चित्रपट कसा वाटला - ३

Submitted by टीना on 11 April, 2017 - 16:44

या आधीचा धागा : http://www.maayboli.com/node/48143
हिंदी/मराठी/इंग्रजी चित्रपट कसा वाटला याबद्दलचे हितगुज.
आधीच्या धाग्यावर प्रतिसादांनी २००० चा टप्पा ओलांडल्यामुळे हा नवा धागा यापुढील चर्चेसाठी..

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मुंबई मेरी जान हा सिनेमा २००८ मधे पाहिला होता. आजूबाजूला सर्वत्र मुस्लीम दहहतवाद आहे असा समज डोक्यात फिट्ट बसलेल्या भक्त होऊ घातलेल्या एका तरूणाचा हा सिनेमा. कथा मुद्दामच म्हटलेलं नाही. कारण या सिनेमाला कथाच नाही. हा फक्त सिनेमा आहे. भाष्य करणारा सिनेमा. जर्नेलिस्टीक मूव्ही. १००% काही लक्षात नाही. पण आता नेटफ्लिक्स वर आल्याचे पाहीले. पुन्हा पाहण्याचे योग असतील तर पाहणारच आहे.

माझी शिफारस - नक्की पहा.

किती अर्धवट माहिती दिली आहे मुंबई मेरी जान बद्दल.
त्यात सोहा अलि खान, माधवन, इरफान खान, परेश रावळ ह्यांच्याही कथा आहेत. फक्त के के मेनन ची कथा नाही.

कुणी म्हटलंय फक्त के के मेननचीच कथा आहे असं ?
(इथे पूर्ण रिव्ह्यू लिहू नये असं वाचल्याचं आठवतंय)

हे माझंच इतरत्र असलेलं लिखाण आहे. त्यातला एक पॅरा इथे डकवला होता.

मुंबई मेरी जान

या नावाचा एक सिनेमा २००८ मधे पाहिला होता. त्या वेळी बहुधा हा सिनेमा थेटरपर्यंत पोहोचला नसावा किंवा लवकरच उडाला असावा. आमीर नावाचा एक सिनेमा खूप चर्चित होता. त्याची ओरिजिनल डीव्हीडी मिळाली होती. त्यातच हा सिनेमाही एकावर एक फ्री म्हणून मिळाला.

आमीर हा मुस्लीम दहशतवादावरचा एक वेगळा सिनेमा होता. तो उत्तम होता पण का कोण जाणे त्या वेळी हा सिनेमा संघाच्या फॅक्टरीतून आल्यासारखा वाटला होता. मुस्लीम दशतवादाचा शिकार झालेला एक उच्चशिक्षित मुस्लीम युवक ही त्याची थीम होती. त्याला कसे बॉंबस्फोटासाठी मुलं बायकांना किडनॅप करून भाग पाडले जाते. त्या दबावाला तो कसा रिअ‍ॅक्ट होतो ही मुख्य कहाणी असली तरीही त्या काळात मुस्लीम दशतवादाची स्क्रीप्ट लिहीणारी जी मंडळी होती त्यांना पूरक असे वातावरण सिनेमाभर होते. त्या सिनेमाला पुरस्कार मिळाले.

तर त्याच वर्षी फिल्मफेअर मधे समीक्षकांचा पुरस्कार मिळवून मुंबई मेरी जान प्रकाशात आला.

आजूबाजूला सर्वत्र मुस्लीम दहहतवाद आहे असा समज डोक्यात फिट्ट बसलेल्या भक्त होऊ घातलेल्या एका तरूणाचा हा सिनेमा. कथा मुद्दामच म्हटलेलं नाही. कारण या सिनेमाला कथाच नाही. हा फक्त सिनेमा आहे. भाष्य करणारा सिनेमा. जर्नेलिस्टीक मूव्ही.

म्हणूनच आमीरचा उल्लेख करावासा वाटला. ज्या मानसिकतेतून आमीर सारखे सिनेमे बनवावेसे वाटत असतील तीच मानसिकता झिरपत तळाला जाऊन लोकांना हसत्या खेळत्या वातावरणातून कशी उठवते, संशयग्रस्त ईसम आजूबाजूला कशा पद्धतीने पाहतो. त्याला काय दिसते आणि प्रत्यक्षात काय असते यावर सातत्याने हा सिनेमा भाष्य करतो.

या जरनेलिझम च्या अनुषंगाने सिनेमात भरमसाट पात्रं येत राहतात. कुणी टीव्ही रिपोर्टर आहे, कुणी पोलीस. कुणी हॉटेलमधे टीपी करणारी तरूण गॅंग मधली पोरं. तर रोजच्या जगण्यासाठी धावपळ करणारी एक ना दोन शेकडो पात्रं. असा विस्तीर्ण पट हा सिनेमा मांडत रातो. सगळीच कथानकं समांतर चालत राहतात. अधून मधून ती या लेन मधून त्या लेन मधे एकत्र धावतात इतकीच.

आजूबाजूला घडणा-या घटनांची आठवण हा सिनेमा पाहताना सातत्याने होत राहते. एक कोलाज असावा तसा सिनेमा उलगडत राहतो.
हिंदू खतरेमे या भावनेने मुसलमानांकडे पाहण्याचा दृष्टीकोण दूषित झाल्याने एक विषारी वातावरण कसे सर्वत्र आहे. वरकरणी सगळे शांत पण हे जहर कसे खोल खोल भिनले आहे त्याचा उत्तम वेध दिग्दर्शक निशिकांत कामत घेतो.

मुंबईची वेगवेगळी रूपं अगदी वास्तव पद्धतीने कॅमेरा मांडतो. सुरूवातीच्या इराणी कॅफेमधल्या प्रसंगापासूनच प्रत्येक फ्रेम या वेगळेपणाची चाहूल देत राहते. प्रसंग अगदी खरे वाटावेत असे वठलेत. स्क्रीन प्ले उत्तम असेल तर दिग्दर्शकाचे काम सोपे होते. एकंदरीत सिनेमा पाहण्यासारखा आहे असे धाडसी विधान करताना रिस्क वाटत नाही.

आज हा सिनेमा पाहून अकरा वर्षे झाली. जसाच्या तसा आठवत नाही. मात्र त्याचा परिणाम अजूनही मनावर रेंगाळतोय. आता नेटफ्लिक्स वर आलेला आहे. पाहणे मस्टच आहे. बघूया.

जमल्यास तुम्हीही पहा. बहुतेक युट्यूब वर सुद्धा आहे.

The tashkent files बद्दल खूप चांगले reviews आहेत. त्याचं प्रोमोशन जास्त झालं नाही पण mouth पब्लिसिटी वर जोरात सुरू आहे.

Avengers Endgame फुल्ल बॉलिवुड टाईमपास आहे , पण जर MCU Fan असाल तर मस्ट आहे

कागरचं माहिती नाही पण रिंकू कलर्सच्या सगळ्या मालिकेत हजेरी लावतेय जाहिरात करायला. मला तर ती बारीक झालेली आर्चीच वाटते.
मुंबई मेरी जान नेटफ्लि सोडून कुठे बघता येईल, तूनळीवर पैसे भरा सांगताहेत बघण्यासाठी, हे नविन आहे माझ्यासाठी Uhoh

तिने बहुतेक बोलण्याचा टोन ही सुधारलाय बहुतेक कागर मधे.>> ट्रेलर बघून तसे काही वाटले नाही. जुनीच जरा बारिक झालेली आर्ची वाटली.

मुंबई मेरी जान नेटफ्लि सोडून कुठे बघता येईल>> इन्थुसान वर आहे
इन्थुसान वर गलि बॉय बघितला , स्पिचलेस आहे बघुन, रणविर अगदी पर्फेक्ट फिट वाटतो , आवडला मुव्ही! आलिया चा काम भारी
सगळेच पर्फेक्ट जमुन आलेत.

ताश्कंत फाईल्स पहिला का कोणी??? आज पाहिला... डोक्यात प्रचंड काहूर माजलयं... खरं काय आणि खोटं काय... इथे कोणीच कसं लिहिलं नाही या चित्रपटाबद्दल?? बऱ्याच गोष्टी इन डीरेक्टली दाखवल्यात त्यामुळे काही काही ठिकाणी संदर्भ लागत न्हवता.. इथे चर्चा झाली तर माहिती मिळवायला नक्कीच आवडेल की हे नक्की काय प्रकरण होत आणि कुणी कसं कसं प्लॉट केलं होत आणि त्यामुळे नक्की असा कोणाचा काय फायदा झाला?? शेवटी सत्ता आणि पैसा ह्याने इतिहास ही पुसता येतो??? त्यातला एक डायलॉग, 'सत्य हे एक लक्झरी आहे' बहुतेक असा काहीसा आहे... अगदी खरंय... सगळ्यांनाच ते शोधणं परवडेल च अस नाही...

ताश्कंत फाईल्स हिट झालाय. मीडियाने जवळपास बहिष्कारच घातलेला चित्रपट आहे. रिव्ह्यू दिलेच नाहीत किंवा एक दीड स्टार दिलेत. पण सोशल मीडिया व वर्ड ऑफ माऊथच्या जोरावर चित्रपट प्रॉफिटमध्ये गेलाय.
मला बघायचंय, फेसबुकवर रिव्ह्यू वाचले ते चांगले आहेत.

कसला बहिष्कार ? जाहिराती आहेत , नेटवरून तिकीट बुक करू शकता, पण शो फार नाहीत , एखादाच , तोही रात्रीचा आहे.

मी ताष्कंद फाईल्स पाहिला, एक रुका हुआ फैसला, 12 जुरी की काय तो इंगसलीश मूवी , त्या फॉरमॅट मध्ये आहे,

इंजुरी , रक्त , मल्टिपल इंजुरीतून मल्टिपल ऑर्गन काढून घेण्याची थेअरी वगैरेने तर डॉ. पारेख अन न्यूटनची मांजरीसुद्धा गरगरून जाईल.

इंजुरी करून विषबाधा लपवायला ऑर्गन काढून घेतले तर ब्रेन कशाला सोडतील ? तो नको का घ्यायला काढून ?शास्त्रीजी , डॉ भाभा , आणि शास्त्रीचे दोक्तर की द्रायव्हर असे कुणीतरी , असे सलग चार लोक अल्पकाळात अपघाती निधन पावले , हे मात्र विचित्र आहे , हे नक्की.
समाजवादावरच्या कमेंट मात्र पटल्या नाहीत. शास्रीना समाजवाद मान्य नव्हता, हेही पटत नाही.

शास्त्री जयंती शाळेत शिकवत नाहीत , हे मात्र खोटेच आहे. असेल अशी कुणाची शाळा, तर त्या शाळेवर केस घालावी .

मोहन भागवतनीही पाहिला मूवी.
https://timesofindia.indiatimes.com/entertainment/hindi/bollywood/box-of...

चित्रपटाच्या शेवटी काँग्रेस पक्षाला कुठून कुठून देणग्या आल्या त्याचे संदर्भ आहेत.

गम्मत म्हणजे , राजकीय पक्षांना देणग्या कुठून आल्या, हे गोपनीय ठेवायचा अधिकार मात्र आताच्या मोदी सरकारने बहाल केला, बरोबर ना ?

कोन्स्पिरसी थिअरी कामयचं लोकांना आकर्षित करीत आली आहे.
अगदी हिस्ट्री channel सारखी मातब्बर चानेल्स सुद्धा अशा थिअरी प्रमोट करत असतात कधी राजकीय व्यक्तीमत्वान्बद्दल, कधी इस पूर्व काळातील विज्ञान प्रगती दाखवून. जोडीला सो कॉल्ड संशोधनाचे दाखले दिलेले असतात, जसे राजकीय पार्श्वभुमी असणाऱ्या चित्रपताना दिले जातात

त्यामुळे फिल्म बनली आहे, चानेल वर आले आहे , मला थरारक वाटले म्हणून खरे , असे मी तरी म्हणणार नाही

ताशकंद फाईल बघितला.

आवडला असे म्हणता येणार नाही मला.

चित्रपट म्हणून चांगला बनलाय. मिथुन व श्वेता दोघांचीही कामे उत्तम झालीत.

पण चित्रपट खूपच पोलिटिकली मोटिव्हटेड बनलाय.

सुरवातीला मृत्यू कसा व का झाला असावा यावर खल करणारा चित्रपट शेवटी मृत्यूचे थेट फायदे ज्यांना झाले
त्यांच्यावर जास्त फोकस करतो. ज्यांना थेट फायदे झाले त्यांनीच मृत्यू घडवून आणला हे नेहमीच खरे असेल असे नाही.

CIA व KGB ने त्या काळात पुढे त्रासदायक ठरू शकतील असे कित्येक लोक उडवले हे त्यांच्या उघड झालेल्या फाईल्समधून बाहेर आलेले आहे.

त्याला अनुसरून शास्त्री व भाभा हे दोघे nuclear पॉवर व बॉम्ब च्या खूप जवळ पोचले होते म्हणून त्यांना एलिनीनेट केले गेले ही एकच थिअरी मला सुसंगत वाटली.

नेहरुननंतर शास्त्रीनची पंप्रपदी निवड जेष्ठतेला डावलून झाली होती असा चित्रपटात उल्लेख आहे. शास्त्रीनंतर इंदिरेची निवड हीसुद्धा जेष्ठतेला डावलून झाली होती हेही चित्रपटात येते.

म्हणजे जेष्ठतेला डावलणे हा काँग्रेसचा परिपाठ होता, पक्षातील लोकांनी शास्त्रीनवर अविश्वास ठरावही आणला होता. हेही चित्रपटात आलेय. इंदिरेला पुढे आणायचे असते तर शास्त्रीना सहज बाजूला करता आले असते. त्यांना मारायची त्या वेळेस तरी गरज नव्हती हेमावैम. शास्त्रीनची निवड ते नेहरूंचे अनुयायी होते, गांधीजींची विचारसरणी अंगिकरणारे होते, म्हणजेच काँग्रेस नेतृत्वाच्या विचारसरणीत फिट बसणारे होते म्हणून केली गेली होती. त्यांना बाजूला करणे तितके कठीण झाले नसते, जरी युद्धानंतर ते लोकप्रिय झाले असले तरीही हेमावैम.

शास्त्री तसेही पंप्र म्हणून निवडणुकीला सामोरे गेले नव्हते की ज्यामुळे ते ताकदवान होऊन इंदिरेला पुढे आणण्यात अडथळे येतील. आणि इंदिरा पंप्र झाली तेव्हा काँग्रेस नेत्यांनी तिची संभावना गुंगी गुडीया अशी केली होती हे वाचलेय.

असे असतानाही तिच्या कारकिर्दीत kgb व तिचे कसे साटेलोटे होते हे दाखवून चित्रपट पोलिटिकली मोटिव्हटेड केला.

दिग्दर्शकाने त्याला याबाबत विचारले असता मी अँटी काँग्रेस म्हणून प्रसिद्ध आहे असे उत्तर दिलेय. Happy

बाकी हा देश फक्त नेहरू गांधींचा का? शास्त्रीनचा का नाही हा प्रश्न योग्य वाटला.

जे बालपणापासून 2 ऑक्टोबर ला शास्त्री जयंती साजरी करताहेत त्यांना ___/\___. मला शाळेत शास्त्रीनवर एक धडा असून सुद्धा तेही 2 ऑक्टोबरचे हे कधीही आठवले नाही, ते कुणी कधी आठवून दिले नाही. त्यांची प्रतिमा कायम एक शांत सज्जन व्यक्ती म्हणूनच डोक्यात राहिली. चित्रपटात प्रथमच त्यांचे भाषण प्रत्यक्ष पाहिले आणि ते जितके ऋजु दिसत तितकेच ते कठोर होते हे लक्षात आले. गेल्या 4-5 वर्षात शास्त्री जयंती कानावर पडतेय.

अमेझॉन प्राईम वर गली बॉय बघितला, प्रचंड आवडला.

रणवीर एक साधारण मुलगा वाटतो. वेळ आल्यावरही त्याचे एका मिनिटात rapper मध्ये आपोआप रूपांतर होत नाही, तसे होण्यासाठी तो दिवसरात्र ध्यास घेताना दाखवलाय. हे खूप आवडले. नाहीतर इतर हिरो माईकसमोर येताच अगदी कसलेले गायक बनतात, काहीही मेहनत न करता.

अलियाला फारसे काम नाही, तिच्याजागी कुणीही चालली असती. insecurity मुळे पजेसीव झालेली गर्लफ्रेंड चांगली साकारलीय, एकच चांगला प्रसंग मिळालाय, आईबाबांना तिचे गुपित कळते तेव्हाचा.

एमसी शेरचे कामही खूप आवडले. शेवटी त्याचे नाव पुकारून नंतर तो बाद म्हणून सांगतात तेव्हाचा त्याचा अभिनय प्रचंड आवडला.

मुराद त्याच्या बाबाला मी कुणीतरी आहे, माझी ओळख आहे व ज्यामुळे ती ओळख मिळाली मी तेच काम पुढे करणार हे सांगणारा सिन पण खूप छान जमलाय. डोळ्यात पाणी आले पाहताना. उपेक्षित पालकांच्या पोटी जन्माला आलेली व स्वतः समोरही उपेक्षित आयुष्य उभे आहे हे बघणाऱ्या मुलांना अचानक दिसलेला आशेचा किरण किती धाडसी बनवतो...

अलियाला फारसे काम नाही, तिच्याजागी कुणीही चालली असती. insecurity मुळे पजेसीव झालेली गर्लफ्रेंड चांगली साकारलीय, एकच चांगला प्रसंग मिळालाय, आईबाबांना तिचे गुपित कळते तेव्हाचा.>>
आलिया परफेक्ट कास्टींग आहे. पजेसीव असली तरी प्रॅक्टिकल आहे. त्याच्यासोबत वाहवत न जाता स्वतः चे शिक्षण करियर यावर फोकस आहे. तो साथीदार म्हणून हवा आहे आणि तोच हट्ट आणि प्रेम आहे.

मला पण गली बॉय ऍमेझॉनच्या कृपेने बघता आला. भयानक आवडला. सगळ्यांची कामे सुंदर. थिएटरमध्ये बघायला हवा होता. अमृता सुभाषने पण काम छान केले आहे.

एक दोन छोटे गुफ अप वाटले. पण तेवढं चालायचंच.

गुगल प्ले वर किंवा टाटा स्काय शोकेस वर 120 रु रेंटल मध्ये मिळतो का बघा.
अर्थात प्राईम रिन्यू केले तर वर्षभर बर्याच इतर गोष्टी पण बघता येतील.

Pages