चित्रपट कसा वाटला - ३

Submitted by टीना on 11 April, 2017 - 16:44

या आधीचा धागा : http://www.maayboli.com/node/48143
हिंदी/मराठी/इंग्रजी चित्रपट कसा वाटला याबद्दलचे हितगुज.
आधीच्या धाग्यावर प्रतिसादांनी २००० चा टप्पा ओलांडल्यामुळे हा नवा धागा यापुढील चर्चेसाठी..

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

केसरी सिनेमाच्या कथेवरची वेबसिरीज आहे नेफ्लिवर. ती चांगली वाटतेय.>> मोहीत रैना ची discovery jeet वर टेलिकास्ट व्हायची.. छान आहे

नेफ्लि वर सध्या भूत, पिशाच्च, अतींद्रिय शक्ती यांचा सुळसुळाट झालेला आहे. >>>>> येस्स काल ७०६ पाहिला नेफ्लि वर हाच विषय आहे.

पिक्चर ओके आहे. अतुल कुलकर्णी आहे म्हणून बघायला घेतला. तो एक पोलिस अधिकारी दाखवलाय. दिव्या दत्ता सायकिअ‍ॅट्रीस्ट असते (वाटत नाही ती डॉ. पण दाखवलीये आता :फिदी:) तिचा सर्जन नवरा (मोहन आगाशे) गेले काही दिवस गायब झालेला असतो. त्याची केस अतुल कडे येते. त्यातून घडलेली ही स्टोरी. दोघांच्या हातून पूर्वी घडलेले गुन्हे या त्यांच्यात समान धागा आहे. त्यात काही कारणाने त्यांचा संबध एका लहान मुलाशी येतो ज्याच्या अंगात भूत शिरलेले असते. त्याला कशी मुक्ती मिळते, त्यात हे दोघे कसे अडकतात याची ही स्टोरी.

Netflix plans in India start at Rs 500 and go up to Rs 800. Amazon's Prime Video is available for Rs 129 per month and Rs 999 for one year. The fees ranging btwn 500 - 800 varies according to the number of users /devises. मी TV आणि iPad अशा दोन divices वर पहाते त्यामुळे माझी फीस 699/month आहे

कोणाला 'बर्ड बॉक्स' आणि 'द क्वाएट प्लेस' मध्ये खूप साम्य आहे असं वाटलं का? खूप गोष्टी समान आहेत

कलंकः

माधुरी: अजुन देवदास मोड मध्येच आहे असे वाटते.
अलिया भट : कथ्थक म्हणजे नुसते उड्या मारणे आणि चेहर्‍यावर भुवया आकुंचित करून नाचणे न्हवे.
संजय दत्तः फुक्कट्ट आहे.

सोनाक्षी: उग्गीच
वरुणः भरपुर अभिनय

काल Hidden Figures नावाचा सुंदर सिनेमा पाहिला. ५०-६० च्या दशकात अमेरिकेत नासात काम करणार्‍या तीन अ‍ॅफ्रो-अमेरिकन स्त्रियांची सत्यकथा आहे. कॅथरिन जॉन्सन, मेरी जॅक्सन, डोरोथी व्हॉन.
अत्यंत हुशार, तीक्ष्ण बुद्धीच्या या तिघींना कामाच्या ठिकाणी सतत वर्णभेदाला तोंड द्यावं लागलं; त्यांच्या पात्रतेच्या मानानं हलकी कामं करावी लागली; तरीही त्याबद्दल गळे काढत न बसता त्या ठामपणे आपली योग्यता संधी मिळेल तिथे सिद्ध करत राहिल्या.
नासातर्फे १९६२ साली जॉन ग्लेनला अवकाशात पाठवण्यात आलं; तो पृथ्वीभोवती ठराविक कक्षेत फिरणारा पहिला अंतराळवीर ठरला. या प्रोजेक्टसाठी नासात विविध पातळीवर जी कामं सुरू होती त्यात अनेक 'मानवी कम्प्युटर्स' काम करत होते. विविध क्लिष्ट गणिती आकडेमोडी, समीकरणं सोडवणे हे त्यांचं मुख्य काम. त्यात अनेक स्त्रिया होत्या; कृष्णवर्णीय स्त्रियाही होत्या.

कृष्णवर्णीय स्त्रियांसाठी जेवणाची वेगळी जागा, वेगळी टॉयलेट्स, त्यांनी हात लावलेल्या कॉफीपॉट्समधून इतरांनी कॉफी न घेणे इत्यादी प्रसंग, तपशील अगदी सहजगत्या पण खूप भेदकपणे दाखवले आहेत. ते पाहताना आत कुठेतरी खूप तुटतं; पण त्याचवेळी तिघींची सकारात्मकता खूप भिडते.
या तिघींचं गणिती, इंजिनिअरिंग ज्ञानाचं नाणं खणखणीत असल्यानं त्या श्वेतवर्णीय वरिष्ठांना हळूहळू आपल्या कामाचं महत्व कसं पटवत गेल्या, त्याची कथा आहे.

जॉन ग्लेनच्या मोहिमेसाठी कॅथरीन जॉन्सननं अनेक महत्वाची गणितं केली; पुढे अपोलो-११च्या मोहिमेतही गणिती आकडेमोडीची प्रमुख जबाबदारी तिनंच पेलली.
डोरोथी व्हॉन तेव्हा अगदी नवीन असलेल्या आयबीएम मेनफ्रेमवर काम करणारी पहिली महिला ठरली.
मेरी जॅक्सन नासाची पहिली अ‍ॅफ्रो-अमेरिकन महिला एरोस्पेस इंजिनिअर ठरली.

सिनेमा मुळीच चुकवू नये असा आहे. कथा इतकी गुंगवून ठेवणारी आहे, की त्यापुढे सिनेमा म्हणून त्यात काही चुका असतीलच तरी त्याकडे दुर्लक्ष होतं. अगदी केविन कोस्नरकडेही ( Blush ) माझं दुर्लक्ष झालं.

वेड्डिंगचा शिनिमा पाहिला. आवडला
सुनील बर्वे ,काळसेकर , मुक्ता , रुचा इनामदार ,साटम : सहज अप्रतीम अभिनय
चित्रपट पकड घेतो पण अनावश्यक उपकथानकांमुळे लांबतो.
क्लायमॅक्स आलाच नाही.
पटकथा , संवाद : हलके फुलके , सुंदर

सिनेमा मुळीच चुकवू नये असा आहे. कथा इतकी गुंगवून ठेवणारी आहे, की त्यापुढे सिनेमा म्हणून त्यात काही चुका असतीलच तरी त्याकडे दुर्लक्ष होतं.>>>>+१

ललिता प्रिती, थोडक्यात छान रिव्ह्यू लिहिला आहे. बघायची प्रचंड उत्सुकता निर्माण करण्याएव्हढा प्रभावी.

कुठे पहिला? Nefli किंवा prime वर आहे का?

मला पेट सीमेटरी चा रिव्ह्यू द्या.1989 पेक्षा चांगला/वाईट?
एकंदर भीती फॅक्टर किती आहे?कथा पकड घेते का?
(स्पोईलर: व्हिक्टर पॉस्को आहे का?)

छान लिहलंय ललिता-प्रीती.
मला वाटतं जर एवढं चांगलं लिहणार असाल आणि ३+ परिच्छेद होणार असतील तर वेगळा धागा काढावा.

हिडन फिगर्स - अप्रतिम चित्रपट
बाथरूम वापरण्यावरून ती बॉसला सुनवते तो
कोर्टातला आपली बाजू मंडतांचा
आणि जेव्हा ती सेक्रेटरी म्हणते मला तुझ्याबद आदर आहे तेव्हा ती म्हणते की असं तुला वाटतंय

उभे राहून टाळ्या वाजवावे असे हे प्रसंग

ललिता-प्रीति, छान लिहीले आहे. हिडन फिगर्स सुंदर पिक्चर होता.

द ग्रीन बुक बघितला नसशील तर तो ही बघ. वर्णभेद पण वेगळ्या स्वरूपात.

कुठे पहिला? Nefli किंवा prime वर आहे का? >>> टीव्हीवर पाहिला. &Prive चॅनलवर अनेकदा छान छान सिनेमे दाखवतात.

ललिता-प्रिती: पुस्तक वाचले आहेस की नाही? >>> नाही ना! पण आता मिळवून वाचणार. (इ-पुस्तकवाचनाची सवय लावून घेण्याची नितांत गरज आहे मला!)

मला वाटतं जर एवढं चांगलं लिहणार असाल आणि ३+ परिच्छेद होणार असतील तर वेगळा धागा काढावा. >>> वेगळ्या धाग्यासाठी आणखी मोठा मजकूर हवा असं मला वाटतं. पण सविस्तर लिहायला वेळ नव्हता.

द ग्रीन बुक बघितला नसशील तर तो ही बघ >>> नाही पाहिलेला... नक्की बघेन.

क्लायमॅक्स आलाच नाही. >>>>>>>> म्हणजे काय पशुपत?
Submitted by सूलू_८२ on 16 April, 2019 - 17:23

गोष्टीत कोणतितरी समस्या , संघर्ष असतो .. जो विविध कारणांमुळे तणाव वाढवत जातो.. ज्याचे निराकरण होण्याचे प्रसंग ही नाट्यमयता वाढवण्याची ठिकाणे असतात. या चित्रपटात समस्याही फार गंभीर नव्हती आणी ती सोडविण्याची प्रक्रियाही रंगतदार नव्हती.

या चित्रपटात समस्याही फार गंभीर नव्हती आणी ती सोडविण्याची प्रक्रियाही रंगतदार नव्हती. >>>>>> ओहो अस होत तर. धन्स पशुपत Happy

हॉटेल मुंबई पाहिला. पाकिस्तानी अतिरेकी जे मुंबईत २६/११ला हल्ला करायला आले होते ते कसे गरीब, भुलवलेले तरुण आहेत असे थोडे दाखवण्याचा प्रयत्न वाटला, त्यातला एक घरी आई-वडिलांशी बोलताना रडतोय, एक गाणे गातोय वगैरे.
बाकी सिनेमा अगदीच सुमार. चाळीत राहणारा देव पटेल कामाला जाताना बायकोला गुडबाय किस तोसुद्धा दाराबहेर करून जातो वगैरे दृष्ये सिनेमा कृत्रिम बनवतात. अनुपम खेरचा शेफ पण बळच गंभीर वाटला.

कलंक चा ट्रेलर पाहून वाटते की मुवी जास्त काय खास नसणार
नेहमी प्रमाणे बडी दुकान फिका पकवान.>>>
बडा घर पोकळ वासा असा आहे चित्रपट. भव्य दिव्य सेट, झगमगीत कपडेपट, नाचगाणी पण कुठेही मनाला भिडत नाही. चित्रपटाची प्रत्येक फ्रेम सुंदर दिसण्याची दक्षता घेतली आहे. पण चित्रपट पाहून झाल्यावर आठवणीत राहील असं काहीच नाहीये. कियारा अडवाणी आणि कृती सनोनचे आयटेम साँग तर अगदी खुपते त्या १९४० च्या काळात Sad ते हुस्नाबाद शहर तर विनोदीच आहे, मोठ्या मोठ्या हवेल्या, राजस्थानी गल्ल्या, घाट, व्हेनिसला लाजवतील असे gondola आणि कालवे, नद्या, बर्फाच्छादित पर्वत, खोल दर्‍या सगळं एका ठिकाणी! मै प्रेम की दीवानी हू मधल्या सुंदरनगरची आठवण आली, तिथेही समुद्र, पर्वत, हिमवर्षाव सगळं एकाच शहरात होतं Happy आणि ते बुलफायटिंग महान विनोदी आहे. तो सगळा प्रकार एका कड्याच्या टोकावर घडतो,बाजूला खोल दरी, बुलने धडक दिली की माणूस जाऊन सरळ दरीतच पडतो, मधे काही कुंपण, संरक्षक कठडे वगैरे प्रकारच नाही Happy

Pages