चित्रपट कसा वाटला - ३

Submitted by टीना on 11 April, 2017 - 16:44

या आधीचा धागा : http://www.maayboli.com/node/48143
हिंदी/मराठी/इंग्रजी चित्रपट कसा वाटला याबद्दलचे हितगुज.
आधीच्या धाग्यावर प्रतिसादांनी २००० चा टप्पा ओलांडल्यामुळे हा नवा धागा यापुढील चर्चेसाठी..

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

कलर्स मराठीवर भाई चित्रपटाचा उत्तरार्ध बघितला काल, मला आवडला. पूर्वार्ध थिएटरमध्ये बघितलेला पण उत्तरार्ध नव्हता बघितला.

परत एकदा सागर देशमुख खूप आवडला भाई म्हणून. गिरीश कुलकर्णीने मस्त काम केलंय.

माणिक वर्मा आणि रामुभैया दाते यांच्या भूमिका कोणी केल्या ते माहिती नाही, पहिल्यांदा बघितले हे दोन्ही कलाकार.

माधव यांची पोस्ट वाचून चॉपस्टिक्स सिनेमा विशलिस्ट मध्ये टाकून ठेवला होता, अखेर काल रात्री पहिला. मस्त हलका फुलका चित्रपट, जरूर पहावा असा.. मिथिला पालकर आणि अभय देओल दोघांचेही काम एकदम चोख, मस्तच..!
वय वाढत जातंय तसा तसा अभय देओल जास्तच देखणा दिसायला लागलाय की राव !! Happy

चॉपस्टिक मी सुद्धा आवर्जून पहिला.. छान आहे.अभय देओल आधीपासूनच आवडतो.
पण हिरोईन मध्ये ( मिथिला) आत्मविश्वास कमी असतो असं काही वाjटलं नाही.मुंबईच्या ट्राफिक मध्ये छान कार चालवताना दाखवली आहे कि ती ... फार फार तर थोडी वेंधळी वाटली...
गर्दीत कार चालवायला सुद्धा तेवढा सेल्फ कॉन्फिडन्स पाहिजे. ( हे मा वै म)

नाइव्ज आउट - अ‍ॅगथा ख्रिस्ती स्टाइल सस्पेंस अशी जाहिरात वाचुन पाहिला. मस्त आहे, अजिबात निराशा झाली नाहि. खुप दिवसांनी एक चांगला रहस्यपट बघितला. ('१७च्या मर्डर ऑन दि ओरिएंट एक्स्प्रेस पेक्षा सरस आहे...)

झी५ वर ड्रीमगर्ल पाहिला. उत्तम चित्रपट, क्लायमॅक्स मात्र बोअर केला.
अन्नु कपूर, आयुष्यमान जब्बरदस्त! अन्नु कपूरने धमाल केलीय. संवाद मस्त आहेत.

Pages