चित्रपट कसा वाटला - ३

Submitted by टीना on 11 April, 2017 - 16:44

या आधीचा धागा : http://www.maayboli.com/node/48143
हिंदी/मराठी/इंग्रजी चित्रपट कसा वाटला याबद्दलचे हितगुज.
आधीच्या धाग्यावर प्रतिसादांनी २००० चा टप्पा ओलांडल्यामुळे हा नवा धागा यापुढील चर्चेसाठी..

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मोग्रा फुलला छान आहे. सगळ्यांची कामे छान आहेत पण कोण कोणाचे काय लागते ते कळलेच नाही. इतके मोठे कुटुंब आहे तरी आई एका मुलासाठी इतकी हळवी आहे हे पटत नाही तरी त्याचे कारण मात्र दिलेले आहे. सुनिलची कुतरओढ स्वप्नीलने चांगली दाखवली आहे. मराठी अनेक ठिकाणी चुकीचं आहे विशेषतः शिवांगीचं. काय हा गहाळपणा हा कुठला वाक्प्रचार आहे. एकदा बघण्यासारखा आहे.

राज, Lol
आधी लिहीलं होतं काय मी या सिनेमा बद्दल? विसरले त्याबद्दल. वय झालं ना... Wink

पण कोण कोणाचे काय लागते ते कळलेच नाही. >> हो कुटुन्ब मोठच घेतलय जरा, निना कुलकर्णिला ३ मुल दाखवलियेत त्यातल्या दोघानी आइच्या मनाप्रमाणे लग्न केली नाहित त्यामूळे मनासारखी आयडीयल सुन आणण्याच्या नादात स्वजोच लग्न रखडलय... तिचा एक विवाहित दिर पण दाखवलाय त्याच्याबरोबर राहताना

नेटफ्लिक्सवर invisible guest बघायचा प्रयत्न केला. पण स्पॅनिश मधेच आहे. इंग्लीश सबटायटल आहेत. पण ते वाचण्यात खुपच तारांबळ उडतेय आणि चित्रपटात काय घडतेय ते बघणे राहून जातेय. त्यामुळे पास द्यावा लागेल. इंग्रजी ऑडीओ वाला कुठे आहे का?
बदलाची कथा उत्कंठावर्धक वाटली तरी तापसी पन्नूला बघणे शिक्षा वाटली.

प्राईमवर 72 Hours: Martyr Who Never Died नावाचा चित्रपट आला आहे. अतिशय उत्तम कथाबीज असतानाही माती करण्यात आपले लोक कसबी आहेत याचे अजुन एक उदाहरण.

हवालदार जसवंत सिंग रावत हे अरुणाचल मधे प्रसिद्ध नाव आहे दंतकथेसाठी. भारत चीन युद्धात गढवाल रेजिमेंटला माघारी येण्याचा आदेश दिला असतानाही जसवंत सिंग यांनी नकार दिला आणि एकट्याने मोर्चा सांभाळला. त्यांच्या मदतीला दोन स्थानिक तरूणी होत्या आणि त्यांनी विविध जागी मशिनगन्स लावून असा देखावा केला की इथे मोठ्या प्रमाणावर भारतीय सैन्य आहे. पण शेवटी दगाबाजी झाल्याने त्यांना अन्नपुरपवठा करणाऱ्याकडून चीनी सैनिकांना कळले की एकटाच सैनिक लढतो आहे. संतापलेल्या चीनने पोस्टवर हल्ला केला आणि त्या धुमश्चक्रीत जसवंत सिंग यांना वीरमरण आले. पण आपली फजीती झाल्याने चिडलेल्या सैनिकांनी त्यांचे शीर कापून नेले.

पण कालांतराने त्यांनी ते परत केले आणि जसवंत सिंग यांच्या शौर्याची कहाणी त्यांच्याकडूनच जास्त समजली. आजही तो भाग जसवंत गढ म्हणून ओळखला जातो. आणि आपले सैनिक मानतात की जसवंत सिंग चा आत्मा अजूनही त्या पोस्टवर पहारा देतो. इतकेच काय तर त्याच्या स्मारकाची देखभाल करायला पाच सैनिक तैनात असतात. ते खोलीत चादर बदलतात, चहा नाष्टा आणतात. त्यांच्या मते सकाळी चादर चुरगाळलेली असते. सैन्यखात्याच्या नुसार हवालदार रावत याला अद्याप पगार दिला जातो आणि सुट्ट्याही मंजूर होतात.

अशी ही विलक्षण कथा. पण नेहमीप्रमाणेच त्यात टिपिकल मालमसाला, गरीब बाप, आंधळी आई, भावनिक संवाद आणि अतिशयोक्त प्रसंगामुळे भिरभिरत्या पतंगासारखा चित्रपट जमिनीवर आदळतो. पण निदान या विषयावर चित्रपट करावा वाटला हेही नसे थोडके.

वेडिंग चा सिनेमा प्राईम वर पाहिला.मला तरी आवडला.मध्ये मध्ये गाणी कम कविता आहेत त्या थोड्या कमी चालल्या असत्या.पात्रं एकदम पटली. नवरा मुलगा बनलेला नट क्युट आहे.म्हणजे दाढी वगैरे असून पण डोळ्यात एक लहान मूल वाला भाव दिसतो.हा नट एकदम खरा वाटतो.परी बनलेली अभिनेत्री पण मस्त.मला सगळ्यांचीच कामं आवडली.मुक्ता बर्वे चांगला अभिनय करते पण नेहमी सराखाच अभिनय करते.शिवाजी साटम, मुळशी पॅटर्न वाला हिरो,अश्विनी कळसेकर,अलका कुबल, नवऱ्या मुलाचा मोठा भाऊ, बहीण सर्वानी एकदम पटेल अशी कामं केली आहेत.
सुनील बर्वे क्युट.पण वाट्याला फार काम आलेले नाही.डान्स वाला नट पण छान.भाऊ कदम कोणत्याही भूमिकेत चमकून जातात.त्यांचं वाक्य "हॅप्पी एन्ड वाला सिनेमा बघून प्रेक्षक आपल्या आयुष्यात पण हॅप्पी एन्ड होईल अशी आशा घेऊन बाहेर पडतो.म्हणून हॅप्पी एन्ड वाले पिक्चर लोकांना जास्त आवडतात" एकदम भिडलं.
एकंदर गाणी पळवून परत बघायला आवडेल.वेडिंग शूट चे सर्व सीन हहपुवा आहेत.मधले सासवड फलटण वाले पंच पण भारी.

स्पॉयलर 66 सदाशिव पेठ

स्पॉयलर 66 सदाशिव पेठ

66, सदाशिव पेठ बघायला घेतला पण पहिल्या 15 मिनिटात असा मी असामी मधला गुरुमैय्या सीन कॉपी आणि नंतर व पु काळेंची जमदग्नी जोशी वाली गोष्ट कॉपी हे पाहून बंद केला.गोष्टी म्हणून जे दोन्ही।खूप क्लिक झालं होतं पण पिक्चर मध्ये पाहताना गणित जमलं नाही.

पोस्टकार्ड बघितला प्राइमवर. तीन गोष्टी आहेत, मधली गोष्ट सगळ्यात जास्त आवडली. सई आवडली. साधी गृहिणी चांगली वठवली आहे तिने. गिरीश कुलकर्णी पण छान. भुताला बघूनही तो घाबरत नाही हे बघून मीच घाबरले. दुष्ट सावकार ही मांगलेची हातखंडा भूमिका आहे. सुबोध विश्वनाथ न वाटता सुबोधच वाटतो. मोठा स्टार झाल्याचा परिणाम म्हणून कि काय त्याला हॅट वगैरे देऊन स्टयलिश दाखवायचा प्रयत्न केला आहे पण तो प्रयत्न पूर्ण फसला आहे. राधिका आपटे शेवटी वेडी होते की काय ते काही कळलेच नाही. गोष्टी एका खेळण्याने एकात एक गुंफल्या आहेत. मस्त आहे चित्रपट. निळी (की निली) शाई गाणे खूपच छान आहे.

गेम ओव्हर - नेटफ्लिक्स वर आला आहे. अनुराग कश्यप चा सिनेमा म्हटल्यावर बघणारच होते. तापसी पन्नू ही एकच मुख्य कलाकार बाकी कुणाला काही काम नाही. हा सायको थ्रिलर आहे थोडी सुपरनॅचरल ची फोडणी असलेला. २ तरुणी, त्यांना जोडणारा समान धागा एक टॅटू पार्लर, सिरियल किलर, वगैरे. थोडक्यात काय तर कश्यप चा फोर्टे. बाकी काही लिहीत नाही. हिंसा, ग्राफिक दृष्ये झेपत नसतील तर हा सिनेमा (या दग्दर्शकाचा कोणताच Happy ) बघू नये.
कथा आणि कॉन्सेप्ट भारी आहे. मधेच जरा स्लो होतो असे वाटते पण नंतर लक्षात येते ते डीटेल्स का घेतलेत ते. शेवटचा हाफ एकदम वेगवान. अनुराग कश्यप ने डिसपॉइन्ट केले नाही.

आज झी टॉकीज वर लपाछपी नावाचा चित्रपट लागला आहे. अमानवीय, भयपट आहे. रिव्हुज बरेच चांगले आहेत.
मी प्रचंड घाबरट असल्याने मी काही पाहिला नाही. पाहायची इच्छा होती पण धाडस नाही.
ज्यांना आवडते, चालते त्यांनी पाहावा.

मिशन मंगल बघितला. रियालिटीपासून प्रचंड फारकत घेतलेला काहीच्या काही वाटला.
बाटला हाऊस मात्र चांगला वाटला.

ह्या विकांताला कोठला चित्रपट पहायचे ते ठरत नव्हते. मिशन मंगल हा चित्रपट ट्रेलर बघूनच पहावा असे वाटत नव्हते. तसेच ह्या चित्रपटातील काही सिन्स पाहून डोक्याला हात लावला होता. (उदा. तापसी पन्नू चा गाडी शिकण्याचा सिन). ज्या गोष्टींचा मंगळ मोहीमेशी संबंध नाही असे काहीतरी घुसडून उगाच कॅरेक्टर डेवलप करण्याच्या नावाखाली काहीही टाकले आहे असे वाटले होते.

बाटला हाऊस ही एक डॉक्युमेंटरी असेल असे वाटत होते म्हणून बघायची इच्छा नव्हती. पण मित्रांच्या सांगण्यावरून बाटला हाऊसलाच शेवटी गेलो. चित्रपट प्रचंड आवडला. निखिल अडवाणी यांचे दिग्दर्शक म्हणून वाचल्यावर चांगला चित्रपट पहाणार हे लक्षात आले. बाटला हाऊस येथे झालेल्या चकमकींनंतर दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलला करावा लागणारा सामना हा मुळ विषय. दिल्लीत पाच ठिकाणी बॉम्बस्फोट झाल्यानंतर काही दहशतवादी बाटला हाउस मध्ये राहात असल्याच्या संशयावरून दिल्ली पोलिसांनी त्यांच्यावर कारवाई केली. झालेल्या चकमकीत दोन दहशतवादी आणि एका प्रमुख पोलिस अधिकार्‍याचा मृत्यू झाला. एक दहशतवादी पळून जाण्यात यशस्वी झाला. यावर नंतर फार राजकारण झाले. विविध सामाजिक संघटना, राजकीय पक्ष यांनी या चकमकीला वेगळेच वळण दिले. अधिकाऱ्याचाच मृत्यू झाल्याने या प्रकरणाला पोलिसांतील अंतर्गत संघर्ष आणि हे सगळे दहशतवादी नसून निरपराध विद्यार्थी आहेत असा सूर निघू लागला. पोलिसांनी खोटे आरोपी निर्माण केले; यासाठी या विद्यार्थ्यांचा वापर केला असा त्यांच्यावर आरोप ठेवण्यात आला. त्याबद्दल चौकशीही सुरू झाली आणि काही वर्षांनंतर या प्रकरणांचा निकाल लागला. चित्रपटाच्या बर्‍याच सीनमध्ये पोलिसांचं धाडस, राजकारण, सो-काल्ड धर्मनिरिपेक्ष संघटनांचा आक्रोश, धार्मिक कट्टरता, प्रसारमाध्यम यांच्या भुमिका दाखण्यात आल्या आहेत. चित्रपटात दिग्विजय सिंह, अरविंद केजरीवाल, अमर सिंह आणि एल. के. आडवाणी यांसारख्या नेत्यांचे रिअल फुटेज वापरण्यात आलंय. (अरविंद केजरीवाल त्यावेळी (म्हणजे २००८ साली) इतका प्रसिद्ध होता? म्हणजे फुटेज देण्याइतका? हा प्रश्न मात्र मनात आला).

एक दोन प्रसंगांतला फिल्मीपणा सोडला तर चित्रपट मुळ विषयाशी धरून राहतो. तसेच चित्रपट एकदम वेगवान झाला आहे त्यामुळे कंटाळाही येत नाही. जॉन अब्राहमने त्याच्या लिमिटमध्ये एकदम व्यवस्थित काम केले आहे. उगाच कुठेही ओवरअ‍ॅक्टींग केलेली नाही. त्याचे गेले काही चित्रपट बघता उगाचच मसाला चित्रपटांच्या मागे न लागता काहीतरी चांगला विषय निवडून त्यावर तो चित्रपट बनवत आहे. माझ्यामते त्याला जमेल तेवढा तो प्रामाणिक प्रयत्न करतोय आणि बर्‍याच प्रेक्षकांनाही हे आवडतंय. मिशन मंगल एवढा बिझनेस जरी नसेल केला तरी ह्या चित्रपटाला रिस्पान्स चांगला मिळाला आहे आणि रिव्हूज्यही चांगले आहेत. बाकी सर्व कलाकारांनी त्यांच्या भुमिका व्यवस्थित निभावल्या आहेत. रवी किशनचा छोटासाच रोल आहे पण तो आपली छाप पाडून जातो.

हा चित्रपट एकदा थेटरात पैसे देऊन बघण्यासारखा निश्चित आहे. मिशन मंगल बघितला नाही हे बरे वाटले.

मस्त रिव्ह्यू योगी९००!
बातला हाऊस बद्दल फक्त चांगलंच ऐकलंय त्यामुळे नक्की बघणार आणि मिशन मंगल बद्दल फक्त वाईटच ऐकलंय त्यामुळे तो नक्कीच नाही बघणार!

मिशन मंगल आणि बाटला house दोन्ही सलग बघितले. दोन्ही सिनेमे खूपच छान आहेत. आम्ही ऑपनिग विकेंड लाच जाणार होतो मिशन मंगल ला पण, इथे टेरर अलर्ट declare केल्यामुळे घरीच बसावं लागलं.
शुक्रवारी सुट्टी आल्यामुळे गुरूवारी मिशन मंगल ला जाता आलं. नवरा बरोबर आला होता पण त्याला आणि मला खात्री होती की तो झोपणार आहे. मुलगा आई ओढूनच नेते म्हणून निरुपायांनी हिंदी चित्रपटाला आला होता. सिनेमा सुरु झाल्यावर दोघांनी enjoy केलाय. मी तर enjoy करणार मला माहीतच होतं Happy नवऱ्याने न-झोपता पूर्ण सिनेमा पाहिला. मुलगा fan झालाय मिशन मंगल चा. दिवसभर ओम मंगलम, मिशन मंगलम non-stop जप चाललाय. Youtube वर त्याला ते बॅकग्राऊंड गाणं मिळत नाहीये. परत ऐकायला. आता आम्ही hotstar वर यायची वाट बघतोय Happy मिशन मंगल चे संवाद एकदम खुसखुशीत आहेत, अमेरिकन sitcom चे असतात तश्या type. एकदम तेवढा excellence नाहीये पण डेफिनेटली baby-स्टेप्स! फॉक्सनी बहुतेक वेगळे writers hire करून संवाद लेखन करून घेतलंय. टीपीकल हिंदी movie नाही वाटत संवादामुळे. विद्या बालन नी अक्षयकुमार पेक्षा जास्त छान काम केलंय. अक्षय कुमार फिल्मी वाटत होता.
Spoiler अलर्ट (खाली )
बाटला house एकदम सिरीयस सिनेमा आहे. सुन्न झाले. मला काही ही केस आठवत नाहीये. जॉन निजामपूर ला जाऊन गुन्हेगाराला पकडतो आणि जमाव ज्या प्रकारे सोडवून नेतो ते हादरवून टाकणारे होते. पोलीस बाटला हाऊस वर कारवाई करत असताना तिकडे मशिदीतून लाऊड speaker वरून पोलिसविरोधी जनमत तयार केलं जातं होतं, ते बघायला एकदम horrifying. जॉन च कोर्टतील जबानी एकदम छान आहे.
Spoiler संपला Happy
दोन्ही सिनेमे बघून भारतात (चांगलं) काम करणारे लोकं अक्षरशः मूर्खांसारखं कसं बरं चांगलं काम करू शकत असतील असं वाटलं! कुठून positivity आणत असतील असं वाटत राहिलं.

मैत्रेयि गेम ओव्हर मध्ये सुपर नॅचरल नाही नाही आहे.अक्खा सेकंड हाल्फ फक्त तिच्या डोक्यातला गेम आहे जी ती डिझाईन करत आहे.

>>स्मिता तांबे नि मस्त काम केले आहे.<<
मला स्मिता तांबे हि मुक्ता बर्वे, अमृता सुभाष यांच्या सारखीच ओवररेटेड वाटते. ओढुन-ताणुन आणलेला गांभिर्याचा अविर्भाव अगदिच विनोदी वाटतो. याउलट, लपाछपी मधली पूजा सावंत शतपटिने चांगली आहे. अभिनयात सहजता कशी आणावी हे होतकरुंनी तीच्याकडुन शिकावं...

सावट कंटाळवाणा वाटला. स्मिता तांबे वाईट नाही पण फारशी आवडलीही नाही (निदान यात तरी). आवाज चांगला आहे तिचा. शेवटचे दृश्य पाहुन चर्र झाले. पण कोण करते ते? ज्याकडुन हे केले गेले त्याशक्तीला हरवणे अशक्य का नव्हते असे वाटुन गेले. (रहस्यभेद न करता लिहायाचा प्रयत्न केलाय)

सुनिधी गूगल करा- असे बरेच किस्से झालेले आहेत अक्ख्या जगात. कदाचित सुरुवातीला प्रयत्न केले गेले असतील नंतर गिव्ह अप केले असावे.

शक्य आहे.

असे किस्से झालेले मात्र वाचले आहेत.

मिशन मंगल बघितला. रियालिटीपासून प्रचंड फारकत घेतलेला काहीच्या काही वाटला.
बाटला हाऊस मात्र चांगला वाटला. >>> + १२३

Pages