दुःखद घटना !

Submitted by सिंथेटिक जिनियस on 13 September, 2017 - 10:06

दुःखद घटना व त्यावर चर्चेसाठी हा नविन धागा.जुन्या धाग्याने दोन हजार प्रतिसाद कधीच पार केले पण कुणी नवीन धागा काढत नव्हते.नवीन प्रतिसाद इथे लिहा.
जुना धागा https://www.maayboli.com/node/44524

Group content visibility: 
Public - accessible to all site users

का इतके त्या रिल्सच्या नादात वहावत जातात? फॅन्स वगैरे काय काही काळ हळहळणार आणि दुसर्‍या कुणाला तरी फॉलो करणार पण मागे राहिलेले कुटुंबीय? मला रेस्क्यू टीम्सचे कौतुक वाटते पण त्यांनाही अशा टाळता येणार्‍या दुर्घटनांपायी वारंवार जीव धोक्यात घालावा लागतो त्याचे वाईट वाटते..

फॅन्स वगैरे काय काही काळ हळहळणार आणि दुसर्‍या कुणाला तरी फॉलो करणार पण मागे राहिलेले कुटुंबीय? मला रेस्क्यू टीम्सचे कौतुक वाटते पण त्यांनाही अशा टाळता येणार्‍या दुर्घटनांपायी वारंवार जीव धोक्यात घालावा लागतो त्याचे वाईट वाटते.. >>> +१००

फॅन्स वगैरे काय काही काळ हळहळणार आणि दुसर्‍या कुणाला तरी फॉलो करणार पण मागे राहिलेले कुटुंबीय?>> +१

मला रेस्क्यू टीम्सचे कौतुक वाटते पण त्यांनाही अशा टाळता येणार्‍या दुर्घटनांपायी वारंवार जीव धोक्यात घालावा लागतो त्याचे वाईट वाटते..>>>>>>>>>>> ++१११

निसर्गाचे काही भाग अनएक्स्प्लोर्ड राहिले तर बिघडतं कुठे तेच कळत नाही. सगळीकडे माणसाला जाऊन जीव धोक्यात घालायचाच आहे.

<< ट्रॅव्हल इन्फ्लुएन्सर इन्स्टावर रील करण्याच्या नादात दरीत पडून गेली. >>
कदाचित कठोर वाटेल, पण स्वतःचा मृत्यू स्वतः ओढवून घेणाऱ्या असल्या आचरट लोकांबद्दल अजिबात सहानुभूती नाही.

कदाचित कठोर वाटेल, पण स्वतःचा मृत्यू स्वतः ओढवून घेणाऱ्या असल्या आचरट लोकांबद्दल अजिबात सहानुभूती नाही.>>> +१११११

<< कदाचित कठोर वाटेल >>

----- कधी धाडस वेडेपणा असतो. ते वेडे धाडस दाखविण्याची फार मोठी किंमत त्यांनी मोजली आहे, त्यांच्याही पेक्षा त्यांच्या मागे राहिलेल्या कुटुंबाने/ मित्रपरिवाराने.

कुणी गेले आहे. Sad प्रत्येक घटनेसाठी सहानुभूती दाखवायलाच हवी अशी अपेक्षा नाही पण एव्हढाही कठोरपणा दाखवायला नको असे वाटते.

कृपया हा धागा फक्त श्रद्धांजली साठीच ठेवावा.
मागे अनेकांनी सुचवल्याप्रमाणे नैसर्गिक - सुलतानी आपत्ती / अपघाती मृत्यू / निष्काळजीपणा मुळे दुर्दैवी घटनांच्या निमित्ताने
मतमतांतसाठी वेगळा धागा कुणीतरी काढावा.
तसेच हा धागा २००० ची मर्यादा केव्हांच पार करून गेला असल्याने याचाही पुढचा भाग काढावा (त्यावर नवी पोस्ट येऊ नये ही प्रार्थना).

Pages