Submitted by टीना on 11 April, 2017 - 16:44
या आधीचा धागा : http://www.maayboli.com/node/48143
हिंदी/मराठी/इंग्रजी चित्रपट कसा वाटला याबद्दलचे हितगुज.
आधीच्या धाग्यावर प्रतिसादांनी २००० चा टप्पा ओलांडल्यामुळे हा नवा धागा यापुढील चर्चेसाठी..
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
काल &जरा हटके बघितला.
काल &जरा हटके बघितला.
फार आवडला असं नाही पण नेटाने बघितला. ठीक वाटला . शेवट फारच फिल्मी .
सिद्धार्थ मेनन आवडतोच , शिवानी रंगोळेचा पहिलाच चित्रपट आहे , पण तिचा वावर कमाल आहे.
खूप क्युट , गोबर्या गालाची दिसते. तिने आस्थाचं बेरिंग बरोब्बर पकडलयं
प्राक्तन नावाचा बंगाली
प्राक्तन नावाचा बंगाली चित्रपट पाहिला. खुप सुंदर...शेवटाला डोळ्यातुन पाणी आले. नक्की पहा. युटुब वर आहे.
अंजली_१२ - Imago ( इमेगो)च्या
अंजली_१२ - Imago ( इमेगो)च्या रेकमंडेशन साठी आभार. मला अतिशय आवडला. अगदीच सांगावी अशी कथा नसलेला, नवीन दिग्दर्शक, नवीन अनोळखी पहिल्यांदा काम करणारे कलाकार, छोट्या खेड्याची पार्श्वभूमी आणि तरीही अतिशय सुंदर सिनेमा. ही दिगदर्शक जोडी कोल्हापूरची आणि नवीन आहे, लेकीन भाई लंबी रेसके घोडे है ।
नेटफ्लिक्सचा मराठी सिनेमा '15
नेटफ्लिक्सचा मराठी सिनेमा '15 ऑगस्ट' नक्की पहावा असा आहे. चाळीत साजऱ्या होणाऱ्या 15 ऑगस्टच्या झेंडा वंदनाचं त्याबरोबर घडणाऱ्या घटना प्रसंगांचं हलकेफुलके चित्रण आहे. सगळ्यांची काम उत्तम. अगदी एका 7-8 वर्षाचा मुलगा आहे त्याच्यासकट सगळेच भारी. नेहमी वैभव मांगले डोक्यात जातो, पण या सिनेमात त्याचं काम आवडलं. दिगदर्शक ( नीट टाइप करता येत नाहीए) आणि लेखकाने छोटी कॅरेक्टर्स पण उत्तम रंगवली आहेत. आवडला. एकदा नक्की पहावा असा आहे.
माणिकर्णिका - ओके आहे. काही
माणिकर्णिका - ओके आहे. काही सीन्स उत्तम.
डॅनी स्वताला कटप्पा समजत आहे बहुतेक.
प्राक्तन म्हणजेच जलेबी हिंदी
प्राक्तन म्हणजेच जलेबी हिंदी मधील. ओरिजिनल चांगला असावा.
माणिकर्णिका - ओके आहे. >>>>
माणिकर्णिका - ओके आहे. >>>> मला अजिबात आवडला नाही. कंगना रानावतच्या दिगदर्शन आणि अभिनयाचं कौतुक सगळीकडे वाचलं, पण मला अभिनय अजिबात आवडला नाही. अगदी टिपिकल फिल्मी फालतू सिनेमा वाटला
नेटफ्लिक्सचा मराठी सिनेमा '15
नेटफ्लिक्सचा मराठी सिनेमा '15 ऑगस्ट' नक्की पहावा असा आहे. >>> बघायचा आहे हा पण नेटफ्लिक्स घ्यायला लागेल. मृण्मयीच्या आईचं काम माझ्या भाचीने केलंय. एक महीना नेटफ्लिक्स घेणार आहोत मग बघता येईल.
नेटफ्लिक्सचा मराठी सिनेमा '15
नेटफ्लिक्सचा मराठी सिनेमा '15 ऑगस्ट' नक्की पहावा असा आहे. >>>> हो काल ट्रेलर बघितला. कन्फ्युज होते बघू की नाही. मृण्मयी खूप आवडत नाही पण बघेन आता तुमच्या रेकमेंडेशन मुळे
प्राक्तन म्हणजेच जलेबी हिंदी
प्राक्तन म्हणजेच जलेबी हिंदी मधील. ओरिजिनल चांगला असावा. >>> पण मग ओरिजिनलचे शिर्षक चांगलच गंडलय. जलेबीत कुठेच प्राक्तन आहे असं नाही वाटलं उलट त्याच्या अगदी उलट आहे - आपण घेतलेले निर्णय आणि ते निभावणे.
प्राक्तन कुठे बघता येइल?
प्राक्तन you tube वर बघता
प्राक्तन you tube वर बघता येईल .
मी पहिला. सुंदर आहे पण मला हिरोइनची हेअर style अजिबात नाही आवडली सतत विस्कटलेली असते .
हिरोच्या बायकोचे काम केलेली हिरोइन फारच cute आहे.
मी पण पाहिला प्राक्तन . आवडला
मी पण पाहिला प्राक्तन . आवडला. केसांच्या बाबतीत अश्विनीशी सहमत!
>> प्राक्तन कुठे बघता येइल?>>
>> प्राक्तन कुठे बघता येइल?>> यु ट्युब
15 ऑगस्ट पहिला. मृण्मयी ने
15 ऑगस्ट पहिला. मृण्मयी ने चांगली अकटिंग केली आहे. तो चित्रकार पण छान अभिनय करतो. मांगले ला नेहमी बाहेर जसा वागतो तसे वाग म्हणून सांगितले असावे. अतिशहानपणा जमलाय त्याला.
मी पण पाहिला १५ ऑगस्ट. संथ
मी पण पाहिला १५ ऑगस्ट. संथ वाटला. बर्याच ठिकाणी रेंगाळत होता. पुढे ढकलत पाहिला. आदिनाथ मस्त दिसलाय.
जंगली बघितला, नाही आवडला.
जंगली बघितला, नाही आवडला. बरेच संवाद समजले नाहीत. विद्युत त्या टायगर सारखा तिबेटी दिसतो. लहान मुलांसाठी ठीक आहे. पूजा सावंत माहूत असते पण हत्तीवर बसण्याशिवाय बाकी काही करताना दिसत नाही. फिगर दाखवण्यापलिकडे तिला काही काम नाही. अतुल कुलकर्णीने हा रोल का केला असेल. हत्तींचंं भावविश्वही फार दाखवलेलं नाही. तस्करी यापेक्षा खूप वरच्या पातळीवर होत असणार, चित्रपटात सगळं बालिश दाखवलं आहे. वैताग आला बघून.
१५ ऑगस्ट पाहिला. बराच चांगला
१५ ऑगस्ट पाहिला. बराच चांगला घेतलाय असं वाटेपर्यंत शेवटी माती खाल्ली. अगदीच पाणी घातलेला, प्रेडिक्टेबल शेवट आणी तो सुद्धा पटकन गुंडाळून टाकलेला. दिक्षीत बाई, चांदीचा चमचा घेऊनच अमेरिकेत आल्यामुळे, अमेरिकेत येऊन शिक्षण वगैरे घेणार्या मध्यमवर्गीय मुलांच्या परिस्थितीविषयी काहीच माहिती नसावी.
केसरी चित्रपट छान आहे अक्षय
केसरी चित्रपट छान आहे अक्षय कुमार एक नंबर
काल 'इक लडकी को देखा तो ऐसा
काल 'इक लडकी को देखा तो ऐसा लगा' बघायचा प्रयत्न केला. पहिल्या अर्ध्या तासात तरी काही पकड नाही घेतली. कॉन्ट्ररी टू पॉप्युलर ओपिनियन, माझं सोनम कपूर विषयी काही वाईट मत नाहीये (तसच कंगना राणावत बद्दल काही खास मत सुद्धा नाहीये
). पण तरी अजून सिनेमा काही खास वाटला नाहीये.
विद्युत त्या टायगर सारखा
विद्युत त्या टायगर सारखा तिबेटी दिसतो.
>>> कसली खोडसाळ कमेंट आहे.
मी पण पाहिला १५ ऑगस्ट. संथ
मी पण पाहिला १५ ऑगस्ट. संथ वाटला. बर्याच ठिकाणी रेंगाळत होता. पुढे ढकलत पाहिला. आदिनाथ मस्त दिसलाय.>>+१
विद्युत त्या टायगर सारखा
विद्युत त्या टायगर सारखा तिबेटी दिसतो.
>>> कसली खोडसाळ कमेंट आहे.
तिबेटी दिसतो असे म्हणण्यात काय खोडसाळ आहे? टायगरच्या आईच्या बाजूने तिबेटी लाईनेज आहे असे वाचले होते, त्याची आई हीरॉईन होती तेव्हा . त्यामुळे त्याच्यात तो लूक आलाय. चांगला दिसतो तोही लूक. मला आवडतो हा मुलगा.
विद्युतबद्दल व्यक्तिगत माहिती नाही. पण तो व टायगर थोडेफार सारखे दिसतात. त्याचाही लूक खूप छान व फिटनेस दाखवणारा आहे.
१५ ऑगस्ट पाहिला. टिपिकल
१५ ऑगस्ट पाहिला. टिपिकल फिल्मी स्टोरी. तो अमेरिकन मुलगा त्या टुकार पेंटरपेक्षा नक्कीच चांगला वाटला, दिसायला पण. हात अडकलेला लहान मुलगा गोड आहे. गाडीत म्हटलेली कविता चांगली वाटली.
बाकी सिनेमा खूप बोर आहे, फास्ट फॉरवर्ड करत कसाबसा पाहिला. दुःखात सुख म्हणजे नेटफ्लिक्स वर असल्यामुळे फुकट आहे.
Dumbo पाहिला. सुंदर कल्पना
Dumbo पाहिला. सुंदर कल्पना आणि सादरीकरण.
लहान मुलांना नक्की दाखवावा असा आहे..
Dumbo पाहिला. सुंदर कल्पना
Dumbo पाहिला. सुंदर कल्पना आणि सादरीकरण.
लहान मुलांना नक्की दाखवावा असा आहे..°>>>>> कशावर पाहिला
मी रोमिओ अकबर वॉल्टर बघितला.
मी रोमिओ अकबर वॉल्टर बघितला. चांगला आहे. जॉन कॅन ऍक्ट!!!
Dumbo मी बघितला. जुना प्रचंड आवडला होता, आणि नव्याकडूनही तितक्याच अपेक्षा होत्या. ठिकठाक वाटला.
यावर्षीचा मी बघितलेला सगळ्यात बेस्ट चित्रपट म्हणजे मर्द को दर्द नाही होता! नक्की बघा!
कशावर पाहिला>>> थिएटर मधे !
कशावर पाहिला>>> भारता बाहेर थिएटर मधे !
भारतात रिलिज झाला का माहित नाही..
रोमिओ अकबर वाँल्टर
रोमिओ अकबर वाँल्टर सुरवातीपासूनच बोर
शेवटला थोडा लक्ष वेधून घेणारा
हा चित्रपट देशाबद्दल आहे त्यामुळे आलोचना करणार नाही
बाँबेरिया पाहिला. अजिबात
बाँबेरिया पाहिला. अजिबात आवडला नाही.
१५ ऑगस्ट बघत होतो. पण खूप
१५ ऑगस्ट बघत होतो. पण खूप रेंगाळल्याने बंद केला. आदिनाथची एण्ट्री झाली तिथेच.
नेफ्लि वर सध्या भूत, पिशाच्च, अतींद्रिय शक्ती यांचा सुळसुळाट झालेला आहे. अगदी अमानवीय धागा झाला आहे नेटफ्लिक्सचा. आपली आवड लक्षात ठेवून रिकमण्डेड मूव्हीज, सिरीज समोर आल्याने तसे वाटत असेल का ?
स्पार्टाकस वेबसिरीज नेमका काय प्रकार आहे हा ? हा तर सॉफ्ट पॉर्नचाच प्रकार वाटला. तेच तेच तेच आणि तेच फक्त. हिंसाचार सुद्धा भयाण आहे.
केसरी सिनेमाच्या कथेवरची वेबसिरीज आहे नेफ्लिवर. ती चांगली वाटतेय.
Pages