आयपीएल २००९

Submitted by नंदिनी on 16 March, 2009 - 01:49

आयपीएल परत सुरू होतय. यंदा निवडणूका आणि अतिरेकी हल्ले यात आयपीएक गर्तेत आहे असं वाटतय. पण मागच्या वर्षीसारखे क्रिकेट याहीवेळेला बघायला मिळेल ही अपेक्षा.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

कोणी मॅचेस् पाहतय का? कालच्या आणि आजच्या मॅचेस् 'फिक्स' असल्याचा संशय आहे असे (सामने पहाणारे) सगळे जण म्हणत आहेत. कालच्या एका सामन्याबद्दल तर वर्तमानपत्रातुन्ही आलेले आहे.श्री. ललित मोदी यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत म्हणे.

मी शक्यतो सगळ्या पाहतोय. (अगदीच सकाळची दुसरी इनींग, नंतरची पूर्ण) Happy

मोदींनी हॉजचे, डगाऔट मध्ये उपस्तिथ नसने कायद्याला धरुन आहे असेही सांगीतले आहे. (आजच) त्यामुळे मला तरी फिक्स असेल असे वाटत नाही.

मस्त झाली मॅच. कोलकाता सुद्धा एक मॅच जिंकले.. दादानी १४ बॉल वाया घालवुन ४ धावा काढल्या ही गोष्ट वेगळी.. Happy

कोलकत्ता जिंकले एकदाचे!
पण आता काय उपयोग?
बैल गेला आणि झोपा केला Happy

मला आवडली मॅच. जबरदस्त झाली. नात्या दोन जिंकले ते. Happy गेल्या पाच-सहा मॅच शेवटच्या ओव्हरमध्ये जातात.
आता माझी टिम दिल्ली. Happy सेंकड प्रिफरंस डेक्कन. रोहीत काय खेळला दोन्ही मॅच मध्ये.

कोलकाता सुद्धा एक मॅच जिंकले.. >> हो रे. मी वाक्य नीट लिहिले नाही. मला म्हणायचं होतं की मुंबई जिंकायचं विसरलीये.. कोलकाता सुद्धा अजून एक मॅच लिंकलं.. Happy

मुंबई त्या सचिन सनथ च्या झंझावाती खेळीनंतर परत कधी दिसलीच नाही.
१, २, ३ धावांनी हरणे म्हणजे काय राव. आज केकेआर सुद्धा जिंकले.
धोनी म्हणतो "one of the worst bowling efforts"

दादाची काल कीव वाटली! १४ चेन्डू ४ धावा!!
ओउट होण्यास पण खुप कश्ट पडले ......
दादा आता तरी सन्न्यास ghya,

दिल्ली पहिल्या षटकात २ गडी बाद १ धाव Happy
प्रवीणकुमार रॉक्स!

बंगलोर जिंकले Happy
बंगलोर ४थ्या स्थानावर पोचलेय!

डेक्कन विरुद्ध जिंकले तर सेमीत पोचतील.... सॉल्लिड इंप्रुव्हमेंट Happy

पंजाब हरले .....
आता बहुदा डेक्कन चार्जर्स आणि रॉयल चॅलेंजर्स दोघेही सेमीज मध्ये येतील!

बहुधा नाही आलेच आहेत. पंजाबला ०.००१% संधी आहे जर बेंगळुरु मोठ्ठ्या फरकाने हरले तर.

दिल्ली, चेन्नाई, डेक्कन, बेंगळुरु सेमीमध्ये.

हो...

आता चार्जर्स आणि चॅलेंजर्स च्या सामन्यातून फक्त सेमीत कोण कुणाशी खेळणार ते ठरेल...
_______
आसमाँ के पार शायद और कोई आसमाँ होगा...

म्हणूनच Cricket is a game of glorious uncertainties... Happy

मुंबईचे इंडीयन्स फक्त कागदावरचे वाघ ठरले. सेमीमध्ये पण नाही पोहोचले.

मुंबईचे इंडीयन्स फक्त कागदावरचे वाघ ठरले. सेमीमध्ये पण नाही पोहोचले.>> गेल्या वर्षी काही वेगळी परिस्थिती होती का?

माझा ह्या वर्षीचा आकडा बंगळूरु रॉयल चॅलेंजर्स वर..

तुमचे आकडे कोणावर लावताय?
=========================
"हाती घ्याल ते घरीच न्याल"

फेक आय् पी एल् प्लेयर कोण आहे ह्याबद्दल काही अंदाज?

मला इतके दिवस आकाश चोप्रा वाटत होते.

त्याचे त्या ब्लॉगवरचे शेवटचे पोस्ट "पाहिले" का? त्यावरून हा एकट्याचा ब्लॉग वाटत नाहिये.

नंदिनी
--------------

एफ् आय् पी आर् आय् पी अशी पोस्ट आहे. पण आमच्या महान कंपनीमध्ये व्हिडियो पहाणे बॅन केले गेले आहे. त्यामुळे पाहू शकलो नाही. काय आहे त्या व्हीडियो मध्ये?

नंदे, त्या फेक आय पी एल प्लेयर ची लिंक दे की जरा..
=========================
"हाती घ्याल ते घरीच न्याल"

>>तुमचे आकडे कोणावर लावताय?

आपला आकडा तर पहिल्यापासुन बंगलोरवर आहे Happy

जय हो पांडेजी की Happy काय खेळला गडी.

हुर्रे.... बंगलोर जिंकले Happy
१) दिल्ली
२) चेन्नई
३) बंगलोर
४) डेक्कन

१ली सेमी फा : दिल्ली वि डेक्कन
२री सेमी फा : चेन्नई वि बंगलोर

संभाव्य फायनल : दिल्ली वि. बंगलोर
संभाव्य विजेता : बंगलोर Happy

संभाव्य फायनल : दिल्ली वि. चेन्नई
संभाव्य विजेता : चेन्नई Happy

तात्यानू सेहवाग आजच जिंवत झालाय. सोबत गौती न एबी. डेंजर लोक आहेत ही सर्व. दिल्लीच. Happy

कोणीही जिंकावे पण रैनाने धुवांधार फलंदाजी करावी, नेहरा, कुंबळे आणि आर पीची बाँलींग मस्त व्हावी.
तशी सर्वात स्फोटक टीम डेक्कन आहे, तिथे एकहाती मॅच घेणारे चार जन आहेत, पण शेवटच्या दोन-तीन ओव्हर मध्ये गडबड होते त्यांचाकडून.

सर्वात स्फोटक टीम डेक्कन आहे, तिथे एकहाती मॅच घेणारे चार जन आहेत >> अगदी.. म्हणूनच माझा आकडा त्यांच्यावर आहे.. Happy

Pages