हस्तर परीक्षण वार बुधवारी वारला

Submitted by हस्तर on 9 October, 2019 - 06:42

२ऑक्टो अर्थात गांधी जयंती ला खास वार चित्रपट प्रदर्शित केला गेला
होता बुधवार आम्ही पण पण बघितला मग वार
तुम्ही बघितला असेल तर कोणी पण मदत करू शकत नाही आणि तिकीट बुक केली असेल तर आत्ताच रिफंड मागा

१) टायगर श्रॉफ ह्याने एक मोठी कमी भरून काढली आहे ,अभिनयाची ची नाही तर आयटम बॉय ची
त्याचा अभिनय बघून म्हणाल टायगर सोड ,चित्रपट करणे नाही तर श्वास घेणे

२) जेव्हा जेव्हा टायगर चे डायलॉग सुरु होतात तुम्ही उभे राहणार
टाळी किंवा शिटी वाजवायला नाही तर समोरच्या माणसाला गप्प करायला जो शिव्या द्याल उभा राहिलेला असणार आहे

३) वार मूवी बघताना तुम्ही चित्रपट समरस व्हाल
डोके ह्रितिक आणि काळीज टायगर होऊन एक दुसऱ्याची वार करेल

४) संगीत एकदम मस्त आहे
तुम्ही कितीपण जोराने डिरेक्टर ला शिव्या दिल्या तरी शेजारच्याला कळणार नाही

५) अनपेक्षित णालकनीय घटना
पहिल्या अर्ध्या भागात काय चालले आहे ते कळणार नाही व दुसऱ्या भागात का व कुठे चालले आहे ते कळणार नाही

६) वाणी कपूर १० मिंट येते तरी चित्रपट तिचे नाव श्रेय नामावलीत आहे ,अनुप्रिया गोएंकाचा रोल मोठा असून नाव नाही
वाणी ला बघून १० मिंट पण खूप दिले असे वाटते

७) ह्रितिक प्रत्येक बाबती टायगर हुन सर्रास आहे
ओव्हर ऍक्टिंग मध्ये पण

८) चित्रपट पूर्ण देशभक्तीपर आहे
सुरुवातीची राष्ट्रगान फक्त आपण देशभक्त नंतर सुन्न

९) क्लायमॅक्स एकदम मस्त
चित्रपट संपला म्हणून सुस्कारा टाकतो आणि पार्ट २ येणार असे कळते

१० ) चित्रपट कमी यु ट्यूब विडिओ जास्त
पुण्यात बसून मोरोक्को इराक सिडनी पुर्तगाल
शेवट तर अचानक केरळ आणि लगेच ऑस्ट्रेलिया
पण दक्षिण ध्रुव

११) सगळ्यात चांगली गोष्ट २ तास ४० मिन संपतो चित्रपटाला २ स्टार एक ह्रितिक आणि दुसरा टायगर

आज गांधीजी असते वाढदिवसाचा बट्ट्याबोळ केल्याबद्दल दोघांना पण कुटून मारले असते
अतर्क्य ऍक्शन बघायची तर साऊथ चे चित्रपट बघा नाच बघायचा तर सपना चौधरी बघा

बाकी सुद्य असा

कळावे
लोभ

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Use group defaults

मी थेटरात शिणुमे बघत नाही. Proud पण जय जय शिवशंकर या गाण्यात हृतिकच्या स्टेप्स भारी आहेत. बाकी आनंद-परमानंद.

आज गांधीजी असते वाढदिवसाचा बट्ट्याबोळ केल्याबद्दल दोघांना पण कुटून मारले असते>>>>>> Rofl अहो काय हे ? गांधीजी आज असते तर ते दिडशे वर्षाचे असते. मग त्यांनी कसे काय कोणाला कुटले असते? Lol

माझी मुलगी व पुतण्या परवा हे गाणे समरसतेने बघत होते मोबाईलवर. सासुबाईंना शब्द कळेनात. मग मी उलगडुन सांगीतले की हिरो म्हणतोय की तुम्ही घरी सांगुन या, तुम्हाला आज उशीर होणार आहे वगैरे. त्या म्हणाल्या कसले र ला ट आणी प ला फ लावुन केले आहे !

नाईलाज को क्या ईलाज !

टायगर चे नाव खालिद सच्चा मुसलमान दारू पण पिणार नाही
मग शिवशंकराची पूजा करणार आणि भंग पण पिणार ?

कल्पना ताइ
तुम्हि अर्मन कोहली चे सर्व चित्रपट बघा

कल्पना, या सार्‍या गोष्टी जर खरच सिरीयसली घेतल्या तर राहुल गांधी, नरेंद्र मोदी आणी आलिया भट या तिघांना तर जगणेच मुश्कील होईल.

एखाद्याला काही जमत नसेल म्हणून मरून जा असं सांगायचं परत त्यात जोक करायचा. त्यावर ऑब्जेक्शन घेतलं की सीरिअसली घेऊ नका तुमच्या भावाला बहिणीला असं म्हणाले असते तर त्यावर हसला असतात का

तुमच्या भावना समजू शकते
हा पिक्चर मुळात कथेसाठी बनलेलाच नाही
स्टंट चे भुकेले, ह्रितिक टायगर च्या बायसेप चे भुकेले आणि ह्रितिक असल्याने तमाम बायका हा पिक्चर आवडीने पाहतील याची खात्री.
कलेक्शन आधीच वसूल झालं
गांधी जयंतीला इतकी मारामारी विमान बैलगाडी बस जीप सायकल बाईक जहाज वरून करणारा पिक्चर रिलीज करणं हा मोठा विनोद आहे.
त्या बाईचं नाव नसतं तरी चाललं असतं.दुसरीचं असायला हवं होतं.

वोर पिक्चर मस्त आहे,

पण शेवटचा प्रसंग आहे, व्हिलन भारतावर रॉकेट सोडतो, कितीही चकचकीत मॉडर्न दाखवले तरी मिस्टर इंडिया आणि अमरीश पुरीच्या रॉकेटची मजा त्यात नाही.

फादर इंडियाबरोबर अमरीश पुरीनेही कुटला असता.

शेवटी हिंदू अन मुसलमान मिळून चर्चमध्ये मारामारी करतात

तुमच्या भावाला बहिणीला असं म्हणाले असते तर त्यावर हसला असतात का>>>>>>> कोणाच्या म्हणण्या / समजण्याने लोक मरत असते तर भारताची संख्या सव्वाशे करोडवर गेलीच नसती, नाही का ?

हर सैनिक का घर परिवार होता है , वो लढता है ताकि एक दिन वो घर जा सके,

लेकिन तुम्हारा तो कोई घर परिवार हैही नही, तुम तो शहीद होने के लिये निकले हो ,

तुम्हारे उपर मैं कैसे भरोसा कर सकती हू ?

डायलॉग फ्रॉम War movie

तुमच्या भावाला बहिणीला असं म्हणाले असते तर त्यावर हसला असतात का >> हो हसले असते....सत्य मान्य करण्याची माझी तयारी आहे. Happy

पैशांसाठी असले सिनेमा काढणार्‍यांना काही वाटत नाही, ह्या ठोकळ्यांनाही काही वाटत नाही, मग प्रेक्षकांनी ह्यांना सहन करायचं Sad

तुम्हांला का एवढे वाईट वाटतेय? ह्यातले कोणी भाऊ बहिण आहेत का तुमचे??

माझ्या भावाने टायगर इतका भीषण अभिनय केला असता तर मीच कुटला असता त्याला घरी आल्यावर
प्रोव्हायदेड त्याला घरी घेतला असता तर
किती अभिनयशून्य असावं एखाद्याने, केवळ शरीर कमावले म्हणून हिरो होण्यापेक्षा बॉडी बिल्डिंग मध्ये तरी जायचं

हिरो होण्यापेक्षा बॉडी बिल्डिंग मध्ये तरी जायचं <<< नेहमीच्या कामाला भरपूर पैसे, प्रसिध्दी, नाव, आदर वगैरे मिळण्याचा हा धंदा सोडून??? Happy