चित्रपट कसा वाटला - ३

Submitted by टीना on 11 April, 2017 - 16:44

या आधीचा धागा : http://www.maayboli.com/node/48143
हिंदी/मराठी/इंग्रजी चित्रपट कसा वाटला याबद्दलचे हितगुज.
आधीच्या धाग्यावर प्रतिसादांनी २००० चा टप्पा ओलांडल्यामुळे हा नवा धागा यापुढील चर्चेसाठी..

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

भंकस आणि काय च्या काय स्लो आहे. पहिली पंधरा मिनिटे काहीच होत नव्हते मग मी direct लास्ट पाहिला आणि बरं झालं पूर्ण movie पाहिला नाही. मला असे hopeless movies आवडत नाहीत. तो the town movie पण असाच होता, अंगावर येणारा!

Triple frontier पाहिला, अति तेथे माती संदेश देणारा movie. Promising सुरूवात आणि वाईट शेवट केलेला मूवी.

Meet Joe Black कितीतरी वर्षांनी परत बघायला घेतलाय, Brad Pitt इतका cute अजून कुठल्या movie मध्ये दिसला असेल असं वाटतं नाही. Especially coffee house मधला सीन, काय केमिस्ट्री Happy

Fractured trauma बेस्ड सायकॉलॉजीकल थ्रिलर आहे. काही खास नाही.

कुठले रहस्य? त्या सिनेमात काय रहस्य होते?
जोडी फॉस्टरच्या फ्लाईटप्लॅनची कॉपी आहे तो सिनेमा. जसा बच्चनचा डॉन आणि शाहरूखचा डॉन... सेम तसेच.
तुम्ही फॉस्टरचा फ्लाईट प्लॅन बघितला नाही का? मग तो बघा जरा बेटर आहे फ्र्रॅक्चर्ड पेक्षा.

Flight plan आणि Fractured चे end एकदम वेगळे आहेत. बाकी स्टोरीलाइन तीच असली तरी. Flight plan मध्ये ती विमानात बसण्याचे कारण पण व्हिलन असतात, इथे तो walk-इन करतो. बाकी flight plan नक्कीच छान आहे.

म्हणुनच Don चे उदाहरण दिले. Happy
आता the lady vanishes नावाची Hitchcock चकली तुम्ही उलटी घाला किंवा सुलटी, तिला तीन वेटोळे द्या की चार.. चकली ती चकली सारखीच दिसायची आणि लागायची.

सुनिधी, फ्लाईटप्लॅन काय किंवा पॅनिक रूम काय.. खरी जोडी त्यात दिसत नाही. जसा खरा नसीरूद्दीन मोहरामध्ये दिसत नाही.

टॅक्सी ड्रायवर मध्ये ती खूप लहान होती त्यामुळे तो सोडून देऊ, साऑलँ बहुतेकांनी बघितलेलाच असतो पण अक्यूज्ड, काँटॅक्ट, नेल, लिटल मॅन टेट अशा सिनेमांमध्ये खरी जोडी दिसते. जोडीने तशी लवकर एक्झिट घेतली पण मला वाटते हिलरी स्वांकने तिची गादी चालवली... स्वांकनेही एक्झिट घेतल्यातच जमा आहे..

हो, काँटॅक्टमधे खरी ‘ती’ दिसली होती. पॅनिक रूम सर्व मिळुन चांगला बनलेला शो आहे. जोडीचा कोहीनुर तो नाही.
मी तिचे जेमतेम २-४ चित्रपट पाहिलेत.

ज्योडी फॉस्टर मी पण फॅन आहे. फार पूर्वी पासून. म्हणजे कसे काम तर चांगले करतेच पण पुढे जाउन प्रोड्युसर झाली चांगले काम केले.

मी आत्ता ६६ सदाशिव पेठ बघत आहे. मुलीचे लग्न जमवायला तिचे आई बाबा एका घरी जातात तिथे दार उघडल्या पासून तो सीन संपे परेन्त
सीन हा असामी असामी मधील माझे आध्यात्मिक जीवन ह्या लेखावर आधारित आहे. संवाद एकदम कॉपी केले आहेत. माझा तर तीळ पापड झाला. हा लेख इतका आयकॉनिक आहे त्याची अशी कॉपी कशी करू शकतात? कदाचित श्रेय दिले असेल. मी बघितले नाही. अगदी संताप जनक आहे हे.

तो हिरो व हिरॉइन पण इतके वाइट आहेत. बघवत नाहीयेत. सर्व प्रोसिडिंग एकदम दळण वळ णाने पुढे जात आहेत. लग्न शेवटी जमेल हे दिसते आहे.

मलाही बोअर झाला अमा तो, मी अर्ध्या तासात बंद केला
पुढचे बरेच सीन वपुंच्या शास्त्रशुद्ध भांडण्याची कला या विषयावरील आधारित जमदग्नी जोशी च्या पात्रावरून उचलले आहेत.

तो हिरो तेलकट केसांचा दाढीवाला फेक वाटतो आहे निव्वळ. हिरोइन ही सुंदर नसावी असे पात्र रचनेत लिहीले असावे म्हणून तशी कोनतरी घेतली आहे. मांजरे कर कुठे पण मांजरेकरच ( गुंड आदमी) उगीच पुणे आहे म्हणून काहीही बघायचे काय.

परवा शुक्रवारी फर्स्ट डे फर्स्ट शो लाल कप्तान पाहिला.
दोन थिएटर्समधे एकही तिकिट विकलं न गेल्यानी शो कॅन्सल झाला होता. तिसरीकडे तब्बल ११ लोक असल्यानी खेळ झाला.
(अंधाधुनच्या फर्स्ट डे फर्स्ट शो ला ६ लोक होते)

तर प्रॉडक्शन डिझाईन, सिनेमॅटोग्राफी, अ‍ॅक्टिंग सबकुछ क्लास... बोले तो.. झकास...
लाईफ गोज इन सर्कल, यही कल था, यही आज है, यही कल रहेगा... या सेन्ट्रल थीमवर बेस्ड, बक्सरच्या लढाईच्या २५ वर्षां नंतरचा काळातली एका नागा साधूच्या रिव्हेंजची गोष्ट.

फक्त थोड्या सब प्लॉट्सना कात्री लाऊन अडीच तासांऐवजि दोन तासात दाखवली असती तर एक्सपीरिअन्स डायल्यूट झाला नसता.
शेवटचा ट्विस्टही पूर्ण ओपन करून मग कथा दाखवली असती तरी चाललं असतं, कारण तासभर आधीपासून धूसर लक्षात येत असल्यानी त्या ट्विस्टचा काहीच इंपॅक्ट राहिला नाही.

पण कसाही असला तरी सिनेमा बरंच काही वेगळं करायचा प्रयत्न करत होता. अन अशा प्रयत्नांना जर सपोर्ट नाही केलं तर मग आहेच नेहमीच्याच साच्यातल्या टाइमपास सिनेमांच्या बनण्याचं रडगाणं...

काल वॉर पाहिला.
अचाट अतर्क्य मधे समावेश व्हावा Proud चिरफाड टीम ने प्लीज जबाबदारी घ्यावी.

आज sony liv वर पुष्कर श्रोत्री दिग्दर्शित 'उबुंटु' पाहिला.. आवडला... मोठ्यांच्या नजरेने पाहिल्याने काही त्रुटी जाणवतात.. पण लहान मुलांना आवर्जून दाखवावा असा आहे चित्रपट..

आज बंदिशाळा हा मराठी पिक्चर पाहिला. चांगले कलाकार (मुक्ता बर्वे, शरद पोंक्षे, गायकवाड नाव विसरले, हेमांगी कवी), आश्वासक सुरूवात, कित्येक प्रसंग आणि संवाद चांगले होते. पण अगदीच फिल्मी शेवट केला.

चॉपस्टीक्स

अभय देओल आणि मिथीला पालकर यांच्या अभिनयाकरता नक्की पहावा असा सिनेमा. नायक आणि नायिकेची भेट झाल्यावर पुढे काय घडणार याचा अंदाज येतो आणि कथा तो अंदाज चुकवत नाही. सिनेमा अगदी बॉलीवूड अंगानेच पुढे सरकतो. पण तरीही चुकवू नये असाच सिनेमा आहे हा. दिग्दर्शक मला महित नव्हता म्हणून गुगलल्यावर समजले की 'क्या सुपर कूल है हम' सारखा चित्रपट त्याच्या नावावर आहे. नशिबाने मला ते आधी माहीत नव्हते नाहीतर चॉपस्टीक्स बघितलाच नसता मी.

अभय देओलकरता हातखंडा भूमिका आहे आणि ती त्याने मस्तच केली आहे. गच्चीवरचा प्रसंग बहुतेक भूमिकेचा हायलाईट असावा पण दुसर्‍या दोन प्रसंगात त्याचा अभिनय अविस्मरणीय झाला आहे. १. नायिका आपल्या भूतकाळाबद्दल सांगत असताना अपल्या बोलण्याच्या ट्रीट्मेंटबद्दल सांगत असताना एक वात्रट विनोद घडतो. तिला समजत नाही पण अभयने अप्रतिम रिअ‍ॅक्शन दिली आहे - 'गालातल्या गालात हसणे' याचा सुंदर नमुना. २. शेवटच्या एका प्रसंगात नायिका व्हिलनला सामोरी जाते. अभय तिला अडवायला जातो पण तेंव्हा त्याला जाणवते की ती आता तोंड द्यायला तयार झालीये, सुरवंटाचे फुलपाखरु झालंय. तेंव्हाचा त्याचा अभिनय एकदम सट्ल पण तेवढाच लाजवाब आहे.

कारवाँ आणि मुरंबामधली मिथीला बघितल्यावर यातली मिथीला अगदी वेगळी वाटते. आत्तापर्यंत तिला 'सुलझी हुई' भूमिकेतच बघितले होते. पण यात आत्मविश्वास नसलेल्या मुलीची भूमिका करताना ती कुठेच कमी पडली नाहीये. तिने दाखवलेले कमी आत्मविश्वास ते पूर्ण आत्मविश्वास हे ट्रान्झीशन म्हणजेच हा सिनेमा. आणि त्या पूर्ण आत्मविश्वासात कुठेच over confidence नाहीये.

चॉपस्टीक्स या नावाबद्दल संपूर्ण सिनेमाभर मी गोंधळलेला होतो पण शेवटच्या हॉटेल्मधल्या प्रसंगात ते टायटल एकदम पटते.

सिनेमा नेटफ्लीक्सवर आहे.

काल वॉर पाहिला.
अचाट अतर्क्य मधे समावेश व्हावा Proud चिरफाड टीम ने प्लीज जबाबदारी घ्यावी.

Submitted by अंजली_१२ on 21 October, 2019 - 10:5

https://www.maayboli.com/node/71909 हस्तर परीक्षण वार बुधवारी वारला

या विकांताला housefull 4 पाहिला .
ईतर housefull सिरिज बघून फार उच्च अपेक्शा नव्हत्याच बर्यापैकी ठीक ठाक वाटला .
काही प्रसन्ग अगदिच किळसवाणे आणि वैतागवाणे , फारच ताणलेले होते .
काही काही डायलॉग्ज, सीन्स वगैरे धमाल वाटले .

मेड इन चायना पाहिला.राजकुमार राव आवडला.बोमन इराणी परेश रावळ मनोज जोशी पण.मौनी रॉय शोपीस.बाकी यातला संदेश खूप भारी आहे.पण मूळ मुद्द्याच्या आजूबाजूला जास्त फिरलं गेलं आहे.स्पेशली प्रॉडक्ट मिळेपर्यंत चा भाग थोडा लांबला आहे.
क्वीन मधल्या ताका ला छोट्या रोल मध्ये बघून छान वाटलं.गोड मुलगा आहे.मोठे रोल मिळायला हवे त्याला.

https://www.maayboli.com/node/71909 हस्तर परीक्षण वार बुधवारी वारला>>>>>>>>>>> धन्यवाद हस्तर, टायटल बघून काही बोध झाला नव्हता त्यामुळे हा कधी वाचला गेला नाही लेख. धन्यवाद लिंकसाठी> वाचते. Happy

मी परवा द एक्सॉर्सि स्ट हा जुना हॉरर सिनेमा पाहिला. नेटफ्लिक्स वर आहे. तेव्हा ह्याची जाम हवा होती. व कथावस्तू चांगलीच आहे. पण अधून मधून बोअर होत राहते. व्हाइट मॅन इराक मध्ये जातो उत्खनन करताना त्याला एक विचित्र विंग्ड फिगर दिसते. ही खरेतर छान आहे. तोच तो डेव्हिल.
मग व्हाइट बाई जी अ‍ॅक्ट्रेस आहे व सध्या शूट साठी मुलीबरोबर एका घरात राहते आहे तिथे मुलगी प्लांचेट टाइप काहीतरी खेळते व त्यातून नेमका हा डेव्हिल तिला बाधा करतो. चित्रपटाला फारच क्रिस्चन गाभा आहे. प्रीस्ट. मग डेव्हिल बाधा झालेली मुलगी घाण करते, विचित्र अभद्र बोलते.
जे आजच्या घडीला फार काही शॉकिन्ग नाही वाटत. पण किळस वाणे आहे. मग आई पहिले मेडिकल टेस्ट कर व ते त्यात मुलीला शिझोफ्रे निआ तत्सम काय काय आहे असे निदान होते.

पण ती भूत बाधाच आहे मग एक म्हातारा प्रीस्ट व एक तरणा प्रीस्ट ज्याची आई मेलेली आहे नुकतीच. व जो सायकिआट्रिसत ट्रेनिन्ग पण घेतलेला आहे . पक्षी डुएल सिम कार्ड हे चर्च च्या परवानगीने एक्सॉ र्सिझ म भूत उतरव णे कार्यक्रम करतात. होली वॉटर, इन द नेम ऑफ द फादर वगिअरे. शेवटी सैतान सोडून जातो. व मुलगी बरी होते.

काही सीन्स भीति दायक जरूर आहेत. पण ओके टाइप्स. द ओमेन सिनेमा जास्त भारी आहे.

ह्या चित्रपटातल्या काही फ्रेम्स अगदी आय्कॉनिक आहेत. प्रीस्ट संध्याकाळी बॅग घेउन मुलीच्या घरी येतो. तो सीन तर पोस्टर वर आहे.
मुलीने चेहरा पूर्ण फिरवणे हे तेव्हा ग्रेट ग्राफिक होते. ते. आता ओके वाट्ते.

इराकचे सीन छान वाटतत. व्हाइट मॅन ला जे माहीत नसते ते सर्व वाइट हे काय. असे वाटून रागच आला. बघून टाकला सिनेमा झालं.

द एक्सॉर्सिस्ट, द ओमेन (नवीन), रोजमेरीज बेबी कोणतेच सिनेमे एवढे खास वाटले नव्हते मला. लॅपटॉपवर बघितल्याने असेल कदाचित किंवा आता वय झालंय म्हणून... त्याऐवजी थिएटरमधे जाऊन पाहिलेले भूत, डरना मना है वगैरे आवडले होते मला तेव्हा. एवढंच काय वास्तूशास्त्र पाहिल्यावरदेखील काही दिवस रात्री झोपायला त्रास झाला कारण माझ्या खिडकीतून झाड दिसत होतं Lol Lol

नवीनमधला काँज्युरींग बरा होता तसा पण थोडा ताणला होता...

Pages