चित्रपट कसा वाटला - ३

Submitted by टीना on 11 April, 2017 - 16:44

या आधीचा धागा : http://www.maayboli.com/node/48143
हिंदी/मराठी/इंग्रजी चित्रपट कसा वाटला याबद्दलचे हितगुज.
आधीच्या धाग्यावर प्रतिसादांनी २००० चा टप्पा ओलांडल्यामुळे हा नवा धागा यापुढील चर्चेसाठी..

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अहो भारताची चिंता करण्याचा मक्ता मोदी-गांधी आणि त्यांच्या अनुयायांना दिला आहे ना. मी आपला माझ्या करमणुकीचा, आणि एखादी कथा मला का नि कशी आवडली याचा विचार करतो आहे. Proud

सॉरी फॉर बॅडजोक अंजली, पण पुन्हापुन्हा तोच मुद्दा येतो आहे.
ज्या समाजाला सुधारण्याचा किंवा सावरण्याचा ठेका फिक्शनल कॅरेक्टर्सनी घ्यावा अशी अपेक्षा व्यक्त होते, त्या समाजाबद्दल काय बोलावं हे मला कळत नाही. अशी अपेक्षा व्यक्त करणार्‍यांना काय उत्तर द्यावं हेही कळत नाही.

तुम्ही मांडला तो मुद्दा अनेक वेळा मीही मांडला आहे. पण तुम्ही पडद्यावरच्या / कथेतल्या कॅरेक्टर्सबद्दल बोलत आहात, आणि मी ती पडद्यावर साकारण्यार्‍या स्टार्सबद्दल बोलतो आहे - असा फरक आहे. समाज सुधारण्याचा मक्ता कथेतल्या आभासी पात्रांनी नव्हे, तर या लार्जर दॅन लाईफ इमेज असलेल्या नेत्या-अभिनेत्या-स्टार्स-खेळाडूंनी घ्यावा. कारण त्यांनी काहीही केलं तरी त्याची बातमी होते, यांचे फॉलोअर्स प्रचंड संख्येने असतात, ते करतील ते त्यांना आदर्श असतं. म्हणूनच पडद्यावर काहीही केलं, तरी बच्चनसाहेबांनी सिद्धिविनायकाला अनवाणी चालत जाण्याचा फार्स जाहीरपणे करू नये. तेंदूलकरने सत्यसाईबाबांच्या जाहीरपणे भजनी लागू नये. आतंरराष्ट्रीय इमेज असलेल्या क्रिकेटपटूंनी मैदानात जाहीरपणे बॅटने मारामारी करू नये. सलमानने दारू पिऊन फूटपाथवर माणसांना चिरडू नये. संजय दत्ताचं ड्रग्ज घेणं आणि गुंडगिरी करणं याचं जाहीरपणे ग्लोरिफिकेशन होऊ नये. भल्यामोठ्या देशाच्या पंत्प्रधानाने 'प्लास्टिक सर्जरीने गणपतीचा जन्म झाला' असं जाहीरपणे बोलू नये. इतकंच काय, पण मुख्यमंत्र्यांनी 'माझा गणपती दुध पितो असं मूर्ख स्टेटमेंट जाहीरपणे करू नये आणि शिवाय दरवर्षी विठ्ठलाकडे पाठ करून फोटो काढवून घेऊन पेपरांत छापू नये. हे सारं कितीही मागे जाऊन इंटेग्रेट करता येईल, पण आता थांबतो. विषयांतर ऑलरेडीच केलं मी..

कथेवर आणि कथेतल्या पात्रांवर प्रेम करणार्‍यांनी समाज, संदेश, संस्कार, अस्मिता, संस्कृती हे विषय मध्ये आणू नयेत. तो कथेवर आणि त्या पात्रांवर अन्याय आहे. आपण कसेही वागणार, पण फिक्शनल पात्रांनी आदर्श वागलं पाहिजे? वा रे वा रे वा!!

कबीर सिंगमधली toxic masculinity 'कुंबलगी नाईट्स' या मल्याळी सिनेमातही थोडीफार आहे. मात्र ही masculinity 'कुंबलगी नाईट्स'मध्ये फार वेगळ्या पद्धतीनं आणि चांगली हाताळली आहे. नेटफ्लिक्सवर आहे. जरूर बघा.

मी कबीर सिंग पाहिलेला नाही, मात्र चित्रपटाच्या दिग्दर्शकाची विविध मुलाखतींमधली मतं अत्यंत प्रतिगामी आणि हिंसक आहेत. त्यांचा निषेध व्हायलाच हवा.

हो अगदी बरोबर. म्हणून दिग्दर्शकाबद्दल चकार शब्द काढला नाही. स्वतःला कितीही बंडखोर समजत असला तरीही मुलाखतींत जाहीरपणे असं बोलणं बरोबर नाही. माझा सिनेमा आणि कथा बघून इंटरप्रिट करा, तुम्हीच ठरवा असं बोलणं जास्त संयुक्तिक असलं असतं..

मी खरे फ्युडल मानसिकतेचे रेड्डी व्यक्तीमत्वे फार जवळून अनुभवली आहेत. ती एंटायटल मेंट, माज बघून मन चरकते.
कथे सा ठी कथा बघा, मनोरंजनच आहे फक्त आदर्श वादि का बरे असावे पात्रांनी हे सर्व एका जागी बरोबर आहे. पण त्या बायस पुढे जाउन जे खर
जीवन आहे त्यात किती व्यक्तिमत्वे मुळापासून उध्वस्त होतात. त्यांच्या दृष्टिकोणातून बघितली ही "कथा" तर त्यांना पुंनःप्रत्ययाचा आसुरी आनंद देउन जाईल. हेच अभिप्रेत आहे. स्त्री म्हणजे पुरु षांची प्रॉपर्टी( चॅटेल) व तो १००% मालक ही वैश्विक मानसिकताच जर ठासून कथा व कल्चर मधून पु ढे न्याय ची असेल तर काय बोलणार . एंजॉय.

साजिरा , माझा मुद्दा मांडून झाला आहे. भारतातला सिनेमाचा प्रेक्षकवर्ग तू मांडलेलं गृहितक समजण्याएवढा प्रगल्भ आहे का? सिनेमा हे फिक्शन आहे हे त्याला 'कळतं' का? सिनेमातल्या पात्रानं समाज बदलावा ही अपेक्षा नाहीये, तर त्या पात्रांना प्रेक्षक आदर्श मानून त्यांचं वागणं खरं मानून त्याप्रमाणे अनुकरण करतात. कितीही नाकारलं तरी मिडीयाचा प्रभाव भारतात नको तितका आहे. तुझा 'दिग्दर्शका बद्दल चकार शब्द काढला नाही' हे वाक्य पण अनाकालनिय आहे. असो.
आणि हो, इट वॉज अ बॅड जोक. :|

भारतातला सिनेमाचा प्रेक्षकवर्ग तू मांडलेलं गृहितक समजण्याएवढा प्रगल्भ आहे का? सिनेमा हे फिक्शन आहे हे त्याला 'कळतं' का? >>> आवरा! कायच्या काय! फर्स्ट वर्ल्ड कंट्रीत पिढ्यानपिढ्या खपलेले सुद्धा भारतीयांना किंवा कुठल्याही समाजाला एवढे राईट-ऑफ करणार नाहीत.

साजिर्‍या,
तुला जर दिग्दर्शकाची चित्रपटाबद्दलची मतं गैर वाटतात, त्यामागची संकल्पना गैर वाटते, तर चित्रपट योग्य कसा?

टीप - मी चित्रपट पाहिलेला नाही.

साजिरा यांच्याशी सहमत. एवढं अनुकरण झालं असतं तर किती तुकाराम आणि शिवाजी झाले असते पण नाही झाले ना. काही टुकार प्रक्षकांसाठी वर्षानुवर्षे तेच तेच बघायचं का. मला तर वाटतं की अजून वेगळे विषय यावेत आणि रूढ चौकटी पडद्यावर मोडल्या जाव्यात. वेगळ्या वाटा म्हणजे फक्तं समलैंगिक संबंध अपेक्षित नाहीत. काही प्रमाणात हे वेबसिरिज करत आहेत आणि गली बॉय सारखे चित्रपट.

अरे चित्रपट आणि दिद्दर्शक आणि कथा ही सांगड कशी कुठे घालायची हे तुझं तू ठरव की. माझं मी ठरवेन. प्रत्येकाने आपापलं ठरवावं. सिनेमा बघून मग ठरवावं की नाही हेही आपापलं आपण ठरवावं.

मुळातच दिग्दर्शकाबद्दल मी शब्दही बोललो नाही. नेहेमी आवडलेल्या चित्रपटांबद्दल बोलताना दिग्दर्शकाबद्दल बोललोच आहे. इथं नाही बोललो. कारण बोलायचंच नव्हतं. कथा हा विषय घेऊन इथला विषय सुरू झाला होता.
असो. आता आवरतं घेतो. बिकाँज इट सीम्स एंडलेस नाऊ.

रोमान पोलान्स्कीचे सिनेमे लोक बघतातच की जरी तो युएस न्यायलयात दोषी ठरलेला बलात्कारी (ते सुद्धा नाबालिक मुलीवर) असताना.

सिनेमे बघून समाज बदलत असता तर अमिताभच्या काळात रस्त्यारस्त्यावर तुडुंब मारामार्‍या झाल्या असत्या. ४०च्या दशकापासून भारतीय सिनेमात प्रणयकथा दाखवल्या जात आहेत, नायक-नायिका स्वतः आपला जोडीदार निवडत आहेत. पण प्रत्यक्ष समाजात मात्र अजूनही 'बघून' लग्न करण्याचे प्रमाण अधिक आहे.

त.टी. मी सिनेमा पाहिलेला नाही.

सिनेमा असो वा क्रीकेट पडद्यावर दिसणार्‍या आवडत्या नायकाचे अनुकरण करणे फार कॉमन आहे भारतात.>>>
मग नायकासारखे आदर्श स्त्रीचे दुसर्‍याशी प्रेम होते म्हणुन तिला पहिल्या रात्री सुद्धा हात न लावणारे, तिच्या पहिल्या प्रियकराकाडे घेवून जाणारे नवरे/हिरो दिसायला हवेत . Happy जे सोप आहे करायला त्याचच अनुकरन होत. फँटसीच कुठुनतरी सगळ्यांनाच आकर्षण आहे. भारतीय वगैरेशी प्रगल्भतेशी त्याचा काही संबध नाही. फँटसी पुर्ण झाल्यावर जितका 'हाय' (ड्र्ग अ‍ॅडीकशन 'हाय') आनंद मिळतो आणि ते मिळविण्यासाठी फारसे कष्ट करावे लागत नाहीत ते सगळ्यांना आवडत. कबीर सिंग च अनुकरन कराव अस वाटणारे असतील आणि ते अनुकरण करतील पण . पण अशी लोक मायनॉरिटी असतील. मग केवळ ती लोक अनुकरण करतील म्हणुन विषय मांडायचा नाही ?
दिग्ददर्शकाच्या मताच काही कळल नाही. मला पण नक्कीच राग आला असता पण हे म्हणजे नागनाथ मंजुळे बायकोशी नीट वागत नव्हते म्हणुन त्यांच्या सैराट पिक्चर चांगला नाही असे म्हटल्यासारखे वाटले.

साजिरा, टवणे सीमा ह्यांना अनुमोदन.

भारतीय वगैरेशी प्रगल्भतेशी त्याचा काही संबध नाही>> +1
कोट्यावधी भारतीयांच्या सामूहिक प्रगल्भते विषयी प्रश्नचिन्ह उपस्थित करणार्‍यांची स्वत:ची प्रगल्भता कुठे पाणी भरते आहे ते सुद्धा कळून घ्यायला नक्की आवडेल.
विकसित देशात बसुन दुसर्‍यांची मानसिकता जोखण्याची उचलली जीभ... सवय खचितच प्रगल्भतेचे लक्षण नाही.

टण्या,
गल्लत होतेय.
'She slapped him without a reason, at least Kabir had a reason to slap her. If you can’t slap, if you can’t touch your woman wherever you want, if you can’t kiss, I don’t see emotion there." असं दिग्दर्शक आपल्या चित्रपटाबद्दल म्हणतो. पोलंसकीने चित्रपटातल्या बलात्काराला असा पाठींबा दिला असता तर त्याचाही निषेधच केला असता. मुळात तू केलेली तुलनाच चुकीची आहे.
गली बॉयमधली आलियाही toxic आहे, तीही हिंसक आहे. पण झोया अख्तरने कुठेही तिच्या वागण्याचं, तिच्या हिंसेचं समर्थन केलेलं नाही.

इथल्या चर्चेनंतर मी अनुपमा चोप्राच्या मुलाखतीत दिग्दर्षकाला असे म्हणताना पाहिले. ते मलाही जाम खटकले. त्या वक्तव्याचा निषेध आहेच. पण इथे वर साजिरादी म्हणत आहेत की त्यामुळे चित्रपट बघणे अयोग्य कसे काय ठरते?
मला तुझा विरोध कशाला आहे ते कळत नाहिये.
समजा झोया अख्तरने गली बॉय मधल्या अलिया भटच्या व्यक्तिरेखेच्या वागण्याचे समर्थन केले असते तर तू तो सिनेमा पाहिला नसतास असे आहे का? समजा एखाद्या कादंबरीत एक अत्यंत पुरोगामी/पुरुष वर्चस्ववादी माणूस चितारला आहे, लेखक खाजगी आयुष्यात तसेच वागणारा आहे मात्र कादंबरी साहित्यिक मुल्यांच्या बाबतीत उच्च आहे तर ती वाचणे अयोग्य का? (हे उदाहरण एक समांतर उदाहरण म्हणून घेतले)

चित्रपटाची जी काही कथा आहे व त्यात हिरोचे जे काय वागणे आहे ते भारतीय लोकांना हिरोकडून अपेक्षित असे वागणे नाही. त्यांना हिरो म्हणजे चांगलाच, तो करत असलेले सगळे बरोबरच असे हवे असते किंवा वाटते. चित्रपटात हिरो स्त्रियांशी वाईट वागलाय या कारणामुळे हा चित्रपट वाईट आहे किंवा आम्हाला आवडला नाही असे काहींचे म्हणणे आहे.

यावर काहींचे उत्तर हे आहे की हिरो चांगला, व्हिलन वाईट वगैरे कल्पना आधी डोक्यातून काढा. शाहिद कपूर या हिरो म्हणवल्या गेलेल्या नटाने भूमिका केलीय म्हणून ती व्यक्तिरेखा आदर्श, चांगलीच हवी हे डोक्यातून काढून टाकून केवळ 'अशीही माणसे असतात, त्यांची गोष्ट' असे समजून चित्रपट पहा.

चिनूक्स स्पष्ट बोलला नाही पण मला वाटते की तो म्हणतोय दिग्दर्शकाच्या मुलाखतीतून त्यालाही बहुसंख्य लोकांना जसे हिरो प्रकारची व्यक्तिरेखा व उदात्तीकरण हवे असते तसेच या चित्रपटात अभिप्रेत आहे असे दिसते. त्यामुळे त्याचा चित्रपट पाहताना आपण 'अशी माणसे असतात, त्याची कथा' असा विचार करून हा चित्रपट पाहू शकत नाही. चित्रपट बनवणाऱ्याची तशी भूमिका नाही.

मी कबीर सिंग बघणार नाही. त्यापेक्षा सुपर 30 बघायचा विचार करतेय. हृतिकने भोजपुरी भाषा व टोन अचूक उचललाय पण त्याची देहबोली बघून कोई मिल गया मधला पहिला रोहित आठवतोय. त्यामुळे 50:50 मनस्थिती होतेय.

आता कोणी चित्रपटावरून प्रेरणा घेवून असं काही करण्याचा प्रयत्न करीत असतील म्हणुन हे असे चित्रपट काढु नयेत अस वाटत असेल ठिक आहे. >> हो ते तसच आहे.
सगळे अ‍ॅडल्ट आहोत. कुठून प्रेरणा घ्यायच्या आणि कुठुन नाही ह्याच भान >>>> ओह प्लिज, हे अस भान प्रत्येकाला सर्व वयात असतय का?

टण्या,
त्या दिग्दर्शकाची मतं त्याच्या चित्रपटाबद्दल आणि व्यक्तिरेखेबद्दल आहेत, मला त्याच्या खाजगी आयुष्याशी घेणेदेणे नाही. चित्रपटाबद्दल व्यक्त केलेली मतं खटकतात पण चित्रपट नाही, हे तर्काला धरून नाही.

पुन्हा एकदा-
एखादा सिनेमा म्हणजे संविधान नाही, तसंच एखाद्या.दिग्दर्शकाने एखादया मुलाखतीत बोललेलं म्हणजेही संविधान किंवा शिलालेख नाही. तो त्याचा विचार आणि परस्पेक्टिव आहे. ते तसं व्यक्त करण्याचं त्याला स्वातंत्र्य आहे. ते मला पटत नसेल तर मी त्याबद्दल बोलणार नाही. मुळात मी जेव्हा एखाद्या कथेबद्दलचं माझं परसेप्शन आणि मला 'दिसला तसा' सिनेमा याबद्दल बोलतो आहे तेव्हा त्यात दिग्दर्शकाने मुलाखतीत बोललेलं घुसडणं हेही तर्काला धरून नाही.

भारतातला सिनेमाचा प्रेक्षकवर्ग तू मांडलेलं गृहितक समजण्याएवढा प्रगल्भ आहे का? सिनेमा हे फिक्शन आहे हे त्याला 'कळतं' का? >>धन्य आहात तुम्ही.

हाब - काय आवरा???? काहीही Uhoh >> एकगठ्ठा भारतीय समाजाच्या प्रगल्भतेवर प्रश्नचिन्ह ऊमटवणारी तुमची सो-कॉल्ड प्रगल्भता आवरा असे म्हणतो आहे. तुमचे स्टेटमेंट केवढे ऑफेन्सिव होते ह्याचा तुम्हाला अजून ऊलगडा झालेला नाही आणि झाला असेल तरी तो तुम्ही मान्य करणार नाही हे माहित आहे.
तुम्ही ज्या प्रगल्भ समाजाला रिप्रेझेंट करत आहात त्याच प्रगल्भ समजात २०१२ मध्ये कोलोरॅडोतल्या ऑरोरा शहरात डार्क नाईट ह्या बॅटमॅन सिनेमाने प्रेरित होऊन अमेरिकन तरूणाने भर सिनेमा थेट्रात गोळीबार करून २४ निष्पाप लोकांना यमसदनी धाडले. सिनेमांनी प्रेरित अशी शेकड्याने रक्तरंजित ऊदाहरणे तुमच्या सो-कॉल्ड प्रगल्भ समजाची मी देऊ शकतो. प्रत्येक समाजात काही बॅड एलेमेंट्स असणारच त्यांच्यावरून संपूर्ण समाजाची वैचारिक स्थिती जोखू नये हे समजण्याला प्रगल्भता नसली तरी कॉमन सेन्स पुरेसा आहे.
२४ लोक मेले म्हणून तुमच्या प्रगल्भ समाजाने बॅट्मॅन सिनेमाचे प्रदर्शन बंद केले की बंदुका बनवणे बंद केले.

फाटक्या प्रगल्भतेचा आव आणत ऊगीच आपलं काहीही बरळायचं...

Enough HB.
You do not have to use such language with me. Read my post again. It's none of your business that which 'society' I am representing.
Typing from a phone, hence writing in English.

माझ्या पोस्ट ला उगाच भारत अमेरिका रंग देऊ नकोस. माझ्या पोस्ट मधे कुठेही समाज हा शब्द आलेला नाही. मी प्रेक्षक हा शब्द वापरला आहे.

काल एचबीओवर बहिमियन र्हॅप्सडी पाहिला. आउट्स्टँडिंग मुवि. फ्रेडी मर्क्युरी (फारुख बलसारा) चं कॅरेक्टर रामी मॅलेकने काय उभं केलं आहे. हॅट्स ऑफ! वन ऑफ दि बेस्ट बायोपिक आय हॅव वॉच्ड सो फार...

अंजली,
वाद पुढे वाढवत नाही पण एक शेवटचं सांगू ईच्छितो, मोठ्या समाजावर (बरं सिनेप्रेक्षकांवर -- किती असावेत हे प्रेक्षक? ५करोड, १०करोड, २० करोड) ऑफेन्सिव जजमेंट पास करण्याची ईच्छा तुमच्या सध्याच्या एन्टायटलमेंट मधून आलेली नाही असे तुमचे म्हणणे असेल तर तुमच्याच पोस्टी ही एन्टायटलमेंट बाजूला ठेऊन पुन्हा वाचून बघा.
आणि हो It wasn't a bad joke he was being modest.

राज, सहमत. काल रात्री पाहिला. अतिशय सुंदर मुव्ही. एकदा पहावाच असा नक्की आहे. मला अतिशय आवडलेलं बायोपिक.

आज दुपारी मराठी सिनेमा 'बोगदा' पाहिला. आवडला, पण काही तरी निसटल्याची चुटपुट लागून राहिली. पटकथा थोडी अजून मजबूत हवी होती. सुहास जोशी आणि मृण्मयी देशपांडेचा अभिनय छान. मृण्मयी थोडी मोनोटोनस वाटायला लागली आहे, पण तरी या भूमिकेसाठी ठीक. सिनेमात कोकणची पार्श्वभूमी आहे, त्यामुळे सुंदर रस्ते, सुंदर हिरवा रंग, एक मस्त विहीर आहे. आई मुलीच्या प्रवासातलं कोकण पण बघत रहावं असं आहे.

हाब, तुझ्या 'बरळणे , एन्लायटमेंट, ऑफेन्सिव जजमेंट वगैरे शब्दांमुळे मला खरंच लिहायची इच्छा नाही. तू तुला वाटेल तो अर्थ माझ्या पोस्टसचा काढू शकतोस. इथून पुढे तुझ्याशी निदान या विषयावर तरी मी बोलणार नाही.

राज,
अगदी सहमत. फार सुरेख सिनेमा आहे.

सॉल्ट, फॅट, अ‍ॅसिड, हीट नावाची मालिका पण छान आहे. कूक्ड नावाची मायकल पोलनची मालिका देखिल चांगली आहे.

हाब, तुझ्या 'बरळणे , एन्लायटमेंट, ऑफेन्सिव जजमेंट वगैरे शब्दांमुळे मला खरंच लिहायची इच्छा नाही. >>माझ्या शब्दात तुम्हाला अपेक्षित असलेली वैचारिक प्रगल्भता दिसली नसल्याने असं झालं असेल.
Lol हरकत नाही... चालायचंच..

Pages