चित्रपट कसा वाटला - ३

Submitted by टीना on 11 April, 2017 - 16:44

या आधीचा धागा : http://www.maayboli.com/node/48143
हिंदी/मराठी/इंग्रजी चित्रपट कसा वाटला याबद्दलचे हितगुज.
आधीच्या धाग्यावर प्रतिसादांनी २००० चा टप्पा ओलांडल्यामुळे हा नवा धागा यापुढील चर्चेसाठी..

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

कबीरसिंग बद्दल या इथल्या चर्चेखेरीज इतर काहीही वाचले नव्हते. पण काल हे चार लेख, याच क्रमाने वाचले:

What's so obscene about Kabir Singh?

Watching a sicko get away just rankles

कबीर सिंह चित्रपट वाद : 'मी सतत नकार देऊनही माझ्या एक्स-बॉयफ्रेंडने बळजबरी केली'

कबीर सिंह: शाहीद कपूरचा हा सिनेमा लोकांना एवढा का आवडतोय? - ब्लॉग

मला वाटतं त्यांनी कमीतकमी शेवटतरी वेगळा दाखवायला हवा होता, देवदाससारखा दुखी किंवा देव-डी सारखा आशावादी.

तिकडचा प्रतिसाद इकडेही डकवतेय.

सुपर30 चित्रपट काल पाहिला. हृतिकचे आजवरचे सर्वात चांगले काम. तो क्षणभरही हृतिक न वाटता आनंद कुमार वाटतो, भाषेचा लहेजा त्याने उत्तम उचललाय. केम्ब्रिजला संधी मिळाली हे कळल्यावर, गाडीला धडकून सायकल पडल्यावर पडलेले पैसे शोधताना, आपली पूर्व प्रेयसी समोर आलीय हे लक्षात आल्यावर, 30 च्या 30 मुले निवडून आल्यावर ह्या सगळ्या प्रसंगात त्याने कमाल केलीय. त्याला पुढेही अशाच चांगल्या भूमिका मिळोत.

शेवटचा हॉस्पिटलातील प्रसंग थोडा नाटकी वाटला.

आनंदकुमारबद्दल विकीवर वाचले. त्याने सुरवातीची सलग 3 वर्षे पूर्ण 30 जणांच्या तुकडीला भारतीय अभियांत्रिकी संस्थेत प्रवेश मिळवून दिला. त्यानंतरही 30 पैकी 25 ते 28 च्या दरम्यान मुले यश मिळवत आहेत. अंबानी, महिंद्रा इत्यादी लोकांनी सामाजिक जबाबदारीअंतर्गत देऊ केलेली मदत नाकारून आजही आई व भावाच्या साहाय्याने तो हा एक वर्ग चालवतोय,चित्रपटात दाखवलाय तसल्याच मोडक्या वर्गात. पैसे घेऊन दुसरे वर्ग चालवून या वर्गासाठी पैसे गोळा करतोय आणि आजही त्याच्यावर शिक्षणक्षेत्रातील माफियांकडून हल्ले होताहेत.

आनंद कुमारची मुलाखत बघितली. त्यात तो म्हणाला की चित्रपटाच्या कथेत त्याचा खूप मोठा सहभाग आहे, लोकांना आकर्षित करून घेण्यासाठी अतिरंजित काहीही घालायला त्याने नकार दिला, हृतिकने आपली भूमिका करावी हा त्याचाच आग्रह.

या पार्श्वभूमीवर हॉस्पिटलचा प्रसंग किती खरा असे वाटते, पण शेवटी reality is stranger than fiction हेही तितकेच खरे आहे.

तसे दिसण्यासाठी त्याला किती मेक-अप करावा लागतो >>>>>
खऱ्या आनंदकुमारने चित्रपटात मुख्य भूमिका केली असती तर इतकी चर्चा झाली असती का?

मेकप विक्रम गायकवाडनी केलाय. अप्रतिम काम. डोळ्यांना फारसा मेकप करता येत नसल्याने मला खूप वेळा ते निळसर वाटले व सावळ्या चेहऱ्यावर विसंगत वाटले. Happy Happy

शेवटच्या दृश्यात आनंदकुमार त्याच्या खऱ्या वर्गात शिकवताना दाखवलाय.

प्रदर्शित झाला तेव्हा डळमळीत सुरवात झाली पण आता चांगला जोर पकडलाय. इथे नव्या मुंबईत सर्वत्र जवळपास हाऊसफुल जातोय.

काल मुक्ता बर्वे व उमेश कामतचा 'लग्न पाहावे करून' यु ट्यूबवर पाहिला. मस्त आहे, आवडला. दोघेही एका लग्नाच्या दुसऱ्या गोष्टीत दिसले तसे एकदम फ्रेश दिसले. अबीरला परत पाहिल्याचा आनंद झाला Wink Wink ... एलदुगोमधला प्रभातड्याही परत दिसला. Happy Happy

दुसरी जोडी सिद्धार्थ चांदेकर व तेजश्री प्रधान. यांनीही छान काम केले. तेजश्रीची मालिका पाहिली नव्हती पण तिचे 'कानाला खडा' पाहिले होते. मुलगी चांगले काम करते. दारू पिऊन बाबाला फोन करण्याचा प्रसंग चांगला जमलाय.

मी कबीर सिंग बघितलेला नाही पण एका मसालापटाबद्दल इतक्या सिरियसली का चर्चा करत आहेत लोक?
बी सी ग्रेड मुव्हीज, साऊथ रिमेक्स, ऍडल्ट मुव्हीज यात हेच सगळं तर असतं की- violence against women(including sexual violence), treating women as inanimate objects etc.
मग याच एका चित्रपटाने इतकं आभाळ कोसळल्यासारखं का झालंय??? अशा गोष्टीही आवडणारे लोक असतात, ते बघतात. त्यात काय नवीन?

त्यांच्याकडे असले फालतु मुव्हीज ढिगाने आहेत, पण आपल्याकडे कमी प्रमाणात त्यांच्याकडे असले फालतु मुव्हीज ढिगाने आहेत, पण आपल्याकडे कमी प्रमाणात आहेत.
आणि ह्या आणि असल्या मुव्हीजवर चर्चा तर व्हायलाच पाहीजे.
कारण आम्ही मुव्हीज फक्त मनोरंजनासाठी नाही तर त्याचा आपल्या/माझ्या समाजावर कसा प्रभाव पडतोय ह्यासाठी बघतो.

मी अर्जुन रेड्डी पाहिला मुद्दाम ओरिजिनल पहावा म्हणून आणि लोकांनी तो जास्त चांगला आहे हे सांगितले म्हणून. किती सामान्य टिपिकल तेलगू छाप सिनेमा आहे!! Uhoh काहीही वेगळेपणा किंवा कसलाही स्पार्क नाही वाटला.
पूर्वीच्या हिंदी सिनेमात कसं माँ मै बिए फर्स्ट क्लास फर्स्ट आ गया असायचं त्याऐवजी इथे डायरेक्ट डॉक्टर, ते पण कॉलेज टॉपर हिरो! सॉकर, मजनूगिरी, उनाड भाईगिरी पण करून वर पुन्हा बेस्ट डॉक्टर. (!) बरं प्रेम प्रेम म्हणून जो काय तीन तास उदो उदो केलाय ते अगदीच भंपक. ओवररेटेड. मला एक वस्तू अवडली आणि मला पाहिजेच, बस्स. फर्स्ट इयर च्या मुलींपैकी एक मुलगी दिसली, आवडली, तिने अजून त्याच्याकडे पाहिले नाही की बोलली नाहीये तर लगेच सगळी गँग पाठवून आख्ख्या कॉलेज ला सांगणे, ती माझी आहे. झाले. आता तिला चॉइस नाही. तिने तो सांगेल तेव्हा तो सांगेल तिथे जायचे, तो हवे तेव्हा पप्पी घेणार, जबरदस्तीने येऊन मांडीवर झोपणार काहीही करणार. याने सांगितले की लेक्चर बुडवून याच्या बाइक वर बसायचे. हे सर्व अजून दोघांत चार वाक्यांचा पण संवाद नसताना! काही काहीही झेपले नाही.
नंतर काय तर ४ वर्षे अलौकिक प्रेम झाले, ५४९ ( हो एक्झॅक्ट नंबर. ते दोघे मोजतात) वेळा सेक्स झाला तरी अचानक फालतू मिस अंडरस्टँडिंग वर हा सगळा प्रेमभंगाचा ड्रामा. वय १४ च्या प्रेम कहाणी मधे इतके हायपर होणे कळू शकले असते पण वय २८ च्या हिरो आणि २५ ची हिरॉइनमधे हे असले गैरसमज वगैरे नथिंग मेक्स सेन्स. तोही फार नाही. सगळे मिळून ८-९ महिन्यात आटोपते सगळे आणि मग खुलासा होऊन गोड शेवट!! शेवट बघून तर "सिरियसली? इतका ड्रामा फॉर नथिंग? बेसिक गोष्टी ही माहित पण करून न घेता? "
काही वेळा माबोवर त्या ह्यांच्या पकाऊ धाग्यावर किंवा मला मयत्री करायला अवदेल असल्या धाग्यावर अन्पेक्षितरित्या टाइमपास चर्चा होऊन १०० पोस्टी पडतात तसा हा सिनेमा हिट झाला असावा असे मला तरी वाटले.
तो विजय देवराकोंडा बरा असावा अ‍ॅक्टर म्हणून. पण ती हिरॉइन अगदी म्हणजे अगदी सुमार. डम्ब. मुकी बहिरी वाटत होती मला बराच वेळ. !
तर ओवरऑल लांबलचक कंटाळवाणा सिनेमा.

एकंदर, कबीर व त्या कोणत्या त्या गप रहाणार्‍या मुलीचे व्यक्तिमत्व , वागणे, प्रसंग भयंकर असहनीय आहे असे नक्कीच दिसते आहे. त्यामुळे हा पहाणार नाही हे २०० टक्के खरे. पण वर ज्यांनी ‘आवडला’ लिहिलेय त्यांनी ‘का आवडला‘ ते ही लिहा की.

मैत्रेयी, पुर्ण पोस्टशी 1000% सहमत. मी अजून कबीर सिंग पाहिला नाही पण अर्जुन रेड्डीचा बोलबाला आणि एकूणच फ्रेंड सर्कल मधलं रेकमेंडेशन म्हणून पाहिला होता. तद्दन टिपिकल तेलगू सिनेमा वाटला म्हणून कबीर सिंग नेट फ्लिक्स किंवा प्राईमवर आल्यावरच पहाणार आहे.

ह्र्तिक रोशन आनंदकुमार वाटत नाही. त्याचा रिचनेस जाणवत राहतो. वर लिहले तसे भाषेचा लहेजा पकडला आहे असे कुठेही वाटले नाही. चक दे पासून असले सिनेमे येत आहेत पण त्याला नाटकी किनार जाणवते,जे मुळ लोकांच्या कर्तृत्वाला बाधक वाटते.
(प्रतिसाद सिनेमा बघत असताना देत आहे) .

> पण वर ज्यांनी ‘आवडला’ लिहिलेय त्यांनी ‘का आवडला‘ ते ही लिहा की. > +१

आणि ज्या सीनवर आक्षेप घेतला जातोय
• प्रेयसीला चपकार
• सहमती न घेता तिच्यासोबत केलेला सेक्स (हे आहे ना?)
• चाकूचा धाक दाखवून स्त्रीला (ही कोण असते?) कपडे काढायला लावणे
• कप फोडला म्हणून मोलकरणीच्या अंगावर धावून जाणे
• व्यसनी, रागीट, सेक्स ऍडिक्ट माणसाला बरे करण्यासाठी आपली बहीण ऑफर करणारा मित्र
• अजूनकाही असेल तर

१. हे सीन तुमच्यामते कसे चित्रित केलेत? - कबीरबद्दल सहानुभूती निर्माण करण्यासाठी कि त्याच्याबद्दल, त्याचे लाड करणाऱ्यांबद्दल घृणा वाटावी असे?
२. या सीनला तुम्ही (आणि थिएटरमधले इतर लोक) धन प्रतिसाद दिला (हसणे, चिअरअप करणे, एक्ससाईट होणे) कि ऋण?

हेदेखील लिहा.

बोगदा चित्रपट कसा आहे? >>>> वर मी लिहिलं होतं. एकदा पहा. चांगला आहे.

काल 'कृतांत' पाहिला. मला अति पकाऊ वाटला. संदीप कुलकर्णी काय कोणत्याही सिनेमात काम करायला लागले आहेत. गैर पाहिल्यावर पण असच वाटलं होतं

कबीर सिंग सारख्या चित्रपटांबद्दल मला मनापासून तिरस्कार वाटतो कारण
१. अभिनय - दिग्दर्शन - संगीत हे उत्तम असणे म्हणजे चित्रपट चांगला नव्हे. त्यासाठी मुळात आक्शेपार्ह "स्वभाव विषेश" - "कथानक" का वापरायचे ?
२. आजकाल चुकीच्या गोष्टींना डोक्यावर घेण्याची फॅशनच आली आहे असे वाटते. असे वागणार्या लोकांबद्दल सहानुभूतीचे चित्र उभे करणे , हे भाबड्या प्रेक्षकांचे इमोशनल ब्लॅकमेलींगच आहे.
दुर्दैवाने असे चित्रपट हातोहात लोकप्रिय होतात.

बोगदा पाहिला नेफ्लि वर. चित्रीकरण वगैरे छान आहे. पण डिप्रेस्ड वाटलं मुव्ही बघून. मधे मधे मी पुढे ढकलला.

कलन्क युट्युबवर आलाय, कसला भन्गार सिनेमा आहे पहिल्या १५ मिनिटातच प्रन्चन्ड बोअर होत, इतकी रडकी कथा, सगळे हताश चेहरे लोक कशाला बघतिल तेच कळत नाही, करण साठी सगळ्यानी हो म्हटल का?

प्राईमवर 'व्हायरस' हा मल्याळी चित्रपट आलाय. अजिबात चुकवू नका. अगदी लहानसहान भूमिकांमध्ये फार उत्तम, मोठे मल्याळी नटनट्या आहेत.
पटकथेचं कौशल्य स्तिमित करणारं आहे.

कलन्क युट्युबवर आलाय, कसला भन्गार सिनेमा आहे पहिल्या १५ मिनिटातच प्रन्चन्ड बोअर होत, इतकी रडकी कथा, सगळे हताश चेहरे लोक कशाला बघतिल तेच कळत नाही, करण साठी सगळ्यानी हो म्हटल का>>मीही पाहिलाय कलंक. यू ट्यूब वर पण आलाय का?? मी प्राईम वर पाहिलाय. नवऱ्याने थोड्यावेळातच give up केलं. मी पूर्ण पाहिलाय. अर्थातच अत्याचार आहे कलंक. मी तर प्रत्येक सीन मध्ये आलिया चे earring, तिचे ड्रेस हेच पाहत बसायचे. :O

मी तर प्रत्येक सीन मध्ये आलिया चे earring, तिचे ड्रेस हेच पाहत बसायचे>>>>>>>>>>>तेवढंच एक बघणेबल आहे

कलन्क युट्युबवर आलाय, कसला भन्गार सिनेमा आहे पहिल्या १५ मिनिटातच प्रन्चन्ड बोअर होत, इतकी रडकी कथा, सगळे हताश चेहरे लोक कशाला बघतिल तेच कळत नाही, करण साठी सगळ्यानी हो म्हटल का? - +१ कुठल्या जगात, कुठल्या काळात , कोणत्या समाजात घडतो हा चित्रपट हेच कळत नाही, लोहार काय, बोटीतून काय प्रवास करतात लोक, दसरा काय भारी साजरा करतात , सगळंच आ आणि अ

ट्रेलर पहिला भयानक आहे
अमेय वाघ अत्यंत बटबटीत वाटतो
सई ताम्हणकर तर नेहमीसारखीच भयाण
आणि रिव्ह्यू वाचला तर त्यात तिने सर्वोत्तम काम केलं आहे असे लिहिलं आहे
त्यामुळे बघण्याचा विचारही करू शकत नाही

Pages