चित्रपट कसा वाटला - ३

Submitted by टीना on 11 April, 2017 - 16:44

या आधीचा धागा : http://www.maayboli.com/node/48143
हिंदी/मराठी/इंग्रजी चित्रपट कसा वाटला याबद्दलचे हितगुज.
आधीच्या धाग्यावर प्रतिसादांनी २००० चा टप्पा ओलांडल्यामुळे हा नवा धागा यापुढील चर्चेसाठी..

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मर्दानी 2... जबरदस्त चित्रपट.. खलनायकी भूमिकेतून पदार्पण करणाऱ्या विशाल जेठवाचे खरोखर कौतुक करावे तितके थोडे!

आजवर अनेक चित्रपट पाहिले, पण पुण्यातल्या multiplex मध्ये टाळ्यांचा कडकडाट फक्त या एकाच चित्रपटासाठी पाहिला.. अति उत्तम चित्रपट!

मला बघायचाय मर्दानी2.
काल प्राईमवर मिसिंग आणि आज टीव्हीवर छिछोरे पाहिला.छिछोरे आवडला.(अर्थात ही एका मोठ्या पिक्चर च्या लांबीची कथा नाहीये.अगदी चिमुकलं कथाबीज आणि सर्वाना अपील होणाऱ्या हॉस्टेल डेज चे किस्से फिलर्स असं स्वरूप आहे.)नवीन पोलिशेट्टी परत नव्याने आवडला एआय बी व्हिडीओज नंतर.बाकी सर्व कलाकार पण रोल मध्ये अगदी सुटेबल.गंमत म्हणजे तरुणपणी हँडसम दाखवलेले सर्व म्हातारपणी नॉर्मल लूक चे आणि तरुणपणी दिसायला चंपट दाखवलेले लोक म्हातारपणी जास्त छान असं दाखवलं आहे त्याची मजा वाटली.प्रत्यक्ष आयुष्यात अशी बरीच उदाहरणे फेसबुकवर पाहिल्याने रिलेट झाले.
मिसिंग...दिग्दर्शकाचा पहिला प्रोजेक्ट म्हणून खूपच चांगला आहे.पण असे खूप पिक्चर पाहिले असल्याने पहिल्या 10 मिनिटात शेवटाचा अंदाज आला.तब्बू छान दिसते.मनोज वाजपेयी पण चांगला दिसतो पण जरा जास्त बारीक झालाय असं वाटलं.अन्नू कपूर चं काम नेहमी
प्रमाणे बेस्ट.

छिछोरेबद्दलच लिहायला आले. मस्स्स्स्स्स्त सिनेमा आहे. सर्वच मुलांनी छान कामे केलीत. तो गोबरा, कुरळ्या केसांचा मुलगा/माणुस आहे त्याने तर फार मस्त विनोदी भुमिका केलीये. (माफ करा, अभिनेत्यांची नावे वाचली नाहीत)

> गंमत म्हणजे तरुणपणी हँडसम दाखवलेले सर्व म्हातारपणी नॉर्मल लूक चे आणि तरुणपणी दिसायला चंपट दाखवलेले लोक म्हातारपणी जास्त छान असं दाखवलं आहे त्याची मजा वाटली.प्रत्यक्ष आयुष्यात अशी बरीच उदाहरणे फेसबुकवर पाहिल्याने रिलेट झाले. > +१ प्रत्यक्ष आयुष्यात अशी बरीच उदा पाहिली आहेत. मला वाटतं प्रत्येक व्यक्तीचा peak bloom असा दहावीस वर्षांचा काळ ठरलेलाअसतो. तो केव्हा येईल-जाईल हे व्यक्तीनुसार बदलते.

आताच वाचले,
यातला सुशांत सिंग चा मुलगा म्हणजे तुंबाड मधला पांडुरंग आहे.मोठा झालाय त्यामुळे ओळखला नाही.
पिक्चर चा शेवट आणि त्यातला मेसेज आवडला.आणि फिल्मी शेवट केला नाही तेही आवडले.

चुचा बरोबर आहे. (खरं तर आधी कळले नाही चुचा म्हणजे काय पण मिस्टर सुनिधींना त्या मुलाचे नाव विचारल्यावर बोलले की ‘नाव माहिती नाही पण फुकरे मधे त्याचे नाव चुचा होते’).. Happy Happy

पिक्चर चा शेवट आणि त्यातला मेसेज आवडला. >> अनुमोदन.

फायनली knives out पाहिला परवा...
मस्त आहे सिनेमा. ओल्ड स्कूल डिटेक्टिव स्टोरीज आवडत असतील तर बिल्कुल चुकवू नका

मर्दानी 2... जबरदस्त चित्रपट.. खलनायकी भूमिकेतून पदार्पण करणाऱ्या विशाल जेठवाचे खरोखर कौतुक करावे तितके थोडे!

आजवर अनेक चित्रपट पाहिले, पण पुण्यातल्या multiplex मध्ये टाळ्यांचा कडकडाट फक्त या एकाच चित्रपटासाठी पाहिला.. अति उत्तम चित्रपट! >>>>>>>>> सध्या जी आजूबाजूला परिस्थिती ( महिलान्वरचे अत्याचार ) ओढावली आहे, ते बघता टाळया वाजवल्या गेल्या ते योग्यच आहे. अगदी परफेक्ट टाईमिन्ग साधल या चित्रपटाने रिलीज होऊन. अश्या चित्रपटाची गरज होती.

ठिक आहे, बेस्ड ऑन रियल लाइफ स्टोरी. सलमान खानचा "भारत" सोडुन चोप्राने हा निवडला अशी बातमी होती. खरं खोटं दोघं जाणे...

फोर्ड व. फेरारी - मस्त आहे. फेरारी सारख्या नीश मार्केटमधे डॉमिनंस असलेल्या कंपनीच्या स्पर्धेत (कार रेसिंग) फोर्ड सारखी ट्रेडिशनल, वेल एस्टॅब्लिश्ड पण थोडी सुस्तावलेली कंपनी कसा सामना करते याचं सुंदर चित्रीकरण आहे. कार एंथुंनी आवर्जुन बघण्यासारखा...

लाल कप्तान म्हणजे सूडकथेला दिलेली ब्रिटीशकालीन पार्श्वभूमीची फोडणी आहे. मराठा सैन्य, ब्रिटीश आणि खजिना ही उपकथा चांगली विणली आहे. सूडकथेला दिलेल्या वेगळ्या ट्रीटमेंटमुळे , वेशभूषेमुळे एकदा पाहण्यासारखा आहे सिनेमा. मात्र १८ व्या शतकातले दुर्गम भागातले कच्चे रस्ते चारचाकी वाहनाच्या वावराने तयार झालेले दिसणे असे दोष राहीले आहे. सिनेमा हॉलमधे आला होता का ला.क. ?

बदमाष कंपनी पण एकदा पाहण्यासारखा आहे.
प्राईम व्हिडीओ वरचा सर्वात चांगला सिनेमा असुरन आहे हे निर्विवाद. तमिळ नावाने कदाचित सापडणार नाही.

द स्काय इज पिंक कसा आहे? >>> गंभीर आहे पण सुंदर आहे. इतके गंभीर कथानक, दुसरे कुठलेही लाईट मूडचे उपकथानक न जोडता खूप डिप्रेसिंग किंवा कंटाळवाणे होऊ शकले असते. पण सिनेमात दुसरे कुठलेच कथानक नाहिये आहे ती फक्त पेशंटभोवती फिरणार्‍या कुटुंबाची कथा. पण तरीही सिनेमा कुठेच डिप्रेसिंग किंवा कंटाळवाणा होत नाही. गंभीर विषय आणि फ्रेश मूड शेवटपर्यंत अगदी परफेक्ट सांभाळले आहेत - ना कम ना ज्यादा!

सिनेमा हॉलमधे आला होता का ला.क. ?>>> हो, आला होता, पाहिला होता आणि मोठ्या पडद्यावर पाहायला मजा देखील आली. (दुर्दैवाने आम्ही दोघे धरून फक्त १३ लोक होते पूर्ण हॉल मध्ये) पण आजकाल पूर्ण ३ तासाचा सिनेमा बघायची तयारीच उरलेली नाही, कथेचा पट फार मोठा असल्याने संथ वाटतो. माझी इच्छा आहे कि या कथानकावर एखादी सिरीज बघायला मिळावी.

गंभीर आहे पण सुंदर आहे. इतके गंभीर कथानक, दुसरे कुठलेही लाईट मूडचे उपकथानक न जोडता खूप डिप्रेसिंग किंवा कंटाळवाणे होऊ शकले असते. पण सिनेमात दुसरे कुठलेच कथानक नाहिये आहे ती फक्त पेशंटभोवती फिरणार्‍या कुटुंबाची कथा. पण तरीही सिनेमा कुठेच डिप्रेसिंग किंवा कंटाळवाणा होत नाही. गंभीर विषय आणि फ्रेश मूड शेवटपर्यंत अगदी परफेक्ट सांभाळले आहेत - ना कम ना ज्यादा!>>>>>>>>>>>>>>>>> थँक्यू माधव.. बघेन आता Happy

सिनेमा हॉलमधे आला होता का ला.क. ?
>> हो फर्स्ट डे फर्स्ट शो पाहिला होता

दुर्दैवाने आम्ही दोघे धरून फक्त १३ लोक होते पूर्ण हॉल मध्ये
>> मी पाहिला त्याला ११ होते (३ कपल्स एसी मधे चिपकायच्या इराद्यानी आली होती, दोन मध्यमवयिन बायका त्यांच्या मैत्रिणीनी सांगितलं म्हणून आल्या होत्या (त्या मैत्रिणीनी म्हणे प्रॉडक्शन डिझायनरला कन्सल्टंट म्हणून थोडी मदत केली होती). आणि एक मुलगा त्याच्या आईसोबत आला होता.

या थिएटरला जाण्याआधी मी इतर २ थिएटर्समध्ये तिकिटं विकली न गेल्यानी शो कॅन्सल झाल्याचं बघून गेलो होतो.

लाल कप्तान थेटरात बघायला गेलो तर लोकच नाहीत त्यामुळे शो कॅन्सल झाला. पण आमच्यात सिनेमाला गेल्यावर न बघता घरी येत नाहीत त्यामुळे वॉर बघितला, झोप लागली मधेमधे.

पति , पत्नी और वो बघितला.
कंटाळा नाही आला पण का बघितला असं झालं.
अनन्या गोड दिसते , भूमी छान , कार्तिकच्या जागी कोणी दुसरा हवा होता .
भूमीने साड्या उलट पदराच्या का नेसल्यात ???

मोगरा फुलला वर चर्चा झालीय या धाग्यावर कुठेतरी ... आज झी टॉकीज वर पाहिला...चक्क आवडला...सुरवातीला चम्या वाटणारा स्वप्नील नंतर आवडलाच...आणि श्रावणी देवधर पण सुंदर दिसलीय...चंद्रकांत कुलकर्णी चा पहिलाच पिक्चर असावा बहुतेक...गाणी पण छान आहेत सगळी...

बनगरवाडी नावाच्या चित्रपटात चंद्रकांत कुलकर्णी हिरो आहे. तो पहिला चित्रपट असेल कदाचित.
मोगरा फुलला आता सतत दाखवतात, आधी नाळ सारखा दाखवत होते Happy सगळ्यांनी बघेपर्यंत दाखवत राहायचा असा हेतू असेल.
ती लहान मुलगी आधी सीरियलमध्ये होती स्टार प्रवाहवर. गोड आहे फार.

ती मुलगी सान्वी रत्नालीकर, गोड आहे फार.

मोगरा फुलला मी शेवटी एक तास बघितला झी युवावर, ते नाटक रीहर्सल वगैरे होती तेव्हापासून. चांगला वाटला. पण आधीचं काहीच बघितलं नाही, आता मुद्दाम बघेन असंही नाही.

लिपस्टीक अंडर बुरखा पाहिला.
परंपरा, धार्मिक, सामाजिक बंधनांत अडकलेल्या, स्वतंत्र मते असण्याची, इच्छा न मारता जगण्याची स्वप्ने बघणार्‍या चार स्त्रिया इ.विषय तसा जुना नाही. चांगला मांडलाय . पण शेवट मला तरी आशादायक/ पॉझिटीव्ह आवडला असता.
कॉलेजकन्येने बुरखा झुगारुन आवडीचे कपडे घालणे किंवा गाण्याचा छंद जोपासणे/त्यात करीयर करणे (कुटुंबियांना सक्सेसफुली समजावून), लग्नाआधीचा प्रियकर असलेल्या, दुसर्याशी ठरलेले लग्न मोडलेल्या मुलीने दोघांना विसरुन नव्याने आयुष्य जगण्याचे पाऊल उचलणे, मॅरीड मुलीने बेक्कार नवर्‍याला डच्चू देऊन आलेली करीयरची संधी आनंदाने स्वीकारुन ती उत्तमपणे निभावणे आणि आजीच्या वयाच्या एकट्या स्त्रीने स्वतःच्या गरजा ओळखून त्यानुसार निर्णय घेणे/पुनर्विवाह करणे असं काहीतरी हवं होतं.
त्याऐवजी शेवटी चौघी मिळून फक्त सिगरेट फुंकताना दाखवल्यात. पुढे काय केलं तेच तर महत्त्वाचं आहे आणि ते कळतच नाही.

Pages