चित्रपट कसा वाटला - ३

Submitted by टीना on 11 April, 2017 - 16:44

या आधीचा धागा : http://www.maayboli.com/node/48143
हिंदी/मराठी/इंग्रजी चित्रपट कसा वाटला याबद्दलचे हितगुज.
आधीच्या धाग्यावर प्रतिसादांनी २००० चा टप्पा ओलांडल्यामुळे हा नवा धागा यापुढील चर्चेसाठी..

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

@मि_अनु, जमल्यास एका बैठकीत हा सिनेमा पहा. एकदम मस्त स्टोरी, अ‍ॅक्टींग, दिग्दर्शन. सगळ्यांची कामे झकास.

नेटफ्लिक्सवर Capernaum नावाचा अरेबिक चित्रपट बघितला. सदासर्वकाळ युद्धजन्य परीस्थितीत असणार्‍या बैरूतमधल्या बकाल वस्तीत कीडामुंगीसारखं जगणार्‍या एका कुटुंबात जन्मलेल्या १२ वर्षीय झैनची गोष्ट आहे. चित्रपटाची सुरूवात त्याने त्याच्या पालकांवर दाखल केलेल्या खटल्याने होते. आरोप आहे "त्यांनी मला जन्माला का घातले?" पुढचा चित्रपट फ्लॅशबॅक मोडमधे घडतो.
धर्माशी निगडीत अंधश्रद्धा म्हणा कींवा असहाय्य आर्थिक परीस्थितीमुळे आलेली बेपर्वाई असो, त्याला ढीगभर भावंडं आहेत. नुकत्याच वयात आलेल्या बहिणीचे लग्न रोखु न शकल्याने आई बाबांना सोडुन तो जातो. परागंदा अवस्थेत त्याची झालेली परवड होते. त्याची ही करुण कहाणी.
झैनची भूमिका एका १२ वर्षीय सिरीयन स्थलांतरीत मुलाने सुरेख निभावली आहे. संपुर्ण चित्रपटात केवळ शेवटच्या दॄश्यात जेव्हा त्याला वैध ओळखपत्रासाठी फोटो काढायचा असतो तेव्हा अखेर तो हसतो तेव्हा कित्ती गोड दिसतो… त्याच्या वयानुरूप निरागस…
दिग्दर्शिका नदिन लाबाकीने स्वतः अभिनेत्री असून बहुतेक त्याच बकाल वस्तीत राहाणारे किंवा तिथून वाढलेले नवखे कलाकार घेउन चित्रपट बनवला आहे. आणि बर्‍याच प्रसंगात कलाकारांनी त्यांच्या अनुभवाने प्रसंग उभारले आहेत (स्त्रोतः विकी)
हा चित्रपट एक विचार करण्यासारखा अनुभव आहे.

झोया फॅक्टरः
सोनम कपूर चित्रपट म्हणजे मुर्खपणा आहे.

ड्रीमगर्लः मस्त हलका फुलका आहे.

वॉर:
अनिमिष नेत्राने ह्रितिक आणि टायगर ला बघायला पिक्चर बघा.
पण फार फार फार फार मारामारी आहे.15 मिनिटात डोकं गरगरायला लागलं.

मारामारी असेल तेव्हा डुलकी काढायची
इतर वेळी दोघांना बघायचं.ह्रितिक टायगर चा पिक्चर चुकवणं म्हणजे जरा पाप लागेल.

स्येरा भंकस असणार आहे. ठग्ज ऑफ हिन्दोस्तान चा भाऊ Happy वॉर पण प्रोमो आणि गाणी बघूनच कंटाळा आला. एक तर एक्सट्रीम अ‍ॅक्शन सीन्स नाहीतर एक्सट्रीम डान्सेस . तो टायगर म्हणजे रबरी फेक बाहुला आहे Happy

ड्रीमगर्ल पाहिला. मस्तच आहे एकदम. खुसखुशीत संवाद आहेत पण कधीतरी वाटत होतं आयुशमान खूप फास्ट बोलतोय.
कपूर (रणबीर) वाला डायलॉग भारी Proud

स्पॉयलर:
.
.

.
.
.
.
.
.

इथे ते दोघे इतके छान दिसतायत, उलट सुलट उड्या मारून विमानं जीप विमानात जीप जीपमध्ये विमान पाण्यात बाईक कारमध्ये उलटा पिस्तुल घेऊन मारामारी करतायत आणि मला सारखे फिरोज इराणी आणि इन्स्पेक्टर मुकेश का आठवतायत.घारे डोळे.
बालमनावर सुशी विपरीत परिणाम.

हित्तीक आणि टायगरकडे पाहुन नेत्रं अनिमिष होत नाहीत हे अजुन एक कारण न पहाण्याचे Happy (अपवाद जेव्हा रोशनपुत्र सुपर थर्टी सारखं उत्तम काहीतरी करेल). टायगरला अभिनय येत नसावा बहुतेक त्यामुळे त्याचा एकही सिनेमा पाहिला नाही, कारण तसे कधी कोणत्या लेखात पण वाचनात आले नाही. ट

टायगरला अभिनय येत नसावा बहुतेक >> आग से ठंडक बर्फ से गरमी माँग के हम पछताए... जॅकी श्रॉफला "बडा दु:ख दिना तेरे लखन"ने मध्ये बघायचं. समोर गोजिरवाणी माधुरी रडते आहे, डिंपल एलिगंटली त्याच्याकडे तिरपे तिरपे कटाक्ष टाकत आहे तरी हा बाबा फक्त पि.टी. करण्यापुरतेच पैसे मिळाल्यासारखा एकदा डावीकडे, मग उजवीकडे, मग खाली, मग समोर मान वळवतो. तेव्हापासून ह्याच्या सात पिढ्यांकडे अभिनयाची अपेक्षा करणार नाही असे वचन मी मला दिले Wink

अय्या, च्रप्स, तुम्ही आम्हाला साठीच्या बायका म्हणताय? थँक्यु हा, आमचे वय १० वर्षांनी कमी केल्याबद्दल. Happy .. देव तुमचं अजुन खुपखुप भलं करो, तुम्हाला माणसांशी नीट बोलायची बुद्धी देवो, समोरच्याला कुजकट बोलुन स्वतःचा कमीपणा लपवायचा स्वभाव बदलायची शक्ती देवो. Happy

सिमंतीनी Happy जॅकी तर बोलायचीच सोय नाही.

समोरच्याला कुजकट बोलुन स्वतःचा कमीपणा लपवायचा स्वभाव बदलायची शक्ती देवो. Happy
>>> बदलायाचा कशाला ... मेहनतिने कमावाला आहे हा स्वभाव Happy

असं म्हणताय? बरं, मग देव आमचेच भलं करो, तुम्ही वा तुमच्यासारखी माणसं आम्हाला प्रत्यक्षात कधी भेटु नयेत याकरता. Happy

फिरोज इराणी आणि इन्स्पेक्टर मुकेश का आठवतायत-> हायला...बघायला पाहिजे मग...मला आठवतय मी आणी माझा भाउ सुशिन्च्या कथांवर कोणीतरी सिनेमे बनवायाला पाहीजेत अस म्हणायचो.. दाराची एक सीरीज , बैरिस्टर अमर विश्वास ची एक सीरीज , मंदार की एक... फिरोज ची एक.. दुनियादारीचे कास्टिंग पण केलेल आम्ही तेव्हा.. DSP - नाना पाटेकर , हीरो - सुनील बर्वे वगैरे वगैरे...

हा पिक्चर पाहिल्यावर तुम्हाला लहान मुलांप्रमाणे 'आपली वाहने' 'ट्रान्सपोर्ट सिस्टम' 'जगाचा भूगोल' या विषयांची नव्याने उजळणी होईल.

एक्सट्रीम डान्सेस >>>>>>>> माझ्यासारख्या ह्रितिकच्या एक्सट्रीम डान्सेस आवडण्यार्यासाठी मग मेजवानीच आहे. टायगर मात्र त्याची कॉपी करतो सगळ्याबाबतीत.

स्येरा भंकस असणार आहे. >>>>>>>> असहमत मैत्रेयी. हा चित्रपट सत्य घटनेवर आधारित आहे. हे वाचा:

https://en.wikipedia.org/wiki/Uyyalawada_Narasimha_Reddy

मला तर आवडला ट्रेलर. ठग्ज ऑफ हिन्दोस्तानशी बरोबरीच होऊ शकत नाही. कुठे तो स्येरा आणि कुठे हा बकवास ठऑहि!

300 रु तिकीट आहे,

म्हणजे त्यामानाने कमीच कलेक्शन आहे

Pages