चित्रपट कसा वाटला - ३

Submitted by टीना on 11 April, 2017 - 16:44

या आधीचा धागा : http://www.maayboli.com/node/48143
हिंदी/मराठी/इंग्रजी चित्रपट कसा वाटला याबद्दलचे हितगुज.
आधीच्या धाग्यावर प्रतिसादांनी २००० चा टप्पा ओलांडल्यामुळे हा नवा धागा यापुढील चर्चेसाठी..

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

Sulu - he wachle ka link madhe -

Historians across India mentioned that the rebellion of Uyyalawada Narasimha Reddy is not about Nationalism as shown in the movie. He only fought with britishers for not getting his monthly pension.[63] Nekkanti Srinivasa Rao, a Telugu historian, told to media that the movie lacks historical accuracy in the story of Uyyalawada Narasimha Reddy by Paruchuri brothers. Srinivasa Rao said that Narasimha Reddy only questioned the British authorities for his monthly pension which he was supposed to inherit from his grandfather

मला सारखे फिरोज इराणी आणि इन्स्पेक्टर मुकेश का आठवतायत.घारे डोळे.
बालमनावर सुशी विपरीत परिणाम. >>>>> mi_anu , अमर विश्वास कथांची नावं सांगू शकाल का? few books are not available in market anymore.

माझा इतका व्यासंग नाही सुशी चा.बऱ्याच वर्षांपूर्वी वाचल्यात.
एका वेगळ्या संकेतस्थळावर एक वेगळे गृहस्थ आहेत ज्यांच्याकडे पूर्ण सुशी कलेक्शन आहे .ते सांगू शकतील.

सुशिन्चा मुलगा माझ्या मेव्हण्याच्या शेजारीच रहातो..बावधन मधे. त्याला विचारता येइल...त्यांच्या प्रमुख पात्र नसलेल्या कथा पण मस्त आहेत। .जश्या ... येता-जाता , ओ गॉsड आणि कही भुत कथा पण प्राक्तन, राउंड हाउस . त्यांची समान्तर तर खूपच आवडलेली।

सुशिंच्या बर्याच भूतकथा वाचल्यात. त्यांच्या अमर कथा मला आवडतात. मंदार कथा विशेष नाही आवड्त. पण भयानक नावाची त्यांची मंदार कथा छान आहे. मंदार कथा कम भूत कथा आहे.
एका वेगळ्या संकेतस्थळावर एक वेगळे गृहस्थ आहेत ज्यांच्याकडे पूर्ण सुशी कलेक्शन आहे .ते सांगू शकतील.>>> संकेतस्थळाची लिंक द्याल का?
सुशिन्चा मुलगा माझ्या मेव्हण्याच्या शेजारीच रहातो..बावधन मधे. >>>> अहो मग विचारा ना प्लीज!

घुंगरू .... गाणे ऐकले

मैं छोड के सारी लाज
ऐसी नाची आज
के घुंगरू टूट गये

मी सोडून सारी लाज
अशी बेभान नाचले आज
की घुंगरू तुटले रे

घुंगरू टूट गये ..... रितीक चे गाणे , याच्या आधी इतक्या कॉपी आहेत

1. पाकिस्तानी फिल्म नाज , राग भूप / देसकार
https://youtu.be/KImIDdYhKjU

2. मराठी गाणे
जानकी , हृदयनाथ मंगेशकर , लता , राग मिश्र जोग

https://youtu.be/RQiJyrcjepY

3. घुंगरू टूट गये
धर्म कांता, नौशाद , आशा भोसले, यमन कल्याण
https://youtu.be/u-X2Yw6MnPI

4. पंकज उदास गझल
https://youtu.be/uROx4n58GJs

5. रुना लैला

https://youtu.be/Ux2-2FXnxic

6. कव्वाली

https://youtu.be/S6PIzuSKIE0

https://youtu.be/CZ-O9uLv-jU

ओहो अस आहे का च्रप्स, हे मी वाचल नव्हत. धन्स. Happy

साउथ इन्डियन दिग्दर्शक- लेखक बॉलिवूडपेक्षा अभ्यासू असतात अस वाटल होत. पण इथे तर खोदा पहाड निकला चूहा अशी गत झालीये.

काल what's up लग्न पाहिला. बोर वाटला.
कथेत काही नावीन्य वाटले नाही.
अतिशय संथ वाटला.
शेवटचा अर्धा तास पहिला नाही.
नवऱ्याला विचारून घेतलं.

अवांतर : ह्या मुव्ही मधला वैभव तत्ववादी आमच्या कॉलेजचाच आहे.
मला आवडतो तो.

हो काल दोन वेळा लागला होता व्हाट्स अप लग्न. किती अंधार असतो त्यांच्या घरात. कलाकार सगळे चांगले होते पण बोर होता. ओला कॅबमध्ये बसल्यावर वैभव otp सांगतो वगैरे डिटेल चांगले होते पण नाशिकला जायला share करता येत नाही हे माहित नाही वाटतं कोणालाच. असा प्रवासात देखणा, बॅचलर, साधासुधा avp भेटला तर किती मज्जा Wink

नाशिकला जायला share करता येत नाही हे माहित नाही वाटतं>>
नाशिकला जायला कंपनीनी कॅब बुक केलीय असं तो आईला सांगतो पण कोणतीही कंपनी शेरिंगची कॅब बुक करणार नाही.
पण हे पटकथालेखक सोयीस्कररीत्या विसरला आहे.
हो घरात फारच अंधार दाखवलाय. Cinematography व्यवस्थित नसेल.

बादवे ते फुंकरीची वादळे गाणं आहे त्यात आमच्या नाशिकच्या बऱ्याच जागा दाखवल्या आहेत, मी मूवी पाहिलेला नाही पण ते गाणं खूप आवडतं, माझ्या नाशिकला फिरून आल्यासारखं वाटतं. सुला वाईन्स, नंदन पाणीपुरी, सलीम चाय वगैरे फुलटू नॉस्टॅल्जिआ...

बघायला पाहिजे ते गाणं, पूर्ण चित्रपट नाही बघितला काल. प्रार्थना तर फारच बालिश वाटली, गाडी चालवायला येत नसताना हायवेवर कोण गाडी चालवेल. ते कंपनीने share मध्ये गाडी बुक करणे मलाही खटकले. एकंदरीत सगळं खोटं खोटं वाटत होतं.

वोर पिक्चर मस्त आहे,

पण शेवटचा प्रसंग आहे, व्हिलन भारतावर रॉकेट सोडतो, कितीही चकचकीत मॉडर्न दाखवले तरी मिस्टर इंडिया आणि अमरीश पुरीच्या रॉकेटची मजा त्यात नाही.

मागच्या रविवारी नाळ बघितला होता. छान वाटला. कुठेही मेलोड्रामा नाही, रडारड नाही. सगळयान्ची कामे छान झाली होती. तो लहान मुलगा तर क्यूटच! Happy अति डायलॉग्ज नव्हते.

ह्या रविवारी ' बदला' बघितला. सुपर्ब अनुभव!

तिरंगा ची मिसाईल फ्यूज कंडक्टर वाली मजा >>>> ही मजा साग्रसंगीत, मसाले लाऊन लाऊन लिहावी अशी विनंती.

Pages