दुःखद घटना !

Submitted by सिंथेटिक जिनियस on 13 September, 2017 - 10:06

दुःखद घटना व त्यावर चर्चेसाठी हा नविन धागा.जुन्या धाग्याने दोन हजार प्रतिसाद कधीच पार केले पण कुणी नवीन धागा काढत नव्हते.नवीन प्रतिसाद इथे लिहा.
जुना धागा https://www.maayboli.com/node/44524

Group content visibility: 
Public - accessible to all site users

बौद्धिक-संपदा हक्क चळवळीतील तज्ञ शमनाद बशीर यांच दुर्दैवी घटनेत निधन
नोव्हार्टीस या बलाढ्य आणि राक्षसी कम्पनीबरोबर कर्करोग इलाजावरील "ग्लीव्हेक" या महागड्या औषधाच्या पेटन्ट संबंधी त्यांनी दिलेल्या लढ्यामुळे आज त्या औषधाची किंमत बऱ्याच रुग्णांच्या आवाक्यात आहे.

ईथे सगळे जण ज्या श्रद्धांजली वाहतात त्याचा आदर आहेच, पण एक गोष्ट प्रकर्शाने खटकली. रा़जकारणी असो वा देशा-परदेशात काही दु:खद घटना घडली तर लगेच अगदी तर्पर्तेने त्याची दखल घेणारे मायबोलीकर पश्चिम महाराष्ट्रात आलेल्या महापुराला कसे विसरले?? काल सांगलीत सुद्धा बोट ऊलटुन बरेच जणांनी आपला जिव गमावला, अगदी त्यांनाही कोणी श्रद्धांजली वाहली नाही, पण सुषमा स्वराज्यांसाठी वेगळे धागा ऊघडला असो.
खेद वाटली ईतकेच

( आता कोणी हे लिहु नका की मग तुम्ही लिहायचे होते, तर आधिच सांगते मी इइथे असे कधी केले नाही पन बाकीचे करतात जे यावेळी दिसले नाही म्हणुन लिहीले)

खय्याम

माजी अर्थमंत्री अरुण जेटली यांचे दु:खद निधन.

केंद्रीय मोदी मंत्रिमंडळात महत्वाचे पद भूषवलेले व अकाली/आकस्मिक मृत्यू आलेले गोपीनाथ मुंडे, मनोहर पर्रीकर, अनंत कुमार, सुषमा स्वराज यांच्या नंतर अरुण जेटली हे पाचवे केंद्रीय मंत्री आहेत.

अरूण जेटली व सुषमा स्वराज यांना श्रद्धांजली. योगायोग म्हणजे दोघानीही आणीबाणीविरुद्ध आंदोलनात भाग घेतला होता.

जेष्ठ वकिल, काय्दे तज्ञ, माजी संसद सदस्य राम जेठमलानी यांचे वयाच्या ९६ वर्षी निधन.

अनेक महत्वाच्या पण वादग्रस्त खटल्यात त्यांनी वकील म्हणून काम पाहिले.
http://www.newindianexpress.com/galleries/nation/2019/sep/08/here-are-10...

बोफोर्सच्या सुरवातीच्या काळात ते रोज दहा प्रश्न राजिव गांधी यांना विचारायचे... तब्बल ३० दिवस.

स्टीव्हन पी कोहेन, श्रद्धांजली. भारताचा हितचिंतक व महान विद्यार्थी, आणि एक उत्कृष्ट लेखक

निवडणूक प्रक्रियेत आमूलाग्र बदल घडवून आणवून निवडणूक आयोगाचा धाक दाखवून देणार्‍या टी.एन.शेषन यांना श्रद्धांजली.....

Tn

टी . एन शेषन
ह्यांना विनम्र श्रद्धांजली

राजस्थानच्या सांभर सरोवर परिसरात ताज्या बातमीच्या हवाल्याने कालपर्यंत तब्ब्ल १७००० प्रवासी पक्षी मरण पावलेत.
काल/परवा बारामतीत एक बैलाला निर्दयीपणे जेसीबीखाली चिरडून मारलं आणि वर त्याचा व्हिडीओबी वायरल केला त्या लोकांनी. सुदैवाने त्यांच्यावर दुसऱ्या दिवशीच गुन्हा दाखल झाला.

avian botulism म्हणतायेत पण तेही खात्रीने नाही सांगू शकत कोणी. एवढ्या मोठ्या पातळीवर वेगवेगळ्या प्रजातींची हानी झाल्याने ते सहभागी असलेल्या अन्नसाखळी वर नक्की परिणाम होणार. ती सर्व दृश्य फार विदारक आहेत पाहायला. सर्वत्र खच पडलाय नुसता Sad

हो तो बैलाचा व्हीडीओ न्यूज चँनेलवर बघितला आज. फार वाईट वाटले. किती ते क्रौर्य. पक्षाचे वाचून हळहळ वाटली.

नवाकाळचे माजी संपादक निळकंठ खाडिलकर ह्यांचं आज निधन झालं. कुठल्याहि राजकिय पक्षाचा मुलाहिजा न बाळगता परखड, सडेतोड अग्रलेख लिहिणार्‍या पिढितला शेवटचा तारा निखळला. त्यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन...

Pages