चित्रपट कसा वाटला - ३

Submitted by टीना on 11 April, 2017 - 16:44

या आधीचा धागा : http://www.maayboli.com/node/48143
हिंदी/मराठी/इंग्रजी चित्रपट कसा वाटला याबद्दलचे हितगुज.
आधीच्या धाग्यावर प्रतिसादांनी २००० चा टप्पा ओलांडल्यामुळे हा नवा धागा यापुढील चर्चेसाठी..

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

किरण प्राईम मेम्बरशीप मस्त आहे
विशेषतः चित्रपट आणि वाचन आवड असेल तर
ऍमेझॉन रीडर ला अनेक इबुक फुकट आहेत
ऍमेझॉन म्युझिक ला मस्त कलेक्शन आहे आणि लेटेस्ट गाणी येतात पटापट
मुव्ही इतके खास नाहीयेत नेटफ्लिक्स इतके पण किमतीतील फरक पहिला तर वर्थ आहे

प्राईम होती माझ्याकडे.
अलिकडे मला कुणी तरी सॉलीड रिकमेण्ड केल्याशिवाय नवीन काही ट्राय करता येत नसल्याने फक्त नेटफ्लिक्स ठेवले. कारण त्यातल्या काही वेबसीरीज मधे अडकलो होतो.

नेटफ्लिक्स च्या मानाने वेबसिरीज अगदीच बोर आहेत प्राईम वर
यंग शेल्डन, मिर्झापुर, टू अँड हाल्फ मेन त्यात बघतो
दुसऱ्या महायुद्धावर मात्र काही मस्त माहितीपट आहेत
ग्रे wulf म्हणून

प्राईमवर अनवट बघितला. गजेंद्र अहिरेंचा असल्यामुळे ब-याच अपेक्षा होत्या पण नाही आवडला. ना धड भूतपट ना धड समाजप्रबोधन. अप्रतिम निसर्ग आणि नावाजलेले कलाकार असूनही गंडलेला शेवट. भूलभुलैय्यासारखा करायचा प्रयत्न केला आहे पण नाही जमला. त्यापेक्षा पूर्ण हाॅॅरर दाखवला असता तर जमून आला असता. मकरंद अनासपुरे गंभीर भूमिकेत चांगले वाटले.

प्राईमवर वेडिंग चा शिनेमा पाहिला. नाही आवडला. संथ, रटाळ आहे.
त्या नवीन हिरवीनीचा आवाज फारच इरिटेटींग आहे.

मला आवडला वेडिंग चा शिनेमा, खूप वास्तव साधी सरळ कथा आहे. उगीचचा मेलोड्रामा नाही, मार्मिक आणि प्रासंगिक विनोदाची पेरणी आहे. सलीलचा डिरेक्टरील debut म्हणून बघायचाच होता न prime च्या कृपेने बघायला मिळाला. संवाद पण अतिशय obvious आणि सरळ आहेत. नात्यांचे पदर उलगडून वगैरे दाखवणारा आहे. मला तर खूप आवडला बुवा. खूप दिवसांनी असा सुंदर साधा आणि मनाला पटणारा शिनेमा पहिला (नाहीतर कौटुंबिक म्हणजे mpm सीरिज कसली पकाऊ वाटते)
गाणी पण छान आहेत वेगळ्या धाटणीची, बोल पक्या छान अवधुतचं.

वेडिंग चा सिनेमा असह्य झाला पहिल्या 10 मिनिटातच
एक तर त्या हिरवणी ला अजिबात अभिनय येत नाही आणि वर पुन्हा आवाज इतका भसाडा. पत्र्यावर कौलं घासावा तसा.
शिवराज एकदम मस्त, त्याचा हातखंडा आहे हा रोल करण्यात
सीरियल मध्ये असाच होता तो
परत धाडस झाले तर उरलेला बघेन

मर्द को दर्द... ठिक आहे अगदिच टाकाउ नाहि. कथानक थोडंफार कराटे किड (मेंटॉरच्या बाबतीत) च्या कडे जाणारं आहे. त्या मुलीने चांगलं काम केलंय मुलापेक्षा. मांजरेकर पण ठिक...

नेफिवरच चॉपस्टिक हा एक हलका-फुलका चित्रपट बघण्या लायक आहे. मुंबईत चोरीला गेलेली वस्तु पोलिंसां ऐवजी इतर मार्गाने कशी मिळवता येते याचं मस्त सादरीकरण आहे. मस्ट वॉच...

'वेडिंगचा शिनेमा' मला फार आवडला.
विशेषतः संवाद आणि मुक्ता बर्वे, शिवराज वायचाळ, सुनील बर्वे, अश्विनी कळसेकर यांचा अभिनय.
ट्रेलर अजिबात आवडलं नव्हतं, त्यामुळे फार अपेक्षा नव्हत्या. पण परवा बघताना आवडला.
वेशभूषा, छायाचित्रण आवडले नाहीत. कंटिन्यूटीच्या चुकाही आहेत.

एक तर त्या हिरवणी ला अजिबात अभिनय येत नाही आणि वर पुन्हा आवाज इतका भसाडा. पत्र्यावर कौलं घासावा तसा.
>>>धन्यवाद आशु. मी इतके वर्षे सांगतोय की मुक्ता ला अभिनय येत नाही, चेहऱ्यावर तेच तेच एक्सप्रेशन्स, माशी उडत नाही. फक्त सस्मित यांनी अनुमोदन दिले होते, आता तुम्ही पण ऍड झालात.

आता तुम्ही पण ऍड झालात.>>> तसे नाही. ओ, ते मुक्ता बद्दल नाही तर त्या चित्रपटातल्या नवर्‍या मुलीबद्दल बोलत आहेत. Proud

होय हो होय, ती नवी कोण आहे तिच्याबद्दल होतं

मुक्ता कधी कधी तोचतोचपणा करते पण अगदीच टाकाऊ अजिबात नाही
रुद्रम, जोगवा हे दोन सणसणीत पुरावे
आता ती त्या बोदल्या मैद्याच्या गोळ्यासोबत सोबत काम करून करून तशी झाल्यास माहिती नाही

ऑगस्ट रश बघितला, इतके दिवस हा चित्रपट मला का कळला नाही याचं आश्चर्य वाटलं.
खूप सुंदर चित्रपट आणि म्युजिक तर देव्हाऱ्यात सजवून ठेवावं असं.
P M NARENDRA MODI सुद्धा बघितला. फॅन्टसी जॉनरला इतका जागणारा चित्रपट आजवर बनला नसेल.
Lol

सांभाळून हा.. मागे मानबा राधिका ला फुगलेला चणा म्हणालो होतो तर काही स्त्री आयडी चिडले होते, बॉडी शेमिंग म्हणून.

Prime वर फोटोग्राफ पहिला, नवाज आणि ती धाकटी दंगल गर्ल आहे म्हणून पाहू म्हटलं, तर प्रचंड कंटाळवाणा आहे उगीच time घालवला. नक्की कशासाठी बनवला ते तो डिरेक्टर च जाणो.
रच्याकने prime वर बघणेबल अजून कुठले चित्रपट असतील तर सुचवा जुने पण चालतील

अल्लादिन फार आवडला नाही,

फान्टसी मध्ये भरपूर पात्रे, दोन चार उपकथा, असले बघून सवय झाल्याने आता दोन चार पात्रे, एकच कथा , खपणारे नाही.

कथाही बदलली आहे

ऑन्लाइन पेड संस्थळावर कुठे पहता येइल ?>> लेकीची फेवरिट मुव्ही आहे. तिला विचारून सांगते. नेट फ्लिक्स वर होती दोन वर्शां मागे.

Pages