चित्रपट कसा वाटला - ३

Submitted by टीना on 11 April, 2017 - 16:44

या आधीचा धागा : http://www.maayboli.com/node/48143
हिंदी/मराठी/इंग्रजी चित्रपट कसा वाटला याबद्दलचे हितगुज.
आधीच्या धाग्यावर प्रतिसादांनी २००० चा टप्पा ओलांडल्यामुळे हा नवा धागा यापुढील चर्चेसाठी..

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मला सध्या सर्वात डोक्याला ताप गेम ओव्हर बघून झाला.
नुसती भीतीदायक भुतं बघणं जास्त बरं.ती खरी नाहीत हे आपल्याला माहीत असतं.

मेड इन चायना पाहिला.राजकुमार राव आवडला.बोमन इराणी परेश रावळ मनोज जोशी पण.मौनी रॉय शोपीस. >>> + १०००० .
राजकुमार राव , अगदी अहमदाबादचा रघु मेहता वाटतो . बोलण्यात कुठेही जास्त हेल नाही . ओवरएक्टीन्ग नाही .

तो देवराज म्हणजे सुमीत व्यास आहेका ? तो पण भारी वाटला .
पण ईतकं प्रॉडक्शन करायला काहीतरी परवानग्या , तयारी तर लागली असेल . सहजासहजी होतं.
आणि त्याच्या बायकोला याच्या कामाचा अजिबातच सुगावा लागत नाही , हे पटलं नाही .

> नुसती भीतीदायक भुतं बघणं जास्त बरं.ती खरी नाहीत हे आपल्याला माहीत असतं. > माझं नेमकं उलटं आहे. भूतं खरी नाहीत हे माहीत असतं म्हणून मी हॉरर जास्त वाचत, बघत नाही. सायकोलॉजीकल थ्रिलर खरे असू शकतात, हे असं आपल्यासोबतही घडू शकतं असं वाटतं. म्हणूनच मी ते वाचते, बघते. कारण मला तो त्रास हवा असतो...

एवढंच काय वास्तूशास्त्र पाहिल्यावरदेखील काही दिवस रात्री झोपायला त्रास झाला कारण माझ्या खिडकीतून झाड दिसत होतं >>>>>> वास्तुशास्त्र ची स्टोरी काय होती ते आजपर्यन्त कळल नाहीये मला. ती भुते भुते वाटतच नव्हती. सगळे पिठ फासून फिरतायत अस वाटत होत. Lol

हा हा तेच की! पीठ फासून फिरणारी भुतं असूनदेखील मी घाबरले होते Blush Blush
कथा विकीवर दिलीय तशीच होती.
त्यात लहान मुलाचे काम करणारी कलाकार खरंतर मुलगी होती आणि सेटवर कोणालाही हे माहीत नव्हतं. तिची आई मुलगा म्हणूनच घेऊन जायची सगळीकडे तिला. या कारणामुळे पुढे त्या नवराबायकोची भांडणं होत होती.

पीठ फासून फिरणारी भुतं असूनदेखील मी घाबरले होते >>> मी पण . खिडकी बाहेर बघायला भिती वाटायची .

पण अशी रंगीबेरंगी /हिडीस भूते नसतानाही सगळ्यात भारी घाबरवणारा मी पूर्ण बघितलेला चित्रपट म्हणजे - भूत .
नुसत आजूबाजूला कोणीतरी आहे , ही जाणिवच भयानक होती . घरात ये जा करणारी माणसं , जिन्याकडे बघायची - तिथे कोणीतरी आहे म्हणून ते फार अंगावर यायचं
उर्मिलाचा अभिनय उच्च होता.

>>पण अशी रंगीबेरंगी /हिडीस भूते नसतानाही सगळ्यात भारी घाबरवणारा मी पूर्ण बघितलेला चित्रपट म्हणजे - भूत .

+१
निकोल किडमनचा द अदर्स पण चांगला आहे.

कौन खूप घाबरवणारा आहे.भूत पण.
काहीही मोटिव्ह(पैसा, बाई, जमीन वरून भांडण,इगो इश्यू,ऑबसेशन) शिवाय उगीच कत्तली करणाऱ्या सायको किलर्स चे पिक्चर जास्त घाबरवतात.'अश्या जगात का राहायचं' आणि 'कोणी यावरून प्रेरणा घेऊन हे प्रकार वाढवले तर' म्हणून.

कौन, भूत चांगले होते. भूतचा दुसरा अर्धा कमी चांगला होता.

इन्सेडिअस पण चांगला होता. ओमेन खुप आवडला होता.

मुळ The Omen ( Gregory Peck, Lee Remick) उत्तम थरारपट होता. चित्रपटाचा sound track पण जबरदस्त आहे. लहान मुलगा, जबरदस्त संगीत आणि जराही किळसवाणा नसुनही भितीदायक होता. शेवटी त्या मुलाचे गोड हसणेही भयावह आहे. My favorite one of the horror movie.

हो भूत मस्तच होता.आणि डरना मना है पण.
द आदर्स देखील आवडलेला.
पण हे क्लासिक समजले जाणारे एक्सोर्सिस्ट, ओमेन, रोजमेरीज बेबी काही खास नव्हते.
इन्सिडिअस आणि जुना ओमेन बघितले नाहीत अजून.

कौन सायकोलॉजिकल थ्रिलर. मस्त होता.

द ओमेन ह्याचा एक कंटेंपररी सेटिंग मध्ये बनवलेला रीमेक पण एकदाच मला स्टा र मुव्हीवर दिसला. तो मिळा ला तर जरूर बघा. पण जुना ओरिजिनल ओमेन ग्रे गरी पेक ली रेमिक व तो गोड बाळ ब्लॅक कुत्रे कावळे वाला मस्तच आहे. माय फेवरिट. एक्सॉर्सिस्ट प्रमाणे ह्याचे पण पुस्तक आहे. एक्स चे पुस्तक प्रथम वाचले २५ वर्शामागे मुव्ही आत्ता बघितली. ओमेन शाळेत बघितला सातवीत आणि पुस्तक नंतर वाचले. विशीत.

एका सिमेट्रीत डेमिअन च्या आईची ग्रेव्ह असते. त्यात वुल्फ असतो सांगाडा मनुषय नाही. खुळचट जुनाट कल्पनांवर आधारित आख्यायिका आहे कि डेमिअयन चे आई बाबा म्ह्नजे खुद्द सैतान व वुल्फ. पण अश्याने वुल्फ, काळा कुत्रा लॅब किंवा रॉटवाइलर असावा, काळे कावळे रेव्हन हे अपशकुनी आहेत सैतानाचे प्रतिक प्रोटेक्ट र असे गैर समज उगीच दृ ढ होतात.

ग्रेगरी पेक व ली रेमिकचे ओरिजिनल नवजात बाळ. ज्यांनी डेमिअन ला त्याच्या जागी ठेवले , त्यांनी ते बाळ डोक्यात दगड घालून मारले व पुरलेले असते. त्याची पण ग्रेव पेक ला तिथे सापडते. व त्याला दु:ख होते. हा सीन फार जबरी आहे. फोटो ग्राफरचा, नन चा मृत्यु व क्लायमॅक्स पण.

ओमेन भाग दोन मध्ये तो एकाला वरून फ्रीझ झालेल्या नदीत पाडून मारतो. तो भारी सीन आहे. भाग तीन आठवत नाही. भाग चार मध्ये डिमिअन मोठा होउन अमेरिकेचा प्रेसिडेंट बनतो. आता हे काही भीतिदायक वाटत नाही आहे. चालसे वो भी चलेगा असेच फील्स आहे.

नुकताच वास्तुपुरुष पाहिला. कधीचा पाहायचा होता, सुमित्रा भावे सुनील सुकथनकार या जोडीचे चित्रपट हमखास पाहते. हा पण छान, आवडला. एखाद्या दीर्घ कादंबरीसारखा मोठा काळ आहे. मुख्य नायकाचे लहान व मोठा दोन्ही भूमिका सुरेख. त्यांचं कास्टिंग नेहमीच चांगलं असतं.
त्यामानाने देवराई एवढा आवडला नाही.

कथा विकीवर दिलीय तशीच होती. >>>>>>>>> अशी आहे तर स्टोरी.

त्यात लहान मुलाचे काम करणारी कलाकार खरंतर मुलगी होती आणि सेटवर कोणालाही हे माहीत नव्हतं. तिची आई मुलगा म्हणूनच घेऊन जायची सगळीकडे तिला. या कारणामुळे पुढे त्या नवराबायकोची भांडणं होत होती. >>>>>>>>> हे माहितीये. कुठल्याशा क्राईम शो मध्ये हिची स्टोरी दाखवली होती. खुपच धक्कादायक होत ते. आता ती नॉर्मल मुलगी म्हणून वावरते. झरीना वहाबबरोबर एका अ‍ॅड मध्ये बघितलय हिला नुकतच. सुन्दर दिसतेय मुलगी.

कौन, भुत, डरना मना है हे माझे सुद्दा फेवरिट आहेत. भुतचा दुसरा पार्ट नाही बघितला. डरना जरुरी है नाही आवडला.

काहीही मोटिव्ह(पैसा, बाई, जमीन वरून भांडण,इगो इश्यू,ऑबसेशन) शिवाय उगीच कत्तली करणाऱ्या सायको किलर्स चे पिक्चर जास्त घाबरवतात.'अश्या जगात का राहायचं' आणि 'कोणी यावरून प्रेरणा घेऊन हे प्रकार वाढवले तर' म्हणून. >>>>>>>>> मला आवडतात (विथ मोटिव्ह आणि विदाउट मोटिव्ह दोन्ही) सायको
किलर्सचे सिनेमे.

सायकोलॉजीकल थ्रिलर खरे असू शकतात, हे असं आपल्यासोबतही घडू शकतं असं वाटतं. म्हणूनच मी ते वाचते, बघते. >>>>>>>>>>> मी सुद्दा.

मला फक्त जुना ओमेनच माहित आहे. तो जबरदस्त होता. नवे पण आहेत हे आत्ता कळलं.
‘भूत’ चा पहिला भाग रामगोपाल वर्माने डायरेक्ट केला होता व मध्यंतरानंतरचा कोणीतरी दुसर्‍याने हा विनोद बराच ऐकला होता, इतका फरक आहे. Happy पहिला भाग भन्नाट व दुसरा पडेल...
वर्मासायबांचाच ‘रात’ फार मस्त होता. त्यात ती रेवती काय खतरनाक हसलीये.

ता.क.
भूत चा एकच भाग आहे. मी मध्यांतरा आधीचा व नंतरचा असे म्हणत होते.

माधव, चॉपस्टिक्स विश-लिस्टमध्ये टाकून ठेवला आहे.

बाला स्द्धा बघायचा आहे.

एकाच विषयावरचे दोन सिनेमे एकाच वेळी कसे काय रिलिज करू शकतात?
Mast aahe... go for it...>>>>>>>> थँक्यू च्रप्स.. इकडे फक्त एकाच ठिकाणी दिसतोय म्हणून वाटलं काही चालत नाहीये की काय? बघेन नक्की.

नेटफ्लिक्स वर हॉलिडे इन द वाईल्ड बघितला. खूप क्यूट छोटा मुव्ही आहे. कथेचा जीवही लहान आहे तरी एकदम मस्त वाटला.
न्यूयॉर्क मधे राहणारी व्हेट, नवर्‍याने अचानक आता आपल्यात काही राहिलं नाही म्हणत आणि मुलगा कॉलेजसाठी निघून गेल्यावर एम्प्टी नेस्ट चा बाऊ न करता अफ्रिकेच्या एका हत्तींच्या अभयारण्यात राहयला जाते (जिथे तिने सेकंड हनीमुनचा प्लॅन केलेला असतो) .
तिथे तिला स्वतःचीच नव्याने ओळख होते, जगण्याचा हेतू आणि प्रेम दोन्ही सापडतं.
या मुव्हीत काही काही निसर्ग शॉट्स, हत्तींचे सीन्स, सूर्यास्त अफलातून घेतलेत. शेवट खूपच छान हळवा केलाय. नक्की बघा.

नेटफ्लिक्स वर हॉलिडे इन द वाईल्ड बघितला. खूप क्यूट छोटा मुव्ही आहे. कथेचा जीवही लहान आहे तरी एकदम मस्त वाटला.
न्यूयॉर्क मधे राहणारी व्हेट, नवर्‍याने अचानक आता आपल्यात काही राहिलं नाही म्हणत आणि मुलगा कॉलेजसाठी निघून गेल्यावर एम्प्टी नेस्ट चा बाऊ न करता अफ्रिकेच्या एका हत्तींच्या अभयारण्यात राहयला जाते (जिथे तिने सेकंड हनीमुनचा प्लॅन केलेला असतो) .
तिथे तिला स्वतःचीच नव्याने ओळख होते, जगण्याचा हेतू आणि प्रेम दोन्ही सापडतं. >>>>>>>>> हे आपल्या कडच्या 'क्वीन' सारख.

बाला मस्त वाटला.

उजडा चमन ज्यास्त छान आहे असे इतर मैत्रीणींनी सांगितले.

काल दुपारी नेफीवर अली फझल आणि महागुरू कन्येचा हाऊस अरेस्ट पाह्यला. अपेक्षा न ठेवता आणि ट्रेलर न पाहता बघितल्याने चांगला वाटलं. श्रिया पुढे मोठी नटी होईल नॉन-मेनस्ट्रीम कॉन्टेन्टमध्ये बहुतेक.
रात्री A Twelve-Year Night हा स्पॅनिश आणि The Art of Racing in the Rain हे दोन्ही खतरनाक सेंटी सिनेमे बॅकटूबॅक पाहिल्याने मी लैच भावुक/नॉस्टॅल्जिक झाल्तो( विड ब्राउनी इफेक्टबी असेल) आणि मग झोपच नाय आली उशिरापर्यंत. तिन्ही सिनेमे पहा जमल्यास

Pages