दुःखद घटना !

Submitted by सिंथेटिक जिनियस on 13 September, 2017 - 10:06

दुःखद घटना व त्यावर चर्चेसाठी हा नविन धागा.जुन्या धाग्याने दोन हजार प्रतिसाद कधीच पार केले पण कुणी नवीन धागा काढत नव्हते.नवीन प्रतिसाद इथे लिहा.
जुना धागा https://www.maayboli.com/node/44524

Group content visibility: 
Public - accessible to all site users

विनार्च ची बातमी फार्च धक्कादायक आहे.
अतिशय उत्साही व्यक्तीमत्व , अचानक काय हे झालं

त्यांच्या कुटुंबियांना सावरायचं बळ मिळो

मायबोलीवरचे काही मोजके सभासद सोडले तर मी कुणालाही वैयक्तिकरीत्या ओळखत नाही. पण मायबोलीवरच्या पोस्ट्स, लेख वाचून अनेकजण ओळखीचे झालेले असतात. A wednesday मधे नासिरुद्दिन शाह म्हणतो तसं, लोकल ट्रेनमधे फक्त चेहऱ्याने अनेकजण एकमेकांना ओळखत असतात. तसं म्हटलं तर फक्त Hello म्हणण्यापुरती ती ओळख असते. पण त्यातला ओळखीचा एक चेहरा कमी होतो तेव्हा ते मनाला खूप लागतं. तसं काहीसं विनार्चची बातमी सकाळी ऐकल्यापासून झालं आहे. रोज पेपरमध्ये कोविडच्या केसेसचा आणि मृत्यूंचा आकडा येतो आणि आपण तो वाचतो. पण त्यातच असा आपल्या ओळखीचा एक चेहरा होता हे जाणवलं आणि मनाला खूप लागलं.
या साथीत अजून काय काय होणार आहे कुणास ठाऊक. +1
श्रद्धांजली

भयंकर धक्कादायक .
श्रद्धांजली!!
त्यांच्या कुटुंबियांना सावरायचं बळ मिळो !

कालच बातमी समजली आणि विश्वास बसेना. त्यांच्या लेखामालेतून त्यांची आणि त्यामुळे अनन्याचीही इन्डायरेक्ट ओळख झाली होती. त्यामुळे फार हळहळ वाटली. विनार्चना श्रद्धांजली! अनन्या आणि त्यांच्या कुटुंबियांना यातून सावरण्याचे बळ मिळो.

विनार्च यांना श्रद्धांजली! फारच वाईट बातमी. त्यांच्या लेकीला आणि इतर कुटुंबियांना या परिस्थितीतून सावरायचं बळ मिळो.

फारच धक्कादायक आणि अतिशय वाईट बातमी.
त्यांच्याशी वैयक्तिक परिचय नव्हता पण त्यांनी लिहिलेल्या लेखांतून त्यांच्या हरहुन्नरी व्यक्तिमत्वाची आणि त्यांच्यातल्या सुजाण पालकाची ओळख झाली होती.
विनार्चना श्रद्धांजली. त्यांच्या आत्म्यास शांती लाभो आणि अनन्या आणि इतर कुटुंबियांना यातून सावरण्याचे धैर्य व शक्ती मिळो.

फारच धक्कादायक आणि अतिशय वाईट बातमी....
अस्वस्थ वाटते आहे.
अनन्यासाठी खूप वाईट वाटते आहे.
विनार्चना श्रद्धांजली. त्यांच्या आत्म्यास शांती लाभो आणि अनन्या आणि इतर कुटुंबियांना यातून सावरण्याचे धैर्य व शक्ती मिळो.+1

बापरे! धक्कादायक! Sad
फारच वाईट बातमी. त्याच्या घरच्यांना सावरायचे बळ मिळो.

अरे बापरे काय ही भयंकर बातमी.

मी विनार्चला पर्सनली नव्हते ओळखत. पण इतके वर्ष मायबोलीवर असल्याने बरेच आयडी प्रतिसादातून लिखाणातून ओळखीचे झालेले आहेत. फारच धक्कादायक आहे हे. देवा काय हे वर्ष चालू आहे:(
त्यांच्या आत्म्याला शांती लाभो. श्रद्धांजली !

कोविदने त्या आपल्याला सोडून जाव्यात हे अतिशय वाईट झाले.
त्यांना प्रत्यक्ष ओळखणाऱ्या सदस्या त्यांच्या कुटूंबाशी संपर्कात असतील. काही मदत लागल्यास इथे कळवल्यास मायबोलीकर मदत करू शकतील.

वाईट बातमी! Sad
त्यांच्या निकटवर्तियांना यातून सावरायचं बळ मिळो.

Pages