Submitted by सिंथेटिक जिनियस on 13 September, 2017 - 10:06
दुःखद घटना व त्यावर चर्चेसाठी हा नविन धागा.जुन्या धाग्याने दोन हजार प्रतिसाद कधीच पार केले पण कुणी नवीन धागा काढत नव्हते.नवीन प्रतिसाद इथे लिहा.
जुना धागा https://www.maayboli.com/node/44524
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
ही बातमी पूर्ण वाचताही आली
ही बातमी पूर्ण वाचताही आली नाही, सुन्न व्हायला झाले.
श्रद्धांजली काय वाहणार अशांना, ज्यांचे आयुष्य नुकतेच सुरू होत होते.
ह्या बातम्या अंगावर काटा
ह्या बातम्या अंगावर काटा आणतात, फार वाईट वाटतं. सुन्न खरंच.
पायल तडवी या टोपिवाला नायर
पायल तडवी या टोपिवाला नायर विद्यापीठात स्त्रीरोग शास्त्रात एम.डी. करणार्या डॉक्टर विद्यार्थिनीने आत्महत्या केली. तिला आत्महत्येस प्रवृत्त करण्यास तिच्याच तीन सिनिअर विद्यार्थी डॉक्टरांनी जातीवरून त्रास दिला असा आरोप आहे. तिन्ही आरोपींना अटक केली आहे.
तडवी भिल्ल ही एक आर्थिक तसेच सामाजिक स्तरावर मागास असलेला समाज आहे. इंडियन एक्स्प्रेसमधील वृत्तानुसार यापुर्वी या समाजातील केवळ एक स्त्री डॉक्टर झालेली आहे. पायल केवळ डॉक्टरच नव्हे तर पुढे उच्चशिक्षण घेत होती.
२१व्या शतकात एका उच्चविद्याविभुषित तरुणीला जातीवरून केलेल्या त्रासातून स्वतःचा जीव संपवण्याची पायरी उचलावी लागणे ही सगळ्या देशासाठी नाचक्की आणि शरमेची बाब आहे.
कठीण आहे सगळेच
कठीण आहे सगळेच
टवणे, jaati varun ki dharm?
टवणे, jaati varun ki dharm?
Another one.
JetLee गेलेत म्हणे?
२१व्या शतकात एका
२१व्या शतकात एका उच्चविद्याविभुषित तरुणीला जातीवरून केलेल्या त्रासातून स्वतःचा जीव संपवण्याची पायरी उचलावी लागणे ही सगळ्या देशासाठी नाचक्की आणि शरमेची बाब आहे.>> १००% सहमत. अत्यन्त दु:खद घटना. फक्त शिक्षण जातीयवाद घालवु शकत नाही हे सिद्ध झाले आहे. ज्यानी या मुलीला छळले त्याना सख्त शिक्षा झाली पाहिजे म्हणजे परत असे वागायला़ कोणी धजणार नाही.
>> पायल तडवी
>> पायल तडवी
_/\_ दु:खदायक, क्लेशकारक, चिंताजनक .....
पायल तडवी>>>>>>>>> खुपच वाईट.
पायल तडवी>>>>>>>>> खुपच वाईट.
पायल तडवी>>> फार क्लेशकारक
पायल तडवी>>> फार क्लेशकारक
.
https://indianexpress.com
https://indianexpress.com/article/india/payal-tadvi-suicide-case-caste-d...
२७ मे २०१९: प्रसिद्ध फाईट
२७ मे २०१९: प्रसिद्ध फाईट मास्टर वीरू देवगण यांचे निधन. अभिनेता अजय देवगन याचे ते वडील होत. त्यांनी सुमारे 80 पेक्षा जास्त चित्रपटांमध्ये अॅक्शन डायरेक्टर म्हणून काम केले आहे.
विनोदी अभिनेते दिन्यार
विनोदी अभिनेते दिन्यार कॉन्ट्रॅक्टर (७९)
दिन्यार कॉन्ट्रॅक्टर
दिन्यार कॉन्ट्रॅक्टर

दूरदर्शनवर त्यांचे आओ मारी साथे न चुकता बघायचे. कित्येक एपिसोड अजूनही आठवणीत आहेत. आता आठवून हसायला येतेय खरे तर... रसनाचा जाहिरातीत पण आठवताहेत.
खिचडी चा जज आणि बादशाह मधील
खिचडी चा जज आणि बादशाह मधील क्लब चा मालक!
दुरदर्शनवर एक सरदारजी
दुरदर्शनवर एक सरदारजी व्यंगात्मक कार्यक्रम करायचे त्यांचे नाव आठवत नाही. काय नाव होते त्यांचं?
जसपाल भट्टी
जसपाल भट्टी
धन्यवाद.
धन्यवाद.
दिन्यार कॉन्ट्रॅक्टर ना
दिन्यार कॉन्ट्रॅक्टर ना श्रद्धांजली.
खिचडी चा जज>>> प्रिन्सिपॉल ना कॉलेजचे
माथेरान येथे १९३८ साली
माथेरान येथे १९३८ साली जन्मलेले आणि मराठी रंगभूमी गाजवलेली नाटकं नागमंडल, हयवदन, तुघलक इत्यादींचे दिग्दर्शन केलेले, पद्मश्री, पद्मविभूषण आणि ज्ञानपीठ पुरस्काराने गौरविलेले लेखक-दिग्दर्शक अभिनेता गिरीश कर्नाड यांचे वयाच्या ८१ व्या वर्षी आजाराने बंगळूर येथे निधन झाले.
प्रायोगिक रंगभूमीला त्यांनी महत्त्वाचे योगदान दिले. मराठी चित्रपट उंबरठा मध्ये त्यांनी काम केले.
अशा या बहुगुणी, बहुआयामी, उत्तुंग व्यक्तिमत्वाला माझा सादर प्रणाम...
RIP गिरीश कर्नाड सर
RIP गिरीश कर्नाड सर
छान फ्रेश चेहऱ्याचा माणूस
छान फ्रेश चेहऱ्याचा माणूस अभिनेता होता.
गिरीश कर्नाड सर RIP
गिरीश कर्नाड सर
RIP
RIP
RIP
https://youtu.be/-VkzoYNp3GI
https://youtu.be/-VkzoYNp3GI
नाटककार, अभिनेते, चित्रपट दिग्दर्शक आणि लेखक गिरीश कर्नाड यांचे सोमवारी बंगळुरूत निधन झाले. ते ८१ वर्षांचे होते. जागतिक स्तरावरील साहित्य आणि कला यामधील त्यांच्या योगदानाबद्दल त्यांना १९९९ मध्ये ज्ञानपीठ पुरस्काराने गौरविण्यात आले होते. अभिनय, नाटक, लेखन अशा विविध क्षेत्रात छाप पाडतानाच राजकीय आणि सामाजिक परिस्थितीवर परखड मत व्यक्त करणारे कलावंत म्हणूनही ते ओळखले जायचे. गिरीश कर्नाड यांच्या निधनाने कलाक्षेत्रात शोककळा पसरली आहे.
========
उंबरठा सिनेमात स्मिता पाटीलच्या नवर्याचा रोल केला होता.
========
श्रद्धांजली
>> उंबरठा सिनेमात स्मिता
>> उंबरठा सिनेमात स्मिता पाटीलच्या नवर्याचा रोल केला होता.
अगदी अगदी. मला सुद्धा त्यांचा हाच रोल आठवतोय सकाळपासून. शिवाय सूर संगम हा चित्रपट आणि त्यातले धन्यभाग सेवा का अवसर पाया हे गाणे सुद्धा तेंव्हा दूरदर्शनवर नेहमी दाखवले जात असायचे. ते सुद्धा आठवत आहे सकाळ पासून. (शिवाय अजून एक चित्रपट आठवतोय त्यात ते स्टेशन मास्तर असतात. आणि एक प्रवासी ह्र्दयविकाराच्या झटक्याने का काय जातो. योगायोगाने तो अगदी हुबेहूब ह्यांच्या सारखाच दिसत असतो. तर ते त्याच्या घरी जातात आणि त्याच्या मृत्यूची बातमी सांगायच्या ऐवजी तो आपणच आहे असे भासवून तिथे रहातात. असे काहीसे. पण त्या वास्तव्यात ते त्याच्या पत्नीला स्पर्शसुद्धा करत नाहीत असे दाखवले आहे. गंभीर भूमिका आहे. त्यांनी भूमिका अतिशय सुंदररित्या साकारली होती. चित्रपट आठवत नाही. प्लॉट अंधुकसा आठवतोय. त्यातले त्यांचे काम मात्र इतके प्रभावी कि अजूनही चांगले आठवतेय)
श्रद्धांजली.
https://abpmajha.abplive.in
https://abpmajha.abplive.in/india/tamilnadu-former-dgp-v-r-lakshminaraya...
वी. आर. लक्ष्मीनारायण
पायल तडवी, गिरीश कर्नाड -
पायल तडवी, गिरीश कर्नाड -
गंभीर भूमिका आहे. त्यांनी
गंभीर भूमिका आहे. त्यांनी भूमिका अतिशय सुंदररित्या साकारली होती. चित्रपट आठवत नाही. प्लॉट अंधुकसा आठवतोय. त्यातले त्यांचे काम मात्र इतके प्रभावी कि अजूनही चांगले आठवतेय) >>
रत्नदीप -- १९७९ गिरीश कर्नाड - हेमा मालिनि
आपल्या सदनिका उभी करण्यासाठी
आपल्या सदनिका उभी करण्यासाठी ज्यांना मुलभूत सोयीसुविधा सुद्धा नीट न पुरवता राबवण्यात येते अशा १५ मजुरांचा झोपेत असतानाच काल पहाटे पुण्यात अंगावर भिंत कोसळून मृत्यू झाला. यात दोन महिला लहान मुले (सकाळ मधल्या बातमीनुसार) यांचा समावेश आहे.

Pages