दुःखद घटना !

Submitted by सिंथेटिक जिनियस on 13 September, 2017 - 10:06

दुःखद घटना व त्यावर चर्चेसाठी हा नविन धागा.जुन्या धाग्याने दोन हजार प्रतिसाद कधीच पार केले पण कुणी नवीन धागा काढत नव्हते.नवीन प्रतिसाद इथे लिहा.
जुना धागा https://www.maayboli.com/node/44524

Group content visibility: 
Public - accessible to all site users

आता थंडीच गरज आहे.
गहू ,आणि हरभरा ह्यांना थंड वातावरण लागते .
पण अजुन तापमान कमी झाले नाही.
आकाशात ढग आहेत त्या मुळे पिकांवर रोग पाडण्याची खूप मोठी शक्यता आहे

अच्छा म्हणजे गहू व हरबरा ही रब्बी पिके आहेत Happy
लहानपणी रब्बी व खरीप असे २ प्रकार होते अभ्यासाला त्याची आठवण झाली.

आता थंडीच गरज आहे.
गहू ,आणि हरभरा ह्यांना थंड वातावरण लागते .
पण अजुन तापमान कमी झाले नाही.
आकाशात ढग आहेत त्या मुळे पिकांवर रोग पाडण्याची खूप मोठी शक्यता आहे>>>

राजेशजी, ही पिकांना कि किडीला श्रद्धांजली? इथे का?

अशा कित्येक अनधीकृत फॅक्टरीज उभ्या आहेत देशभरात, जिथे धोका माहीत असूनही पोटासाठी नाईलाज म्हणून लोक जीवावर उदार होऊन काम करतात. भयानक विषण्ण वाटते हा विचार करून Sad Sad

Samana madhle sanwaad nehmi athawtat mla tyanche... kewal apratim... khup great actor & soo natural he was... bhawpurn shradhdhanjali Sad _/\_

_/\__/\_

डॉ.लागूंना श्रद्धांजली
अभिनेता हा अ‍ॅथलिट असला पाहिजे म्हणजे भुमिका सादर करताना शारिरिक क्षमतेअभावी सादरीकरणामधे काही न्यून राहू नये याकरता मदत होते अशा प्रकारचे त्यांचे विचार होते. त्यांच्या लहान / तरूणपणी टिळक तलावावर भरपूर पोहायचे आता म्हातारपणी टेकडीवर अगदी नियमितपणे असायचे आत्ता आत्ता पर्यंत दिसायचे. सामाजिक कृतज्ञता निधी उभारणीसाठी भरपूर काम केले. 'देवाला रिटायर केले पाहिजे' सारखी टोकाची भुमिका घेऊनही ते अनेक सश्रद्ध माणसांचे देखिल लाडकेच राहिले.
फार वाईट वाटते आहे.

बाळ कुडतरकर यांचे ९९ व्या वर्षी दुःखद निधन...
विनम्र श्रद्धांजली....
पुन्हा प्रपंच ही अविस्मरणीय श्रुतिका आज प्रकर्षाने आठवली..

Atta sambandhit baatmya wachlya... he bhagwan kaay suru ahe? Sad 1990 pasun muli ektarfi wasnechya bali tharat ahet. tarihi ajun he prakar kunihi thambwu shkat nahi??? RIP mhntana sudhdha sharm watat ahe Sad

1990 pasun muli ektarfi wasnechya bali tharat ahet. tarihi ajun he prakar kunihi thambwu shkat nahi???>>>

कोण थांबवणार? निर्भयाच्या गुन्हेगारांचे आजवर तीनदा डेथ वॊरन्ट निघाले, तेही हैद्राबादनंतर घाईघाईत काढले गेले, हैद्राबाद घडले नसते तर हेही झाले नसते. पण आज देशाचे सरन्यायाधीश तरी छातीठोकपणे सांगू शकतील का की त्याच तारखेला शिक्षेची अंमलबजावणी होईल म्हणून? तिचे गुन्हेगार आज मृत्यूच्या सावलीत नाहीत तर 'देखा जायेगा, कुछ नही होगा' या विचाराने हसताहेत, निर्भयाची आई रडतेय. काय न्याय मिळाला निर्भयाला? कोणाला जरब बसली किंवा बसणार आहे ह्या खटल्यामधून ???? फाशीची शिक्षा जरब बसावी यासाठीच सुनावली होती ना?

आज कायदा गुन्हेगारांच्या बाजूने आहे. चुकीच्या माणसाला शिक्षा होऊ नये म्हणून आरोपीला शक्य तितके संरक्षण कायदा देतो. कागदावर यात चुकीचे असे काहीही नाही. पण प्रत्यक्षात अंमलबजावणी होताना जे गुन्हेगार आहेत हे सिद्ध झालेले आहे त्यांनाच सर्वाधिक संरक्षण मिळते.

जगभरात मानवी हक्कांनी विचित्र, न पटणारे रूप घेतलेले आहे. एकदा तुम्ही पीडित झालात की तुम्ही संपला. पण तुम्हाला मारून जे जिवंत आहेत त्यांचे जीवनविषयक हक्क मात्र संपत नाहीत. त्यांना सांभाळले जाते. त्यांनी इतरांचे हक्क डावलले असले तरीही. हा विचित्र प्रकार जगभर होतोय.

एकूणच सामाजिक नीतिमत्ता तळाला गेलेली आहे.कोणीही नितीवान उरलेले नाही, समाजात कुठलेही आदर्श उरलेले नाहीत. जे आज आदर्श वाटताहेत, त्यांचे मातीचे पाय कधी दिसतील सांगता येत नाही. त्यामुळे कोणाला कसलेही प्रबोधन, समाजाला कडक दोन शब्द सुनावून समाज जागृती करायचा अधिकार राहिलेला नाही. एखादा शिल्लक असेलही नितीवन पण आता कोणीही कोणाला जुमानत नाही.

निर्भया, हैद्राबादची डॉक्टर, हिंगणघाट या सगळ्या स्त्रिया तुमच्याआमच्यातल्याच होत्या, एका रात्रीत त्यांचे आयुष्य होत्याचे नव्हते झाले. ही स्थिती उद्या कोणावरही येऊ शकते. ती आपल्यावर येऊ नये यासाठी फक्त प्रार्थना करणे हातात आहे. बाकी कसलेही संरक्षण आज शिल्लक नाही.

Pages