चित्रपट कसा वाटला - ३

Submitted by टीना on 11 April, 2017 - 16:44

या आधीचा धागा : http://www.maayboli.com/node/48143
हिंदी/मराठी/इंग्रजी चित्रपट कसा वाटला याबद्दलचे हितगुज.
आधीच्या धाग्यावर प्रतिसादांनी २००० चा टप्पा ओलांडल्यामुळे हा नवा धागा यापुढील चर्चेसाठी..

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

फोटोग्राफच्या आधी, सदाशिव बघायला घेतला होता पण तो मिलिंद गुणाजीसारखा दिसणारा नट काय बोलत होता काsss ही कळत नव्हतं, ट्रॅफिकचाही खूप आवाज होता काल गणपतीमुळे, कंटाळून बंद केला. परत बघायचा प्रयत्न करेन. फोटोग्राफचे संवाद कळले काय नाही कळले काय, काही फरक पडत नाही.

सा हो पाहिला नाही, पण त्याबद्दल नकारात्मक reviews ऐकायला मिळत आहेत.. इथे माबोवर कोणीतरी चिरफाड कराच! Full scope आहे

साहो बघितला. खरतर श्रद्धासाठीच बघितला माझ्यामते अप्रतिमच काम केलंय तिने. प्रभासचा हिंदी अक्सेंट खुपच वाईट. वन टाईम पाहण्यासारखा आहे.

साहो कुणी पाहिला? >>>> कालच बघितला. Advanced booking केलं होतं. त्यामुळे reviews कसेही आले तरी बघायचा होताच.

Its the better version of Race3 . धक्क्यावर धक्का.
प्रभास चा प्रभाव काही पडत नाही. Romantic scenes मध्ये पण constipated looks आहेत त्याचे. Dialogue delivery पण प्रचंड रटाळ आहे.
काही scenes एकदम crisp आहेत. प्रचंड मारामारी. शेवटी शेवटी कंटाळा येतो.
Music मस्तच, पण गाणी उगाच आहेत.
पण एक action scenes सोडले तर मला तर.कुठेही कंटाळा आला नाही.
मला सगळ्यात जास्त चंकी पांडे आवडला.

VB , हो.
पण ते जे काही आहे ते फार वाईट आहे.

शरद केळकर ने डबिंग केलेय, प्रभासचा आवाज नाहीये हिंदीमध्ये
>>> नाही vb , ते बाहुबली मध्ये .साहो मध्ये प्रभासने स्वतःच आवाज दिलाय.

साहो आवडला

रूप की राणी , लायन किंग , धूम 2 ह्यांचे मिश्रण

प्रभासचा लूक फारसा आवडला नाही, रामायण संपल्यावर त्या कलाकारांना दुसरी भूमिका कुणी देऊ केली नाही, काम मागायला गेले की सगळे वाकून नमस्कार करत होते Proud

हेही बहुदा तसे होणार , फ़ैटिंगमध्ये बाहुबलीचेच सीन घेतलेत असे वाटते, गोळीबाराच्या सीनमध्ये आता हा राजकुमारी नाद्वे मणीबंधम बहिर्मुखम म्हणतो की काय असे वाटून गेलं, त्यात त्याचे हिंदी अगदी विचित्र आहे

नाही vb , ते बाहुबली मध्ये .साहो मध्ये प्रभासने स्वतःच आवाज दिलाय.>>>> ओके, मला वाटले, यात पण केलकरचा आवाज आहे. साहो बघितला नाही कारण नेमके गणपती तयारीचे दिवस. बाहुबली मध्ये प्रभास खूप आवडलेला म्हणून त्याच्यासाठी बघायचा होता. पण बरेच नेगटीव्ह रिव्ह्यू ऐकलेत सो आता कदाचित बघणार नाही.

मी पाहिला.फार आवडला नाही.डिमेंशिया चं भयंकर स्वरूप टाळून अगदी सुपरफिशियल आणि थोडं गोंडस स्वरूप दाखवलं आहे असं वाटलं.त्या लहान मुलीचं काम खूप छान झालंय.बाकी तर मुरलेले कलाकार आहेतच.

सावट पाहिला. चांगला आहे.

स्पोईलर -
शेवटी ती तीन मुले कुठली ते कळलं नाही. ती अधीरा- विराजची का?
संग्राम आणि विराजचं कनेक्शन कळलं नाही.

आज हलाल बघितला टीव्हीवर. चांगला आहे, सर्वांचे अभिनय छान आहेत, एकही गाणं नाही, पटकन संपतो. हम दिल दे चुके सनम म्हणू शकतो Wink

शशी देवधर या चित्रपटाविषयी इथे कुणीतरी विचारलं होतं ना, मगाशी लागला होता टीव्हीवर, थोडासा बघितला, चांगला वाटला, गंभीर आहे. अविनाश खर्शीकर खूप दिवसांनी दिसला. परत दाखवणार आहेत संध्याकाळी.

काल ड्रीम गर्ल पाहिला.आयुष्यमान चे असतात तसाच मस्त हलका फुलका पिक्चर आहे.
(आयुष्यमान नॉर्थ इंडियन,मोठयांचा आदर करणारा पण त्याच बरोबर हल्लीच्या मुलांच्या मजेच्या कन्सेप्ट मधल्या सर्व सवयी असलेला मुलगा या रोल मध्ये टाईप कास्ट होईल असं वाटतं.पण तो ते रोल मजेशीरच करेल आणि पिक्चर हिट करेल.)

चंपा, धन्यवाद. मला खूप।उत्सुकता होती।या चित्रपटाविषयी पण कुठेही मिळत नव्हता. झी टॉकीज वर आता पाहतेय.

नेटफ्लिक्सवर Falling in Love पाहिला. टिपीकल M&B स्टोरी आहे, बाकी काहीच सांगण्यासारखं नाही. कथानायिका (प्रेमात पडण्यासाठी) US हुन न्यूझीलंडला येते, त्यामुळे NZ चा निसर्ग पाहायला मिळतो आणि डोळ्याला सुखावतो. बाकी इतकी घिसिपीटी स्टोरी आहे की तुम्ही जर sweet 16 टाईप किंवा M&B कथांचे चाहते असाल तरच पहा.

धन्यवाद चंपा, हो मीच विचारलं होतं इथे आणि आज पहिला चित्रपट. छान आहे सई ची नॉन ग्लॅमरस भूमिका आहे त्यात ती छान वाटली आणि सगळ्यांची कामं सुरेख. हा चित्रपट कुठेच सापडत नव्हता

नवीन पॉलिशेट्टी चा 'साई श्रीनिवास आथ्रेया' हा तेलगू पिक्चर प्राईम वर सब टायटल सह बघायला घेतलाय.रोज 15 मिनिटं.
हुशार आणि होतकरू आहे हा मुलगा.aib व्हिडिओस, मग वेब सिरीज, आणि आता पिक्चर्स. बराच पुढे जाईल.

नेटफ्लिक्सवर Falling in Love पाहिला. टिपीकल M&B स्टोरी आहे, >>>>>>>>>>> हो येस्स मी पण पाहिला तोच विकेंडला. घिसापिटा असला तरी बघितलाच Happy मस्त टाईमपास. न्यू झीलंड भारीच वाटलं.

डीएनए पाहिला प्राईमवर. एक मुल नसलेलं कपल आई-बाबा होण्यासाठी डेस्परेट असतात. त्यासाठी लागणार्‍या टेस्टस, दवाखाने, सरोगसी या सगळ्या चक्रातून जात असतात. त्यातून असा एक ट्विस्ट येतो की दोघे पूर्ण बदलून जातात. अमेरिकेतलेच लोकल कलाकार आहेत बहुधा यातले. वेगळा म्हणून बघायला आवडला मुव्ही.

नेटफ्लिक्सवर जाऊ कहां बता ये दिल सुरू केला होता. पण महाबोअर वाटला. संथ, रटाळ किती वेळ काहीच घडलं नाही. एक लव्ह स्टोरी चालू एवढंच कळलं. सुमार दिसणारी बाई आणि तिचा सुमार प्रियकर. पुढे पुढे ढकलला तर अक्षरशः पॉर्न फिल्म वाटावी असं काहीतरि चालू होतं. बंदच केला मग.

Pages