चित्रपट कसा वाटला - ३

Submitted by टीना on 11 April, 2017 - 16:44

या आधीचा धागा : http://www.maayboli.com/node/48143
हिंदी/मराठी/इंग्रजी चित्रपट कसा वाटला याबद्दलचे हितगुज.
आधीच्या धाग्यावर प्रतिसादांनी २००० चा टप्पा ओलांडल्यामुळे हा नवा धागा यापुढील चर्चेसाठी..

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

वेडींगचा शिणेमा एकदा बघू शकतो. जे या फेजमधून चाललेत त्यांना कदाचित रीलेट पण होईल. हिरॉईन अजिबात आवडली नाही. तिचं जेवढं कौतुक पेपरमध्ये वाचलं होतं तेवढी ती छान वाटली नाही. घसा बसल्यासारखा आवाज आहे तिचा. मुक्ता बेस्ट आहे. भाऊ, अलका कुबल, शिवाजी साटम हुकमी एक्के आहेत. संकर्षणने छान काम केले आहे. सुनील बर्वे evergreen आहे. केस न रंगवून त्याने वय स्वीकारलं आहे हे दिसतं. अश्विनी काळसेकर कॉमेडी करत आहे असेच वाटते, सीरियस बोलत असली तरी. तिच्या आधीच्या कामांचा परिणाम असावा.

शिवाय अश्विनी काळसेकरने बोटॉक्स करून चेहरा भयाण करून घेतला आहे. मध्ये माधुरी दिक्षितच झालं तेच हिचं पण झालं आहे. भावनाविरहीत प्लास्टिकचा चेहरा वाटतो. खरं तर ती छान दिसायची आणि जे काही छोटेमोठे रोल्स असायचे त्यात लक्षात राहण्या इतपत चांगलं acting पण करायची. बोटोक्सने मात्र चेहऱ्याचे मसल्स आखडतात आणि acting चेहरा आणि डोळ्यापर्यंत पोचतच नाही.

तिचा चेहेरा मला तजेलदार आणि छान वाटला. आधीपेक्षा जास्तच ग्लो करत होती ती. मला आवडते पण यात डॉक्टर म्हणून नाही पटली. सुनील बर्वे मनोविकारतज्ज्ञ असतो हे शेवटी कळलं. संकर्षणची बायको दाखवलेली ती या आधी कशात बघितल्याचे आठवत नाही.

वेडिंग चा सिनेमा बघायचा प्रयत्न केला. हिरो, हिरवीण कोणीच आवडेना. "बोल बोल बोल पक्या "एवढं भयाण lyrics असलेलं आणि महाबोरिंग चाल असलेलं गाणं सुरु झाल्यावर बघायचं बंद केलं. सलील कुलकर्णी एक गायक, संगीतकार म्हणून आवडतोच (इतका की त्याच्या बिल्डिंग समोरून pass होतं असताना मी बऱ्याचदा बघत असते तो दिसतो का. एक भाबडा आशावाद. )त्यांनी तेच करावं.

"बोल बोल बोल पक्या "एवढं भयाण lyrics असलेलं आणि महाबोरिंग चाल असलेलं गाणं सुरु झाल्यावर बघायचं बंद केलं. >>>>> अगदी अगदी.. बडबडगीत Proud

'व्हायरस' हा मलयाळम चित्रपट चुकवू नये असा आहे. केरळात निपाह व्हायरसचा धुडगूस आणि सरकारी यंत्रणा, डॉक्टर व सामान्य नागरिक यांनी या विषाणूचा केलेला सामना, असा विषय आहे. पटकथेची रचना अभ्यासावी अशी आहे. लहान भूमिकांतही उत्तम, नावाजलेले अभिनेते आहेत. रेवती, पार्वती, तोव्हिनो थॉमस, कुन्चाक्को बोबन, रिमा कलिन्गाल, इन्द्रजीत सुकुमार, जिनू जोसेफ, मॅडोना सेबास्टियन, सौबिन शाहीर असे एकापेक्षा एक नट चित्रपटात आहेत. नक्की बघा.

अ‍ॅडम सॅन्डलर आणि जेनिफर अ‍ॅनिस्टन चा मर्डर मिस्ट्ररी आलाय नेट्फ्लिक्स वर..छान आहे एकदम हलकाफुलका!

बोल पक्या गाणं अवधुतने संगीतबद्ध केलंय.

नवीन Submitted by सान्वी on 18 June, 2019 - 00:45>>ओह.. हे माहिती नव्हतं.. तरीच. स. कु. एव्हढी बोर चाल देणार नाही.

विन्सी दा

व्यक्तीमधला कलाकार मोठा की माणूस मोठा? ज्यांच्या कलेवरून जीव ओवाळून टाकावासा वाटतो त्यांच्या अवगुणांचे किस्से ऐकले की तोच जीव कासावीस होतो. तेंव्हा हा प्रश्न हमखास पडतोच. आजपर्यंत ह्या प्रश्नाचे स्वतःलाच हमखास पटणारे उत्तर मला मिळाले नव्हते. कधी वाटायचे एवढ्याश्या दुर्गुणाकरता एवढी महान कला कशी नजरेआड करायची? तर कधी ज्याची मनात पुजा बांधली त्याचेच पाय मातीचे निघाले हे बघून खूप दु:ख व्हायचे. दुर्गुण त्या कलाकारापुरते मर्यादित असतील तर एकवेळ त्याकडे दुर्लक्ष करता येत होते पण जेंव्हा त्याचा समाजावर (अगदी अल्प का होईना) परीणाम व्हायचा तेंव्हा हा गोंधळ खूप वाढायचा.

आपला दूर राहून इतका गोंधळ उडतो तर प्रत्यक्ष त्या कलाकाराची काय अवस्था होत असेल? एक तर त्या कलेची 'ती येते आणिक जाते' अशी बेभरवशी वागणूक. ती आल्यावर मग एखादी कलाकृती घडणार, इतर वेळेला नुसतीच तगमग. बरं ती आल्यापासून ते कलाकृती घडण्यापर्यंतचा प्रवासही सोपा नाहीच. तो झपाटलेपणा, त्या प्रसूतीवेदना तो एकटाच सहन करत असतो. बाकीचे नुसतेच बघे असतात. खूप वेळेला तर त्या कलाकाराला तर्‍हेवाईक, विक्षीप्त ठरवले जाते. तो बिचारा ते पण सहन करतो. पण जेंव्हा त्याच्या कलेला व्यवहाराच्या तराजूत हीन ठरवले जाते तेंव्हा तो खवळून उठतो.

अशाच खवळलेल्या कलाकाराच्या मनःस्थितीचा कोणी गैरफायदा घेतला तर? विन्सी दा अशाच एका कलाकाराची गोष्ट सांगतो. poetic justice या काहीश्या हव्याहव्याशा पण तरीही थोड्या बटबटीत सूत्राने हनेसगळा सिनेमा विणलेला आहे. पण त्यातली दोन्ही प्रमुख पात्रं इतकी अस्सल आहेत की पात्रं उरत नाहीत, आपल्या भोवताली दिसणार्‍या माणसांत आपण त्यांना शोधू लागतो. कधीकधी ते दोघेही आपल्यात पण आहेतच ही पण जाणीव होते. पण मला सगळ्यात आवडलेली गोष्ट म्हणजे दोघांची ग्रे स्केल. दोघेही सारख्याच ग्रे पातळीवर आहेत पण तरिही 'हा सूर्य आणि हा जयद्रथ' इतक्या स्वच्छपणे 'हा नायक आणि हा खलनायक' हे जाणवते.

नावाने सूचीत केल्याप्रमाणेच सिनेमा बंगाली आहे. पहिला एक तास सब टायटल्सच्या कुबड्या लागतात. पण मग एकदा आत शिरल्यावर भाषेची फारशी जरुरी उरत नाही. मोजकीच पात्रे आहेत आणि सगळ्यांचेच अभिनय बावनकशी आहेत. मेकअप, वेशभूषा, केशभूषा इतके वास्तव आहेत की ग्लॅमरचा पूर्ण अभाव आहे. पण तरीही सिनेमा कंटाळवाणा कुठेच होत नाही. सिनेमा जरी कलाकार आणि माणूस यांच्यावर बेतलेला आहे तरी सिनेमा पूर्विच्या कलात्मक सिनेमांसारखा अबोध, संथ, कंटाळवाणा जराही नाही

आवर्जून बघावा असा हा सिनेमा प्राईमवर बघता येइल.

विन्सी दा इथले वाचून पाहिला. खूप छान बनवलाय. एका कलाकाराची तडफड सुरेख दाखवलीय. पहिली घटना घडून गेल्यावर दुसऱ्या घटनेसाठीची ऑफर मिळते तेव्हा आपण भयंकर चूक करतोय हे विन्सीदा ला पटलेले असते पण इतके चॅलेंजिंग काम हातचे घालवायला त्याच्यातील कलाकार तयार होत नाही. अप्रतिम घेतलाय हा सिन.

धन्यवाद माधव.

वेडिंगचा सिनेमा पाहिला. प्रचंड आवडला. शेवटसुद्धा अगदी नेहमीचा असला तरी आवडला. मराठी सिरियल्स बघत नसल्याने शिवराजला आधी कधी बघितले नव्हते. त्याचे काम खूप आवडले. मुक्ताही छान दिसलीय व वावरलीय. दोन्ही बर्व्यांनी मजा आणली.

काल पाहीला. शाहीदच काम बरंच बर होतं. तसाही तो मला जास्त आवडत नाही
मुव्ही चांगला नाही पण ओके होता.
एकदा बघायला काही हरकत नाही.

आर्टिकल १५ पाहिला. आयुष्यमान खुराणा चा सिनेमा असल्याने चांगला असणार याची खात्री होतीच. अपेक्षाभंग अजिबात झाला नाही.
सगळ्याच कलाकारांचा अभिनय, संवाद, सादरीकरण चांगलं असलं तरी काही तरी कुठे तरी थोडं कमी पडतंय असं वाटत राहिलं.
तरीही वर्थ वॉचिंग सिनेमा !

https://youtu.be/7sX2To6mFZU

चार दरवेस

हॅरी पॉटर , ममी , हातीमताई व बाहुबली ह्यांचे तिलीसमी मिश्रण !!!!

ह्याचे रस ग्रहण कोण करेल ?

सुपर डिलक्स हा तामिळ सिनेमा पाह्यला. विजय सेतुपती ला मी माझ्या गुड बुक्समधे का ठेवतो हे त्याने ह्यावेळी पुन्हा सिद्ध करून दाखवलं

कलंक prime वर आलाय, कसला भंकस सिनेमा आहे! अलियाचे ड्रेस बघण्यासारखे आहेत फक्त. माधुरीचं वय दिसतं. तिला आणि संजय दत्त ला काही कामच नाहिये. संवाद पण बोगस.

आर्टिकल १५ पाहिला. आयुष्यमान खुराणा चा सिनेमा असल्याने चांगला असणार याची खात्री होतीच. अपेक्षाभंग अजिबात झाला नाही.
सगळ्याच कलाकारांचा अभिनय, संवाद, सादरीकरण चांगलं असलं तरी काही तरी कुठे तरी थोडं कमी पडतंय असं वाटत राहिलं.
तरीही वर्थ वॉचिंग सिनेमा !
+१

कुठे तरी कमी पडतंय असं जे मला वाटतंय त्याबद्दल लिहिले तर ते कथा उघड केल्यासारखे होईल म्हणून आता लिहित नाहीये.

Netflix वर पिहू बघितला. प्रचंड disturbing चित्रपट आहे. मी तर फटटू असल्याने मला बघवतच नव्हता but I forced myself to watch till the end in one sitting.
इतकं अस्वस्थ करणारं अलीकडे दुसरं काही बघितलं नाही.
पिहू या दोन वर्षांच्या मुलीची आई झोपेच्या गोळ्या घेऊन आत्महत्या करते. नवऱ्याशी भांडण झालेलं असतं. नवरा सकाळी उठुन मिटींगला निघून जातो. बायकोने असं केलंय हे त्याला माहित नसतं. पिहू उठते. आई झोपेतून का उठत नाहीये तिला कळत नाही. मग ती दिवसभर घरात एकटीच एका मागून एका संकटात सापडत राहते. बापाने ऑन ठेवलेल्या इस्त्रीने हात भाजतो, खाणं शोधताना फ्रीजमध्ये अडकते, बाल्कनीच्या गजावर डेंजरसली वर चढते, गॅसवर चपाती जळते, उरलेल्या झोपेच्या गोळ्या तोंडात टाकते वगैरे. इथे बापाला फोनवरून काहीतरी गडबड आहे याचा अंदाज आल्यावर तो घरी यायला निघतो. होम अलोन प्लस बेबीज डे आउट बट विथ horror theme.

चित्रपट बघताना मुळात असा प्रश्न पडला की असं कोण कसं करेल? कोणती बाई स्वतः जीव देऊन लहान मुलीला असं सोडून देईल? रात्रभर झोप लागली नाही तरी पोराच्या टिफिनसाठी पाचच्या ठोक्याला उठणाऱ्या आया आपण बघतो, तोच आदर्श मानतो. पण मेंटल हेल्थ इश्यूजमुळे एखादी बाई असाही निर्णय घेऊ शकतेच. अमेरिकेत ड्रग्जमुळे दिवसेंदिवस नशेत मुलांकडे दुर्लक्ष करणारे, ओडी करून त्यातच मरून जाणारे आई बाप ही रिएलिटी आहेच.
भीतीदायक असला तरी बघावा म्हणून रेकमेंड करेन.

Pages