दुःखद घटना !

Submitted by सिंथेटिक जिनियस on 13 September, 2017 - 10:06

दुःखद घटना व त्यावर चर्चेसाठी हा नविन धागा.जुन्या धाग्याने दोन हजार प्रतिसाद कधीच पार केले पण कुणी नवीन धागा काढत नव्हते.नवीन प्रतिसाद इथे लिहा.
जुना धागा https://www.maayboli.com/node/44524

Group content visibility: 
Public - accessible to all site users

जेष्ठ अभिनेते जयराम कुलकर्णी यांचे आज पहाटे निधन Sad
खूप चांगले अभिनेते. बातमी वाचून मला 'आईग्ग!' असेच झाले.

देसाई नाही सरदेसाई, श्रद्धांजली . वडिलांच्या मेडिकल फाईल मध्ये डॉक्टरांच एक 1970 सालाच प्रिस्क्रिप्शन आहे.

डॉ ह वि सरदेसाई :
आमच्या वैद्यकीय वर्गाचे गुरु, मार्गदर्शक, हसतमुख, मित्रवत , व्यासंगी.
आदरांजली.

आजपर्यंत कोरोनामुळे मेलेल्या निष्पाप लोकांना श्रद्धांजली. आज इटलीमध्ये ४७५ लोकांचा या व्हायरसमुळे मृत्यु झाला हा आजपर्यंतचा सर्वात मोठा आकडा आहे.

IMG_20200420_225655.jpg

RIP

IMG_20200420_225655.jpg

RIP

धन्यवाद सामो..

दैनिक लोकमत च्या बातमीची लिंक डिलीट केलीय.

सामाजिक कार्यकर्त्या व ज्येष्ठ पत्रकार दिवंगत अरुण रामतीर्थकर यांच्या पत्नी अपर्णा रामतीर्थकर यांचे निधन.
ओम शांती.

इरफान खान.... अत्यंत शॉकिंग... माझा खूप खूप आवडता अभिनेता. या माणसाचं अजून खूप काम पाहायचं होतं.. अत्यंत ताकदीचा कलाकार. खरंतर रिकव्हर होईल असं वाटलं... खूप वाईट वाटतंय, दुर्दैवी...

अतिशय दुःखद घटना. मागे तो कॅन्सरमधून बाहेर आल्याची बातमी आली होती. पण ...

यश त्याला जरा उशिराच मिळाले, पण प्रत्येक कामावर त्याचा ठसा उमटवून गेला.

श्रद्धांजली.

खूप खूप शॉकिंग,
एक चांगला माणूस आणि तितकाच चांगला अभिनेता गेला.
अचानक टचकन डोळ्यात पाणीच आलं माझ्या...
मी याला किती मिस करेन माहिती नाही. कायम हिंदी आणि अंगरेजी मीडियम मधला प्रेमळ बाप डोळ्यासमोर तरळत राहील.
खूप खूप खूप वाईट वाटतय. अजून खूप काही करायला हवं होतं... खूप...

वाईट वाटलं
एन्डोक्राईन कँसर नंतर आशा थोड्या कमीच होत्या.
तरीही पॉझिटिव्हली तो 1 वर्षं चांगला राहिला.
शुटिंगही केली असावी.
एक गुणी अभिनेता गेला.
मला तो बनेगी अपनी बात मध्ये कल्पना अय्यर चा सायको नवरा म्हणून आठवतो.
खूप चांगल्या भूमिका, स्ट्रगल करून वर आलेला अभिनेता.

इरफान खान.... अत्यंत शॉकिंग... माझा खूप खूप आवडता अभिनेता. या माणसाचं अजून खूप काम पाहायचं होतं.. अत्यंत ताकदीचा कलाकार. खरंतर रिकव्हर होईल असं वाटलं... खूप वाईट वाटतंय, दुर्दैवी... ~~ +१ सान्वी . खूप खूप वाईट वाटतय ऐकल्यापाससून.

Pages