चित्रपट कसा वाटला - ३

Submitted by टीना on 11 April, 2017 - 16:44

या आधीचा धागा : http://www.maayboli.com/node/48143
हिंदी/मराठी/इंग्रजी चित्रपट कसा वाटला याबद्दलचे हितगुज.
आधीच्या धाग्यावर प्रतिसादांनी २००० चा टप्पा ओलांडल्यामुळे हा नवा धागा यापुढील चर्चेसाठी..

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

कागर बघितला.
बोर वाटला.
रिंकू राजगुरू तर सैराट स्टाईल ऍक्टिंग करत होती.
सैराट +पॉलिटिकल drama असं काहीतरी बन वलयं. गाणी काही
विशेष वाटली नाही.
एकंदरीत भट्टी जमली नाही.

इंटरनेट वर अमाप प्रसिद्धी मिळालेल्या ‘राणु मोंडाल‘ यांचे रेशमैय्याच्या सिनेमातले गाणे (झलक) युट्युबवर ऐकले नसल्यास ऐका. अत्यंत सुंदर , पवित्र आवाज. बंगालमधे रस्त्यावर, रेल्वे स्टेशनवर गाणे गाऊन कशीबशी गुजराण करणारी ही स्त्री. आज सगळीकडुन गायला बोलावणी येत आहेत.

निखिल अडवाणी यांचे दिग्दर्शक म्हणून वाचल्यावर चांगला चित्रपट पहाणार हे लक्षात आले.
>>
आयायाया...

आता चांदनी चौक टू चायना, पतियला हाऊस, हीरो (सूरज पांचोली वाला), कट्टी बट्टी पण बघा...

निखिल अडवाणी यांचे दिग्दर्शक म्हणून वाचल्यावर चांगला चित्रपट पहाणार हे लक्षात आले.
>>
आयायाया...

आता चांदनी चौक टू चायना, पतियला हाऊस, हीरो (सूरज पांचोली वाला), कट्टी बट्टी पण बघा...

>>>>

इतका फालतू सिनेमा आहे तो बाटला हाऊस. काहिही धड नाहीये. ती पोलीस टीम यूपीच्या एका गावात जाऊन धाड काय टाकते, पोलीस डीएसपी न्यायालयात भाषण ठोकतो आणि त्याची टीम टाळ्या काय वाजवते, कॉमिकल विरोधी पक्षाचे वकील, मूळव्याध झाल्याचे भाव चेहऱ्यावर ठेवून वावरणारा हिरो, वृत्तवाहिनीत बातम्या सांगणारी (निवेदक) आधुनिक सुशिक्षित बायको नवऱ्यासमोर एकदम 'आप, संजयजी' असे म्हणत जयश्री गडकर भाव तोंडावर ठेवून काय वावरते, एकुणात फालतूपणाचा कळस आहे

आता चांदनी चौक टू चायना, पतियला हाऊस, हीरो (सूरज पांचोली वाला), कट्टी बट्टी पण बघा...
हा हा... बरोबर आहे तुमचे अँकी नं. हे चित्रपट फालतूच होते त्याचे. पण कल हो ना हो, सलाम ए इश्क मुळे मला याचे डायरेक्शन आवडते.

टवणे सर - तुमच्या भावना पोचल्या. थोडाफार फिल्मी पणा आहे. तो जर ठेवला नाहीतर डॉक्युमेंटरी होईल. बाकी कोर्टात टाळ्या वाजवल्या यात काही गैर वाटले नाही.

थोडाफार फिल्मी पणा आहे. तो जर ठेवला नाहीतर डॉक्युमेंटरी होईल >>> असंच काहीसं मिशन मंगल पाहताना पण डोक्यात ठेवलं होतं त्यामुळे तो पिक्चर आवडला. पिक्चर म्हणूनच पाहिला तर चांगला वाटतो.

सावट कालच पाहिला. चांगला आहे. बर्‍यापैकी वेगवान आहे. शेवट प्रेडिक्टेबल आहे थोडासा पण तरी बघताना थोडं धस्स झालंच.

टवणे सर - तुमच्या भावना पोचल्या. थोडाफार फिल्मी पणा आहे. तो जर ठेवला नाहीतर डॉक्युमेंटरी होईल. बाकी कोर्टात टाळ्या वाजवल्या यात काही गैर वाटले नाही.>>योगी टवणे सरांचा IQ हाय आहे. त्या दर्जाचा सिनेमा काढणे निखिल अडवाणीला शक्य नाही Happy

योगी टवणे सरांचा IQ हाय आहे.>>>
हाय खाल्लेला या शब्दप्रयोगातला 'हाय' का? Happy

बाकी >> बाकी कोर्टात टाळ्या वाजवल्या यात काही गैर वाटले नाही. >>> यात गैर वाटत नसेल काही तर मग तुम्हाला सबूत मद्देनजर रखते हुए बाइज्जत बरी (इंग्लिशमधले) करायला हवे

मिशन मंगल आवडला.हे सगळे चक दे इंडिया वर्गवारी मधले टीम बिल्डिंग पिक्चर असेच असतात.टीम बनवण्यात अडचणी, एका ठराविक प्रसंगामुळे टीम चे मोटिव्हेशन वाढणे,शेवटी अकस्मात अडचण येणे आणि सर्व आशा संपली वाटत असताना सर्व नीट होणे.मजा येते असे पिक्चर पाहायला.कार ड्रायव्हिंग शिकतानाचा सीन उगीच घातलेला वाटला.शर्मन जोशी चे कॅरेक्टर राजू रस्तोगी ला जनता स्टिरिओटाईप करेल असे वाटले.तो चांगला कलाकार आहे.त्याला वेगवेगळ्या भूमिका मिळायला हव्यात.दलिप ताहील ने असेंट(मला जोडाक्षर लिहिता आलं नाही) मस्त केलाय.
कुरळे केस वाली साऊथ इंडियन अभिनेत्री क्युट आहे.विद्या बालन नेहमी प्रमाणेच छान करते काम.त्या ए आर रहमान प्रभावीत मुलाने पुढे काय केलं दाखवायला हवं होतं.

' Uyare' मल्लू movie subtitles सकट बघितला(Netflix).छान आहे. स्टोरीलाइन पासून अजिबात इकडे-तिकडे सरकलेला नाही. हिरोईन आवडली. एकदा बघायला पाहिजे. ऍसिड अटॅक victim movie आहे. पण कुठेही अति केलेले नाही.

मला वाटलंच होतं ही हिरोईन करीब करीब सिंगल मध्ये होती, पण त्यात ती किती मोठी दिसत होती, ह्या मध्ये लहान दिसते आहे.

काल इथेच वाचून सावट पहिला, चांगला वाटला. पण मला एक कळलं नाही की इथल्या बऱ्याच लोकांना शेवट अंगावर का आला? मला तर पॉझिटिव्ह शेवट वाटला.

@ rajasi

पार्वती छानच एक्टरेस आहे..तिचा "Take OFF" मूवी पहा . मल्याळम आहे. सबटायटल्स आहेत.
Tiger jinda he ची स्टोरी line आहे पण नो मेलोड्रामा..

Article 15 आवडला.
अवांतर- फिल्मची स्क्रिप्ट सध्या व्हॉटसअपवर फिरत आहे. जास्त चांगली आहे.

कुरळे केस वाली साऊथ इंडियन अभिनेत्री क्युट आहे. -> नित्या मेनन नाव आहे तिचे. फार गोड आहे आणि तेलुगु/मल्याळी मधे फेमस आहे.

काल तापसी पंनू साठी game over पहिला. अजिबात आवडला नाही. Total wastage of time, का? कशासाठी ही उत्तरे मिळालीच नाही. फुकटचा थरार नुसता, शेवटी कळेल म्हणून पूर्ण पहिला आणि पश्चात्ताप नुसता.

फोटोग्राफ बघितला प्राईमवर. अतिशय संथ आणि रटाळ वाटला. काहीच कळलं नाही. जुन्या आर्ट फिल्मसारखा. अंधार बराचवेळ. सान्या मल्होत्रा आणि नवाझ अगदी विजोड वाटले. कदाचित तेच अपेक्षित होतं. सान्या नक्की काय प्रकार आहे, तिला काय हवंय, ती खूष आहे की नाही, काss ही कळलं नाही. नवाझसाठी तरी संवाद दिलेत की तो भावना मनात दाबून ठेवतो, स्वतःचा विचार करत नाही वगैरे वगैरे पण सान्यासाठी तसे काहीच दाखवले नाही. नवाझ पहिल्यांदा आवडला नाही तो राघवनच्या चित्रपटात आणि आता यात. जिम सरभ थोडा दिलासा पण तो अगदी थोडावेळ होता. सचिन खेडेकर फक्त इंग्लिशमध्ये बोलतो. शेवट काहीच दाखवला नाही.

दगडी चाळ बघितला दुपारी टीव्हीवर. धागा गाणं छान आहे. पूजा सावंतच्या जागी दुसरी कोणी असती तरी काही फरक पडला नसता. इतकी मंद दाखवली आहे ती, तिच्यामुळे तो या सगळ्यात पडतो Angry अंकुश एकदम क्युट. तो एकटा अनेक गुंडांना मारतो तलवारी वगैरे घेतलेल्या, जुने हिंदी सिनेमे आठवले. मकरंदने आणि यतीनने छान काम केले आहे. एकदाच बघितला खूप झालं, परत लागला तर फक्त गाणं बघेन.

Pages