चित्रपट कसा वाटला - ३

Submitted by टीना on 11 April, 2017 - 16:44

या आधीचा धागा : http://www.maayboli.com/node/48143
हिंदी/मराठी/इंग्रजी चित्रपट कसा वाटला याबद्दलचे हितगुज.
आधीच्या धाग्यावर प्रतिसादांनी २००० चा टप्पा ओलांडल्यामुळे हा नवा धागा यापुढील चर्चेसाठी..

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

>>>काय? कितीजणांना हे नाव तरी माहीत आहे का ते आधी विचारा...<<
ज्यां थोड्याफार लोकांन माहितीय, त्यांनीच ओवरहाईप्ड केलीय असे आहे ते.
——
ती मला करीनाची बहिण वाटते अभिनयाच्या बाबतीत.

मी काही फॅन नाही, पण सई अगदी टाकाऊ नाही. फक्त ग्लॅमरस रोल न करता बरेच वेगवेगळे रोल करते की. रादर ग्लॅमरस रोल मधेच ती आवडत नाही. सामान्य मुलगी किंवा बायको/आई अशा रोल्समध्ये आवडली. अर्थात असे खूप काही मुव्हीज आठवत नाहीत. पण नुकत्याच पाहिलेल्या 'पोस्टकार्ड' मध्ये छोट्याशा रोलमध्ये बरी होती. तरीही मी फॅन नाहीच Proud

सई ताम्हणकरचं अभिनयासाठी कौतुक झालेलं पाहिलं नाहीए. त्यामुळे ती अभिनयासाठी तरी ओव्हरहाइप्ड नाही.

मीरा म्हणतात तसे रोल बालक पालक आणि हिंदी हंटरमध्ये होते.

आम्ही सेकंड-थर्ड इअरला होतो तेव्हा या सईबाईने पुण्यात मयूर कॉलोनीत रात्री दारू पिऊन नग्न होऊन धिंगाणा घातला होता. आमच्या एका मित्राचा मित्र मयूर कॉलोनीतील त्याच सोसायटीत राहायचा त्याने हा सगळा प्रकार कॅमेऱ्यात शूट केला होता. तोच काय आख्खी सोसायटी हा प्रकार रस घेऊन बघत होती. नंतर उशिरा पोलीस आले. विशेष म्हणजे हे झालं त्यावेळीच ती सकाळ का लोकसत्ताला तीच ललित सदर लिहीत होती. ते सगळे विडिओ पाहिल्यानंतर जेव्हाजेव्हा ती कुठे बोलबच्चन टाकत असते लै हसू फुटत. Proud

>>सई ताम्हणकरचं अभिनयासाठी कौतुक झालेलं पाहिलं नाहीए. त्यामुळे ती अभिनयासाठी तरी ओव्हरहाइप्ड नाही.<<
मी दिसणं आणि अभिनयाच्या बाबतीत तारीफ करणारे एकलेत्/पाहिलेत. असो.

सई ताम्हणकर ला पहिल्यांदा अनुबंध मालिकेत पाहिलं होतं. विषय, सादरीकरण आणि तिचा अभिनय या सगळ्याच गोष्टी त्या मालिकेत आवडल्या होत्या.
त्यानंतर ती फारशी आवडली नाही.. अपवाद 'जाउंद्या ना बाळासाहेब' आणि 'वजनदार'.
या सगळ्या भूमिकांमधलं साम्य म्हणजे ती डिग्लॅम लुक मधे होती आणि सगळ्यांमधलं तिचं पात्र रियॅलॅस्टिक होतं !

आम्ही सेकंड-थर्ड इअरला होतो तेव्हा या सईबाईने >>>>

म्हणजे या गोष्टीला काही वर्षे तरी नक्कीच लोटली असावीत.

पार्टीत दारू जास्त प्यायली गेली व धिंगाणा घातला गेला असे कोणाकडून आजवर झाले नाहीच का? गलथानपणा म्हणा किंवा अजून काही, एखाद्याच्या हातून काही चूक घडली तर आपण ती चूक कायम लक्षात ठेवून त्या माणसाची परीक्षा त्याच चुकीवरून करणार का? असो.

वायझेड चित्रपटातील सईचे काम मला आवडले होते. तो चित्रपटही खूप सुंदर आहे.

मी तिच्या कामाबद्दल काहीच मत व्यक्त केलं नाहीये. पार्टीत दारू पिऊन धिंगाणा घालणं वेगळं आणि आपण ज्या बिल्डिंग मध्ये राहतो तिथं रात्री लोक झोपल्यावर बाहेर येउन नागडं होऊन शिव्या देत धिंगाणा घालणं वेगळं. मी आपली एक गमतीशीर आठवण सांगितली फक्त.

नशीबवान बघितला टीव्हीवर. चांगला वाटला. नोटाबंदीचा चांगला उपयोग करून घेतला आहे. आम्ही दोघी पण सुंदर चित्रपट आहे. प्रिया बापट पहिल्यांदा सुसह्य वाटली. लाडात न येता पहिल्यांदा काम करताना बघितलं तिला. मुक्ता नेहेमीप्राणेच उत्तम.

जजमेंटल है क्या - अचाट, भारी सिनेमा आहे.
जरा ऑफ बीट बॉलिवूड सिनेमे आवडत असतील तर नक्की बघा.
कंगना एक नंबर! सिनेमातलं तिचं पात्र जसं त्या-त्या भूमिकेत शिरतं तशीच ती या भूमिकेत अक्षरश: शिरली आहे.
स्क्रिप्ट, कॅमेरावर्क, एडिटिंग देखील झकास.

'गर्लफ्रेंड' पाहिला ! मस्त आहे एकदम. काही गोष्टी थोड्याफार खटकतात ( तशा त्या बर्‍याच चित्रपटांत खटकतातच Proud ) पण तरी स्टोरी टेलिंग आणि अमेय वाघ- सई ताम्हनकरचा अभिनय सुंदरच ! गाण्यांचे टेकिंग एकदम फ्रेश आणि हटके.

सई ताम्हनकर आवडते, तिचा अभिनय आवडतो आणि तिच्या मुलाखती बघायलाही आवडतात. प्रिया बापटही आवडते मला Wink

कंगना एक नंबर! सिनेमातलं तिचं पात्र जसं त्या-त्या भूमिकेत शिरतं तशीच ती या भूमिकेत अक्षरश: शिरली आहे.>>>> मला तर वाटतं की कंगनाला समोर ठेउनच अशा भुमिका लिहिल्या जातात की काय

गावात दाखवायला आणतोय म्हणुन विचारुन घेतले. >>> पुर्वी गावात मैदानावर पडद्यावर सिनेमा दाखवायचे तसं चित्र क्षणभर नजरेसमोर आलं. Proud

गर्लफ्रेंड पाहून माझी भयंकर चिडचिड झाली अगो! Lol संवाद टुकार आहेत. सिनेमा खूप चांगला होऊ शकला असता, पण संधी घालवली सिधयेंनी. पहिला हाफ एकदम मस्त आहे, दुसरा मात्र टोटल क्लिशे. अतार्किक होतो नंतर सिनेमा. सईचं काम मात्र आवडलं.

काल अ‍ॅमॅझॉन प्राईमवर 'भारत' पाहिला! किती चांगले रिव्ह्युज आले होते या सिनेमाचे! सगळेच्या सगळे पेड असतात यावर आता शिक्कामोर्तबच झालं! एखादा सिनेमा बाळबोध म्हणजे किती असावा! तशी सिनेमांच्या बाबतीत आमची सहनशक्ती बरीच आहे, तरीही अनेकदा 'हा बंद करूया, या पेक्षा रेस ३ सुद्धा चांगला होता' असं म्हणालो, यातच काय ते आलं! Lol

मिशन मंगल मराठी डब करायला मनसेने केलेला विरोध पटला नाही.

म्हणे पूर्ण चित्रीकरण मराठीतच करा. डब नको,

बरे झाले ज्ञानेशवरी आधीच लिहून झाली, नैतर सगळे महाभारत मराठीत पुन्हा घडवा म्हणून बोलले असते.

बरे झाले ज्ञानेशवरी आधीच लिहून झाली, नैतर सगळे महाभारत मराठीत पुन्हा घडवा म्हणून बोलले असते. > Biggrin

अर्र पूनम Lol मला तर पहिल्यापेक्षा सेकंड हाफच आवडला Wink
चित्रपट अजून चांगला होऊ शकला असता ह्याला अनुमोदन. विशेषतः शेवट जरा अजून वेगळ्या पद्धतीने यायला हवा होता ( म्हणजे जो आहे तोच पण त्याची ट्रीटमेंट ) अशी माझी अपेक्षा होती पण ठीक आहे... पैसे वसूल तर नक्की वाटला !
ट्रेलर बघून मला वाटत होतं की सई बहुतेक figment of his imagination आहे की काय. तसं असलं तर बघण्यात अजिबात इंटरेस्ट नव्हता. पण नंतर बुकमायशोवरच्या व्ह्युअर्स कमेंट्स बेताबेताने ( म्हणजे कथा कळणार नाही अशा पद्धतीने वरवर ) वाचताना असं नसावं असं वाटलं म्हणून मग गेले पाहायला.

श्री... Happy
रविवारी येतोय एकदाचा.

स्पॉईलर अलर्ट!!!!

गर्लफ्रेंड - बेकार मूवी. पहिली जेमतेम २० मिनिटे बरा असेल. सईचे पात्र , तिचे असे वागयचे कारण काहीच कळले नाही( मग कशाला उगाच दाखवता असे सीन्स? आम्ही उगाच तर्क लावत बसलो). नायकाचे प्रॉबलेम्स असे काय होते गर्लफ्रेंड नसल्याने हे काहीच नीटसे नाही. ते असे प्रसंग नीट हाताळले असते तर विनोदी झाले असते. उगाच ऑफीसमध्ये बॉस चँलेज देतो म्हणून फायनली ट्रिगर दाखवलाय. नायिकेचे उगाच गूढ वागणं दाखवायचा जो प्रयत्न होता, फारच फसला.
सई फारच खप्पड आणि म्हातारी दिसते. बर्‍याच त्रुटी आहेत ज्या टाळता येण्यासारख्या आहेत.
शेवट तर कायच्याकाय होता. अगदी पांचट.

जजमेंटल है क्या?- सुरुवातीची मिनिटे सुसह्य होती. मग चित्रपट अगदीच अपेक्षित वळणं घेवून संपवला. शेवट तर आधीच कळतो.
राजकुमार रावला काहीच फारसे काम न्हवते. दुसरा कोणीही टपोरी चालला असता. कारण त्याचेहेही पात्र ( नायकाचे) खुलवले नाहीये व नक्की काय प्रयत्न आहे असे पात्र घुसडण्याचा काहीच नाही. बरं, कंगना हिचे पात्र ह्यावर फोकस ठेवायचे तर ते काही नीट येत नाही.
आता, ह्यात कंगना जशी दिसावी तशी दिसते. मला उगाच तिचे खाण्या पिण्याचे प्रश्ण पडलेले ती परदेशात दाखवलेली असताना. जर सुरुवातीचा भाग( लहानपणी झालेले भावनिक व मानसिक आघात ) विचारात घेतला व ठेवला तरच चित्रपट सटलपणे काय सुचित करतो हे कळू शकते प्रेक्षकांना. आमच्यासारखे कीस पाडणारे असल्यानं ते त्यांनाच कळते, बरेच जण थ्रीलर कॉमेडी समजून बाहेर पडले थेटरातून.
बाकी, इतका महत्वाचा विषय होता तर ना ते ही धड ना थ्रिल्लर हि धड अश्या परीस्थितीत चित्रपट संपतो.

मिशन मंगळ ट्रेलर मध्ये सोनाली सिन्हा पाहूनच मजा वाटली. त्यात ती नासात. एका सीन्स मध्ये चेहर्‍यावर मक्ख भाव ठेवून ती जे बोलते ते पाहून मला एकदम रडायला आले. ;).
अक्षयकुमार एकाच धाटणीत बोलतो, एकदमच बोर वाटते अश्या चित्रपटात.

मोगरा फुलला! सरधोपट कथा आहे , काहिच नविन नाही तरी एकदा पाहायला आवडला, माझा मुलगा/मुलगी खुप भारी म्हणून भर्पुर /अवाजवी (काहिवेळेस अवास्तव )अपेक्षा ठेवुन वर /वधु शोधणार्या आया भरपुर आहेत पाहण्यात त्यामूले सिनेमाचा फोकस तोच आहे का हे वाटत असताना तो किन्चित का होइना बदलतो.
सगळ्यात आवडल तर काय स्वप्निलच बदलेला चेहरा-मोहरा, अभिनयात पण त्याने प्रयत्न पुर्वक चान्गले बदल केलेत, मधे मधे सन्जय जाधव च्या कारखान्यातुन शाखाची वाईट कॉपी( आधिच शाखा ओव्हरॅकिटिन्ग ))असेलेले अनेक मुव्हिज त्याने केले ते अर्थातह सुमारच वाटलेले.
यात मात्र त्याने छान काम केलेय.
हिरॉइन कोण आहे ते माहित नाही पण छान दिसलिय, वावरलिये . मुळ मराठी नाही अस अ‍ॅक्सेन्ट वरुन वाटत पण छान टपोरे डोळे, डस्की पण बोलका चेहरा, अभिनय पण ठिकठाकच आहे.
चन्दु कुलकर्णी, निना कुलकर्णी वैगरे तर काय कसलेले मन्डली ती योग्य ते काम चोख बजावतात.

प्राजक्ता +१
मोगरा फुलला एकदा बघायला मस्त आहे. सर्वांची कामं छान आहेत.

सगळ्यात आवडल तर काय स्वप्निलच बदलेला चेहरा-मोहरा, अभिनयात पण त्याने प्रयत्न पुर्वक चान्गले बदल केलेत >>>>>>> स्वप्नीलच्या गेटअपमध्ये रब ने बना दी जोडीच्या शाखाची कॉपी होती अस मला वाटतय.

हिरॉइन कोण आहे ते माहित नाही पण छान दिसलिय, वावरलिये . >>>>>>>> सई देवधर. श्रावणी देवधरची मुलगी. हिन्दी सिरियल्समध्ये काम करते.

Pages