चित्रपट कसा वाटला - ३

Submitted by टीना on 11 April, 2017 - 16:44

या आधीचा धागा : http://www.maayboli.com/node/48143
हिंदी/मराठी/इंग्रजी चित्रपट कसा वाटला याबद्दलचे हितगुज.
आधीच्या धाग्यावर प्रतिसादांनी २००० चा टप्पा ओलांडल्यामुळे हा नवा धागा यापुढील चर्चेसाठी..

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मोगरा फुलला छान सिनेमा आहे. मी अश्या आया बघितल्या आहेत स्वप्निल व सई देवधर छान कामे केली आहेत. तसे पाहिलेतर ही सिंगल मदर ची कथा पण आहे. एक सीन आहे ज्यात ती गॅसवाला आला म्हणू न गडबडीत घरी येते तो ठणाणा करत असतो. गाडी लावून दार उघडते तर समोरची मालकीण बाई ओरडत येते गाडी चुकीच्या ठिकाणी पार्क केली आहे ती हलवा व तेव्हाच सासूचा भयानक रूड बोल्णारा फोन येतो कोणीच तिचे ऐकून घेत नाही हे एकदम बरोबर चित्रित केले आहे. आई भक्त परायण मुलगा, पहिला मुलगी रिजेक्ट करायचा सीन बघतानाच त्या आईचा राग यायला लागतो.

कथा व ट्रीटमेंट एकदम सरधोपट आहे. ते मारवा वाले गाणे स्त्री पुरुष दोनी आवाजातले मस्त आहे. क्लासिक नाही पण ऐकायला छान.
सई देवधरच्या साड्या व ब्लाउज छान दिसतात. ही जरा जुनी स्टाइल आहे. प्लेन साडी प्रिंटेड ब्लाउज. माणव चा रोल मजेशीर आहे. उगीच व्हायरस घालतो सॉफ्ट वेअर मध्ये हे फारच मजेशीर. खरंच आयटी वाले असे करत असतील. ही कथा छोट्या शहरातली आहे का? सिम्ग ल पेरेंट च्या पगारात हिरॉइनीला एकद् म मोठे घर कसे मिळते असा प्रश्न पडला पण गावात असेल शक्य. हिरोचे घर् पण मोठा बंगला शेजारची मुलगी पण बंगल्यातलीच.

शिवाय प्रपोज करणे, मुलग्याला तुझे लग्न मी ठरवले आहे असे सांगणे हेसर्व नाटकाच्या मध्यंतरात का बरे करतात. जरा दम घ्या ?!
लगेच उद्याच साखर पु डा लेव्हलची गडबड. हिरोचे सेन्सिटिव्हली रडणे हे एकदम गडबडीत. क्लायमॅक्स पण एकदम प्रेडिक्टेबल.
सईचा एक संवाद आहे तो मात्र छान आहे बर्‍याच स्त्रियांची अशी स्थिती असते. सर्वत्र प्रयत्न करत राहणे परिस्थिती नीट असल्याचे नाटक करणे खूप स्ट्रेसफूल असणार. अशी कथा मांडली हेच मला आशादायक वाटले.

वेडींगचा सिनेमा पाहिला. खूप फ्रेश, हलकाफुलका आहे. सगळ्यांची कामे सुंदर. नवीन हिरॉईनला मराठीतली ईशा + आहना देओल म्हणायला हरकत नाही. खूपच साम्य आहे. मुक्ता बर्वे नेहमीप्रमाणे उत्तम काम करते . शेवटी बॉफ्रे येण्याच्या शॉटमध्ये साडीत फार सुंदर दिसलीय.
मूड छान बदलणार सिनेमा आहे. जरुर बघा. डॉ. सलील कुलकर्णींचा पुढील सिनेमा (असल्यास) नक्की पाहणार.
बायदवे, यामध्ये चित्रकाराच्या छोट्या भूमिकेत संदीप खरे आहेत का?

गर्लफ्रेंड एकुण आवडला. टाईमपास झाला. फेणे जरा जाड वाटला (सांगा त्याला कोणीतरी) पण त्याचे काम आवडले. दिसण्यात एकदम बदल केलाय तेही आवडले. आवाज पण दिलदोस्ती मधे होता तसा नाहीये , व्यवस्थित बोललाय(त्यात शब्दांवर एकदम जोर देत बोलतो). सई ताम्हणकरचे कामही चांगले पण दिसायला नाही आवडली. काहीकाही प्रसंगात खुप हसु आले. काही प्रसंग अतार्किक आहेत पण करमणुकप्रधान सिनेमात ते असणारच. पण मजा आली.

पण या सिनेमाला ‘बदला’ टायटल देणे स्टोरी टु ऑबव्हियस बनवते. >> बरोबर. कारण मी जेव्हा इन्व्हिजिबल गेस्ट बघत होते तेव्हा सारख वाटत होत कि 'बदला' कधी घेणार आता आणि कोण/कशाचा वगैरे. जर हिंदी या नावाचा मुव्ही आहे हे माहितच नसतं तर , बदला घेणार वगैरे अज्जिब्बात शंका सुद्धा आली नसती.
मुळात अमिताभ च्या ऐवजी (नथिंग अगेन्स्ट हिम. मला आवडतो अजुनही.) नविन /अनोळखी चेहरा घेतला असता तर. पण असो. मी अजुन बघितला नाही 'बदला'. उगाच हवेत तीर सगळे. इन्व्हिजिबल मुळ इतकी इप्रेस झाले कि 'बदला' पण आवडलाच पाहिजे अस वाटु लागलय त्यामुळ लिहित सुटलीये. Happy बदला नेटफ्लिक्स वर आला कि बघणार खर .>>>>
>>>>(मी बदला बघितला नाही. पण इन्व्हिजिबल गेस्ट बघितला त्यावरून लिहिते.)
मुव्ही 'लॅटरल थिंकिंग ' वर बेस्ड आहे ना. सो कुठलीच गोष्ट खरी नाही किंवा खोटीही नाही. लॅटरल थिंकिंग : एकच गोष्ट आपण किती प्रकारे अ‍ॅनालाईज करु शकतो. त्यामुळ काय खर खोट गौण आहे. तुम्ही पहाल तसे. ईंटरप्रीट कराल तसे.
आत्मीक समाधानासाठीच तर आहे ना सगळे. मुळ चित्रपटात वडील त्याला सांगतात कि "तु फक्त कुठे टाकलस माझ्या मुलाला ते सांग. आम्हाला त्याला पुरण्याचे समाधान तरी मिळु देते. तु कबुल कर किंवा न कर. " पण तो त्याला नकार देतो. दुसरं म्हणजे फक्त अ‍ॅक्सिडेंट असता तर सांगितले असते कि घाबरून गाडी ढकलून दिली. पण तो कबुल करत नाही म्हणजे त्याने त्यापेक्षा पुढे जावून (खुन) केला असणार असे त्यांना इंट्युंशन आहे. आणि त्यासाथी त्यांची धडपड चालु आहे सगळि अस मला वाटल.
'बदला' नावाने हा घोळ झालाय. मुळ चित्रपटात , बदला अस कुठेच वाटत नाही. मुव्ही फक्त एकच गोष्ट कशी वेगवेगळ्या प्रकारे खरी वाटु शकते या कन्सेप्ट वर जास्त फोक्सड आहे अस वाटत. त्यामुळ सगळे धक्के असे एकावर एक आदळत जातात.
इन्व्हिजिबल गेस्ट : तुम्हाला वाटत रहात , वडिल इन्व्हिजिबल गेस्ट आहे हॉटेल रुम मध्ये. सो नेम मेक्स पर्फेक्ट सेन्स. आणि वडीलच खुनी अस वाटु लागल असतानाच एकदम , चेंज होते स्टोरी. आणि दुसरीच व्य्कती जी कन्सिस्टंतली गुन्हेगाराबरोबर आहे , ती व्यक्ती इन्व्हिजिबल गेस्ट होते.>>>

ही मा़झ्याच पोस्ट कोट करतीये कारण 'बदला' बघितला. आणि लोकांना इतके प्रश्न का पडलेले ते कळलं. सिन तो सिन कॉपी करुन सुद्धा ओरिजिनल सुरेख चित्रपटाचा कसा सत्यानाश करता येतो ते बदला बघितल्यावर कळलं. भयंकर राग पण आला.
मुळातइन्व्हिजिन्बल मधली दोन असहाय्य पालकांची तळमळ आपला मुलगा मेलेला आहे हे माहित असुनही फक्त त्याला शेवटी शक्य असेल तर बघायचय किंवा निदान ती जागा तरी बघायची आहे ज्णेकरून क्लोजर मिळेल.
हिंदी व्हर्जन मध्ये तीच तळमळ हरवून ठेवली आहे. गुन्हेगार (तापसी) इनोसंट असल्याच ढोंग करण्यात कमी पडते. अमिताभ ने तर पाट्या टाकल्या आहेत. बदला बघितला असला तरी इन्व्हिजिबल गेस्ट जरुर जरुर बघा.
आणि इन्व्हिजिबल गेस्ट बघितला असाल तर मुळीच बदला बघु नका. एका चांगल्या चित्रपटाचा सत्यानाश केल्याबद्दल डायरेक्टरला बदडून काढल पाहिजे.

हंपी पाहिला YouTube वर..खूप आवडला सोनाली कुलकर्णी, ललित प्रभाकर, प्राजक्ता माळी आहेत कलाकार.. मस्त अभिनय आणि विशेष म्हणजे कॅमेरा angles खूपच छान आहेत.. अप्रतिम...

अनुराग कश्यपचा शैतान बघितला.
नील भूपालन , गुलशन देवया , किर्ती कुल्हारी , राजकुमार राव अशा आज ओळखिच्या चेहर्यांना पाहून गंमत वाटली.

सीमा, खूप छान लिहिलेस. मी invisible guest पाहिला, त्यानंतर बदला पहायची इच्छा केलीच नाही, मूळ चित्रपटाचा इफेक्ट घालवायचा नव्हता हे एक कारण आणि बदलाच्या ट्रेलरमध्ये मूळ चित्रपटातली स्थळे जशीच्या तशी वापरताना बघितल्यावर फ्रेम टू फ्रेम कॉपीत रस राहिला नाही. मूळ चित्रपट खूप ठिकाणी खिळवून ठेवतो.

हो ना. बदला मधे अमृता सिंगचे पात्र खूपच नाहक बडबड करते. हिंदीत नेहमीच दाखवले जाणारे सुमार समीकरण..... पात्रावर काही वाईट कोसळणार आहे हे दाखवायला त्याला नको तितके उत्साही दाखवणे. आणि अमृता सिंगपण खुपच खोटा अभिनय करते त्या दृष्यात.
गेस्टमधे मेकप काय मस्त केला होता बाईचा व एकच बाई होती. इथे माणुसच बदललाय. Sad

Invisible guest वरुन Everybody knows का आठवावा हे काही कळाले नाही. फक्त स्पॅनिश आहे म्हणुन का? कारण एक urban setting मध्ये घडतो तर दुसरा rural. एक revenge thriller type आहे तर दुसरा broken Spanish family वर आहे.
पण everybody knows सुद्धा मस्त आहे. Cruz आणि Bardem दाम्पत्याची कामे मस्त. दोघेही एवढे मोठे glamorous कलाकार पण अशा rural setting सिनेमात साध्या माणसांची भूमिका मस्त जमवली आहे.
मला राहून राहून ह्या कथेवर कोल्हापूर-मुम्बई किंवा हरियाणा-मुम्बई अशा सेटिंग मध्ये मराठी किंवा हिंदी सिनेमा मस्त बनेल असे वाटत होते.

>>Invisible guest वरुन Everybody knows का आठवावा हे काही कळाले नाही.<<
सिंपल. कारण दोन्हिंत ड्रामा, मिस्टरी आहे ट्विस्ट्स देखील आहेत. हे सगळं तुम्हाला दिसलं नसेल तर परत एकदा पहा, असं सुचवेन... Wink

Everybody knows एक मोठी फॅमिली, तिचा मित्रपरिवार आणि ते रहात असलेली ग्रामीण शेतकरी कम्युनिटी ह्यांच्यातल्या नातेसंबंधांची कहानी आहे. ज्यातील लोकांच्या मनाच्या कोपर्‍यात दडून ठेवलेला एक भूतकाळ आहे आणि जो वर्तमानकाळात त्या फॅमिली वर गुदरलेल्या एका दुर्दैवी प्रसंगानंतर हळूहळू सगळ्यांसमोर ऊभा राहतो. असे होतांना आई/मुलगी/बहीण्/बायको/ मित्र/ नवरा ह्या सगळ्या नातेसंबंधांवर ताण येऊन त्या प्रत्येक नात्यातली व्यक्ती ह्या प्रसंगात कशी वागते ह्यावर बेतलेला सिनेमा आहे Everybody knows. नुसती दुर्दैवी घटना आणि त्यातला बारकासा थरार म्हणजे सिनेमा असे म्हणत असाल तर मग "कळलाच हो" तुम्हाला सिनेमा असे म्हणून घेतो. Wink
'द इन्विजिबल गेस्टचा' ऑफिशिअल जॉनरा मिस्ट्री/क्राईम आहे आणि 'एवरीबडी नोजचा' ड्रामा/थ्रिलर असा आहे.
दोन्ही सिनेमात आजिबात नसलेले प्यारलल्स तुम्हाला दिसल्याबद्दल तुमचे अभिनंदन Wink
अर्थात असे दिसण्यात चुकीचे काहीच नाही. सिनेमा संपल्यानंतर माझ्या लक्षात त्यातल्या पात्रांचे नातेसबंध राहिले आणि तुमच्या ते नातेसबंध
दिसून येण्यासाठी दाखवलेल्या दुर्दैवी घटनेतला बारकासा थरार. चालायचेच Proud

डुड, मी वर लिहिल्या प्रमाणे दोन्हित ड्रामा आहे. ड्रामा हॅपन्स व्हेन ऑर्डिनरी पिपल डु एक्स्ट्राऑस्डिनरी थिंग्ज अंडर नॉट सो ऑर्डिनरी सर्कंम्स्टॅम्सेस (टु सेव देर आ** थिंकिंग दॅट इज दि बेस्ट कोर्स ऑफ अ‍ॅक्शन). या व्याख्येनुसार दोन्हि चित्रपट परत एकदा पहा, असं पुन्हा सुचवेन...

>>त्या फॅमिली वर गुदरलेल्या एका दुर्दैवी प्रसंगानंतर हळूहळू सगळ्यांसमोर ऊभा राहतो.<<
दुर्दैवी प्रसंग? इट्स ए प्लॅन्ड किडनॅपिंग. प्लिज, वॉच इट अगेन... Lol

एनीवेज, मी इथे थांबतो कारण हा धागा "चित्रपट कसा वाटला" हे सांगण्या करता आहे, डिटेल रसग्रहणाकरता नाहि...

डुड, मी वर लिहिल्या प्रमाणे दोन्हित ड्रामा आहे. ड्रामा हॅपन्स व्हेन ऑर्डिनरी पिपल डु एक्स्ट्राऑस्डिनरी थिंग्ज अंडर नॉट सो ऑर्डिनरी सर्कंम्स्टॅम्सेस (टु सेव देर आ** थिंकिंग दॅट इज दि बेस्ट कोर्स ऑफ अ‍ॅक्शन). >> साऊंड्स लाईक एनी ऑर्डिनरी स्टोरीलाईन ऑफ एनी ऑर्डिनरी मुवी दॅट वॉज एवर शॉट विथ अ‍ॅट लीस्ट वन "डेडली सिन" ईट. Happy

दुर्दैवी प्रसंग? इट्स ए प्लॅन्ड किडनॅपिंग. प्लिज, वॉच इट अगेन... Lol >> सर, मला किडनॅपिंग शब्द टाईप करता येत नव्हता असे तुम्हाला वाटले का? Proud किडनॅपिंग होते हे सांगून टाकले आहे तर कोणी केलेले असते ते सुद्धा सांगून टाका आता.

" The Ghost Writer" हा ब्रिटीश मूव्ही प्राईमवर पाहिला. आवडला.

राज व हायझेनबर्ग यांच्या प्रेमळ व खुसखुशीत संवादांनंतर हा बघुनच टाकला. Happy
जरा हळू आहे पण आवडला. आणि सिनेमाच्या ओळखीतच किडनॅपिंगचे व कोणाचे कुठे होते तेही लिहीले आहे त्यामुळे चिंता नसावी. कारण नंतर भरपुर काही होते ते पहाणे महत्वाचे.

हा हा. अंजली, तुमची कामेंट माझ्याकरता अगदि देजा वु मोमेंट; आणि तुमच्याकरता?.. Proud

सुनिधी, एव्हरीबडि नोज आवडला हे सांगितल्याबद्दल आणि त्यातले बारकावे ओळखल्याबद्दल अनुक्रमे धन्यवाद आणि अभिनंदन. तुमची आवड लक्षात घेउन अजुन एक "ड्रामा" सजेस्ट करतो. बॉय मिसिंग - दि इन्व्हिजिबल गेस्ट फेम ओरिओल पॉलोचीच कथा आहे. तुम्हाला आवडेल अशी आशा करतो...

Pages