही माझा अतिरेकी आशावाद म्हणणं हाच अतिरेक होईल . Wink

अजून ४०-५० मारल्या तर ऑसीज ना ४०० अवघड दिसतात इथे.

पॉण्टिंग चे उद्गार म्हणजे बळच काड्या घालतात ऑसीज तसला प्रकार दिसतोय.

Pages