चित्रपट कसा वाटला - ३

Submitted by टीना on 11 April, 2017 - 16:44

या आधीचा धागा : http://www.maayboli.com/node/48143
हिंदी/मराठी/इंग्रजी चित्रपट कसा वाटला याबद्दलचे हितगुज.
आधीच्या धाग्यावर प्रतिसादांनी २००० चा टप्पा ओलांडल्यामुळे हा नवा धागा यापुढील चर्चेसाठी..

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

कबीर सिंग, अर्जुन रेड्डी आणि त्याच्या दिग्दर्शकाच्या मुलाखतीवरून इथे बरीच चर्चा होते आहे. स्त्रीवाद्यांना हे दोन्ही चित्रपट आक्षेपार्ह वाटलेत आणि दिग्दर्शकाच्या वक्तव्यावरून त्या आक्षेपांना खतपाणी मिळालंय.

प्राईमवर द नोटबुक पाहिला. कथा सुरवातीला छान वाटली पण शेवटची 15 मिनिटे का ही ही कॅटेगरीत गेली. शिकाऱ्यातून झालेले काश्मीरदर्शन व शिकारा तलावात फिरतानाचे चित्रीकरण अफाट आहे.

Some (or not everyone is /) are not fit to become parents ---असा काहीतरी बोध होता म्हणे पिहू चा!जेव्हा pic release झाला तेव्हा कोणाची तरी मुलाखत वाचली होती. मला पण बघावेल असं वाटतं नाही, trailer च भयंकर होता.

पण शेवटची 15 मिनिटे का ही ही कॅटेगरीत गेली >>> अगदी अगदी.

दिग्दर्शक प्रचंड गोंधळलेला वाटला. आधी वाटले की एकाकीपणामुळे स्वतःचा स्वतःशी संवाद चालू आहे नायकाचा. मध्यंतरापर्यंत खूप मस्त होता. काश्मीरदर्शन खिळवून ठेवते आणि तो एकटेपणा हळूहळू मनात भिनू लागतो. मध्यंतरानंतर वाटायला लागले होते की 'लेक हाऊस' सारखी सुंदर प्रेमकथा असेल (अर्थात लेक हाऊसचा ट्विस्ट बॉलीवूडला झेपणारा नाहीये म्हणा). या दोन्हीपैकी काहीही असते तरी चालले असते कारण बाकीची भट्टी मस्त जमून आली होती. पण मग सिनेमा ज्या नोटवर संपतो तो अगदीच फुसका बार वाटला.

पण हीरो आणि हिरवीण दोघेही प्रॉमिसिंग वाटले. ती तर नूतनची नात आहे. अभिनयात वडलांपेक्षा आजीचे गुण आहेतसे वाटले. अर्थात एकाच सिनेमावरून अंदाज बांधणे योग्य नाहीच.

अर्जुन रेड्डी पाहिला. फार फार पीळ वाटला. ३ तासांच्या लांबीतला शेवटचा १ तास तर फार जास्ती. तेच अन तेच अन तेच.

चांगल्या प्रकारे एडिट करून पावणेदोन - दोन तासात उरकला असता तर क्रिस्पनेस मुळे बरा वाटला असता.

सुपर डिलक्स हा तमिळ सिनेमा बघाच, नेटफ्लिक्स वर आहे.
आर्टिकल १५ चांगला आहे. पण आयुष्मान फार कमी पडतो.

कबीर सिंग पाहिला. नाही आवडला.
जरा सायको वाटला कबीर. स्वत: च्या आई वडील्,भाऊ कुणाचाच विचार तो करत नाही.
स्व्तःचं आयुष्य, करीयर पणाला लावतो.. काहीही..!
फक्त शिवाचं पात्र आवडलं.. मैत्री मस्त दाखवली आहे. बिचारा मित्रासाठी स्वतःची बहिण द्यायला तयार होतो..!

कबीर सिंग पाहिला. नाही आवडला.
जरा सायको वाटला कबीर >>>>>>>>>> कबीर सिन्ग रिमेक आहे तेलगू सिनेमा ' अर्जून रेड्डी' चा.

मैत्री मस्त दाखवली आहे. बिचारा मित्रासाठी स्वतःची बहिण द्यायला तयार होतो..!>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>> मैत्री हे मोठ्या आणि छोट्या पडद्यावर दाखवलं गेलेलं आणि दाखवण्यात येणारं सगळ्यात ओव्हररेटेड नातं आहे.

मैत्री हे मोठ्या आणि छोट्या पडद्यावर दाखवलं गेलेलं आणि दाखवण्यात येणारं सगळ्यात ओव्हररेटेड नातं आहे.

>>>>> पुर्णपणे सहमत !!

क्रॉल : नाव ऐकल्यावरच अंगावर शहारा आला होता म्हणुन पाहिलाच. सभ्य भयपट वाटला. त्यामुळे आवडला.

सभ्य भयपट : ज्यात अती रक्तपात दाखवत नाहीत, पाहवणार नाहीत अशा पद्धतीने माणसे मेलेली दाखवत नाहीत, फार किंचाळ्या नाहीत, मृत्यु काटा आणणारा वेळखाऊ पाठलाग करत नाही पण तरीही सारखी भितीची भावना मनात असते.

‘ए एम सी’ चे परवा सरळ सभासद झालो. महिन्याला २०$ बरे वाटले दर सिनेमाला १२-१४$ देण्यापेक्षा. आता आठवड्याला ३ चित्रपट कुठेही पहाता येतील. लगोलग एन्डगेम, स्पायडरमॅन व क्रॉल पाहिले ३ दिवसात. कंटाळा आला की सभासत्व रद्द करता येतेच केव्हाही.

महिन्याला २०$ बरे वाटले दर सिनेमाला १२-१४$ देण्यापेक्षा. >>> थँक्स. ट्राय करायला पाहिजे.

झॉम्बी विषयावरचे दोन चित्रपट पाहिले: ट्रेन टू बुसान (कोरियन आहे, इंग्रजी सबटायटल्स), आणि द रिझॉर्ट. दोन्ही बघण्यासारखे आहेत पण पहिला जास्त थ्रिलर आहे. दुसरा ऑल्मोस्ट स्काय फाय चॅनेल वर असतात तसा आहे, अ‍ॅमेच्युअरिश.

कबीर सिंग मध्ये टॉक्सिक पौरु शाला उदो उदो केले गेले आहे. व हेच नॉर्मल आहे असे ठ्सवायच प्रयत्न आहे. ओरिजि नल रेड् डी फ्युडल माइंडसेट - सरं जाम शाही मानसिकता - अनुभव ली आहे , मारहाण नव्हे पण रेड्डी व इतर दोर्रा लोक कसे वागतात ते बघितले आहे त्यामु ळे ओरिजिनल व हा दोन्ही सिनेमे बघायची शक्यता नाही. पण लोकांना आव्डतो आहे. Sad

काल परवाच्या टाइम्स मध्ये सर्वाइ विन्ग द कबीर सिंग इन माय लाइफ म्हणून दोन तीन बायकांचे अनुभव आले होते तेच भीतिदायक आहेत.
एका बाईचा नवरा तिला इतकी मारहाण करत असे की ते बघुन तिचा मुलगा मुकाच झाला बोलेचना शेवटी तिने घर सोडले.

काल आरची रिंकूचा कागर बघितला. ट्रेलर ठीकठाक वाटला होता पण चित्रपट प्रत्यक्षात काहीच्या काही आहे. अचाट कथा व त्याची ढिसाळ पटकथा...

रिंकू छान बारीक झालीय, दिसलीही चांगली, उच्चारात मात्र मार खाते. बाकी पात्रे, विशेषतः तिचे आईवडील प्रमाण मराठीत बोलत असताना मुलगी अशी का बोलते याचे स्पष्टीकरण आले असते तर थोडेफार पटले असते. अभिनयाचा उजेड पाडायच्या संधी उत्तरार्धात येतात पण तोवर मीच इतके कंटाळले होते की रिंकुच्या चेहऱ्यावरील कंटाळाही चित्रपट टुकार असल्यामुळे दिसतोय असा मी समज करून घेतला. Happy

Tc. Gn मागेच पहिला prime वर. छान आहे.
काल prime वर मोगरा फुलला पहिला. खूप बोर झाला. Story तर बोर आहेच. पण acting च्या नावानेही आनंदाच आहे. नीना कुलकर्णी एरवी आवडतात पण त्यात काहीही दाखवलाय त्यांच character. मुलगा दुरावेल म्हणून कुणी मुलाचं लग्न लावून न देता राहील का... ती हिरवीन पण बोर आहे.

कबीर सिंग ...... एकदम घाणेरडा आणि फालतू. अगदी अतिरेकी, काहीच अर्थ न कळणार. >>> मी फाफॉ करत बघितला, एकाही सीनवर ५ मिन्स च्या वर थांबू शकले नाही .
पूर्ण चित्रपटाचा हेतूच कळला नाही.
शाहिद आणि कियारा मात्र आवडले.

मुलगा दुरावेल म्हणून कुणी मुलाचं लग्न लावून न देता राहील का... >>>हो, असतात अशी लोकं. मी पाहिलेत. ते तर त्यांची मुलगी तीशीच्या वर गेली तरी तिचे लग्न करायला तयार नव्हते.

Pages