चित्रपट कसा वाटला - ३

Submitted by टीना on 11 April, 2017 - 16:44

या आधीचा धागा : http://www.maayboli.com/node/48143
हिंदी/मराठी/इंग्रजी चित्रपट कसा वाटला याबद्दलचे हितगुज.
आधीच्या धाग्यावर प्रतिसादांनी २००० चा टप्पा ओलांडल्यामुळे हा नवा धागा यापुढील चर्चेसाठी..

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मी लिपस्टिक थेटरात बघितला होता. मला अजिबात म्हणजे अजिबात आवडला नव्हता. वेगळ दाखवायच म्हणुन काहीही दाखवलय. टु मुच ऑफ सेक्स इज नॉट कप ऑफ मय टी. मला सेक्रेड गेम्स पण म्हणूनच नाही आवडली.

परवा टी व्ही वर हिचकी लागला होता. फार वेळ पाहू शकले नाही. राणी मुखर्जी ला मधूनच जी सवय `हिचकी' म्हणून दाखवली आहे तसे खरंच असते का ? मान हलवण्याची सवय असलेल्या एक काकू माहित होत्या ; पण ते त्यांच्याही नकळत व्हाय्च हे तेव्हाही कळायच , आणि फारस व्यत्यय आणणारं नव्हत. सिनेमात मात्र तसं वाटलं नाही.

हीचकी मस्त मूव्ही होती...त्यात राणीला एक आजार असतो ज्यामुळे सारख्या उचक्या येत असतात...ती सवय नसते...पण त्यावर मात करून ती शिक्षक बनते. सगळ्या शाळेत बदनाम अशा टारगट मुलांच्या तुकडी ला शिकवून रुळावर आणते...मस्त केलाय राणी ने
हा रोल.. .. मोजकी पात्रे , मुलांनी पण अॅक्टिंग छान केली आहे...

जी सवय `हिचकी' म्हणून दाखवली आहे तसे खरंच असते का ? >>> हो. Tourette syndrome (TS or simply Tourette's) is a common neurodevelopmental disorder राणीला या आजाराने उचकी येताना दाखविली आहे पण वेगळा आवाज काढणे, चेहरा वाकडा करणे, खोकने, शिट्टी वाजवणे अशी लक्षणे ही दिसून येतात.

हिचकी , मस्तच आहे.
डोक्याला फार भारी ताप होईल म्हणून बघायला टाळत होते पण त्यामानाने बरा हलका फुलका वाटला

ह्या आठवड्यात वेळ होता म्हणून तनु वेड्स मनू रिटर्न व मनमरझिया हे दोन चित्रपट पाहिले.

तवेमरी मध्ये कंगणाने अफाट काम केले आहे. हरयाणवी दत्तोतर खूपच मस्त जमलीय. चित्रपटात दत्तोलाच सगळे तनु समजताना दाखवले तरी मला सुरवातीला त्या दोघीत काहीही साम्य दिसले नाही. लुक्स मेकअपने मॅनेज केले असावेत पण तरीही भाषा व मॅनेरीझममधल्या प्रचंड फरकाचे श्रेय कंगणाला दयायला हवे.

हे वगळता चित्रपटात दुसरे काहीही पटण्यासारखे नाही, अगदी काहीही नाही... माधवन क्युट दिसतो म्हणून, नाहीतर मी दोन लाथा नक्कीच घातल्या असत्या. तो चित्रपटभर नुसता तरंगतो, स्वतः वर अजिबात ताबा नसल्यासारखा.
बाकी इतर तर बघायला नकोच.
बायको ivf करते, नवऱ्याला माहीत नाही.
मुलगी ह्याचा स्टेटसला lol प्रतिक्रिया देते म्हणजे ती प्रेमात.. आज डिओर्सची नोटीस व उद्या नवरा परत घोडीवर.
संबंध नसलेल्या लोकांच्या लग्नात जाऊन पडेल ती कामे करत बसणारा जिम्मी शेरगिल..
यादी संपणारी नाही. पहिला भाग तरी बरा, मध्यंतरानंतर अगदीच अ आणी आ झालेय सगळे.

मनमरझिया थोडा आवडला. तिघांनीही छान कामे केलीत. 'ही केली ती चूक शेवटची, यापुढे एकदम चांगला वागणार' ही ग्वाही देऊन स्वतःच स्वतःला परत परत खोटे पाडणारे पुरुष व दरवेळी 'कदाचित यावेळेस खरेच सुधारेल' या विचाराला बळी पडून त्यांना माफ करणाऱ्या स्त्रिया पाहिल्यात. त्यामुळे आश्चर्य वाटले नाही. कधी नव्हे ते अभिषेकचे काम आवडले व रोल आवडला.

हिचकी एका सत्यघटनेवर आधारित आहे. त्यावर इन्गलिश चित्रपटही काढलेला आहे:

Hichki (transl. Hiccup) is a 2018 Indian Hindi comedy-drama film, directed by Sidharth P. Malhotra and produced by Maneesh Sharma under the banner Yash Raj Films. It is an Indian adaptation of Brad Cohen's autobiography Front of the Class: How Tourette Syndrome Made Me the Teacher I Never Had, which Yash Raj Films acquired the rights to,[8] with Cohen himself also giving advice during the film's production.[9]

ब्रॅड कोहेनच्या पुस्तकावर आधारित हा इन्गलिश चित्रपट आहे.

>>तवेमरी मध्ये कंगणाने अफाट काम केले आहे.
+१
केवळ तिच्यासाठी मी हा सिनेमा परत पाहू शकते. बाकी अ आणि अ बाबींशी सहमत. माधवनला वाया घालवलेय.

आन्दन एल राय चे सगळेच पिक्चर थोडे अ आणि आ च असतात म्हणजे त्याच्या पिक्चरचे सगळे मेन कॅरेक्टर सेल्फिश, समाजाच्या कुठल्याच नॉर्मल नॉर्मस मधे न बसणारे असतात. राझना मधे तो साउथचा हिरो असाच त्या सोनम साठि पागल असतो, तनु वेडस मनु मधे कन्गणा थोडि येडपटच दाखवलिये, झिरो मधे शाखा.

लाल कप्तान सिनेमा पाहिला अमेझॉनवर. पटकथा आणि दिग्दर्शन यांवर जर अधिक मेहनत घेतली असती तर सुरेख चित्रपट झाला असता असे वाटले. सैफपेक्षा दीपक डॉब्रियलने चांगली भूमिका केली आहे.

Hotstar स्पेशल वर 'छप्पड (छप्पर) फाड कें' सिनेमा आहे. शेवट फार अंगावर येणारा आहे. छान विनोदी चाललेल्या कौटुंबिक नाट्यात एकदम काहीतरी वेगळंच.

हॉटस्टार कृपेने कानपुरिये / कनपुरीये बघण्यात आला. केवळ शेवट थोडाफार गोड केला आहे म्हणून.. नाहीतर बऱ्यापैकी सॅडीस्ट सिनेमा आहे. एकवेळ विनोद हसवत नाहीत पण या सिनेमात एवढ्या लोकांची स्वप्न भंग होताना बघून नैराश्य येतं.

मर्दानी भाग एक बघितला. चांगला आहे पण शेवट फिल्मी वाटला.
एक निर्णय, स्वतःचा, स्वतःसाठी हाही प्राईमवरच बघितला. त्या नवीन हिरोईनपेक्षा मधुरा वेलणकर टवका दिसते. डॉक्टर ईशान (सुबोध भावे) कधीच काहीच निर्णय ठामपणे घेऊ शकत नाही. मूल नकोय तर घटस्फोट का घ्यायचा ते कळलं नाही. ईशान बायकोच्यामागे ठामपणे का उभा राहत नाही. नंतर मुक्तालाही ईशानपासूनच मूल का हवं असतं तेही नीट कळत नाही. एवढी शिकलेली आणि मानसोपचार वगैरे घेऊ शकणारी माणसं जर एव्हडी गोंधळलेली असतात तर सर्व सामान्यांचं काय.
सुहास जोशी मूल होऊ दे म्हणून मागे लागलेल्या असतात, मुंबई पुणे मुंबई तीन मध्ये असतात तशाच, फक्त इथे जरा जास्त हट्टी दाखविल्या आहेत.

चंपा,
एक निर्णय, स्वतःचा, स्वतःसाठी हाही प्राईमवरच बघितला.>> कधी बघितला? सध्या दिसत नाहीय प्राईमवर...

घोस्ट स्टोरी बघितला. पण फ्रँकली मला 4 पैकी 3 स्टोरीजचे शेवट नीटसे कळलेच नाही. कुणी पाहिले असल्यास disclaimer सकट चर्चा करायला आवडेल.

परेश रावलचा नेटफ्लिक्सवर धर्मसंकट पाहिला. खरतर कन्सेप्ट चांगला होता पण नेहमीप्रमाणेच काहीतरी कौटुंबीक मेलोड्रामा, सो कॉल्ड उच्च संस्कृती आमुची ,फाल्तु गाणी घालून सत्यानाश करून टाकला आहे. अन्नु कपुरने रोल साठि एकदम जबरी तयारी केली आहे. नसरुद्दिन शाहने अक्षरशः उगाच जाता जाता काम केले आहे. परेश रावल सेम. मेक अप , पर्स्नॅलिटी सगळ अगदी तेच तेच वाटल.
घोस्ट स्टोरीज मधली पहिली स्टोरी बघितली. आवडली नाही. यापेक्षा लस्ट स्टोरीज जास्त जमलेले अस वाटलं.

लाल कप्तान उत्तम आहे. त्याचा संथपणा हेच त्याचे वैशिष्ठ्य आहे. आणि अफाट visuals. ऐतिासिकदृष्ट्या सिनेमा किती अचूक आहे या बद्दल तज्ञांचे मत जाणून घ्यायला आवडेल.

Pages