चित्रपट कसा वाटला - ३

Submitted by टीना on 11 April, 2017 - 16:44

या आधीचा धागा : http://www.maayboli.com/node/48143
हिंदी/मराठी/इंग्रजी चित्रपट कसा वाटला याबद्दलचे हितगुज.
आधीच्या धाग्यावर प्रतिसादांनी २००० चा टप्पा ओलांडल्यामुळे हा नवा धागा यापुढील चर्चेसाठी..

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मोगरा फुलला आलापण प्राईमवर. मला वाटलं अजून रिलीज व्हायचाय. सई देवधर आहे ती, श्रावणी देवधरची मुलगी. श्रावणीचे दिग्दर्शन आहे. स्वप्नील किती चम्या दिसतो. बघेन थोडावेळ आवडला तर.

हो, असतात अशी लोकं. मी पाहिलेत. ते तर त्यांची मुलगी तीशीच्या वर गेली तरी तिचे लग्न करायला तयार नव्हते.>>बापरे ह्याला प्रेम तरी कसं म्हणायचं?? त्यांच्या तारुण्यसुलभ भावना दाबून काय मिळवतात ही लोकं??

हो स्वस्ति, मीही फाफॉ करतच बघितला त्या कियाराचे आई वडील का म्हणून विरोध करतात आणि तेही एका सर्जन ला. आणि हा बाबा (शाहिद) उगीच दारू पितोय, सिगारेटी ओढतोय आणि काय काय हे त्याच्या बोलण्यातून. बाकी मित्र धन्य याने एवढे त्याच्यासाठी काय केले असते जे तो याच्याशी एवढा पाईक, गॉन केस माणसाबरोबर आपल्या बहिणीचे लग्न लावायला जातो.
खरतर यात त्याचीच चूक असते ऍक्टिवा आणायला जातो तेव्हा ती प्रीती दिसते त्याला टेरेसवर आणि शाहिद विचारतो सुद्धा त्याला प्रीती है क्या वहा सांगितले असते याने हो तर पुढचं एवढं दारूपुराण घडलंच नसते.
या मुव्हीला हिट होण्यामागे नेमके काय कारण असेल काय माहित. त्यापेक्षा गल्ली बोळातून फिरलेला आपल्या रणवीर चा gully boy छान होता.

टॉक्सिक पौरु शाला उदो उदो केले गेले आहे. व हेच नॉर्मल आहे असे ठ्सवायच प्रयत्न आहे >> अजिबात नाही अमा. बॉलिवुडी शेवट सोडला तर असं काहीही केलेलं नाही. बघितला नसेल तर जरूर बघा. (शेवटची १० मिनिटे नाही बघितला तरी चालेल). 'अशी माणसं असतात' हे सांगणं, आणि त्याची एक कथा पडद्यावर मांडणं- इतकंच ते आहे. 'एक कथा' म्हणून आपण पदद्याकडे का बघू शकत नसू. सतत सूक्ष्म आणि तत्त्व पातळीला का जायचं ? अर्थात आपल्याच सिनेम्यांनी आपल्याला ती सवय लावली आहे म्हणा..

लोकांना आव्डतो आहे >> पण त्यातल्या बहुतेकांना कबीर सिंग चुकीच्या कारणासाठी आवडतो आहे Sad

उदोउदो किंवा ग्लोरीफिकेशन नाहीये.
आहे हे असं आहे, कबीर आहे हा असा आहे, त्याच्या आयुष्यात गोष्टी घडतात, तो त्यावर त्याच्या पद्ध्तीने रीअ‍ॅक्ट होतो. बास.

कियाराचे आई वडील का म्हणून विरोध करतात आणि तेही एका सर्जन ला.>>>उगीच नाही. जात आडवी येते.

मुलगा दुरावेल म्हणून कुणी मुलाचं लग्न लावून न देता राहील का... >>>>>> अगदी शक्य आहे हे. पाहिल्या आहेत अशा मानसिकतेच्या बायका/आया.

मुलगा दुरावेल म्हणून कुणी मुलाचं लग्न लावून न देता राहील का... >>>>>> अगदी शक्य आहे हे. पाहिल्या आहेत अशा मानसिकतेच्या बायका/आया.>>>
मागे मुक्ता बर्वे आणि रिमा लागूचे नाटक आलेले छापा काटा! त्यात रिमा मुक्ताची आई असते आणि ती मुक्ताचे लग्न जमू नये म्हणून वेगवेगळे प्रयत्न करत असते. नंतर रिमाची भूमिका नीना कुलकर्णी करायला लागल्या. मी त्या असलेल्या संचातले नाटक बघितलेले. खुपच लाउड वाटलेल्या. रीमाचा शो बघायला न मिळाल्याचे दु:ख वाटलेले.

कबीर - लोकांना आव्डतो आहे >> पण त्यातल्या बहुतेकांना कबीर सिंग चुकीच्या कारणासाठी आवडतो आहे Sad >> म्हणूनच असे सिनेमे बनणे पटत नाही.
मी काही बघितला नाही. आधी कमीनेशी साधर्म्य साधणारा ट्रेलर बघितला तेव्हा बघायचा विचार केलेला पण TOI मधला रिव्ह्यू वाचल्यावर बिलकुल इच्छा झाली नाही.

आपल्याला हिरो हिरॉइन, खलनायक आणि त्यांनी टिपिकल वागाव अशी सवय झाली आहे बहुदा. त्यामुळ कबीर सिंग सारखी लोक अवती भवती बघून सुद्धा चित्रपटात बघितली कि ते वागणं जस्टीफाय केल आहे अस वाटत. कारण हिरो तस करतो म्हणजे ते चांगलच अस काहीतरी. आता नवनविन मस्त मुव्हिज येताहेत. टिपिकल हिरो हिरॉइन नसलेले. बघायला छान वाटतय उलट त्यामुळ.
कबीर सिंग पण बघेन. शाहीद दिसलाय पण गाण्यात भारी एकदम.

>>त्यामुळ कबीर सिंग सारखी लोक अवती भवती बघून सुद्धा चित्रपटात बघितली कि ते वागणं जस्टीफाय केल आहे अस वाटत. >> अगदि खरय.
ते ग्लोरिफिकेशन पटले नाही. नायिकेचे पात्र इतके मंद का दाखवलय? डॉ बनायला चाललेली मुलगी इतकी कमालीची बाव़ळट !!!! कोणी मुलगा जबरदस्ती करत चाललाय आणि हिला मेंदू नसल्यासारखी तो सांगेल तसं वागते. मला खरं तर त्या सर्किट कबीर पेक्षा त्या बयेचा राग आला.

म्हणूनच असे सिनेमे बनणे पटत नाही >>
याबाबत फारच मुलभूत विचार करायला हवा. आपल्याला अशी पात्रं प्रत्यक्ष आपल्या आजूबाजूला दिसत असतील, कथा कादंबर्‍यांत येत असतील, तर पडद्यावर आलेली का नको आहेत? सिनेमा म्हणजे काय संविधान थोडीच आहे. एखादा नायक किंवा एखादी प्रवृत्ती प्रत्यक्षातून किंवा पुस्तकाच्या पानावरून पडद्यावर आली तर अचानक त्याचं ग्लोरिफिकेशन कसं होईल? कथा सांगण्याचं आणाखी एक निराळं माध्यम- इतकंच काय ते. त्यातल्या तथाकथित क्रिएटिव्ह बाबी बाजूला ठेवल्या, तरी गोष्टी बघायला ऐकायला सर्वांनाच आवडतं ना..

डॉ बनायला चाललेली मुलगी इतकी कमालीची बाव़ळट >>>
अहो हे तर काहीच नाही. ती पोर फक्त १९ वर्षांची आहे. अजून मेडिकलला अ‍ॅड्मिशनच फक्त घेतली आहे. पन्नाशी साठी उलटलेल्या, आयुष्यात इतके अनुभव घेतलेल्या अणि शिवाय उच्चविद्याविभूषित वगैरे बायकांना फेसबुकवर प्रेमाच्या जाळ्यात ओढून अमुक लाखांना फसवलं- अशा बातम्या आपण रोजच वाचतो की नाही? हे लोक कुठे मेंदू गहाण ठेवतात? (असं आपण बातमी वाचून म्हणतो :फिदी:) तर ते तसं नाही, हेच खरं. हा असा मूर्खपणा करताना ते स्वतःच्या मेंदूचंच ऐकत असतात. मेंदू कुणाचाच कधीच गहाण पडत नाही. इथं तर कंबख्त प्यार.. वगैरे..
आणखी म्हणजे, या अशा फेसबुकवर फसवल्या जाण्याच्या बातम्या (स्टोरी / गोष्टी) 'पेपरात' रोज आल्यामुळे 'ग्लोरिफिकेशन' होत नाही का? का?

साजिरा + १
१८-१९ च्या मुली प्रेमात अशा स्वतःची बुद्धी नसल्यासारख्या वागतात हे बघितलंय.

>>>तर पडद्यावर आलेली का नको आहेत?>>>
पडद्यावर आलेली नको असे नाही. पण पडद्यावर ती कशा स्वरूपात पेश होतात ह्याचा विचार करणे आवश्यक आहे. सध्या झी मराठीवर चालू असलेल्या रात्रीस खेळ चाले मालिकेतील अण्णा नाईक हे पात्र असेच आहे. गुणा-अवगुणाच्या बेरीज-वजाबाकीत अवगुण जास्त भरतील. परंतु मालिकेत ते व्यवस्थितपणे अधोरेखित झाले आहेत. ह्या उलट तुला पाहते रे मालिकेत विक्रांत सरंजामेचे सगळे गुन्हे प्रेक्षक आणि मालिकेतल्या पात्रांसमोरसुद्धा आले आहेत पण सध्या तरी track नायिका त्याला माफ करेल अश्याच वळणाने जाताना दिसते आहे. माझ्या नवऱ्याची बायको ह्या मालिकेबद्दल तर बोलायलाच नको.
रंग दे बसंती चित्रपट एकदम इंटेन्स आहे. त्याचा शेवटही असाच मनावर जबरदस्त ठसा सोडणारा आहे. पण चित्रपटगृहातून बाहेर येताना तरुण पिढीसमोर चुकीचा पायंडा पडेल असे वाटलेले. सुदैवाने तितके काही झाले नाही. उलट निर्भयाप्रकरणी बऱ्याच आशावादी स्वरुपात चित्रपटाचा परिणाम समोर आला. तेव्हाच कुठे त्या चित्रपटाबद्दल थोडे बरे वाटले.
देव डी देखील असाच एक चित्रपट होता. त्यात कुठेही नायकाच्या वागण्याचे ग्लोरिफिकेशन झाले नाही. पण तरीही पडद्यावर बघताना तो फार उल्हासदायक अनुभव नव्हता. आता कुणी म्हणेल प्रत्येक चित्रपट उल्हासदायकच असायला हवा असे नाही. तर हो अशी काही आवश्यकता नाही. पण असा चित्रपट मी जाऊन बघावा हे देखील आवश्यक नाही.

वेडिंगचा सिनेमा पाहिला.
ठीक आहे.
त्यातल्या नायिकेने फारच ओवर अॅक्टिंग केली आहे
क्रिमिनल जस्टिस मध्ये नायकाची बहिण होती. तिथे तर खूप सहज आणि छान अभिनय केलाय तिने.. या पिक्चर मध्ये का असा अभिनय केलाय कुणास ठाऊक.! सतत अती हसू आहे चेहर्‍यावर.!
एकदम मिसफिट वाटते ती या रोलमध्ये..

नायिकेचे पात्र इतके मंद का दाखवलय? डॉ बनायला चाललेली मुलगी इतकी कमालीची बाव़ळट !!!! कोणी मुलगा जबरदस्ती करत चाललाय आणि हिला मेंदू नसल्यासारखी तो सांगेल तसं वागते. मला खरं तर त्या सर्किट कबीर पेक्षा त्या बयेचा राग आला.>>>>> i swear! ती अत्यंत मंद तरी दिसते नाहितर चेहर्‍यावर पाळलेल्या कुत्र्यासारखा भक्तीभाव असतो.

ते ग्लोरिफिकेशन पटले नाही. नायिकेचे पात्र इतके मंद का दाखवलय? डॉ बनायला चाललेली मुलगी इतकी कमालीची बाव़ळट !!!! >>
उलट मला ते पटले. म्हणजे ते ग्लोरिफाय केले नाही तर असा माणुस असु शकतो हेच दाखवलय अस वाटल. आपल्याला ते ग्लोरिफाय केलय अस वाटत कारण तो हिरो आहे आणि हिरोने वागलेल आदर्शच असत अस आपल्या मनावर बिंबलय .
डॉक्टर मुली अगदी मुर्खासारख्या वागु शकतात. शिक्षणाचा आणि भावनेत वाहून जाण्याचा काही संबध नाही. एखाद्या डॉक मुलीला वडीलांच प्रेम मिळाल नसेल तर मोठेपणी ती कबिर सिंग सारख्या अति प्रेम करणार्‍या/प्रोटेक्ट करणार्‍या व्यक्तीचा आदर करायला लागु शकते/प्रेम करायला लागु शकते, अ‍ॅज अ मेल अ‍ॅथोरेटिव्ह फिगर म्हणुन.

मला काय म्हणायच आहे ते बहुदा लिहिता येत नाहीये. पण साजीर्‍याने एकदम पर्फेक्त लिहिलय. तेच मला म्हणायच आहे. Happy

कबीर सिंग न आवडणारे पण लोक आहेत???
तुम्ही आयुश्यात खरे प्रेम केले असेल तर नक्कीच आवडेल.
एक नंबर पिच्चर आहे.

साजिरा, सर्वच प्रतिसाद अतिशय उत्तम...

>>>'अशी माणसं असतात' हे सांगणं, आणि त्याची एक कथा पडद्यावर मांडणं- इतकंच ते आहे. 'एक कथा' म्हणून आपण पदद्याकडे का बघू शकत नसू. सतत सूक्ष्म आणि तत्त्व पातळीला का जायचं ?<<< .

हे ही छानच..

सुपर ३० आवडला. चांगल्या कथेला बॉलिवूड मसाला अ‍ॅडिशन मस्त जमली आहे. गाणी प्रसंगानुरूप आलेली आहेत उगीच टाकलेली वाटत नाहीत. ह्रितिक आणि सगळ्यांचाच अभिनय मस्त झाला आहे.

सतत सूक्ष्म आणि तत्त्व पातळीला का जायचं ?<<< .>> कोण जातंय पण प्रॅक्टिकली रोज पेपर मधल्या बातम्या जरी वाचल्या तरी मुली बायका किती असुरक्षित आहेत फक्त संशयावरून मारलेल्या, आंतरजातीय विवाह केला म्हणून, फक्त तिने ह्याच्या प्रपोजलला नाही म्हट ले म्हणून चवताळलेल्या रँडम मुला कडून मारल्या गेलेल्या अश्या कितीतरी मुलींच्या सत्य कथा आहेत. अश्या परिस्थितीत हेच वागणे बरोबर आहे ह्याचे समर्थन करणारे सिनेमे आले व ते चालले की असे वागणे नॉर्मलाइज होते व बरोबर वाटू लागते ते तसे नाही इतकेच. नवरा म्हणजे मालक. ही मानसिकता बरोबर नाही एका बाप्याचे प्रेम आपल्या ला मि ळावे ह्या फेक सुरक्षिततेसाठी ( कारण ते काही काळाने गळून दुसृया स्त्रीवर बसू शकते कधीही) एका स्त्रीने काय काय सहन करा वे, आपल्या विचारांना व व्यक्तिमत्वाला किती परेन्त मुरड घालावी हा तिचा व त्याम्चा वै यक्तिक प्रश्न आहे. तिला मारच खायचा असेल व त्यात आनंद व सुर क्षित वाटत असेल तर मी तिचे डोळे उघडू शकत नाही. पण हे बरोबर नाही.
जेव्हा वैयक्तिक सुरक्षिततेचा व विचार लैंगि क स्वातंत्र्याचा मुद्दा येतो तेव्हा मी अश्या कबीर सिंग टाइप व्यक्तिमत्वाचे समर्थक करू शकत नाही.
माय बॅड. पण असे कोणी वागायचा प्रयत्न जरी केला तरी माझे रक्त खवळेल. आत्या बाईचे निखळ स्त्रीत्व विसरलास काय रे खंडेरावा.

आत्या बाईचे निखळ स्त्रीत्व >> क्या याद निकाली बॉस

उंटमारे देशमुखाच्या गढीत झालेला नवर्‍याचा हॉरिबल खून. तीही एक कथाच आहे अमा. खरी कथा असण्याची प्रचंड श्गक्यता. हे असो, पण याहीपेक्षा भयानक कथा प्रत्यक्ष आयुष्यात घदलेल्या असतील्च ना.
चांगलं आणि वाईट असं काही नसतं, कथा ही कथा शेवटी. सारे मानवी गुणधर्म आपोआप पृथ्वीवर घडणार्‍या कथांना चिकटून येणारच. तसे ते आले नाहीत, तर ती कथा मला माझी वाटणार नाही. इट वोंट बी ह्युमन.

समर्थन हा पुढचा भाग. कशाचं समर्थन हा त्याच्याही पुढचा. कथा आहे तशी मांडणं, मग ती कुठच्याही माध्यमात असो- याला माझं समर्थन. कथेच्या पात्राच्या वागण्याला समर्थन- हा पुढचा भाग, आणि बराचसा वैयक्तिक आहे. ं हे कोण ठरव्णार? पण एक्झॅटली याच पायावर तुम्चा आक्षेप समर्थनीय ठरतो. जनरल तत्त्व म्हणून तुम्ही असं बोलत असाल तर ओके आहे. मात्र कबीर न बघताच 'तात्त्विक पातळीवर विरोध हे कबीरावर अन्याय करणारं आहे.

ह्याचे समर्थन करणारे सिनेमे आले व ते चालले >> समर्थन नाहीये अमा. समर्थन आहे असं समजणार्‍या लोकांना कबीरसिंग आवडतो आहे- हे मला प्रॉब्लेमॅटिक वाटतंय. तुम्ही सिन्मा बघा, काय म्हणायचा प्रयत्न करतो आहे ते लक्षात येईल.

तुमचं आणि माझं आहे, तसं कबीरचंही स्वतःचं तत्त्वज्ञान आहे. ऑपरेशन्च्या वेळी, कामवालीला पळवताना, प्रिन्सिपलला उत्तर देताना, कॉलेज संपल्यावर तडकाफडकी प्रेयसीचा निरोप घेऊन परदेशात पीजी करायला जाताना- अशा अनेक प्रसंगात हे त्यानं स्वतः 'कॉईन' केलेलं तत्त्वज्ञान समोर येतं. तो 'पु.व.डू.' आहे, असं अनेकांना वाटलं (आणि त्यामुळे काहींना सिनेमा आवडला!), पण ते तसं नाही. प्रेयसी सोडून गेल्यावर तो हॉरिबली कोसळला आहे. हे नेहेमीचंच, आणि सिनेम्यांत हजारो वेळा बघितलेलं आहे आपण. पण कबीर थोडा वेगळा यासाठी, की कोसळण्यातून सावरायची त्याला घाई नाही. ही वाँट्स टू गो थ्रू इट. त्याच्या आजीने सांगितल्याप्रमाणे 'ये सफरिंग उसका खुदका है, उसीका रहने दो. लेट हिम गो थ्रू इट. उसके बाद वो अपनेआप ठीक होगा.'

देवदास, देव-डी, कोसला, कॅचर इन द राय इ.ची आठवण होईल. पण हे प्रकरण आणखी किंचित निराळं आहे. त्याची स्वतंत्र चर्चा व्हायला हवी. शेवट असा नसता तर चार चांद लागले असते. पण शाहीद सुपरस्टार आहे. हिशेबवह्यांचा विचार आड आला असणार..

काय शेवट आहे?

तमाशाने माणूस बिघडत नाही व कीर्तनाने सुधारत नाही- इति निळूजी फुले

खंडेराव- आत्याबाई काय गोष्ट आहे?
कबीर सिंग वेगळा धागा काढा ना प्लीज, मी पहिला नाहीये पाहणार पण नाहीये पण चर्चा वाचायला आवडेल

सिंबा, हिंदू रे.

वरती गलीबॉयचा विषय काढलेला कुणीतरी. गलीबॉय हे अचाट सुंदर कमर्शियल क्राफ्ट आहे. जोया अख्तर, यू नो. कबीर सिंग आणि गलीबॉय दोघांची ट्रीटमेट अत्यंत आधुनिक आणि फ्रेश आहे. क्राफ्ट आणि टेकिंग म्हणून गलीबॉय उजवा आहे. कथा आणि कॅरे़क्टर्स साठी कबीरसिंग.

या निमित्ताने गलीबॉय शाहीदने आणि कबीर रणवीरसिंगने केला असता तर काय- असा विचार आला. इंटरेस्टिंग. तरीही दोन्ही सिनेमे सुपरहिट झाले असतेच..

अर्थात याला काही अर्थ नाही. खिलजी सलमानने आणि रतनसिंग देवगनने केला असता तरीही पद्मावत हिट झालाच असता Proud

चित्रपट आवडला म्हणजे त्या व्यक्तीमत्वाच समर्थन केलय अस होत नाही. कुणाला रामायण आवडत म्हणुन ते रामाची/रावणाची समर्थक असतीलच अस नाही. आता कोणी चित्रपटावरून प्रेरणा घेवून असं काही करण्याचा प्रयत्न करीत असतील म्हणुन हे असे चित्रपट काढु नयेत अस वाटत असेल ठिक आहे. पण मग प्रत्यक्ष अशी माणस असु शकतात हे डिनाय केल्यासारख झाल. आपण सगळे अ‍ॅडल्ट आहोत. कुठून प्रेरणा घ्यायच्या आणि कुठुन नाही ह्याच भान असलेला अशा ग्रुहितकावर आधारीत असे चित्रपट येणारच. सतत जर आपण समाजमनावर परिणाम होतो, चुकीच्या गोष्टी ग्लोरिफाय केल्या जातात वगैरे भितीने 'गोष्टी' सांगायच थांबवल तर कठिण होईल. यापेक्षा ती गोष्ट आहे, कला आहे ती एंजॉय करुन त्यातून काही संदेशच घेतला पाहिजे असा विचार न करता ती गोष्ट ऐकली तर?
परत आणि आपला चॉईस आहेच.

सजिरा आणि सीमा,
भारतात इतका तर्कशुद्ध विचार करणारा, सिनेमा म्हणजे कथा आहे, खरी / सत्य गोष्ट नाही हे कळणारा - मानणारा किती टक्के प्रेक्षकवर्ग आहे? पडद्यावर दिसणार्‍या अभिनेत्याला देवाचा दर्जा देऊन त्याची पूजा करणारा वर्ग अधिक दिसतो. सिनेमा असो वा क्रीकेट पडद्यावर दिसणार्‍या आवडत्या नायकाचे अनुकरण करणे फार कॉमन आहे भारतात.

Pages